Site icon InMarathi

या १२ चित्रपटांतला विज्ञान आणि कल्पनाशक्तीचा मिलाफ प्रत्येकातील सुप्त वैज्ञानिकाला जागं करतो

time travel movies inmarathi

thequint.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपण एखाद्या व्यक्तीला दिलेली वस्तू परत घेता येते. पण, आपण कोणाला दिलेला वेळ परत घेता येत नाही. त्यामुळेच आपल्याला काही लोकांकडून हे वाक्य ऐकायला मिळत असतं की,

“त्यावेळी मी ही हे केलं असतं, तर बरं झालं असतं.” किंवा “आमच्या वेळी हे क्षेत्र नव्हतं. नाही तर, मी सुद्धा त्या क्षेत्रात करिअर केलं असतं.”

या पलीकडे जाऊन काही लोकांमध्ये या गोष्टीचं सुद्धा कुतूहल आहे की, जर का वेळेला मागे नेऊन ठेवता आलं असतं तर किती छान झालं असतं.

Nostalgia ही एक अशीच गोष्ट आहे. थोड्या वेळासाठी कधी आपल्या बालपणीच्या गोष्टी कुठे वाचण्यात किंवा बोलण्यात आल्या की आपण मनाने त्या ठिकाणी मनाने लगेच पोहोचतो.

मधल्या काळात आपण बघितलं की, लोकांना 90’s चे टीव्ही सिरियल्स, गाणी, जाहिराती यांबद्दल फारच आत्मीयता निर्माण झाली होती.

२०१८ मध्ये एक तामिळ सिनेमा आला त्याचं नाव होतं ‘९६’.

 

indiaglitz.com

 

त्या सिनेमाची कथा ही एक १९९६ च्या शाळेत एकत्र असलेल्या दोघांची होती जे की reunion मध्ये परत भेटतात आणि त्यांची अर्धवट राहिलेली प्रेमकहाणी पूर्ण होते.

लोकांना हा सिनेमा प्रचंड आवडला होता.

मागच्या काही वर्षातील काही हिंदी सिनेमे जर बघितले तर लक्षात येईल की, जवळपास प्रत्येक सिनेमा मध्येच कथा सांगण्याची पद्धत ही फ्लॅशबॅक आणि आज या दोन कलखंडातच सांगितली जाते.

वेळेचा प्रवास लोकांना पडद्यावर बघायला आवडतो असं म्हणता येईल. मग सिनेमा बॉलीवूड चा असो किंवा हॉलीवूड चा. हॉलीवूड चे असे बारा चित्रपट आहेत ज्यामध्ये वेळेचा हा प्रवास खूप छान दाखवण्यात आला आहे.

ह्यापैकी कोणताही सिनेमा बघितला की एक प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो की, “कधी तरी आपल्याला भूतकाळात जाऊन एखादी गोष्ट बदलणं शक्य होईल का ?”

हे बारा सिनेमे कोणते ते आपण बघूया:

 

1. Looper (2012) :

 

empiremovies.com

 

हा एक ऍक्शन सिनेमा आहे जो की वेळेभोवती फिरतो.

हा सिनेमा बघितल्या नंतर आपल्याला असेच प्रश्न पडतात की, पडद्यावर घडणाऱ्या जुलमी गोष्टी काही काळ मागे जाऊन बदलता आल्या असत्या तर किती छान झालं असतं.

ब्रूस विल्स आणि जोसेफ गॉर्डन-लेवीट यांनी या सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा सिनेमा त्यावेळी जास्त आवडतो जेव्हा हे दोघे कलाकार मध्ये एक काळ लोटल्यानंतर भेटतात.

एमिली ब्लन्ट च्या असण्याने कथेला एक पूर्णत्व प्राप्त होतं. सिनेमा एक मेसेज नक्की देतो तो म्हणजे हा की, कधी कधी अति उतावीळ पणाची शिक्षा ही भविष्यात सुद्धा आपली पाठ सोडत नाही.

