Site icon InMarathi

भर समुद्रात, कासवाचं रक्त पिऊन ४३८ दिवस जगलेल्या माणसाची गोष्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

माणसाच्या बेसिक गरजा काय आहेत हे जर का आज विचारलं तर चार येतील: अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट.

सध्याच्या परिस्थतीत कल्पना करा की, सगळं काही बंद आहे तरी आपलं फार काही अडत नाहीये.  तेच एक पूर्ण दिवस जर का इंटरनेट बंद पडलं तर लोक किती हैराण होतील.

आपण फक्त एका दिवसाचं बोलतोय जेव्हा की आपल्याला स्मार्ट फोन ला टच करता येणार नाहीये, कोणाशी कनेक्ट होता येणार नाहीये. इतकी सुद्धा भीती आजकाल एखाद्याला व्यक्तीला अस्वस्थ कण्यासाठी पुरेशी आहे.

पण, तुम्हाला एका व्यक्तीची कथा माहीत आहे का जो की या सर्वांपासून एक, दोन नाही तर तब्बल ४३८ दिवस दिवस लांब होता ते सुद्धा पाण्याच्या खाली.

 

 

अगदीच अविश्वसनीय वाटणाऱ्या या व्यक्तीची कथा आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

जोस सॅल्वाडोर अल्वारेंगा हे त्या मेक्सिको च्या व्यक्तीचं नाव आहे ज्याने हा पराक्रम करून दाखवला आहे. नोव्हेम्बर २०१२ मध्ये घडलेली ही घटना आहे, जेव्हा जोस सॅल्वाडोर अल्वारेंगा हा फिशिंग करण्यासाठी मेक्सिको च्या समुद्रात गेला होता आणि तिथे अचानक एक वादळ आलं होतं.

जोस हा त्या वादळात वाहून गेला आणि त्यानंतर सापडला ते ४३८ दिवसानंतर.

आपण याबद्दल बऱ्याच बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील की काही लोक समुद्रात वाहून गेले आणि अगदीच अनोळख्या आणि निर्मनुष्य एखाद्या बेटावर पोहोचले.

आपण आपल्या सिनेमांमध्ये सुद्धा आपल्या हिरोंना बघतो जे की सगळ्या अडचणींवर मात करतात आणि तरीही हार मानत नाहीत.

तसाच सॅल्वाडोर अल्वारेंगा हा सुद्धा एक कणखर लढवैय्या म्हणून जगात नावारूपास आला आहे. व्यवसायाने कोळी असलेला जोस हा त्याच्या एका साथीदारासोबत या ३० तासांच्या नियोजित सफरी साठी गेला होता. पण, नियतीला काही तरी दुसरंच मान्य होतं.

 

हे ही वाचा – ‘रक्ता’विषयी तुम्ही ह्या गोष्टी आजवर कधीही ऐकल्या नसतील !

समुद्रात आलेल्या चक्री वादळाने त्यांच्या बोटीची मोटर, रेडिओ सगळं काही खराब झालं. आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी जवळपास ५०० किलो वजनाच्या पकडलेल्या एका मास्याला परत समुद्रात सोडून दिलं.

त्यांच्याकडे ती जहाज हाताने चालवण्यासाठी कोणतीच सोय नव्हती. ना कोणती बॅटरी, टॉर्च सुद्धा नव्हती. खाण्या पिण्याची सुद्धा कोणतीच गोष्ट नव्हती.

किनाऱ्यावरून त्यांच्याशी संपर्क होईल अशी सुद्धा कोणतीच गोष्ट त्यांच्याकडे नव्हती. ते दोघं समुद्रात वाहत गेले. दूर दूर पर्यंत जमीन कुठेच दिसत नव्हती.

 

 

जोस ने काही दिवस आपल्या हाताने मासे, जेली फिश, टर्टल असे समुद्र पक्षी पकडले आणि स्वतःची भूक भागवली. त्याच्याकडे असलेलं पिण्याचं पाणी संपलं होतं आणि त्यामुळे त्याला कासवाचं रक्त आणि मूत्र प्यावं लागलं होतं.

