' चमत्कार की विज्ञान: सुस्थितीत राहिलेले हे १० मृतदेह पाहण्यासाठी जगभरातून गर्दी होते – InMarathi

चमत्कार की विज्ञान: सुस्थितीत राहिलेले हे १० मृतदेह पाहण्यासाठी जगभरातून गर्दी होते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुठल्याही प्राण्याचं आयुष्य हा जन्म आणि मृत्यू या दरम्यानचा प्रवास असतो. जन्मलेल्या प्राण्याचा मृत्यू हा अटळ आहेच! भारतीय संस्कृतीत जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टींशी संबंधित बऱ्याच प्रथा- परंपरा अजूनही कायम आहेत.

मृत्यू आणि त्या नंतरचे जीवन याविषयी मनुष्याच्या मनात अपार कुतुहल दिसून येते आणि पूर्वीपासूनच त्या रहस्यावरुन पडदा उठवण्याचा प्रयत्न त्याने केला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सामान्यतः मृत्यू नंतर काही वेळातच कुठल्याही प्राण्याचे शरीर खराब होऊ लागते. वेळीच त्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर दुर्गंधी, रोगराई पसरण्याची शक्यता असते.

 

death inmarathi

 

परंतु काही लोकप्रिय व्यक्तींचे मृतदेह अनेक शतकांपासून जतन करून ठेवण्यात आले आहेत. त्या काळात उपलब्ध असणाऱ्या सर्व उपायांचा वापर करून, मृत शरीर खराब होण्यापासून वाचवून वर्षानुवर्षे जतन करून ठेवण्यात आले आहेत.

असं करण्यामागे बरीच कारणे सांगितली जातात. एक तर आपली प्रिय व्यक्ती किमान निर्जीव स्वरूपात तरी आपली सोबत करेल किंवा मृतदेह जतन करून ठेवल्याने ती व्यक्ती परत जिवंत होईल! असे कित्येक गैरसमज या प्रथेमागे असू शकतात.

परंतु जगामध्ये आज ही बरेच जुने मृतदेह जतन करून ठेवण्यात आले आहेत. त्यातील बरेचसे मृत शरीर हजरो वर्षांपूर्वी चे असून ही सुस्थितीत आहेत! चला तर मग जाणून घेऊयात यातील काही प्राचीन मृतदेहांबद्दल.

१. सेंट झिता

 

dead bodies inmarathi

 

इटली मधल्या लुका भागातील ‘बैसिलिका डि सैन फ्रेडिआनो’ येथे संत झिता यांचं मृत शरीर जतन करून ठेवण्यात आलं आहे. त्या एक कॅथलिक संत होत्या आणि गरजू लोकांची देखभाल करायच्या.

लोकांची अशी मान्यता आहे की इ.स १२७२ मधे जेव्हा झिता यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्या घरावर एक चमकदार तारा दिसून आला.

पुढे इ.स.१५८० मधे त्यांचं दफन केलेलं मृत शरीर दफनभूमीतून काढण्यात आलं. आश्चर्य म्हणजे, ते मृत्यूच्या ३०० वर्षानंतर सुद्धा सुस्थितीत होतं!

१६९६ ला त्यांना संतपद बहाल करण्यात आलं. आज ही त्यांचं मृत शरीर त्यांच्या मूळ गावी ठेवण्यात आलं आहे.

२. जॉन टोरिंगटन

 

dead bodies inmarathi1

 

इ.स १८४६ ला इंग्रज अधिकारी उत्तर- पश्चिम पॅसेज च्या शोधातील मोहिमेत सहभागी होता. परंतु या संशोधनादरम्यान अवघ्या २२ व्या वर्षी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृत्यू नंतर त्याचं शरीर कॅनडातील आर्क्टिक मधील बरेन टुंड्रा येथे दफन करण्यात आलं. १९८४ ला दफनभूमी स्थलांतरण करताना जॉन ची कबर सुद्धा खोदण्यात आली. त्या वेळी त्याच मृत शरीर जशास तसं दिसून आलं.

जवळपास १४० वर्ष जमिनीत असून सुद्धा शरीराच विघटन झालं नव्हतं. त्या वेळी या बातमीचा बराच गवगवा झाला होता.

३. ला डोंसेला

 

dead bodies inmarathi2

 

एक तरुण इंका महिलेचा अँडीस पर्वतावर एका धार्मिक रीती रिवाजाने बळी देण्यात आला. ही घटना युरोपियन दक्षिण आफ्रिकेत येण्यापूर्वी काही काळ पूर्वीच झाली होती. या महिलेला कोका वनस्पतीची पानं देण्यात आली होती.

पर्वतावर बर्फाने गोठून या स्त्रीचा मृत्यू झाला असावा. सुमारे ५०० वर्षानंतर या स्त्रीचं मृत शरीर पाय आखडून घेतलेल्या स्थितीत अँडीस पर्वतावर सापडलं.

पुरातत्व संशोधकांच्या मते मृतदेहाची कुठल्याच प्रकारे झीज झाली नव्हती.

===

हे ही वाचा – या रहस्यमय गोष्टी पाहून मानवाच्या अज्ञात इतिहासाबद्दल तुम्हीही विचारात पडाल!

===

४. डॅशी -डॉरझेव इटिगेलोव्ह

 

dead bodies inmarathi3

 

डॅशी डॉरझेव इटिगेलोव्ह हे एक बुद्ध भिक्खू होते. इ.स १९२७ मध्ये ध्यानधारणा करताना कमळाच्या मुद्रेतच त्यांचं निधन होतं.

