Site icon InMarathi

स्वतःला सिद्ध करायला ‘गोल्ड मेडल’च आणावं लागणार का? विस्मृतीत गेलेल्या १२ खेळाडूंची व्यथा

Neeraj-Chopra article Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

७ ऑगस्टचा शनिवार भारतीयांसाठी ‘सुवर्ण संध्याकाळ’ घेऊन आला. नीरज चोप्राच्या टोकदार भाल्याने भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील क्रिडाप्रेमींच्या काळजाचा ठाव घेतला.

 

 

नीरजच्या गळ्यात विजयाचं पदक पडलं आणि इथे सोशल मिडीयावर क्रिडा क्षेत्राबद्दल देशाला असलेल्या उदासिनतेचा पाढा वाचण्यास सुरुवात झाली. P.T. च्या तासाला गणिताचा ज्यादा अभ्यासक्रम घेणा-या शिक्षकांच्या माथी हे खापर मारलं गेलं तर काहींनी सरकारला दोष देत आपला निषेध दर्शवला.

चूक कोणाची हे शोधत बसून त्यावर पुन्हा त्याच शिळ्या चर्चा उगाळण्यापेक्षा या परिस्थितीला वैयक्तिक आपण जबाबदार आहोत का? हा प्रश्न तुम्ही कधी स्वतःला विचारलाय का?

अर्थात इथे कुणालाही दोष देण्याचा उद्देश नाही, कोणावरही याचं खापर फोडण्याचा प्रयत्न नाही मात्र या वास्तवाकडे आजही डोळेझाक केली जाते.

ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं की व्हॉट्सअप, फेसबूकला खेळाडूंचे फोटोंची ‘स्टोरी’ ठेवल्यानंतर आपलं देशप्रेम क्षणात आटतं. याचंच एक जीवंत उदाहरण म्हणजे शनिवारी उगवत्या सुर्याच्या देशात भारताचा पुत्र सुवर्ण इतिहास रचत असताना दुसरीकडे अनेक भारतीयांच्या घरात भारत- इंग्लंड सामाना उत्सुकतेने पाहिला जात होता. त्यावेळी सोशल मिडीयावर नीरजचं कौतुक सुरु झाल्यानंतर अनेकांनी टिव्हीच चॅनल बदलून नीरजचा हा पराक्रम पाहिला.

इतर खेळांपेक्षाही क्रिकेटला दिलं जाणारं झुकतं माप याचं हे बोलकं उदाहरण आहे. क्रिकेटर्सची नावं तोंडपाठ असलेल्या क्रिडाप्रेमीला बॅडमिंटन, हॉकी, भालाफेक अशा खेळांत इतिहास रचणा-या किती खेळाडूंचं यश कितीजणांना आठवतं?

 

 

अर्थात याा प्रश्नाचं तात्पुरतं उत्तर इतरांना देण्यापेक्षा एकदा स्वतःशी प्रामाणिक राहून याचा विचार करूयात.

दोन दिवसांपुर्वी संपलेल्या ऑलिम्पिकमुळे यंदाच्या यशस्वी खेळाडूंची नावं सर्वांना ठाऊक असतीलच मात्र सायना नेहवालने २०१२ च्या लंडन ऑलम्पिक मध्ये ब्रॉंझ मेडल पटकावलेलं हे आठवतंय का? तेव्हा तिला घोषित केलेलं नगद इनाम तिला अजून मिळालेलं नाही.

तसेच, २०११ च्या महिला कबड्डी विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला देशात परतल्यावर रिक्षामधून प्रवास करायला लागला होता.

 

dnaindia.com

 

हे तर उदाहरण झाले. असे कित्येक खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळामध्ये भारताचं नाव गाजवलं आहे.

पण कालांतराने काळाच्या पडद्या आड ते असे गेले की आज त्यांची आठवण सुद्धा उरलेली नाही. बघूया असेच १२ खेळाडू,जे काळाच्या पडद्याआड गायब झाले.

 

१. माखन सिंग :

 

timesofindia.indiatimes.com

 

कॅरीमिनातीच्या रोष्टींग व्हिडीओ मधला एक फेमस डायलॉग आहे, ‘हर विवेक ओबेरॉय के लिये एक सलमान खान होता ही है।’

सलमान खान आणि विवेक ओबेरॉयच्या जन्माच्या आधी हे सिद्ध केलेले ते माखन सिंग यांनी.!

आपल्या करियर च्या सर्वोच्च शिखरावर असताना मिल्खा सिंग यांना १९६२ च्या कोलकाता नॅशनल गेम मध्ये मागे सोडत चार सुवर्ण पदक पटकावली होती!

