Site icon InMarathi

माणसाचं नाक किती प्रकारचे गंध ओळखू शकतं हे वाचून तुम्हाला धक्का बसेल

human nose smelling inmarathi

beliefnet.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सुगंध, गंध निरनिराळे सुवास सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात. इतकं की ह्या सुगंधाची वर्णनं साहित्यात आढळतात, कवींना देखील गंध ह्या शब्दाचा, ह्या जाणीवेचा मोह काव्यात गुंफायचा मोह आवरला नाही.

मराठी भाषा समृद्ध आहे हे कवी, लेखकांनी वेळोवेळी सिद्ध केलं आहे. ‘गंध फुलांचा गेला सांगून’, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात’, ‘त्या फुलांच्या गंधकोषी’ अशी एक ना अनेक गीते…

गंध, सुवास, सुगंध हे शब्द वापरून त्या गंधाला शब्दातून प्रत्यक्ष अनुभूती देण्याचं अनमोल काम ह्या कवींनी केलं आहे.

फुलांचा सुगंध, पहिल्या पावसाच्या सरींनी चिंब न्हाऊन निघालेल्या धरतीवरील मृदेचा सुगंध (ह्याला दुसऱ्या कुठल्याच सुगंधाची, इतर कशाचीच तोड नाही), गरम अन्नाचा दरवळ, अत्तर, सेंट, परफ्युम, डिओड्रंट असे अनेक गंध आपल्याला आवडतात.

 

 

त्यातही आपल्या आवडीचा गंध, नावडीचा गंध एवढच आपल्याला माहित असतं. पण, आपल्या घ्राणेंद्रियांना किती प्रकारचे गंध ओळखण्याची क्षमता आहे हे माहित आहे का तुम्हाला?

गुलाब, जाई-जुई, चमेली, मोगरा ह्यासारखी सुगंधी फुले, गरम गरम कॉफीचा सुवास, बटाटे वडे, भजी ह्यांचा तळतानाच सुटलेला घमघममाट, खमंग फोडणीचा वास हे आपल्याला हवेहवेसे वास आहेत.

तर काही नकोसे वासही असतात जसे नावडती भाजी, नावडता अत्तराचा किंवा परफ्युमचा गंध. काही उग्र वास आपल्याला नकोसे होतात.

ह्याशिवाय दुर्गंध असतात जे आपल्याला अज्जिबात हवेसे वाटत नाहीत. आपला हात किंवा हातरूमाल आपसूक नाकाकडे जातो. तोंड वाकड होतं.

 

thehealthsite.com

 

आता हे झालं आपल्याला माहित असणारे, नेहमीचे किंवा सवयीचे सुगंध आणि दुर्गंध ह्या दोन्हीच्या बाबतीत. पण, आता आपण जाणून घेऊया ह्याहून अधिक माहिती आपल्या घ्राणेंद्रियांच्या क्षमतेबद्दल, ज्यामुळे आपलं नाक ह्याहून कितीतरी अधिक गंध ओळखू शकतं.

मानवाची वास घेण्याची क्षमता खूप जास्त असते. तीव्र वास घेता येतो तसाच अतिशय मंद वास देखील घेता येतो माणसाला.

ह्यात प्रत्येकाची वास घेण्याची क्षमता कमी-जास्त असू शकते पण, वास घेता येतोच. फक्त काही अपवादात्मक परिस्थिती असतात जसे सर्दी!

 

 

सर्दी झाली की अज्जिबात वास घेता येत नाही. एरवी, ‘नॉर्मल’ परिस्थिती मध्ये माणूस किती प्रकारचे वास घेऊ शकतो माहितेय का?

मनुष्याची घ्राणेंद्रिये किती प्रकारचे गंध ओळखू शकते, माणूस किती प्रकारचे वास घेऊ शकतो ह्यासाठी अनेक संशोधने करण्यात आली. ह्या आधी असे प्रयोग झाले होते पण ठोस आकडा हाती लागला नव्हता.

