Site icon InMarathi

भारतीय चलनी नोटांच्या मागे असलेली विशिष्ट “चित्रं” म्हणजे भारताच्या विविधतेचं ‘प्रतिकच’!

100 rs note inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

प्रत्येक देशाचे स्वतःचे असे एक चलन असते. त्या त्या देशातील सरकार नियंत्रीत संस्था ह्या ते चलन नोटा किंवा नाण्याच्या स्वरूपात छापून वितरित करीत असतात.

चलनाची छपाई ही त्या त्या देशातील असलेल्या सरकारकडील सोन्याच्या साठ्यावर अवलंबून असते!

संतुलित छपाई न केल्यास त्या देशाची अर्थव्यवस्था बिघडू शकते. भारतीय चलन रुपये हे नाणे आणि नोटांच्या स्वरूपात उपलब्ध आहे.

ह्या नोटांवर छापण्यात आलेली चित्रे ही भारतातील विविध महापुरुष आणि विविध महत्वाच्या स्थळांची असतात. हे फोटो भारताच्या विविधतेचे प्रतीक आहेत.

नोटांवर छापलेल्या चित्रांमुळे परदेशात ही आपण आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवितो.

 

cnbc.com

 

भारतात ऐतिहासिक म्हणता येईल अशी १८ नोव्हेंबर २०१७ रोजी नोटबंदी घोषित करण्यात आली. आणि जुन्या ५०० व १००० रुपयाच्या नोटा बंद करून नवीन ५०० व २००० रुपयाच्या नोटा आणण्यात आल्या!

यावरून तत्कालीन सरकारला कित्येक जणांनी दोष दिले, त्यामुळे बऱ्याच अफवा देखील पसरल्या, अगदी ह्या नवीन नोटांमध्ये एक चिप बसवण्यात आली आहे जेणेकरून तिचे ट्रॅकिंग मिळते वगैरे वगैरे बऱ्याच अफवा पसरल्या गेल्या!

पण नोटाबंदीचा तो निर्णय देशाने आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाने मान्य केला आणि त्याला भरगोस पाठिंबा सुद्धा दिला! एका अर्थी हा निर्णय घेणं तसं गरजेचं सुद्धा होतं!

कारण काळ्या पैशाची देवाण घेवाण प्रचंड फोफावली होती, नोटाबंदीमुळे हा सगळा पैसा बँकेच्या सरकारच्या नजरेखाली आला! काळा पैसा व्हायचा थांबणार नव्हताच आणि तो थांबणार पण नाही!

 

financebuddha.com

 

पण या निर्णयामुळे ज्यांच्याकडे नको तितका पैसा आहे त्यांचे व्यवहार सरकारच्या नजरेत येऊ लागले!

नवीन नोटा आणल्या असल्या तरी जुनी चित्रे छापण्याची परंपरा तशीच आहे. आज ही आपण पाहत असलेल्या नोटांवर विविध चित्रे आहेत तर जाणून घेऊया ही नेमकी कशाची चित्रे आहेत!

 

एक रुपयाची नोट :

 

shop24ampm.com

 

नोट छापण्या आधी एक रुपयाचे चांदीचे नाणे चलनात होते, परंतु पहिल्या महायुद्धाच्या काळात जेव्हा चांदीचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा ३० नोव्हेंबर १९१७ पासून नोट ची छपाई सुरू करण्यात आली.

एक रुपयाची नोट ही एकमेव नोट आहे जी केंद्रीय अर्थ खात्यातर्फे छापली जाते, बाकी इतर नोटा ह्या भारतीय रिझर्व्ह बँकेकडून छापल्या जातात!

एक रुपयाच्या नोटेच्या पुढील बाजूला एक रुपयाच्या नाण्याचा फोटो असून मागच्या बाजूला खनिज तेल शोध घेणाऱ्या साईट चा फोटो आहे.

 

दोन रुपयाची नोट :

 

pinterest.com

 

दोन रुपयांच्या नोटे चा छपाईचा खर्च जास्त असल्याने सरकारने नवीन दोन रुपयांच्या नोटांची छपाई बामद केली आहे. जुन्या नोटा मात्र चलनात आहेत.

ह्या नोटे च्या पुढच्या बाजूला “अशोक चक्र” असून मागच्या बाजूला भारताची पहिली सॅटेलाईट ” आर्यभट्ट” चा फोटो आहे. ही नोट भारताच्या अवकाश क्षेत्रातील प्रगती चे प्रतीक आहे.

 

पाच रुपयाची नोट :

 

leftovercurrency.com

 

छपाई खर्च जास्त असल्यामुळे सरकार ने ह्या नोटेच्या छपाई बंद केली असली तरी जुन्या नोटा अजून चलनात ग्राह्य आहेत.

