Site icon InMarathi

‘राम-श्याम’, ‘सीता-गीता’ अशा २०० जोड्या असलेलं केरळ मधलं हे गाव आहे औत्सुक्याचा विषय

twin town featured inmarathi

timesofindia.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

ख्रिस्तोफर नोलनचा ह्युग जॅकमॅन,क्रिस्टीयन बेल याचा आणि स्कारलेट जॉन्सन यांना घेऊन तयार केलेला प्रेशटीज सिनेमा आठवतो?

ख्रिश्चन बेले दाखवत असेलेले जादूचे प्रयोग आपल्या जुळ्या भावासोबत करत असतो,हे शेवट पर्यंत कळत नाही.

एक जुळी भावंड शेवट पर्यंत तो सस्पेन्स ताणून ठेवतात तर विचार करा एकाच गावात २०० पेक्षा जास्त जुळे भावंड असतील तर.?

ते जादूचे प्रयोग करणार नाहीत. पण २०० पेक्षा जास्त जुळी भावंडे म्हणजे कन्फ्युजन तर भयंकर असेल.

होय, अस गाव अस्तित्वात आहे आणि ते देखील भारतात! हे गाव जुळ्यांचं गाव म्हणून जगप्रसिद्ध आहे. ‘कोडीन्ही’ हेच ते जुळ्यांचं गाव.

 

ripleys.com

 

केरळ राज्याच्या उत्तरेला स्थित असलेलं या गावात जवळपास १५-२० हजाराची लोकसंख्या असेल.

इतर सामान्य गावा प्रमाणे कोडीन्ही पण सामान्यच आहे. चारही बाजूला वेढलेलं हिरवेगार भात शेती. भात शेती असल्याने या गावात बाराही महिने खाचरात पाणी साचलेले असते.

पावसाळ्यात तर एवढं पाणी साचलं जातं की कधी कधी या गावाचा इतरांशी संपर्क सुद्धा खंडित होतो.

या गावात आलात तर ड्युअल व्हिजन चा त्रास होतोय की काय असा भास व्हायला सुरुवात होईल.

दोन हजारच्या जवळपास या गावात कुटुंब आहेत. आणि तब्बल सव्वा दोनशे च्या आसपास जुळी भावंड या गावात आहेत.

 

dw.com

 

या गावात दर हजार बालजन्मामध्ये ४५ जुळी मुलं जन्माला येतात. जे जगभरच्या सरासरी पेक्षा ६ पट जास्त आहे. या गावातलं सर्वाधिक वयस्कर जुळे भावंडे आज ७५ वर्षाचे आहेत.

या गावात ‘कोंडीनी ट्विंस अँड किन्स असोसिएशन’ (TAKA) नावाची जुळ्यांसाठी एक संस्था सुद्धा आहे.

भारतात तसेच जगात जवळपास सगळ्याच शहरात विवाहाचे वय, करियर यासारख्या गोष्टींमुळे गर्भधारणा करण्यासाठी औषध आणि इतर उपचार घ्यावा लागतो!

तसेच टेस्ट ट्यूब बेबी सारखी कृत्रिम गर्भधारणेचे तंत्र सुद्धा अस्तित्वात आलेले आहे.

त्यामुळे या वैद्यकीय यशामुळे कृत्रिम रित्या जुळ्या बालकांना जन्म देणं आजच्या घडीला होऊ शकत.

परंतु, कोडीन्ही गावात नॉर्मल १८-२२ वयात तरुण तरुणी विवाहित होऊन सामान्यपणे कुठलीही कृत्रिम उपचार न घेता जुळ्यांना जन्म देत आहेत.

कुठल्याही उपचाराविना, कुठल्याही औषधांचा वापर न करता या गावात मोठ्या संख्येने जुळे जन्माला कसे येतात हा वैद्यकशास्त्राला न सुटलेलं एक कोड आहे.

 

scoopwhoop.com

 

कोडीन्ही गाव हे सांगितल्याप्रमाणे सामान्यच गाव आहे.

येथील लोक कोणताच विशेष असा आहार घेत नाही. शेती नैसर्गिक असल्या कारणाने धोकादायक औषध किंवा जंतुनाशके यांच्याशी त्यांचा संपर्क येत नाही.

तरी सुद्धा या गावात एवढे जुळे बाळ कसे जन्माला येतात हा डॉक्टरांना पडलेला प्रश्नच आहे.

काहींना हा कोडीन्ही च्या पाण्याचा गुण आहे असं वाटत. पण त्याला वैज्ञानिक तथ्य अस काहीही नाही.

केरळमधील जुळ्या मुलांच्या प्रसूतीमागील तथ्यांचा अभ्यास करणारे केरळस्थित डॉक्टर कृष्णन श्रीबिजू दोन वर्षांपासून कोंडीनी मधल्या मोठ्या संख्येने जुळ्या मुलांचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

त्याचे असे मत आहे की कागदामध्ये अधिकृतपणे नोंदविल्या गेलेल्या संख्येपेक्षा खेड्यातील जुळ्या मुलांची वास्तविक संख्या ही जास्त आहे.

