Site icon InMarathi

अंदमान निकोबारच्या बेटांमधला ज्वालामुखी जागा झालाय!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

अंदमान आणि निकोबार म्हंटलं की डोळ्यासमोर येतं ते काळं पाणी, छोटीछोटी बेटं आणि ओसंडून वाहणारं निसर्ग सौंदर्य. अंदमानच्या बेट समूहात सध्या लहान सहान अशी तीनशे बेटं आहेत. तिथं असलेले अनेक सुंदर असे समुद्रकिनारे आणि वृक्षवल्ली मोहून टाकणारे आहेत. म्हणुनच हे एक प्रेक्षणीय स्थळ झालं असून दर वर्षी हजारोंच्या संख्येत इथे पर्यटक येतात.

पण सध्या ह्या ३०० पैकी एका बेटावर ज्वालामुखी जागा होत असल्याचं नुकतंच Times of India ने सांगितलं आहे. बॅरन नावाच्या बेटावर एक दीडशे वर्ष जुना ज्वालामुखी आहे. १५० वर्ष शांततेत असलेला हा ज्वालामुखी मागच्या काही वर्षात जागा झाल्याचे गोव्यात असलेल्या National Institute of Oceanography (NIO) ने सांगितलं.

Source

नकाशावर एकदम लहान दिसणाऱ्या बॅरन बेटावर पहिल्यांदा ज्वालामुखीची चिन्हं १९९१ मध्ये दिसू लागली. दहा मिनिटांच्या छोट्या वेळांसाठीच हा ज्वालामुखी लाव्हा बाहेर फेकतो.

दिवसा बॅरन बेटावरून फक्त धुर बाहेर फेकलेला दिसतो तर दिवस मावळला की लालसर लाव्हा डोंगराच्या टोकावरून खाली वाहताना दिसतो. त्याचा रंग निळ्या आकाशाला लाल छटा देऊन जातो.

NIO च्या अभय मुधोळकर ह्यांच्या टीमने केलेल्या परीक्षणानंतर त्यांनी टाइम्स ला सांगितलं. त्यांच्या टीमच्या रिपोर्टवरून बी नागेंद्र ह्यांच्या टीमने सुद्धा ह्या गोष्टींना पुष्टी दिली.

Source

CSIR आणि National Institute of Oceanography (NIO) च्या टीम्स ने बॅरन बेटाच्या आसपासची माती आणि पाण्याचे नमुने परीक्षणासाठी घेतले आहेत. परीक्षणात कोळश्यासारखे काळे आणि ज्वालामुखीतून बाहेर पडलेले पदार्थ ( ज्यांना – pyroclastic material म्हणतात) हे आढळले. हा पदार्थ ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लाव्ह्याचा भाग आहे असा निष्कर्ष काढला जातो.

ह्या पदार्थांच्या परीक्षणामुळे जवळपासच्या सगळ्याच ज्वालामुखीचा अभ्यास करणे सोपे जाणार आहे. सध्या नमुन्यांचं परीक्षण करताना लाव्हाची बारीक पावडर करून त्याच्या एकूण कंपोझिशन बद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न चालू आहे. पण ह्या घटनांमुळे बॅरन बेटाच्या पट्ट्यात छोटी छोटी ज्वालामुखीची केंद्रे वर येऊ लागली आहेत. ह्यालाच ‘व्होल्कॅनिक आर्क’ म्हणतात.

तज्ज्ञांच्या मते हा ज्वालामुखी बाहेर पडण्याचे कारण पृथ्वीच्या सर्वात आतील भागातील लाव्हा आहे. हा लाव्हा वर येताना समुद्राच्या तळातील पृथ्वीचं आवरण वितळल्याने सतत धुमसत असतो आणि एकदम बाहेर पडतो. अश्या पाण्याखालच्या काही लहान ज्वालामुखी च्या जवळील नमुने सुद्धा घेतले आहेत.

अंदमानच्या नकाशावर बारीकसं बॅरन बेट हे पर्यटकांचं आकर्षण ठरण्याचं काहीच कारण नाही. कारण बॅरन अगदीच निर्मनुष्य आहे. बॅरन ह्या शब्दाचा अर्थ आहे “कस नसणारी जमीन” म्हणजे इथे कसल्याच प्रकारचं वनक्षेत्र नाहीये. पर्यटकांना जर इथे जायचं असेल तर त्यांना वेगळी बोट करावी लागते. आणि त्याआधी पोर्ट-ब्लेअरच्या वनविभागाची परवानगी घ्यावी लागते.

भारताचा स्वतःचा ज्वालामुखी जागा झालाय तुम्ही बघायला जाणार का?

(हे देखील वाचा: स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतर अंदमान -निकोबार मध्ये भारतीय रेल्वेची एन्ट्री!)

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version