Site icon InMarathi

नोकरी धंद्याच्या तणावामुळे स्वतःला वेळ देता येत नसेल तर मग ह्या १० टिप्स फॉलो कराच!

frustrated guy inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काही काही जणांना त्यांच्या व्यस्त आयुष्यामुळे स्वतःकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. धकाधकीच्या जीवनात आजारी पडल्यावरच स्वतःची काळजी घ्यावी अशी मानसिकता झालेली आहे सगळ्यांची.

काम, काम आणि काम अशीच दिनचर्या आहे सगळ्यांची… काही जणांना वाटतं, स्वतःकडे लक्ष दिलं तर बाकीचे आपल्याला स्वार्थी समजतील, पण ही मानसिकता बदलली पाहिजे.

स्वतः कडे लक्ष द्यायलाच हचं, आधीच जर आपण आपली, आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी थोडासा वेळ दिला तर, नंतरची हानी, नंतरचे प्रॉब्लेम्स् टाळता येतील.

स्वतःसाठी वेळ देणे ही गोष्ट खरोखरच सोपी नाहिये, आज काल तर नोकऱ्या, बिझिनेस्, उद्योग इत्यादी गोष्टींमध्ये लोकं इतकी व्यस्त असतात की स्वतःसाठी वेळ देणे ही संकल्पनाच स्वार्थीपणाची वाटते.

 

shutterstock.com

 

कामाच्या ताणामुळे चिंता वाढणे, तणाव वाटणे ह्यासारख्या गोष्टी तर होतातच, शिवाय आहाराच्या पद्धती, वेळा बदलतात. झोपेच्या वेळा बदलतात. ह्या सगळ्याचा परिणाम तब्येतीवर होतो.

त्यात अजुन भर पडलीये तंत्रज्ञानातील प्रगतीची!

आयपॉड, टॅब, स्मार्टफोन्स्, लॅपटॉप ह्या उपकरणांमुळे व्यस्त जीवनात अजूनच भर पडली आही. जरा वेळ मिळाला की लोकं ह्या उपकरणांमध्ये गुंतुन जातात.

त्यामुळे मनःस्वास्थ्य पण बिघडतं.

आपल्या तब्येतीची तसेच मनाची देखील काळजी घेण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी सर्वांनी आपल्या स्वतःसाठी वेळ द्यायलाच हवा, त्यासाठी बघुया ह्या काही टिप्स्!

ज्या पाळल्या तर आपल्या आयुष्यार खूप मोठा चांगला, सकारात्मक बदल घडेल.

 

१) झोपेला आपल्या रूटिनचा भाग बनवा :

 

indiatimes.com

 

पुरेशी झोप होणे हे आपल्या तब्येतीसाठी सगळ्यात जास्त आवश्यक असते. आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी झोप ही अत्यावश्यकच असते.

पुरेशी झोप न मिळाल्यास त्याचा विपरित परिणाम आपल्या तब्येतीवर होतो. आपल्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी झोप हवीच असते, ही झोप नीट व्हावी म्हणून काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

जसे, झोपायच्या आधी कामाचा ताण तणाव येऊ द्यायचा नाही, मन शांत ठेवायचं. मोबाइल, लॅपटॉप, टॅब हे उशापासून लांब ठेवायचं. जेवल्यानंतर लगेचच झोपु नये.

रात्रीच्या जेवणानंतर झोपेपर्यंत कमीत कमी १ तास तरी जाऊ द्यावा.

त्याचप्रमाणे कॉफी, मिठाई वगैरे पदार्थांचं सेवन केल्यानंतर लगेचच झोप लागत नाही (झोप उडते, कधी कधी रात्रभर झोप लागत नाही), त्यामुळे झोपेच्या आधी ह्या गोष्टींचे सेवन करणे टाळावे.

त्याचप्रमाणे आपली बेडरूम शांत असावी, तिचे पडदे गडद असावेत. ह्या गोष्टींचे पालन केल्यास शांत झोप होण्यास मदत होते.

 

२) आहार :

 

masala.com

 

आपली तब्येत चांगली राहण्यासाठी किंवा बिघडण्यासाठी देखील आपल्या आहारावरच अवलंबून असते. त्यामुळे योग्य तो आहार योग्य त्या वेळेवर घेणे हे आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी खूपच गरजेचं असतं.

जंक, फास्ट फूड आपल्या तब्येतीला चांगले नसते, आतड्याला चिकटून राहते असे अन्न. त्यामुळे हेल्दी, तब्येतीला चांगले असेच अन्न सेवन करावे.

आपण जे अन्न सेवन करतो त्यावर आपले आरोग्य, चैतन्य अवलंबून असते.

 

३) व्यायाम :

 

 

शारीरिक हालचाल, जिम मध्ये जाणे, व्यायाम करणे, चालणे, सायकलिंग, पोहणे, योगासने करणे ह्यासारखे प्रकार नित्य नियमाने करणे म्हणजेच आपल्या तब्येतीची योग्य ती काळजी घेणे होय.

आपल्या दैनंदिन कामातून थोडासा वेळ जर ह्या गोष्टींसाठी देखील दिला तर आपली शारीरिक आणि मानसिक तब्येत चांगली राहण्यासाठी नक्कीच मदत होते.

शिवाय आपला मूड चांगला राहतो, अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होते, आपण आनंदी आणि फ्रेश राहतो. आपला कामातला उत्साह वाढतो.

आणि साहजिकच कामाचा ताण तणाव आपल्याला जाणवत नाही. ह्यामध्ये श्वसनाचे व्यायाम आणि ध्यानधारणा ह्यांचा समावेशही अत्यावश्यक आहे.

