Site icon InMarathi

आज जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात होणारी प्लास्टिक सर्जरी ही प्रथम प्राचीन भारतात झाली होती!

plastic surgery sushrut inmarathi

indiatoday.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

मागे आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, की जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी ही भारतात झालेली. उदाहरण देताना त्यांनी पुराणातली गणपतीच्या मस्तक प्रत्यारोपणचं उदाहरण दिलं होतं.

त्यांच्यावर खूप टीका झाली. स्टँडअप कॉमेडियन त्यांची खिल्ली उडवू लागले. अशा अनेक घटना घडल्या.

पुराण कथांवर विश्वास असेल तर या गोष्टीचा तुम्हाला काही फरक पडणार नाही, पण नसेल तर मग तुम्ही ‘तथ्य नाही’ असं समजून ही गोष्ट सोडून द्याल.

मोदींनी दिलेलं उदाहरण हे चुकीचं होतं की नाही ही नंतरची गोष्ट. पण ज्या विधानासाठी त्यांनी हे उदाहरण दिलं ते विधान १००% खरं आहे.

 

 

पहिली प्लास्टिक सर्जरी ही भारतातच झालेली आणि ती केली होती आचार्य सुश्रुत यांनी!

वैद्यकीय इतिहासातला पहिला ग्रंथ म्हणून आयुर्वेदाला सर्वत्र मान्यता आहे. याच आयुर्वेदाच्या सुश्रुत संहिते मध्ये प्लास्टिक सर्जरी बद्दल सखोल लिहिलेलं आहे जे की आजच्या काळात सुद्धा लागू होतं.

ख्रिस्ताच्या जन्माच्या कैक वर्षांपूर्वी हिंदू धर्मातल्या प्रचलित वेदांची रचना केली गेली होती. चार वेदापैकी एक अथर्ववेद ज्यामध्ये आयुर्वेदाचा उल्लेख होतो.

 

chronicle.lu

 

आयुर्वेद जो भारतीयांच्या वैद्यकीय इतिहासाचा पाया आहे. त्यातले तीन मूळ लेखन जे आज ग्रंथ म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत-चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांग हृदया.

चरक संहिता : ज्यामध्ये विविध आजार आणि त्यावर उपाय म्हणून औषध यावर लिहिलं गेलं आहे.

सुश्रुत संहिता : ज्या मध्ये अवयवांचे प्रत्यारोपण यावर लिहिलं गेलं आहे.

तर अष्टांग हृदया मध्ये मानवी शरीरा बद्दल गाईडलाईन्स दिल्या गेल्या आहेत.

ख्रिस्त पूर्व ६०० मध्येच पहिली प्लास्टिक सर्जरी झालेली हे अनेक वेळा सिद्ध केलं गेलं आहे. तत्कालीन काशी म्हणजे आजच्याच वाराणसी मध्ये स्थायिक असलेल्या सुश्रुत यांनी केली होती.

 

quora.com

 

या दाव्याचे पुरावे दिल्लीच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी एक्झिबिशन मध्ये लावले गेले होते.

संशोधनकर्त्या पैकी एक एन.अय्यर म्हणतात,

“इतिहासात आपण साम्राज्यशाहीच्या अधीन राहिलो आहोत. त्यामुळे आपल्याला पाश्चिमात्य इतिहास हा आपल्या स्वतःच्या इतिहासापेक्षा जास्त शिकवला गेला. त्यामुळे आमचे प्रयत्न आहेत, की पश्चिमी देशांच्या आधी आपल्या देशात काय काय संशोधन झालं होतं ते पाहणं.”

उपलब्ध पुराव्याच्या आधारे प्लास्टिक सर्जरी ही सुश्रुत यांनी केली हे आपण पाहिले. सुश्रुत यांनी ही सर्जरी ‘फादर ऑफ मेडिसिन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रीसच्या हिप्पोक्रेटस याच्या कित्येक वर्षाआधी यशस्वी करून दाखवली होती.

 

newsgram.com

 

हेच कारण आहे की देशातल्या बऱ्याच वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण क्षेत्राचं नाव सुश्रुत आहे. सुश्रुत यांनी शल्य चिकित्सेचा प्रचार केला.

आज ज्याला अनस्थिसिया म्हणतात त्याची माहिती सुद्धा सुश्रुत यांनीच जगाला दिली.

सर्जरीच्या सुरुवातीला ते रोग्याला गुंग करण्यासाठी मदिरेचा वापर करायचे. या मदिरेमध्ये ते काही औषधी काढा टाकून रोग्याला बऱ्याच काळासाठी बेहोश करायचे. ज्यामुळे रोग्याला सर्जरीच्या वेळेस होणाऱ्या त्रासाचा अजिबात फरक पडत नसे.

यालाच भूल देणे असे म्हणतात आणि आधुनिक वैद्यकशास्त्र याला ‘अनस्थिसिया’ अस म्हणते.

