Site icon InMarathi

सिटकॉम : शिकूया इंग्रजी मनोरंजनासोबत!!

friends inmarathi.jpg1

mashable.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : प्रसाद पवार

===

सध्या बहुभाषिकत्व आणि प्रामुख्याने इंग्रजी भाषेचे असलेले महत्व कोणीही नाकारू शकत नाही. ह्याचा अर्थ मातृभाषेला तुच्छ लेखणे असा नाही.

अधिकाधिक भाषांच्या ज्ञानाने आपण विविध संस्कृतींचा अभ्यास आपसूकच करत असतो. आणि आपली विचारक्षमताही त्या पटीत वृद्धिंगत होत असते.

इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे ही आता काळाची गरज बनली आहे. पण हीच भाषा शिकण्यासाठी मनोरंजनाचा मार्ग स्वीकारला तर?

आजच्या लेखात माहिती घेऊयात अशा काही इंग्रजी कार्यक्रमांची (सिटकॉम) ज्यांचा इंग्रजी शिकण्यासाठी आणि मनोरंजनासाठी म्हणून सुद्धा उपयोग होऊ शकतो.

१. फ्रेंड्स

 

gamesradar.com

 

ऑल टाइम ग्रेट अशा अजरामर कार्यक्रमात समावेश होईल अशी ही १० खंडातील मालिका.

१९९४ ते २००४ दरम्यान प्रक्षेपित झालेल्या ह्या मालिकेत ६ भन्नाट मित्र मैत्रिणींची कहाणी, न्यूयॉर्क शहरातील त्यांचे एकत्रित वास्तव्य आणि त्यांच्या आयुष्यातील सुखदुःख, धमाल विनोदी स्वरूपात पण वेळप्रसंगी मनाला हळवे करेल अशा रूपात ही मांडले आहे.

निखळ विनोद, त्याचे टायमिंग, वाक्यांमधील सहजता, मिश्किल हावभाव , विविध संस्कृतींचा संगम आणि त्याला अमेरिकी शहरी तरुणाईचा तडका ह्यापेक्षा मनोरंजक आणि भाषा शिकण्यासाठी योग्य ठिकाण ते दुसरे असणार नाही.

अर्थात काही विनोद अमेरिकी संस्कृतीतले असल्यामुळे सुरुवातीला समजायला अवघड जातील पण नवशिक्यांनी जरूर बघावी अशी ही मालिका.

 

२. माईंड युअर लँग्वेज

 

bohemianalgerian.wordpress.com

 

विविध संस्कृतीतल्या भारतीय, स्पॅनिश , पाकिस्तानी आणि इतर अनेक देशांमधून आलेल्या आणि इंग्रजी शिकण्यासाठी म्हणून एकत्र जमलेल्यांची ही कहाणी.

त्यांना शिकवणारा एक तरुण शिक्षक आणि कलाकारांचे हास्यविनोद, त्याला संभाषणात येणाऱ्या अडचणी आणि त्यातून उद्भवणारे प्रासंगिक विनोद म्हणजे माईंड युअर लँग्वेज.

तशी १९७७ ची ही मालिका. पण आजही अगदी नवीकोरी वाटेल.

 

३. येस मिनिस्टर

 

justwatch.com

 

ही तशी ब्रिटिश मालिका. सुरुवात ह्या मालिकेने करू नये कारण अमेरिकी उच्चारांच्या तुलनेत ब्रिटिश इंग्रजी उच्चार हे समजण्यास थोडे कठीण असतात.

पण एकदा का तुम्ही सुरवात केलीत तर शेवटपर्यंत तुम्ही थांबणार नाहीत. ब्रिटिश राजकारणात विरोधकांना तोंड देतांना पंतप्रधानांची उडालेली भंबेरी आणि त्यांच्या सहाय्यकातील आणि त्यांच्यातील संभाषणाचे विनोदी चित्रण म्हणजे येस मिनिस्टर.

हे नाव म्हणजे खरेतर इंग्रजीतले व्यक्ती विशेषण बनले आहे. १९८० साली प्रक्षेपित झालेली ही मालिका ३ खंडात उपलब्ध आहे.

 

४. न्यूजरूम

 

thedenofgeek.com

 

टीव्ही पडद्यावर दिसणाऱ्या बातम्या पाहून बहुदा आपण त्या वाहिनीची विचारसरणी ठरवत असतो.

पण पडद्यामागचे राजकारण? ते कसे असते? हे जाणून घेण्यासाठी आणि तसेच अफलातून डायलॉग्स साठी म्हणून पाहण्यासारखी मालिका म्हणजे न्यूजरूम.

ह्यात देव पटेल हा भारतीय वंशाचा चेहरा दिसेल आणि सोबत उत्कंठावर्धक नाट्यमय घडामोडी.

 

५. हाऊस ऑफ कार्ड्स

 

WSBT.com

 

ह्या मालिकेबाबत विशेष स्पष्टीकरण द्यायची खरेतर गरज नाही. पराकोटीचे राजकारण, राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठीची फ्रॅंक अंडरवूड यांनी खेळलेल्या खेळी, हेवेदावे आणि अमेरिकी राजकारणाचा रंग त्यातून दिसतो.

अर्थात अफलातून डायलॉग्ज आणि वाद प्रतिवादामार्फत भाषा शिकता येते ह्यात दुमत नाही आणि हाऊज ऑफ कार्ड्स पाहून हे नक्कीच साध्य होईल.

ह्या सर्व मालिका नेटफ्लिक्स, हॉटस्टार वर उपलब्ध आहेत. अर्थात फुकट पाहायच्या असल्यास त्या कुठे उपलब्ध आहेत ह्याची माहिती देणार नाही कारण तेवढा शोध घेण्यात सर्वच तरबेज आहेत.

तर जरूर बघा ह्या मालिका आणि आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version