 

2. About Time (2013) :

 

 

timepilgrims.com

 

हा सिनेमा म्हणजे एक रिफ्रेशिंग लव्हस्टोरी आहे. सिनेमाच्या नायक Domhnall Gleeson च्या हे लक्षात येतं की त्याच्या मध्ये एक विशेष शक्ती आहे ज्याने की तो वेळेचा प्रवास करू शकतो.

ही शक्ती त्याच्या वडिलांकडून त्याला आलेली असते. तो त्या वेळेत परत जाऊ शकतो जो त्याने आधी स्वतः जगला आहे.

त्याच्या या शक्तीमुळे तो कायम आनंदी असतो कारण वेळेचा हा उलट प्रवास केल्यानंतर त्याला त्याची प्रेयसी Rachel McAdams ही भेटत असते आणि त्यामुळे Domnhall हा सतत खूप आनंदी राहत असतो.

पण, गोष्टी तेव्हा अवघड होत जातात जेव्हा हिरो ला त्या काळातील सगळे नियम पाळावे लागतात.

त्याच्या समोर असा पेच तयार होतो की तो एक तर वेळेच्या मागे जाऊ शकतो किंवा त्याला एका शिक्षेसाठी तयार व्हावं लागणार असतं.

एक गोड, विचार करायला लावणारी ही प्रेमकथा प्रत्येकाला आवडेल अशीच आहे.

 

3. 12 Monkeys (1995) :

 

gonewiththetwins.com

 

ब्रुस विल्स यांचा हा ऍक्शन पट हा एका फ्रेंच सिनेमावर आधारित आहे. हा पूर्ण सिनेमा हा स्टील फोटोग्राफी ने शुट केलेला आहे. वेळेचा प्रवास हा या सिनेमाचा सुद्धा आत्मा आहे.

एक येणारं संकट वेळेचा आधार घेऊन कसं टाळता येईल त्या भोवती सिनेमाचं कथानक फिरत राहतं. विल्स हे एक साथीचा रोग थांबवण्यासाठी प्रयत्न करत असतात.

वेळेचा प्रवास साध्य करताना त्यांना एक भविष्यात घडणारी एक भयानक घटना दिसते ज्याची की ते स्वतः साक्षीदार असतात.

अश्या घटना दिसूनही तुम्ही त्या बदलू शकतात का ? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रवास म्हणजे हा सिनेमा आहे.

 

4. The Terminator (1984) :

 

uk.newononetfix.com

 

Arnold Shwarzenegger यांचा सिनेमा म्हणजे वेळेचा प्रवास दाखवणाऱ्या सर्वोत्तम सिनेमांपैकी एक आहे. सिनेमाची कथा साधारणपणे अशी आहे की, व्हीलन हा भविष्यातील काही घडामोडी बदलणार असतो.

अरनॉल्ड यांनी एका क्रूर रोबोट चा रोल केला आहे या सिनेमा मध्ये. या रोबोट ला असं एक टास्क दिलं जातं की त्याने भविष्यात जन्म घेणाऱ्या एका हिरोची हत्या करायची.

गोष्टी तेव्हा अजून जास्त अवघड होतात जेव्हा त्या भविष्यात जन्म घेणाऱ्या मुलाचे वडील सुद्धा वेळेचा प्रवास करतात आणि त्या मुलाच्या आईला वाचवायचा प्रयत्न करतात!

आणि ते दोघंही या रोबोट च्या प्रेमात पडतात आणि गोष्टी अजून गुंतागुंतीच्या होऊन बसतात.

 

5. Somewhere in Time (1980) :

 

ricksrealreel.blogspot.com

 

Christopher Reeve आणि Jane Seymour ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या हा सिनेमा एका अभिनेत्री आणि नाटककार यांची प्रेमकथा आहे.

ते दोघं एकमेकांना एका हॉटेल मध्ये भेटतात जी की त्यांना वेळेचा प्रवास करण्याचा एक फॉर्म्युला सांगणार आहे. Reeve यांनी एका मॉडर्न व्यक्तीचा रोल केला आहे.

Seymour चा एक फोटो बघून Reeve यांना अचानक देवत्वाची भावना येते.