सुश्रुत यांचा सुश्रुत संहिता हा ग्रंथ संस्कृत मध्ये आहे.

हा ग्रंथ पाच खंडामध्ये विभागला गेला आहे.पहिल्या खंडात ४६, दुसऱ्या खंडात १६, तिसऱ्या खंडात १०, चौथ्या खंडात ४० आणि पाचव्या खंडात ८ असे एकूण १२० अध्याय आहेत.

 

jagran.com

 

याच सुश्रुत संहितेमध्ये शस्त्रक्रिये वेळी लागणाऱ्या साधनाचा सुद्धा उल्लेख पाहायला मिळतो. ग्लेनॉईड साधन ज्याचा उपयोग तुटलेली अस्थी आणि अनावश्यक मांस काढायला केला जायचा.

असे जवळपास १०१ साधन आणि यंत्रांची माहिती या ग्रंथात आहे.

या यंत्रांना ६ भागात विभागले गेले आहे.

१.स्वस्तिकयंत्र

२.सदंशयंत्र

३.तालयंत्र

४.नाडीयंत्र

५.शलाकायंत्र

६.उपयंत्र

विशेष म्हणजे सुश्रुत संहितेमध्ये सुश्रुत यांनी प्रात्यक्षिक सुद्धा घेतल्याचा उल्लेख आहे. इतरांना म्हणजेच विद्यार्थ्यांना सर्जरीच्या स्टेप्स समजाव्यात म्हणून प्रात्यक्षिक करायची योजना सुद्धा होती. यासाठी सुश्रुत यांनी सर्जरीची विविध भागांमध्ये वर्गवारी केली होती.

भेद्यकर्म

छेदयकर्म

लेख्यकर्म

वैद्यकर्म

ऐस्यकर्म

अहर्यकर्म

विस्त्रवर्यकर्म

सिव्यकर्म

वैद्य जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवत असेल तेव्हा अवयव म्हणून कापण्यासाठी फळांचा वापर केल्याचा उल्लेख सुश्रुत संहितेमध्ये सापडतो.

 

harekrsna.com

 

तसेच पोट चिरायच्या प्रात्यक्षिक करतेवेळी पाण्याने भरलेली एखाद्या कातडी पिशवीचा वापर केला जाई. तसेच डोक्यावर सर्जरी करायच्या वेळेस केस साफ करण्याच्या प्रात्यक्षिक वेळेस मेलेल्या जनावरांच्या शरीरावरील केसाळ भागाचा वापर केला जात असे.

•सुश्रुत यांचं वैद्यक शास्त्रातील इतर योगदान.

१.सुश्रुत यांनी १२ प्रकारच्या अस्थिभंग (फ्रॅक्चर) आणि ६ प्रकारच्या हाडांच्या जागा बदलण्याच्या साशंका (डीसलोकेशन) यांची सखोल माहिती दिली आहे.

आजचे ऑर्थोपेडिक सर्जन आजसुद्धा सुश्रुत यांच्या या थिअरीचा आधार घेतात.

२.सुश्रुत यांनी ट्रॅक्शन, मॅनिप्युलेशन,स्टेबिलायझेशन,अपॉझिशन आणि पोस्टऑपरेटिव्ह फिजिओथेरपी या तत्त्वांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे.

३. केस गळती आणि गरज नसलेल्या केसांचं निवारण याबद्दलची थिअरी.

४.सर्जरी नंतर जखमा लवकर भरून याव्या यासाठी काही उपाययोजना सुद्धा सांगितल्या. जसं की सूज निवारण, इंडयुरेशन, शरीराला पुनः त्याच रंगात आणणे इत्यादी.

 

dharmawiki.org

 

सुश्रुत संहितेचे पहिले युरोपियन भाषांतर हेसलर यांनी लॅटिनमध्ये आणि जर्मनमध्ये मुलर यांनी १९व्या शतकाच्या सुरूवातीला प्रकाशित केले.

१९०७ मध्ये कलकत्ता येथे तीन खंडात संपूर्ण इंग्रजीमध्ये सुश्रुत संहितेच भाषांतर कविराज कुंजालाल यांनी केले.

सुश्रुताने मध्ययुगीन भारतात सर्वप्रथम शस्त्रक्रिया केली आणि त्या काळाला नंतर प्राचीन भारतातील ‘शल्यकाळातील शस्त्रक्रिया’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

सुश्रुतच्या अलौकिक बुद्धिमत्तेने प्रख्यात शल्यचिकित्सक अलेन व्हिप्प्पल यांनी पुढील वक्तव्य केले,

“सुश्रुत यांचं वैद्यकीय क्षेत्रातील योगदान पाहता सुश्रुत यांना मध्ययुगीन काळातला महान शल्य चिकित्सक मानले गेले पाहिजे.”

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version