ट्रम्प चं “अमेरिकन स्वदेशी” भारताच्या फायद्याचं! कसं? वाचा!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
सध्या चालू असलेल्या जागतिक राजकारणात अमेरिकेतील घडामोडी महत्वाच्या ठरत आहेत. नुकतंच राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्यामुळे अनिश्चिततेचं एक वेगळंच वलय निर्माण झालंय. ट्रम्प ह्यांच्या निवडणुकीच्या आधीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुद्धा निवडुन आले. पहिल्याच भाषणात ट्रम्प ह्यांनी अमेरिकेला स्वदेशीचा नारा दिला. ट्रम्प ह्यांच्या मते बाहेरील देशांमधून येणाऱ्या लोकांमुळे अमेरिकेत बेरोजगारी वाढत चालली आहे. ह्यासोबतच वाढता इस्लामचा दहशतवाद संपवण्यासाठी ट्रम्प ह्यांनी अमेरिकेत येणाऱ्या लोकांना प्रवेश निषिद्ध केला आहे.
ट्रम्प ह्यांनी काढलेल्या Executive order नुसार बाहेरील देशांमधून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. संख्येने 3 ते 3.5 लाख असलेले भारतीय कर्मचारी आता काळजीत आहेत. ह्या धोरणाचे पडसाद जगातील अनेक देशांवर पडले. काही देशांनी कोर्टात धाव घेतली तर काही देशांनी आश्रितांना जवळ केलं.
भारतीय तंत्रज्ञांसाठी कॅनडाचे पंतप्रधान पुढे आले. भारतीय कर्मचारी वर्ग खासकरून तंत्रज्ञान क्षेत्र – Techies ना आम्ही आश्रय देऊ त्यांना आमच्याकडे काम पोषक असं वातावरण निर्माण करून देऊ असं कॅनडाच्या पंतप्रधानांनी – Justin Trudeau नी जाहीर आवाहन केलं.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार त्यांनी सीरियाच्या आश्रितांचा दाखला देऊन “आम्ही निर्वासितांना आश्रय देण्यासाठी तयार आहोत” असं सांगितलं. नोव्हेम्बर 2015 पासुन कॅनडा ने 40000 सीरियन लोकांना आश्रय दिला होता. वेगवेगळ्या देशांच्या लोकांना आश्रय देण्यावरून ते सांगतात
तुमचा विश्वास कोणत्याही तत्वांवर असला तरी आम्ही तुम्हाला आश्रय देऊ करत आहोत कारण विविधता ही आमच्या बलस्थानांपैकी एक आहे.
कॅनडाच्या सरकार बरोबरच उद्योजकांनाही भारतीय तंत्रज्ञांचे वेध लागलेत. फँटसी 360 चे सीईओ शाफिन तेजानी ज्यांनी तब्बल 21 देशांत 40 स्टार्ट-अप्स सुरु केले असून त्यातून 669.80 कोटी रुपये उभे केले आहेत. भारतीय तंत्रज्ञानाबाबत बोलताना सांगतात..
“अमेरिकेचं धोरण आमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. भारतातील कौशल्य आम्ही आमच्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही ह्या कौशल्याचा पुरेपूर वापर करून घेऊ. आमच्याकडे आता नोकऱ्यांची विचारणा करणारे फोन्स सुद्धा सुरु झाले आहेत. आम्ही ह्या मनुष्यबळाचा वापर करून जागतिक कंपन्या उभ्या करू शकतो.”
नुकतंच मुकेश अंबानींनी NASSCOM च्या एका कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या धोरणाचा भारतावर कसा सकारात्मक प्रभाव पडू शकतो ते सांगितलं.
ट्रम्प ह्यांचा अमेरिकन स्वदेशी नारा भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्राच्या पथ्यावर पडू शकतो.
कार्यक्रमाबद्दल इकॉनॉमिक टाइम्स ने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत स्थित कर्मचारी वर्गात प्रामुख्याने तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना अमेरिकेच्या ह्या धोरणाचा फटका बसल्यास त्यांनी भारतात यावं. भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रात असलेल्या त्रुटींवर काम करून भारताची बाजारपेठ मजबूत करावी. अश्याने भारताचा प्रगतीचा वेग तर वाढेलंच पण त्यासोबतच भारतीय लोकांना बाहेर कामासाठी जावं लागणार नाही.
मुकेश अंबानी पुढे सद्यःस्थितीबद्दल सांगतात की चौथ्या औद्योगिक क्रांतीत माहिती – Data हा एक महत्वाचा घटक आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योगासाठी माहिती तयार करणारे आणि ती वापरणारे (creating and using data) ह्या दोन गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात व्हायला हव्यात. भारतात असलेल्या लोकसंख्येमुळे ह्या गोष्टींची चिंता नाही. म्हणुनच आताशा माहिती – data आता तेला एव्हढा महत्वाचा आहे. आपल्या देशात असणारी तंत्रज्ञान क्षेत्रातली मरगळ आणि त्रुटींमुळे आपल्या देशातील तंत्रज्ञ दुसऱ्या देशात जाऊन काम शोधतात. पण अंबानींनी वर्तवलेली ही शक्यता जर वास्तवात उतरली तर भारतीय तंत्रज्ञान सर्वात जास्त प्रगत असेल. म्हणजेच ‘अच्छे दिन आयेंगे!’.
आता बघायचं हे आहे की अमेरीकेतुन भारतीय कर्मचारी भारतात येतील का? आणि जर आले तर त्यांना उपयुक्त वातावरण मिळेल का?
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi