Site icon InMarathi

रामायणाच्या पडद्यामागील रामायण : राजकारण, आप्तजनांकडून त्रास…बरंच काही…

ramayan inmarathi 2

amarujala.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

रामानंद सागर. ‘नाम तो सुना ही होगा’. हो तेच. रामायण ची ओळख आपल्याला ज्यांच्यामुळे झाली तेच. भारतीयांच्या मनात रामानंद सागर म्हणजे रामायण हे समीकरण अगदीच फिट बसलं आहे.

त्यांचं मोठेपण फक्त हे सिरीयल तयार करण्यात नाहीये तर ह्या गोष्टीत सुद्धा आहे की, रामायण सादर करतांना ज्या गोष्टींबद्दल लोकांमध्ये भिन्न मत मतांतर आहेत, त्या गोष्टीबद्दल ते स्वतः त्यांनी जे दाखवलं आहे ते कोणत्या ग्रंथाच्या कितव्या श्लोकाच्या आधारे दाखवलं आहे इतपत माहिती देत असत.

खरं तर एका सिरीयल चा तो भाग प्रसारित झाल्यावर रामानंद सागर हे कोणाच्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाहीयेत. पण, तरीही कोणताही गैरसमज लोकांच्या मनात असू नये म्हणून ते स्वतः त्याबद्दल माहिती द्यायचे.

उगीच नाही रामानंद सागर ह्या व्यक्तीने भारतीयांच्या मनात एक विशेष स्थान मिळवलं आहे. पण, आपल्याला रामानंद सागर यांनी रामायण च्या आधी आणि रामायण साठी किती संघर्ष केला आहे ते माहीत आहे का?

 

desidime.com

 

प्रेम सागर ह्या रामानंद सागर ह्यांच्या मुलाने त्यांच्या आयुष्यावर ‘An Epic Life: Ramanand Sagar ‘ हे एक पुस्तक लिहिलं आहे. प्रेम सागर यांनी या पुस्तकात टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्री आणि रामायण च्या मेकिंग मधल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी त्या पुस्तकात लिहिल्या आहेत.

त्या पुस्तकातील काही गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील त्या बद्दल जाणून घेऊया:

१९८० चं दशक. जेव्हा एकीकडे बॉलीवूड मध्ये एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे तयार होत होते आणि त्याचवेळी दुबई मध्ये बसलेल्या माफिया डॉन दाऊद इब्राहिम ह्याने बॉलीवूड मधून विविध मार्गाने खंडणी मागण्यास सुरुवात केली होती.

फिरोज खान यांचा ‘कुर्बानी’ ह्या सिनेमाचं वितरण हे पूर्णपणे माफिया गँग मुळे रखडलं होतं. रामानंद सागर हेच नाही तर बॉलीवूडच्या सगळ्याच निर्मात्यांनी बॉलीवूडचं भविष्य आता अंधकारात आहे हे मान्य केलं होतं.

त्यामुळे इथून पुढे टीव्ही इंडस्ट्री मध्येच काम करत राहण्याचा निर्णय रामानंद सागर ह्यांनी घेतला. पण, ते टीव्ही इंडस्ट्री कडे आकर्षित कसे झाले याची सुद्धा एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे.

 

aajtak.com

 

१९७६ ची ही गोष्ट आहे. रामानंद सागर हे त्यांच्या चारही मुलांसोबत (सुभाष, मोती, प्रेम आणि आनंद) यांच्यासोबत स्वीत्झर्लंड मध्ये ‘चरस’ या सिनेमाची शुटिंग करत होते.

संध्याकाळी शुटिंग संपवून रामानंद सागर आणि त्यांची मुलं हे एका कॅफे मध्ये बसले होते. त्यावेळी तिथे प्रचंड सर्दी होती. कॅफे मध्ये रेड वाईन सर्व्ह करणाऱ्या वेटर ने एका रिमोट ने टीव्ही चालू केला.

टीव्ही वर एक सिनेमा सुरू होता आणि कमालीची गोष्ट म्हणजे तो टीव्ही रंगीत होता. त्या पाचही जणांनी एकमेकांकडे आश्चर्याने बघितले. कारण, त्यांनी कधीच कोणता सिनेमा रंगीत टीव्ही वर बघितला नव्हता.

तो तोच क्षण होता, जेव्हा रामानंद सागर यांनी मनात ठरवलं की आता आपण टीव्ही इंडस्ट्री कडे वळायचं. हातात रेड वाईन चा ग्लास घेऊन रामानंद सागर हे किती तरी वेळ टीव्ही कडे एकटक बघत बसले होते.