शास्त्रज्ञांनी अंदाजे सांगितलं होतं की मनुष्य वेगवेगळ्या प्रकारचे १०,००० गंध ओळखू शकतो. पण आत्ताचे हे संशोधन वारंवार केले गेले, त्यात परिपूर्णता होती आणि सातत्याने, वारंवार केल्यानंतर हा ठोस निष्कर्ष काढण्यात आला आहे.

ह्या संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, मनुष्य वेगवेगळ्या स्वरूपाचे सुमारे १०,०००,०००,००,००० म्हणजेच सुमारे १० लाख कोटी इतक्या प्रकारचे वास ओळखू शकतो. म्हणजेच मानवच्या वास घेण्याची क्षमता खूपच जास्त असते.

ह्या संशोधनात अनेक प्रकारची द्रावणे तयार केली गेली होती, काही काही द्रावणे केवळ एकच होती तर काहींचा गंध जवळपास एक असणारा, अगदी हलकाच फरक असणारा अशी एकापेक्षा जास्त द्रावणे मिसळलेली होती.

सर्वसाधारण माणसांवर करण्यात आलेल्या ह्या प्रयोगात वेगवेगळा वास असणारी द्रावणे सहजतेने ओळखली आणि हलकाच फरक असणारी द्रावणे थोड्या कष्टाने, वेळ घेऊन ओळखण्यात आली.

अनेक प्रकारच्या ह्या द्रावणांमधून अतिशय भिन्न गंध असणारे तसेच दोन द्रावणांमध्ये किंचितसाच फरक असणारे सुद्धा गंध माणसांना ओळखता आले.

 

discovermagazine.com

 

ह्या प्रयोगासाठी साठी २४ ते ४८ वयोगटातील भिन्न भिन्न व्यक्तींची निवड करण्यात आली होती. हा खरंच अवघड प्रयोग होता.

इतकी द्रावणे घ्यायची म्हणजे त्यांचा शोध घ्यायचा, ती वेगवेगळी करायची, जवळ जवळचे गंध असणारी द्रावणं वेगळी करायची आणि लोकांना ती द्रावणे ओळखायला सांगायची! कठिणच होता हा प्रयोग!

खरंच १० लाख कोटी गंध आपण ओळखू शकतो ही खूपच अविश्वनीय आणि अकल्पनीय गोष्ट आहे. हा प्रयोग करणारे शास्त्रज्ञ म्हणतात,

१० लाख कोटी हा त्यांच्यासाठी देखील अविश्वसनीय आकडा होता. घ्राणेंद्रियाची श्वसन क्षमता तसेच मेंदुची संवेदन क्षमता ह्यांच्या ह्या गंध ओळखण्याच्या अफाट संख्येवर विश्वास ठेवणे खरंच कठिण जाते. त्यामुळेच हा प्रयोग वारंवार केला गेला आणि प्रत्येक वेळी तेवढाच आकडा आला.

म्हणजेच माणसाचं नाक खरचंच १० लाख कोटी इतक्या प्रकारचे वास घेऊ शकते. खरंच ही खूपच आश्चर्यकारक गोष्ट आहे. हा भला मोठा, अवाढव्य आकडा सगळ्यांनाच तोंडात बोटं घालायला लावणारा आहे.

 

islam.ru

 

आपल्या पंच ज्ञानेंद्रियांपैकी एक नाक किंवा घ्राणेंद्रिय आहे. ह्या सगळ्या ज्ञानेंद्रियांचे कार्य कसे चालते सगळ्यांनाच ठाऊक आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्या सगळ्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवायच्या हे यांचं काम.

घ्राणेंद्रिय देखील असेच कार्य करते. वायु द्वारे गंध नाकात घेते आणि त्या गंधाचे रेणू नाकातल्या रिसेप्टर्स् द्वारे मेंदू पर्यंत पोहोचवले जातात आणि मेंदू ह्या गंधातील विविधता ओळखू शकतो.

ह्या संशोधनामुळे अनेक गैरसमज कमी होतील. मानव गंध घेण्यासाठी इतर प्राण्यांच्या तुलनेने कमी पडतो, गंध घेण्यास मानव तितकासा सक्षम नाही अशा गैरसमजूतींना छेद जाईल, असा ठाम विश्वास शास्त्रज्ञांना आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version