त्याच वर्षी जकार्ता येथे झालेल्या आशियायी खेळात माखन सिंग यांनी १ सुवर्ण १ रौप्य पदक पटकावले. नॅशनल गेम्स मध्ये माखन सिंग यांनी एकूण १६ पदक जिंकले होते.

एका अपघातात पाय गमावल्या नंतर त्यांच्या करियर ला उतरती कळा लागली. २००२ ला मृत्यू होई पर्यंत त्यांनी आणि त्यांच्या परिवाराला अत्यंत हलाखीची परिस्थिती सहन करावी लागली होती.

देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवल्यानंतर एका अनपेक्षित घटनेने माखन सिंग यांना काळाच्या पडद्या आड कायमच ढकललं.

 

२. खाशाबा जाधव :

 

yourstory.com

 

हे नाव कोणाला माहीत नाही? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला पहिलं वहील वैयक्तिक पदक मिळवून देणारे खेळाडू!

१९५२ च्या हेलसिंकी ऑलम्पिक साठी साधा प्रवास आणि राहण्या खाण्याचा खर्च सुद्धा त्यांचा केला गेला नव्हता. स्वखर्चाने ऑलम्पिक स्पर्धा गाठून पदक मिळवून ते परत आले.

१९९६ च्या अटलांटा ऑलम्पिक मध्ये लियांडर पेस ने पदक जिंकेपर्यंत खाशाबा जाधव यांचा देशासाठी पदक मिळवण्याचा रेकॉर्ड अबाधित होता.

३. मो. युसूफ खान:

 

indiatimes.com

 

कधीकाळी भारत सुद्धा फुटबॉल मध्ये एक दादा संघ होता, होय! १९६२ च्या आशियायी खेळात दक्षिण कोरियाला पराभूत करून भारताने सुवर्ण पदक जिंकले होते आणि हे पदक जिंकण्याच्या मागे मोठा हात होता तो मोहम्मद युसूफ खान यांचा.

१९६० ला रोम ऑलम्पिक मध्ये गेलेल्या भारताच्या फुटबॉल संघाचे ते सदस्य सुद्धा होते.

 

४.अश्विनी नाचप्पा :

 

kreedon.com

 

पी टी उषा यांना टक्कर देणारी खेळाडू म्हणजे अश्विनी नाचप्पा! दक्षिण आशियायी खेळाच्या ३ सिझन मध्ये एकूण ३ सुवर्ण आणि ४ रौप्य पदक त्यांनी पटकवलेली.

आपल्या शेवटच्या सामन्यात म्हणजेच १९९० च्या दक्षिण आशियायी खेळात त्यांनी रौप्य पदक पटकवलेलं.परंतु, खेळात नसलेलं भविष्य पाहता त्यांनी अभिनय क्षेत्रात आपला मोर्चा वळवला.

तेव्हा पासून त्या विस्मरणात गेल्या.

 

५. सरवान सिंग :

 

indiatimes.com

 

१९५४ च्या आशियायी खेळात अडथळ्यांच्या शर्यतीत भारतातर्फे सुवर्ण पदक जिंकणारा खेळाडू. सरवान सिंग यांचा पहिलाच मोठा इव्हेंट आणि त्यात सुद्धा त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षेपेक्षा जास्त यश त्यांनी मिळवलं.

पण, २० वर्षानंतर एक टॅक्सी ड्रायव्हर म्हणून त्यांना आपली रोजंदारी चालवावी लागत होती.

अखेरच्या क्षणी स्वतःच सुवर्ण पदक विकून त्यांना उदरनिर्वाहासाठी पैसा जमवावा लागला होता.

 

६. मुरलीकांत पेठकर :

 

chaseyoursport.com

 

१९६५ च्या इंडो-पाक युद्धामध्ये गोळी लागेपर्यंत पेठकर हे आर्मीचे एक नावाजलेले बॉक्सर होते. देशाला पॅरालॉम्पिक मध्ये वयक्तिक पदक मिळवणारे खेळाडू म्हणजे मुरलीकांत पेठकर.

१९७२ च्या हेडलबर्ग पॅरालॉम्पिक मध्ये ५० मीटर फ्री स्टाईल मध्ये विक्रमासह सुवर्ण पदक जिंकल होत.

भारतीय लष्कराने १९८४ पासून रेकॉर्डची नोंद ठेवायला सुरवात केलेली. सो पेठकर यांचा रेकॉर्ड आज अधिकृत सुद्धा नाही.