थोडया वेळाने रामानंद सागर यांनी त्यांची नजर हटवली आणि त्यांच्या मुलांना त्यांचा एक निर्णय जाहीर केला,

“मै सिनेमा छोड रहा हूं… मै टेलिव्हिजन (इंडस्ट्री) मे आ रहा हूं. मेरी जिंदगी का मिशन मर्यादा पुरुषोत्तम, श्री कृष्ण और आखीर मे मा दुर्गा की कहानी लोगोंके सामने लाना है.”

ज्या व्यक्तीला आपलं जीवनाचं मिशन इतकं क्लिअर होतं त्याला थोडीच कोणी थांबवू शकतं. रामानंद सागर ह्यांच्याबद्दल ही तेच झालं. त्यांनी कधीच पुन्हा मागे वळवून बघितलं नाही.

 

firstpost.com

 

असं नाही की त्यांना या प्रवासात काही अडचणी आल्याच नाहीत. त्यांना सुद्धा अडचणी आल्या. या प्रवासात रामानंद सागर यांना आलेल्या अडचणी कोणत्या स्वरूपाच्या होत्या आणि त्यावर त्यांनी कशी मात केली ते बघूया.

१. मित्रांचा विरोध:

जेव्हा रामानंद सागर यांनी रामायण आणि श्री कृष्ण ह्या दोन्ही सिरीयल चे pamplet छापले आणि घोषणा केली की ह्या दोन्ही कथा या विडिओ कॅसेट द्वारे लोकांसमोर आणलं जाईल तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना मदत करण्यापासून हात आखडता घेतला.

प्रेम सागर यांनी त्यांच्या पुस्तकात असं लिहिलं आहे की, “माझ्या वडिलांनी मला जगातील सर्व प्रमुख देशांची विमानाची तिकिटं काढून दिली आणि मला तिकडे पाठवून दिलं.

 

picdn.net

 

त्या सर्व देशातील मित्रांची यादी वडिलांनी मला तयार करून दिली आणि त्या मित्रांकडून या ड्रीम प्रोजेक्ट साठी पैसे घेऊन यायला सांगितलं. त्या मित्रांपैकी किती तरी मित्रांना या प्रोजेक्ट च्या यशाबद्दल खात्री वाटत नव्हती.

काही मित्रांनी त्यांच्या सेक्रेटरी मार्फत इशारा करून खूप नम्रतेने बाहेरचा रस्ता दाखवला. वडिलांच्या अगदी जवळच्या मित्रांनी मला सल्ला दिला की, तुझ्या वडिलांना नीट समजावून सांग की ते किती मोठी चूक करत आहेत.

महिनाभर नुसतं इकडून तिकडे फिरणं झाल्यावर मी काहीही सोबत न घेऊन भारतात परतलो. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या प्रोजेक्ट मध्ये पैसे गुंतवायला कोणीही तयार नव्हतं.”

२. ‘विक्रम और बेताल’ ला मिळालेली वेळ:

 

freeonlineindia.in

 

८० च्या दशकात भारतीय घरांमध्ये टीव्ही आले होते. दूरदर्शन या चॅनल वर लोकांची श्रद्धा बसली होती. शरद जोशी हे NBT या पेपर मध्ये एक कॉलम लिहायचे.

शरद जोशी आणि रामानंद सागर यांनी एकत्र येऊन सोमदेव भट्ट यांनी लिहिलेलं पुस्तक ‘बेताल पच्चीसी’ या पुस्तकावर आधारित ‘विक्रम और बेताल’ ही २५ एपिसोड्स ची सिरीयल तयार करायचं ठरवलं.

ही सिरीयल तयार करण्यामागे उद्देश हा होता की, असा शो तयार करावा जो की पूर्ण परिवार एकत्र बसून बघू शकेल आणि त्यात एक मेसेज सुद्धा असेल.

असा शो हा प्राईम टाईम ला असावा अशी रामानंद सागर यांची इच्छा होती. पण, दूरदर्शन कडून त्यांना दुपारची वेळ मिळाली होती. त्यामुळे थोडी नाराजी होती. पण, तरीही सिरीयल ला मिळालेलं यश हे सुखावणारं होतं.

त्या काळात टीव्ही वर स्पेशल इफेक्ट्स चा वापर करणारा ‘विक्रम और बेताल’ हा पहिला शो होता.

 

dailymotion.com

 

या सिरीयल ला मिळालेल्या यशाने रामानंद सागर यांनी रामायण हे सिरीयल तयार करण्याचं कन्फर्म केलं. स्टारकास्ट सुद्धा त्यांना विक्रम आणि वेताळ या सिरीयल मधूनच मिळाली.

विक्रम आणि वेताळ मध्ये राजा चा रोल करणारे अरुण गोविल हे ‘राम’ होतील हे ठरलं. काही भागांमध्ये राणी चा रोल केलेल्या दिपीका चिखालीया या ‘सीता’ होतील हे ठरलं.

