' बटर, चीज म्हणजे शरीरासाठी अपायकारक असं म्हणत असाल तर हे वाचा म्हणजे गैरसमज दूर होतील! – InMarathi

बटर, चीज म्हणजे शरीरासाठी अपायकारक असं म्हणत असाल तर हे वाचा म्हणजे गैरसमज दूर होतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

चीज आणि बटर आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे फारच कठिण.

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चीज, बटर आवडतं. ब्रेड-बटर, सॅंडविच, पिझ्झा अशा विदेशी पदार्थांवर भरपूर चीज, बटर घालून खायचं हे तर असतंच!

पण, आपल्या कडचे पोळी, घावन, डोसा ह्यासारख्या पदार्थांबरोबर किंवा पदार्थावर देखील चीज किंव बटर घेऊन खाणे सगळ्यांनाच आवडते.

 

roti inmarathi
dunzo.com

 

पण, बरेच डाइटिशियन्स, डॉक्टर्स, जिम इन्स्ट्रक्टर्स् हे पदार्थ न खाण्याचा सल्ला देतात.

हे शरीरासाठी हानीकारक असतं, डेअरी प्रोडक्टस् मुळे कॅलरीज् वाढतात, वजन वाढतं, कोलेस्टेरॉल वाढतं अशा एक ना अनेक गोष्टी सांगितल्या जातात.

त्यामुळे चीज, बटर असले पदार्थ आवडत असतानाही खायचे की नही ह्याचा संभ्रम पडतो.

आज आपण ह्या लेखातून चीज, बटर बद्दल असणारे सगळे गैरसमज दूर करूया आणि आपले आवडीचे हे चीज, बटर मस्तपैकी खायला सुरवात करुया.

१. चीज किंवा बटर आहारातून वर्ज्य करावे असे सांगितले जाते पण चीज, बटर आहारातून वर्ज्य करायची काहीही गरज नसते, जे तंदुरुस्त असतात त्यांनी हे डेअरी प्रोडक्टस् बिनधास्त खावेत.

ज्यांचे कोलेस्टेरॉल जास्त असते, ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो त्यांनी हे पदार्थ कमी प्रमाणात खावेत.

चीजमध्ये कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस, जस्त, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी यासारखे १२ पोषक घटक असतात. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

 

cheese butter inmarathi
news-medical.net

 

त्यामुळे ह्यांचे सेवन करणे योग्य असते.

२. वजन कमी करण्यासाठी, ‘बॉडी मेंटेन’ ठेवण्यासाठी चीज, बटर असे डेअरी प्रोडक्टस् खाऊ नयेत असे सांगितले जाते!

पण मोझोरेला, टोफू आणि बटर यासारख्या पदार्थांमध्ये फॅटस् कमी असतात, ते जरूर खावेत कारण त्यांच्यामध्ये कॅल्शियम जास्त असते.

एका सर्वेक्षणानुसार असा अहवाल सादर केला आहे की दर १० पैकी ९ स्त्रीयांमध्ये आणि दर १० पुरुषांमध्ये ६ पुरुषांमध्ये कॅल्शियमची कमतरता असते.

चीज, बटर मधील प्रथिने आणि कॅल्शियम शरीराला उपयुक्त असते. स्नायुंना बळकटी मिळते. कॅल्शियमच्या समृद्धीमुळे हाडांना मजबुती मिळते. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रश्नच नाहीये!

 

cheese and calcium inmarathi
home.bt.com

 

उलट प्रथिने आणि कॅल्शियम ह्यामुळे बॉडी बिल्डिंग मधे ह्यांची नक्कीच मदत होऊ शकते. त्यामुळे चीज, बटर ह्यासारखे डेअरी प्रोडक्टस् आपल्या आहारात जरूर असावेत.

३. चीजमधे कॉंजुगेटेड लिनोलिक ऍसिड असते जे शरीरासाठी खूपच आवश्यक आहे. कॉंजुगेटेड लिनोलिक ऍसिड ह्या घटकामुळे कर्करोगाचा धोका खूपच कमी होतो.

त्याचप्रमाणे ह्या कॉंजुगेटेड लिनोलिक ऍसिड मुळे शरीराला आवश्यक ती चरबी मिळते (अनावश्यक फॅटस् नाही) त्यामुळे जाडेपण नाही तर, शरीर हेल्दी राहते.