आपल्याला लिहिताना आणि वाचताना त्रास होतो या गोष्टींचा विचार करून. त्याने या गोष्टी प्रत्यक्षात कश्या केल्या असतील हे त्यालाच माहीत. जोस आणि त्याचा जोडीदार Cordoba हे समुद्रात वाहून आलेल्या प्लास्टिक आणि खाण्याच्या वस्तू सुद्धा जपून ठेवत असत.

या परिस्थितीत कोण किती काळ तग धरून ठेवू शकणार ? Cordoba सोबत तेच झालं. चार महिने असा सगळा आहार घेऊन त्याची तब्येत खालावली होती.

त्याला खाण्याचा कंटाळा आला होता आणि त्यामुळे त्याने खाणं पिणं सोडून दिलं आणि त्याचा भुकेने जीव गेला. जोस ने सुद्धा आत्महत्या करायचा विचार केला कारण त्याच्या मित्राच्या जाण्याने तो खूप खचून गेला होता.

जवळपास सहा दिवस तो Cordoba च्या मृतदेहाशी बोलत बसायचा. जोस ला नंतर लक्षात आलं की, आता आपण हे सत्य मानायलाच पाहिजे. त्याने Cordoba च्या शरीराला समुद्रात टाकून दिलं.

“माझ्या शरीराला खाणार नाहीस” असं वचन Cordoba ने जोस कडून घेतलं होतं.

चंद्राच्या बदलत्या स्थितीनुसार जोस हा दिवसांची मोजणी करायचा. प्रार्थना म्हणून, गाणे म्हणून आणि त्याच्या बोटीच्या ice box वर बसून तो आपले दिवस घालवायचा.

जोस ने खूप जहाज आणि Ocean Linears बघितले पण त्यांच्यापैकी कोणीही जोस ला बघितलं नाही. डोक्यावरून जाणाऱ्या विमानाचं लक्ष वेधून घ्यायच्या पलीकडे जोस च्या हातात दुसरं काहीच नव्हतं.

४३८ दिवसांनी म्हणजे ३० जानेवारी २०१४ या दिवशी जोस यांना काही अंतरावर पहाड दिसले. ते मार्शल islands चा एक कोपरा होता. जोस ने पाण्यातून खाली उडी मारली आणि पोहत त्या किनाऱ्यावर पोहोचले.

 

 

जमिनीवर पाय ठेवणे ही जोस साठी इतकी अद्भुत गोष्ट होती की ते काही वेळासाठी चक्क बेशुद्ध पडला. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला त्याचा आजूबाजूला त्या Beach House चे मालक दिसले.

Beach House च्या मालकाने तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना याबद्दल सांगितलं. पायाचे सुजलेले घोटे आणि लो ब्लड प्रेशर या व्यतिरिक्त जोस यांची तब्येत व्यवस्थित होती.

जोस यांना भेटून त्यांच्या परिवाराला किती आनंद झाला असेल हे शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडचं आहे. या घटनेनंतर जोस यांनी मासेमारी चं काम बंद केलं.

 

 

४३८ दिवसांच्या या समुद्रात घालवलेल्या आयुष्यामुळे त्यांच्या मनात समुद्राबद्दल एक भीती बसली आहे. ही भीती घालवून एक नॉर्मल आयुष्य जगण्याचा जोस सध्या प्रयत्न करत आहेत.

जगभरातील मीडिया ने त्यांच्या कडे या घटनेबद्दल विचारणा सुरू केल्यानंतर जोस यांनी एक वकील अपॉइंट केला आणि त्यांनी सरकार कडे जोस यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली.

जोस यांना स्वतःच्या भीती वर मात करण्यासाठी एक वर्ष लागलं. तोपर्यंत त्यांना सतत कोणीतरी एक माणूस सतत त्यांच्या सोबत असावा असं वाटायचं.

ज्यांना तहान, भूक आणि समुद्रातील एकटेपणा हरवू शकला नाही त्यांनी या भीतीवर सुद्धा मात केली.

जोस यांची ही स्टोरी वाचून एकच गोष्ट मनात येते: ‘तुम्हाला हे सुंदर जीवन एकदाच मिळतं. या जगण्यावर शतदा प्रेम करा.’

===

हे ही वाचा – ‘रक्ता’विषयी तुम्ही ह्या गोष्टी आजवर कधीही ऐकल्या नसतील !

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version