 

४) आपल्याला कशातून आनंद मिळतो त्याचा शोध घेऊन त्या गोष्टी कराव्यात :

 

shutterstock.com

 

आपल्याला आयुष्यात खूपच ताण तणावांना सामोरे जावे लागते. हा ताण तणाव कमी करण्यासाठी ज्याप्रमाणे जोप, आहार, व्यायाम ह्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत त्याप्रमाणेच आपला छंद देखील तितकाच महत्त्वपूर्ण आहे.

आपल्या कामातून वेळ काढून छंद जोपासावेत. कोणाला गायनाचा छंद असतो, कोणाला वाचनाचा! कोणाकोणाला नृत्याचा, कोणाला फिरण्याचा, कोणाला पाककलेचा!

कोणी चित्रकलेत पारंगत असतं तर कोणी अभिनयात. हे छंद आपण जर जोपासले तर कामाचा ताण तणाव तर कमी होईलच त्यशिवाय कामातला एकसुरीपणा नाहिसा झाल्यामुळे कामातला उत्साह देखील वाढतो.

 

५) आपल्या तब्येतीसाठी, स्वतःसाठी इतरांना “नाही” म्हणण्यास शिका :

 

mindfamilymedicine.com

 

आज-काल पार्टी वगैरेचे ‘फॅड’ वाढलंय, ज्यामध्ये जे अन्न असतं ते आरोग्यासाठी हानीकारक असते आणि त्यात जी पेये असतात ते देखील आरोग्याला नुकसान पोहोचवणारे असतात.

हे पदार्थ वारंवार खाल्ल्याने जळजळ होणे, अल्पकालीन स्मृती नष्ट होणे ह्यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे कोणीही कितीही आग्रह केला तरी त्यांना ठामपणे नकार देण्यास शिका.

 

६) छोटाश्या सहलीला जाणे :

 

masterlife.com

 

रोजच्या कामातून थोडासा वेळ काढून एक किंवा दोन दिवस आसपासच्या गावी जाण्याला प्राधान्य दिले तर कामाच्या ताणातून मुक्ती तर मिळतेच.

त्याशिवाय कुटुंबाला वेळ देता येतो आणि पुढच्या कामातला उत्साह द्विगुणित होतो. आपल्यालाच आपल्यातला हा बदल ठळकपणे जाणवतो.

आपल्या कामातला उत्साह वाढतो, ताण कमी होतो आणि कुटुंबाबरोबर वेळ घालवायला मिळाल्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो.

 

७) योग्य व्यवस्थापन आणि नियोजन :

 

liquidplanner.com

 

आपण आपल्या कामाचे योग्य नियोजन करण गरजेचे आहे. आपल्या कामांचे योग्य ते वेळापत्रक बनवून ते सहजपणे दिसेल अशा ठिकाणी लावा.

एका डायरीमध्ये आपल्या मीटिंग्ज् ची तारिख, वेळ लिहून ठेवा आणि ती डायरी नियमितपणे तपासत जा.

आपल्याला रोज लागणाऱ्या वस्तू जसे, पेन, रूमाल, पाकिट, किल्ली इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी एका ठिकाणी ठेवा हवं तर त्यासाठी एखादी छोटीशी बॅग किंवा पर्स वापरू शकता.

जेणे करून ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी राहतील आणि हवं तेव्हा मिळतील, शोधाशोध करायला लागणार नाही. ह्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो.

 

८) स्वतःची काळजी घेण्यासाठी तसे एक वेळापत्रक तयार करा :

 

knot9.com

 

स्वतःची काळजी घेण्यासाठी एक वेळपत्रक तयार करणे ही गोष्ट क्खूपच महत्त्वाची आहे.

आपल्या ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त मिळणारा वेळ हा बर्याचदा मोबाइल, टी.व्ही., टॅब, लॅपटॉप ह्यामध्येच जातो.

हा स्वतःसाठी दिलेला वेळ नसतो तर वेळेचा अपव्यय असतो त्यामुळे आपण आपले छंद, व्यायाम इत्यादी आरोग्यदायी गोष्टी करण्यासाठी वेळापत्रक तयार करावे ज्याचा आपल्याला खूपच फायदा होतो.

 

९) पुस्तक वाचणे :

 

pinkvilla.com

 

ताण तणाव कमी करणारी, विनोदी, मार्गदर्शक अशी अनेक सकारात्मक पुस्तके आहेत ज्यांचे वाचन आपल्याला स्फुर्ती देते, उत्साह देते. मग ते कोणाचे चरित्र असो किंवा अनुभव असो.

आत्मचरित्र, सफर वर्णन असो. ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो, सकारात्मकता वाढते अशी पुस्तके जरूर वाचावीत!

आणि आपल्याला ऑफिसमधून येता जाता बऱ्यापैकी वेळ मिळतो तेव्हा हा वाचनाचा पर्याय खूपच उत्तम आहे.

 

१०) पाळीव प्राणी ताण कमी करण्यास सहायभूत ठरतात :

 

economictimes.indiatimes.com

 

पाळीव प्राणी आपल्याला कुठल्याही अपेक्षेशिवाय, निरपेक्ष प्रेम देतात. त्यांच्यासोबत थोडावेळ घालवला तर आपला ताण तणाव कमी होतो, नैराश्य कमी होते असे संशोधनाअंती आढळले आहे.

ह्या गोष्टी आपल्या आयुष्यातील ताण तणाव, चिंता कमी करण्यात मदत करतात.

शिवाय कामाचा उत्साह वाढवतात, नैराश्य कमी करतात, त्यामुळे स्वतःसाठी थोडासा वेळ काढणे हा स्वार्थीपणा नाहीये तर आपल्यात सकारात्मकता वाढवणे ह्यासारख्या चांगल्या गोष्टींची वाढ करणे होय.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version