असं का होतंय हा विचार करण्यासाठी ते संमोहन शास्त्राच्या आधारे ज्या काळात Seymour ज्या काळात एक अभिनेत्री होती त्या काळाचा अभ्यास करतात आणि त्या काळात सुद्धा ते भेटले होते हे त्यांना कळतं.

तुम्ही हा सिनेमा कितीही वेळेस बघू शकतात आणि प्रत्येक वेळी तुम्हाला ते दोघं भेटल्यावर तितकाच आनंद होईल याची खात्री आहे.

 

6. Source Code (2011) :

 

the-satya.blogspot.com

 

Jake Gyllenhall हे या सिनेमाचे नायक आहेत. ह्या सिनेमात त्यांनी अश्या व्यक्तीचा रोल केला आहे ज्यांना की सतत एक अपघात दिसत असतो आणि तो ते अपघात जगत असतात.

तो अपघात रोखण्याचा ते प्रत्येक वेळी प्रयत्न करत असतात पण ते त्यांना शक्य होत नसतं. प्रत्येक वेळी वेळ कमी पडत असल्याने अपघात आधीच घडून जात असतो.

Michelle Monaghan ही त्यांच्या प्लॅन मध्ये सहभागी होण्यास तयार होते. काही दिवसातच आभासी जगात घडणारी ही गोष्ट Jake यांना प्रत्यक्षात वेगवेगळ्या वेळी दिसायला लागते.

सिनेमाचा शेवट हा एका अनपेक्षित घटनेने केला आहे. Jake Gyllenhaal हे वेळेचा प्रवास कसा साध्य करतात ? हे वाचण्यापेक्षा पडद्यावर बघणं किती तरी जास्त आनंददायी आहे

 

7. Deja Vu (2006) :

 

flixwatch.co

 

Denzel Washington ची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात त्यांनी एका गुप्तहेराची भूमिका केली आहे.

हा गुप्तहेर एक अश्या आतंकवादी हमल्याचा शोध घेत असतात ज्यासाठी त्यांना एका सॅटेलाईट यंत्रणेची मदत घ्यावी लागते. या यंत्रणेच्या आधारे त्यांना वेळेचा प्रवास करणं शक्य असतं.

Paula Patton ही ती महिला आहे जिचा आतंकवादी हमल्यात मृत्यू झाला होता तीच व्यक्ती Denzel Washington यांना भूतकाळात एका ठिकाणी दिसते.

त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी Denzel हे ती वेळ बदलण्याचा प्रयत्न करतात ज्यावेळी हा अतिरेकी हमला झाला होता. असं करून त्यांना Paula Patton यांना वाचवण्याची इच्छा असते.

 

8. The Lake House (2006) :

 

gwcmodela.com

 

Keanu Reeves आणि Sandra Bullock यांची सुंदर प्रेमकथा असलेला हा सिनेमा आहे. या सिनेमा मध्ये हे दोघंही आत्मा असतात आणि ते एकमेकांना शोधत असतात.

हे दोघं एकाच lake house मध्ये राहिलेले असतात पण वेगवेगळ्या वेळी. दोन्ही कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने हा सिनेमा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे.

Lake House मध्ये राहून गेलेले Keanu Reeves आणि Sandra Bullock हे एकमेकांशी वेळ आणि जागेच्या पलीकडे जाऊन कधीही बोलू शकत असतात आणि हीच या सिनेमाची सर्वात सुंदर गोष्ट आहे.

9. Intersteller (2014) :

 

wallpaperstock.net

 

हा सिनेमा म्हणजे सायन्स फिक्शन आहे. सिनेमाची कथा इतकी गुंतागुंतीची आहे की एकदा पाहण्यात कधी कधी हा सिनेमा समजतच नाही.

पण, त्यात असलेल्या स्पेस शिप्स, टनेल्स या गोष्टी आपल्याला खूप आनंद देऊन जातात. त्याशिवाय, वडील आणि मुलीची ही एक सुंदर कथा आहे ज्यामध्ये वेळ आणि जागा यांचे बंधन न ठेवता एकमेकांशी कधीही बोलू शकत असतात.