त्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीसाठी चीज, बटर ह्यासारखे पदार्थ आहारात अवश्य असावेत.

४. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, चीज, बटर ह्यांसारखे पदार्थ इम्युनिटी सिस्टीम वाढवण्यास मदत करतात.

ह्या पदार्थांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे आजार रोखण्यास मदत होते.

तसेच जे उतारवयामधे बर्याच वेळा लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यास सुरवात होते, त्यांच्यात देखील रोगप्रतिकारक शक्ती योग्य त्या प्रमाणात वाढवण्यात मदत होते.

म्हणजेच आबालवृद्धांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे डेअरी प्रोडक्टस् खूपच उपयुक्त असतात.

 

amul butter inmarathi
youtube.com

 

५. चीज आणि बटर मधे थायरॉइड संप्रेरकांच्या वाढीस मदत करून व्हायरसला रोखण्याची क्षमता आहे. म्हणजेच थायरॉइडमुळे उद्भवणारे अती लट्ठपणा किंवा अती बारिक होणे तसेच इतर त्रास उद्भवत नाहीत.

म्हणजेच आहारात बटर आणि चीज ह्यांच्या समावेशामुळे थायरॉइड मुळे उद्भवणार्या विकारांचा धोका उद्भवत नाही.

६. बटर आणि चीज ह्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी हे मोठ्या प्रमाणावर असतं. व्हिटॅमिन डी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मेंदु आणि मज्जासंस्था ह्यांच्या आरोग्यास सहाय्य होते.

मधुमेहाच्या पातळीवर विटॅमिन डी मुळे नियंत्रण राहते. फुप्फुसांचे कार्य व्यवस्थित सुरू राहते ह्या व्हिटॅमिन डी मुळे, तसेच हृदय आणि रक्तवाहिन्या ह्यांचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते.

 

cheese and diabetics inmarathi
express.co.uk

 

७. ऑक्सलेटची लेव्हल वाढल्यामुळे कीडनी स्टोन हा विकार उद्भवतो, ज्यामुळे कंबरदुखी आणि लघवीचा त्रास होतो.

चीज आणि बटर ह्या दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनामुळे ऑक्सलेटची लेव्हल नियंत्रित राहते.

त्यामुळे किडनी स्टोन होण्याच्या त्रासापासून किंवा भीतीपासून स्वतःला मुक्त करण्यासाठी ह्या डेअरी प्रोडक्टस् चा आहारात जरूर समावेश करावा.

८. चीज आणि बटर हे शाकाहारी पदार्थ प्रथिनांनी युक्त असतात. ह्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि इतर खनिज द्रव्यांचा भरपूर साठा असतो.

तसेच इतर आधुनिक पदार्थांपेक्षा ह्या पदार्थांमधे मीठाचे प्रमाण कमी असते. चीज आणि बटर ह्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये नैसर्गिक फॅटस् असतात जे आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त असतात.

हे पदार्थ आपल्या दातांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. बटर आणि चीज ह्या डेअरी प्रोडक्टस् मध्ये चांगले बॅक्टेरिया असतात जे शरीराला खूपच उपयुक्त असतात.

 

cheese eating inmarathi
alphadentalteethtamers.com

 

९. बटर आणि चीज हे डेअरी प्रोडक्टस कार्बोहायड्रेडस् नी समृद्ध असतात. कार्बोहायड्रेट्स शरीराला आवश्यक ती ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात जी ऊर्जा दीर्घ काळासाठी उपयोगी येते.

त्यामुळे हे दुग्धजन्य पदार्थ सेवन करणे आवश्यक आहे.

ह्या गोष्टींमुळे चीज आणि बटर ह्यांचा आहारात जरूर समावेश करावा.

शरीराला प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स्, विटॅमिन डी, कॅल्शियम ह्यासार्ख्या अनेक गोष्टी ज्या आपल्या शरीराला आवश्यक आहेत त्या ह्या चीज आणि बटर मधून आपल्याला मिळतात!

ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते आणि साहजिकच शरीर निरोगी असलं की मनही प्रसन्न राहतं आणि असं असलं की साहजिकच आपण आनंदी राहतो.

अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच! त्यामुळे ह्या पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?