 

७. देवेंद्र झझारिया :

 

youtube.com

 

मुरलीकांत पेठकर यांच्या नंतर सुवर्ण जिंकणारे झझारीया दुसरे खेळाडू होते. २००४ च्या पॅरालॉम्पिक मध्ये एका भालाफेकी मध्ये त्यांनी सुवर्ण जिंकले होते.

ते पहिले दिव्यांग खेळाडू आहे ज्यांना पद्मश्री हा नागरी सन्मान देखील प्राप्त झाला आहे. एवढे किर्तीमान रचून सुद्धा आज ते दुर्लक्षित आहेत.

 

८. शंकर लक्ष्मण :

 

sportskeeda.com

 

पहिले गोल किपर ज्यांनी आंतरराष्ट्रीय हॉकी संघाचे नेतृत्व केलं आहे. २ ऑलम्पिक सुवर्ण आणि १ रौप्य सोबत २ आशियायी खेळात सुवर्ण आणि १ रौप्य पदक जिंकणारे खेळाडू म्हणजे शंकर लक्ष्मण!

आंतरराष्ट्रीय हॉकी मध्ये आपल्या अभूतपूर्व गोल किपिंगमुळे ‘रॉक ऑफ जिब्राल्टर’ म्हणून ते प्रसिद्ध होते. आपला शेवट त्यांना अत्यंत हालाकी मध्ये घालवावा लागला.

गॅंगरीन मुळे त्यांचा मृत्यू झाला.

 

९. करनाम मल्लेश्वरी :

 

indiatimes.com

 

ऑलम्पिक खेळात देशाला पदक मिळवून देणारी पहिली महिला खेळाडू. २००० च्या सिडनी ऑलम्पिक मध्ये वेटलिफ्टिंग खेळ प्रकारात त्यांनी ब्रॉंझ पदक जिंकले.

त्या सलग ९ वर्ष नॅशनल रेकॉर्ड होल्डर होत्या. स्वतःचेचं रेकॉर्ड तोडत तोडत त्या इथपर्यंत पोहोचले होते.

आज दशकभरा नंतर त्या काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. फक्त ऑलम्पिक खेळ जवळ आले की त्यांचा उल्लेख प्रसारमाध्यमात सुरू होतो.

 

१०. विल्सन जोन्स :

 

indiatimes.com

 

अर्जुन पुरस्कार १९६२, पद्मश्री १९६५, द्रोणाचार्य पुरस्कार १९९६, एवढे उपलब्धी असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावर विख्यात खेळाडू म्हणजे विल्सन जोन्स!

२ वेळा वर्ल्ड बिलियड चॅम्पियन आणि १२ वेळा नॅशनल चॅम्पियन असलेले जोन्स यांच्या आज आठवणी सुद्धा धूसर झाल्या आहेत.

 

११. मारिया इरूदायम :

 

mensxp.com

 

कॅरम या खेळासाठी अर्जुन पुरस्कार मिळवलेले एकमेव खेळाडू आणि एकमेव भारतीय!

२ वेळा वर्ल्ड चॅम्पियन आणि ९ वेळा नॅशनल चॅम्पियन राहिलेले मारिया सामान्य जीवन व्यतीत करण्यावर समाधान मानतात. त्यामुळे प्रसिद्धीच्या लाईम लाईट पासून ते दूरच राहिले.

 

१२. आशा रॉय :

 

indiatimes.com

 

एका भाजी विक्रेत्या कुटुंबातील मुलगी आज ट्रॅक वरची वेगवान भारतीय आहे. आशा रॉय ने २०११ साली कोलकात्यात भरलेल्या ओपन अँथलँटिक चॅम्पियनशिप मध्ये रेकोर्ड प्रस्थापित केला.

प्रत्येक खेळाडूला ठरलेला आहार हा घ्यावा लागतो. पण आशाला दोन वेळचं साधं जेवण सुद्धा नशिबी नव्हतं.

भारत चांगले खेळाडू निर्माण करत नाही यावर रडणं आता बंद झालं पाहिजे. जे आता उपलब्ध आहे त्यांना पाठिंबा द्या. त्यांना त्यांचं क्रेडिट द्या.

मुख्यतः हे सगळं सरकार, शिक्षण व्यवस्था करेल, अशी व्यवस्था निंर्माण करा

त्यामुळेचं भविष्यात निर्माण होणारे खेळाडू प्रोत्साहित होऊन देशाचं नाव उज्वल करतील. तुम्हाला पटतंय का? तुमचं मनमोकळं मत कमेंट्स द्वारा नक्की व्यक्त करा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version