Matthew McConaughy आणि Jessica Cha stain या दोघांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा एका अश्या तंत्रज्ञानाची माहिती देतो जे की पृथ्वी ग्रहाला एका संकटापासून वाचवणार आहे.

 

10. Back to the Future (1985) :

 

pics.alphacoders.com

 

८० च्या दशकातील हा सिनेमा  कितीदा ही बघण्यासारखा आहे. मायकेल जे. फॉक्स यांनी केलेलं मार्टी हे पात्र प्रत्येकाला आपल्या प्रेमात पाडतं.

मार्टी हा त्याच्या पालकांच्या समोर त्यावेळी येतो जेव्हा ते high school मध्ये शिकत असतात. हा विचार सुद्धा आपल्याला किती रोमांचित करणारा आहे.

कथेमध्ये त्यावेळी अजून जास्त गंमत होते जेव्हा मार्टी ची आई त्याच्या प्रेमात पडते. हा सिनेमा म्हणजे १९५० च्या दशकाची एक सुंदर सफर आहे.

Nostalgia चा अनुभव काय असतो ते हा सिनेमा पहिला की लगेच अनुभवता येतं.

 

11. Safety Not Guaranteed (2012) :

 

youtube.com

 

Mark Duplass आणि Audrey Plaza या दोघांच्या भूमिका असलेला हा सिनेमा एक विनोदी सफर आहे.

दोघंही अश्या परिस्थितीत सापडतात आणि नकळत प्रेमात पडतात त्यावेळी जेव्हा टाईम ट्रॅव्हल मशीन च्या सफरीवर ते सोबत निघालेले असतात.

Duplass हे त्या सफरीसाठी एक साथीदार शोधत असतात तेव्हा त्यांची Audrey यांच्याशी भेट होते. या प्रवासावर जाताना Duplass यांनी एकच अट ठेवली होती की,

सोबत कोणतंही शस्त्र असू नये. म्हणूनच ते या मिशन ला “safety not guaranteed” असं म्हणत असतात.

Plaza ही एक पत्रकार असते आणि तिची एक छान कथा लिहिण्याची इच्छा असते. तिची अजून एक इच्छा असते की भूतकाळात जाऊन काही गोष्टी बदलाव्यात.

दोन वेगवेगळ्या इच्छा असणाऱ्या या दोन व्यक्ती एकत्र येतात आणि प्रेक्षकांना एका विनोदी सिनेमाची भेट देतात.

 

12. Midnight in Paris (2011) :

 

netflix.com

 

हा सिनेमा म्हणजे वेळ हा विषय डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली अजून एक nostalgic करणारी कथा आहे.

Owen Wilson यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात त्यांनी एका लेखकाची भूमिका केली आहे ज्यांचे विचार कायम भूतकाळातच असतात.

विल्सन हे याच विचारात पूर्ण पॅरिस शहरभर पायी चालतात आणि जीवनात झालेल्या बदलांना नावं ठेवत असतात. काही दिवसातच ते १९२० च्या पॅरिस मध्ये पोहोचतात.

ते त्या काळातील नामवंत कलाकार Gertrude Stein, Salvador Dali यांना भेटतात. हा अनुभव त्यांना खूप काही शिकवून जातो कारण हे नामवंत कलाकार आनंदी राहणारे होते.

विल्सन यांच्या हे लक्षात येतं की, आपण ज्या परिस्थितीत आहोत त्यातच आनंद शोधायला शिकलं पाहिजे.

‘वेळ’ या विषयावरील काही सिनेमे हिंदीत पण तयार झाले होते पण तो प्रयत्न तितका जमला नाही असं म्हणावं लागेल.

जेव्हा हिंदीतील या विषयावरील सिनेमे डोळ्यासमोर आले की त्यापैकी जवळपास प्रत्येकाने या विषयाकडे केवळ विनोद बुद्धीनेच पहायचा प्रयत्न केला आहे.

कुतूहलाच्या नजरेने बघितलं तर किती तरी सुंदर सिनेमे तयार होऊ शकतात हे वरील हॉलीवूड च्या सिनेमांची माहिती वाचून आपल्या लक्षात आलं असेलच.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version