ह्या नोटेवर पुढे “राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो” असून मागच्या बाजूला एक शेतकरी शेत नांगरत असलेला फोटो आहे. ही नोट भारत हा कृषिप्रधान देश आहे जे दर्शवते.

 

दहा रुपयांची नोट :

 

mintageworld.com

 

दहा रुपयाच्या एक नोटेचा छपाई खर्च ९६ पैसे आहे. ह्या नोटे च्या पुढच्या बाजूला महात्मा गांधी व अशोक चक्र दोन्ही असून मागच्या बाजूला हत्ती, गेंडा व वाघाचे चित्र आहेत.

दहा रुपयाच्या नवीन नोटे च्या मागच्या बाजूला कोणार्क सूर्य मंदिर आणि स्वच्छ भारत योजनेचे चिन्ह आहे.

 

वीस रुपयाची नोट :

pinterest.com

 

वीस रुपयाच्या नोट छपाईचा खर्च हा दहा रुपयाच्या नोटे इतकाच म्हणजे ९६ पैसे आहे. वीस रुपयाच्या अंदाजे ५००० लाख नोटा बाजारात आहेत.

ह्या नोटेच्या पुढच्या बाजूला महात्मा गांधींचा फोटो असून मागच्या बाजूला अंदमान निकोबार ची राजधानी पोर्ट ब्लेयर येथील माऊंट हेरिटेज लाईट हाऊस चा फोटो आहे.

 

पन्नास रुपयाची नोट :

 

banknoteworld.com

ह्या नोटे च्या छपाईचा खर्च एक रुपया ऐंशी पैसे असून अंदाजे ४००० लाख नोटा बाजारात आहेत.

ह्या नोटेच्या पुढच्या बाजूला महात्मा गांधी, अशोक चक्र आणि भारतीय संसदेचा फोटो असून तो भारतीय लोकशाहीचे प्रतीक आहे.

मागच्या बाजूला स्वच्छ भारत योजनेचे चिन्ह व कर्नाटक मधील हम्पी ह्या पर्यटन स्थळातील रथ स्मारकाचे फोटो आहेत.

 

शंभर रुपयाची नोट :

 

twitter.com

 

ही नोट छापायला अंदाजे ३ रुपये लागतात आणि १६००० लाख नोटा सध्या चलनात आहेत.

ह्या नोटेवर पुढे महात्मा गांधी व अशोक चक्राचा फोटो आहे.

मागच्या बाजूला सिक्कीम येथील कांचनजंघा टेकडी चा फोटो आहे. ही टेकडी जगातील तिसरी उंच टेकडी आहे.

 

दोनशे रुपयाची नोट :

 

paisaboltahai.rbi.org.in

 

ही नोट पहिल्यांदा नोट बंदीनंतर छापण्यात आली. अंदाजे तीन रुपये इतका खर्च येतो एक नोट छापायला.

ह्या नोटेच्या पुढच्या बाजूला महात्मा गांधी व अशोक चक्र असून मागच्या बाजूला मध्यप्रदेश मधील सांची स्तूप चा फोटो आहे.

 

पाचशे रुपयाची नोट :

 

mintageworld.com

 

ऐतिहासिक नोट बंदी मध्ये जुन्या हजार आणि पाचशे च्या नोटेची जागा नवीन पाचशे व दोन हजार च्या नोटेने घेतली.

ही नोट बनवायला साधारण ३ रुपये खर्च येतो. नवीन पाचशे च्या मागच्या बाजूला देशाच्या राजधानीतील लाल किल्याचा फ़ोटो आहे.

 

दोन हजार रुपयांची नोट :

 

youtube.com

 

ही नोट छापण्यास खर्चिक आहे, डुप्लिकेट कुणी छापू नये म्हणून खुप काळजी घेण्यात आली आहे.

ह्या नोटेच्या पुढील बाजूस महात्मा गांधींचा फोटो असून मागच्या बाजूला इस्रो ने २०१३ नोव्हेंबरमध्ये लाँच केलेल्या मंगळयानाचा फोटो आहे.

ही नोट भारताच्या अंतराळ व अवकाश क्षेत्रातील प्रगती दर्शविते.

आपण पाहिले की प्रत्येक नोटेवर छापलेल्या फोटोंचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे.

“विविधतेतून एकता” हा संदेश आपल्याला ह्यातून मिळतो. ह्या नोटांमार्फत सरकार भारत देशाच्या संस्कृती चे दर्शन होते. भारत मातेला आमुचे नमन

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version