त्यांच्या शेवटच्या दोन इच्छा होत्या. एक म्हणजे ज्या अवस्थेत त्यांचं निधन होईल त्याच स्थितीत त्यांना दफन केलं जावं .. आणि दुसरी म्हणजे दफनानंतर बऱ्याच वर्षांनंतर त्यांच मृत शरीर परत जमिनीतून बाहेर काढण्यात यावं!

मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे दफन करण्यात आलं. परंतु त्यांची दुसरी इच्छा पूर्ण करण्यासाठी बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा मृत शरीर परत वर काढण्यात आलं तेव्हा, डॅशी डॉरझेव इटिगेलोव्ह यांची ध्यान मुद्रा स्थिती कायम होती आणि मृत शरीराची झीज सुद्धा झाली नव्हती.

तिथल्या बुद्ध संतांनी त्या मृत शरीराला पवित्र देह जाहीर करून रशियातील बुराटिया मधील ऑर्डन पॅलेस मंदिरात जतन करून ठेवण्यात आलं आहे.

५. लेडी जिन झुई

 

dead bodies inmarathi4

 

ही जगातील सर्वात जुन्या ममी पैकी एक आहे.लेडी जिन झुई ही राजघराण्यातील एका मंत्र्याची पत्नी होती.लेडी दाई या नावाने सुद्धा ती प्रसिद्ध होती.

ख्रिस्तपूर्व सन १६३ मधे तिचं निधन झालं. त्यावेळी तिचं मृत शरीर जतन करून ठेवण्यात आलं होतं. अनेक शतकांनंतर सुद्धा त्या मृतदेहाच्या नसांमध्ये रक्त आढळून आलं! तिचं शरीर आणि इतर वस्तू चीन मधल्या हुनान संग्रहालयात ठेवण्यात आलं आहे.

शास्त्रज्ञांनी तिच्या मृत शरीराची ऑटोप्सी करून तिचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं असण्याचा निष्कर्ष काढला.

६. रोसलिया लोम्बर्डो

 

dead bodies inmarathi5

 

सिसलीची राजधानी पार्लेमो मध्ये रोसलिया लोम्बर्डो या दोन वर्षीय मुलीचं मृत शरीर जतन करून ठेवण्यात आलं आहे. इ.स.१९२० मधे न्यूमोनिया ने या मुलीचं दुर्दैवी निधन झालं.

नंतर या मुलीच्या पित्याने तज्ञ लोकांच्या मदतीने आपल्या मृत मुलीचे शरीर सुरक्षित रित्या जतन करून ठेवलं. त्या साठी त्यांनी अल्कोहोल, सैलीसाईलीक आम्ल आणि ग्लिसरीनचा वापर केला.

आजतागायत हे मृत शरीर जतन करून ठेवण्यात आलं आहे.

===

हे ही वाचा – जगाच्या इतिहासातील या रहस्यमय मृत्यूंचा अखेर छडा लागला…

===

७. व्लादिमिर लेनिन

 

dead bodies inmarathi6

 

सोव्हिएत संघाचे नेते लेनिन यांचं १९२४ मधे निधन झालं. तत्कालीन सोव्हिएत सरकारने येणाऱ्या पिढीला लेनिन पासून प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचं मृत शरीर जतन करण्याचा निर्णय घेतला.

त्यांचं मृत शरीर चांगलं ठेवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या आम्लानी अंघोळ घालण्यात येते, तसेच वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शन आजही दिली जातात. याचा परिणाम म्हणजे त्यांचं मृत शरीर एखाद्या जिवंत व्यक्ती प्रमाणे दिसतं!

रशियातील ‘रेड स्क्वेर’ इथल्या त्यांच्या समाधी स्थळी त्यांचं मृत शरीर जतन करण्यात आलं आहे.

८. टोलुंड मॅन

 

dead bodies inmarathi9

 

डेन्मार्कमधील जटलँड पेनिनसुला येथे टोलुंड मॅन चं मृत शरीर काळजीपूर्वक जतन करून ठेवण्यात आलं आहे.

वैज्ञानिकांच्या मते, टोलुंड मॅन चा मृत्यू इसवी सन पूर्व चौथ्या शतकात झाला असावा. हे शरीर ज्या माती मध्ये ठेवलं आहे त्यात, मृत शरीर बऱ्याच काळा पर्यंत सुरक्षित जतन करण्याचा गुण असावा.

हा मृत देह इसवी सन पूर्व ३३५९ ते ३१०५ दरम्यान चा आहे.

९. ओटझी

 

dead bodies inmarathi8

 

इटलीच्या दक्षिण टेयरॉल भागात थंडी मुळे आज पर्यंत हे मृत शरीर सुरक्षित आहे. इसवी सन पूर्व ३३५९ ते ३१०५ वर्षांपूर्वीपासून असलेली ही युरोपातील सर्वात जुनी ममी आहे.

हे मृत शरीर ताम्रयुगातील असण्याची शक्यता आहे. मृत शरीरावरील कपडे गवत आणि चामड्याचे बनले आहेत. या शिवाय एक कुऱ्हाड, चाकू, तरकस सारखी हत्यारं सापडली आहेत.

===

हे ही वाचा –  ब्रूस लीचा मृत्यू : आजदेखील न सुटलेले कोडे, वाचा त्याविषयीची धक्कादायक माहिती

===

१०. संत फ्रान्सिस झेवीयर

 

dead bodies inmarathi7

 

संत फ्रान्सिस यांचे मृत शरीर जुन्या गोव्यातील ‘बेसिलिका ऑफ बोम जीसस’ येथे सामान्य अवस्थेत ठेवण्यात आले आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ४६० वर्षांपासून कुठल्याही लेप, मसाले यांचा वापर न करता सुद्धा हे मृत शरीर आजही तेजस्वी दिसते.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?