श्रीबिजू म्हणतात, “माझ्या वैद्यकीय मतानुसार कोडीन्हीच्या ग्रामीण हद्दीत जवळपास ३०० ते ३५० जोड्या आहेत.”

 

2eyeswatching.wordpress.com

 

ऑक्टोबर २०१६मध्ये, सीएसआयआर-सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युकर बायोलॉजी, हैदराबाद,केरळ विद्यापीठातील फिशरीज अँड ओशन स्टडीज (KUFOS) तसेच

लंडन आणि जर्मनी विद्यापीठासह विविध संस्थांच्या संशोधकांच्या संयुक्त पथकाने या घटनेची उत्तरे शोधण्यासाठी गावाला भेट दिली.

त्यांच्या डीएनएचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी जुळ्या मुलांकडून लाळ आणि केसांचे नमुने गोळा केले.

हा अभ्यास एकाच वेळी कोडीन्ही, दक्षिण व्हिएतनाममधील हंग लोक समुदाय, नायजेरियातील इग्बो-ओरा आणि ब्राझीलमधील कॅन्डिदो गोडई या ठिकाणी केला गेला, जिथे जुळ्या मुलांची संख्या जास्त आहे.

KUFOS च्या प्रोफेसर ई.प्रीतम यांनी सांगितले की असे का होऊ शकते याबद्दल अनेक अनुमान आहेत. परंतु वैज्ञानिकदृष्ट्या काहीही सिद्ध झालेले नाही.

“बरेचजण हे अनुवांशिक असल्याचे सांगतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे की गावातील हवा किंवा पाण्याचे विशिष्ट घटक या घटनेस कारणीभूत ठरू शकतात.

 

thenewsminute.com

 

जिथे आमच्या अभ्यासाचा प्रश्न आहे तोपर्यंत आम्ही कोडीनीतील लोकांकडील नमुने गोळा केले आहेत.आणि इतर समाजांकडूनही नमुने गोळा करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

अद्याप या घटनेचे शास्त्रीय स्पष्टीकरण मिळालेले नाही.” असे डॉ.प्रीतम सांगतात.

ही प्रक्रिया आनुवंशिक नसल्याची काही उदाहरणाने सिद्ध होते. त्यापैकी एक प्रसीना ही सुकुमारण यांची एकुलती एक कन्या आहे.

त्याचे कुटुंब गेल्या दोन पिढ्यांपासून कोडीन्ही येथे वास्तव्यास आहे. त्याच्या कुटुंबात जुळे जन्म झाले नाहीत पण आता प्रसींना यांची मुलगी प्रसन्ना जुळ्यांची आई आहे.

सुकुमारण म्हणतात,

“आमच्या मुलीच्या लग्नानंतर ती आपल्या पतीबरोबर राहण्यासाठी कतारमध्ये गेली आणि वर्षातून एकदाच आमच्याशी भेटायला जात असे. दहा वर्षांपूर्वी जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हा ती जुळ्यांना जन्म देईल याची आम्हाला कल्पना नव्हती,”

वर सांगितल्या प्रमाणे कोडीन्ही मध्ये जुळ्यांसाठी TAKA नावाची संस्था आहे. ही संस्था जुळ्यांचं रजिस्ट्रेशन करून त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचे कार्य करते.

जुळ्यांचं संगोपन करणं हे आर्थिकदृष्ट्या कुटुंबाला आणि शारीरिक दृष्ट्या आईला अवघड कार्य आहे.त्यादृष्टीने TAKA हे गावात कार्य करत आहे.

इतकी जुळी भावंडे या छोट्याश्या गावात असल्याने गावात गोंधळ, गंमत होण्याचे बरेच प्रकार सारखेच घडत असतात.

 

2eyeswatching.wordpress.com

 

बहुतेक भावंडांची नावे सारखीच असतात व ते सर्वसाधारणपणे सारखेच कपडे घालत असल्याने पालकांचा सुद्धा कोण झोपले आहे आणि कोण खेळते आहे हे सांगताना गोंधळ उडतो.

शाळेत शिक्षकांचा सुद्धा असाच गोंधळ उडतो. पुष्कळदा ही भावंडे आजारी पण एकदमच पडतात. अर्थात त्यांच्यात फरक पण असतातच.

एकाला क्रिकेट आवडत असले तर दुसर्‍याला फुटबॉल आवडतो.

लवकरच देशातील तसेच आंतरराष्ट्रीय संस्था या गुपित मागचं रहस्य उलगडून दाखवतील असा विश्वास दाखवला जात आहे.

पण,आपल्या या वेगळेपणा लौकिक जगभर झाल्यामुळे कोडीन्ही चे गाववाले स्वतःला अभिमानास्पद गौरवान्वित समजत आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version