राजकुमार झालेले सुनील लाहरी हे ‘लक्ष्मण’ झाले आणि दारा सिंह यांना ‘हनुमान’ च्या रोल मध्ये कास्ट करण्यात आलं.

 

३. सरकारचा विरोध:

 

patrika.com

 

रामायण आणि महाभारत हे दूरदर्शन वर दाखवण्या बद्दल सरकार मध्ये एकमत नव्हतं. दूरदर्शन चे अधिकारी या निर्णयाच्या बाजूने होते.

त्यांचं असं म्हणणं होतं की, रामायण हे भारतीय संस्कृतीचं महाकाव्य आहे जे की फक्त धार्मिक असूच शकत नाही. स्वतः वाल्मिकी ऋषींनी ‘रामायण’ मध्ये मर्यादा पुरुषोत्तम राम यांचा उल्लेख हा एक सामान्य व्यक्ती म्हणून केला आहे.

त्यावेळी रामायणचं प्रसारण दूरदर्शन वर सुरू झालं होतं. पण, दिल्ली मध्ये सारं काही अलबेल नव्हतं.

काँग्रेस पक्षातील काही नेत्यांचं असं म्हणणं होतं की, रामायण टिव्ही वर दाखवल्याने त्यांना नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तत्कालीन सूचना एवं प्रसारण मंत्री बी एन गाडगीळ यांनी रामायण टीव्ही वर दाखवण्यावर आक्षेप घेतला होता.

त्यांना असं वाटलं की, यामुळे हिंदू एकत्रीकरण आणि हिंदू शक्ती चा जन्म होईल आणि त्यामुळे भाजपा ची वोट बँक वाढेल.

सरकार मध्येच नसलेलं एकमत त्यावेळी समोर आलं जेव्हा पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वतः दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांशी बोलून रामायण आणि महाभारत हे महाकाव्य टीव्हीवर दाखवले गेले पाहिजे असं सांगितलं. ज्यामुळे आपली संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचेल.

 

४. दूरदर्शन वर सरकारकडून आलेला दबाव:

 

 

एकीकडे दूरदर्शन होतं आणि एकीकडे सरकार. दिल्ली मधील मंडी हाऊस येथील दूरदर्शन च्या हेड ऑफिस मध्ये चक्कर मारण्यात रामानंद सागर यांच्या चपला झिजून गेल्या, पण कोणीही या सिरीयल ला जवाबदारी घेऊन मान्यता देत नव्हतं.

रामानंद सागर हे एका दिवशी सकाळीच एका उच्च अधिकाऱ्याच्या घरी पोहोचले. ते अधिकारी घरीच होते. घरातच बायको सोबत गार्डन मध्ये फिरत होते. पण, तरीही त्यांनी रामानंद सागर यांना भेटायला वेळ दिली नाही.

त्या अधिकाऱ्याचा परत फोन येईल म्हणून रामानंद सागर हे किती तरी दिवस दिल्ली च्या अशोक हॉटेल मध्येच वास्तव्य करायचे. कारण, तेव्हा आजसारखे मोबाईल फोन नव्हते.

एक वेळ अशीही आली होती की, दूरदर्शनचा एक चपराशी रामायणच्या एपिसोड च्या चार व्हिडीओ कॅसेट घेऊन उभा होता आणि सांगत होता की, दूरदर्शनच्या वरिष्ठ अधिकारी लोकांना सिरीयल चे संवाद आवडले नाहीत.

तेच संवाद ज्याची आजच्या प्रेक्षकाने भरभरून तारीफ केली. हे ऐकून रामानंद सागर यांना त्यावेळी फार वाईट वाटलं होतं.

या सर्व अडचणी येत असतानाच एक अद्भुत गोष्ट सुद्धा त्या काळात घडली होती :

 

lallantop.com

 

हिमालयातून एक तरुण साधु रामानंद सागर यांना भेटायला आला होता. त्याने असं सांगितलं की, माझ्या गुरूंनी मला तुमच्याकडे एक संदेश किंवा आदेश घेऊन पाठवलं आहे. तो संदेश असा होता:

“तुम्ही ‘रामायण’ बनवत आहात. कोणत्याच गोष्टीची काळजी करू नका. दिव्य लोक मध्ये एक योजना विभाग आहे. त्या मध्ये तुम्ही आणि तुमच्या सारख्या सत्कर्म करणाऱ्या लोकांना कायमच जागा आरक्षित करून ठेवलेली असेल.

असंच छान काम करा आणि त्या दिव्य लोकांत आम्ही स्वागताला तुमची कायम वाट पाहत असू.”

हे सर्व बोलतांना त्या साधुचा आवाज आणि टोन हा अचानक एका दैवी पुरुषाच्या आवाजासारखा झाला होता.

रामानंद सागर यांच्या या प्रवासाला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला आमचा सलाम!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version