Site icon InMarathi

अनेकांच्या करिअरवर कोरोनाने उभ्या केलेल्या एका महाभयंकर संकटावर “हा” आहे रामबाण उपाय!

recession due to corona inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

अनेकदा सामाजिक परिस्थिती अशी निर्माण होते की मंदीचा काळ येतो आणि अनेकांच्या नोकऱ्या जाण्याचे संकट उद्भवते.

तसं तर नोकरी जाणे ही परिस्थिती कोणावरही कोणत्याही कारणाने कधही ओढवू शकते. मात्र काही परिस्थिती या सार्वजनिक मंदिच्या येतात. या काळात एक दोन नव्हे तर अनेकजण या संकटाचा सामना करत असतात.

नोकरी जाण्याने किंवा ती धोक्यात येताना दिसल्याने व्यक्ती काळजीत पडते. निराश होते आणि हळूहळू डिप्रेशनमध्ये जाते.

कोरोना महामारी

 

theeconomictimes.com

 

सध्या कोरोनाचा काळ हा विचित्र परिस्थितीचा काळ झाला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय- उद्योग धोक्यात आलेत. काही मंद पडलेत, तर काही बंद पडलेत.

अशा वेळी या उद्योग-व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या अनेकांच्या नोकऱ्याही आज संकटात आहेत. काहींच्या गेल्यात, काहींच्या जाण्याच्या मार्गावर आहेत, तर काहींच्या जेमतेम टिकून आहेत.

अशावेळी केवळ नोकरी गेलेली व्यक्तीच डिप्रेशनमध्ये आहे असे नाही, तर ज्यांच्या नोकऱ्या अजून शिल्लक आहेत, ते देखील अस्थिरतेच्या सावटाखाली डिप्रेशनमध्येच आहेत.

सकारात्मकता –

 

youtube.com

 

प्रत्येक व्यक्तीचा घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा वेगळा असतो. आपण एखाद्या घटनेकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघतो हे देखील आपल्याला डिप्रेशनमध्ये नेण्यास किंवा त्यातून निघण्यास मदत करते.

त्यामुळे घटनेकडे सकारात्मकतेने पाहायला शिका.

अनेकदा वैयक्तिक संकटापेक्षा सार्वजनिक संकट लोकांना सुसह्य वाटते. कारण, ही परिस्थिती माझ्या एकट्याची नाही, तर माझ्यासारख्या अनेकांची आहे ही गोष्ट त्याला दिलासा देत असते.

आज कोरोना लॉकडाऊनची परिस्थिती ही केवळ भारताची समस्या नसून ती जगभराची समस्या बनलेली आहे. अमेरिकेत देखील अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत.

तरी देखील संकट वैयक्तिक असो वा सामुदायिक त्याचे दुष्परिणाम तर भोगावे लागतातच. त्यावरच आपण आता विचार करणार आहोत.

 नैराश्य : 

 

 

नोकरी गेल्यामुळे केवळ आर्थिक नुकसान होते आणि त्याचीच काळजी सतावते असे नाही. नोकरीशी संलग्न बऱ्याच गोष्टी असतात. किंबहुना आपल्या नोकरीशी संबंधित आपले जवळपास निम्मे आयुष्यच असते म्हणा ना!

आपले रोजचे रुटीन असते, कलिग्सच्या भेटीगाठी असतात. नोकरीच्या जागेशी जुळलेले भावबंध असतात. प्रवास असतो. त्या प्रवासातले साथी-सोबती असतात. त्यांच्याशी शेअरींग असतं.

वेगवेगळ्या लोकांशी मुलाखती असतात. बाहेर खाणं-पिणं असतं. वेळेची सायकल असते. अशा एक ना अनेक बाबी आपल्या नोकरीनिमित्ताने आपल्याला व्यापून असतात. जेव्हा नोकरी जाते तेव्हा या सगळ्याच गोष्टींना माणूस दुरावतो.

आर्थिक बाबींसोबतच एक नाकारलं गेल्याचं दुःखही असतं. ते अधिक त्रासदायक असतं. माणसाचा आत्मविश्वासच प्रसंगी घालवणारं असतं.

 

Patrika.com

 

 

नोकरी गेल्यानंतर दुःख तर होणारच आहे. शिवाय ज्यांची नोकरी सध्याच्या काळात शिल्लक आहे, ते देखील फार आनंदात आहेत असं नाही. ते देखील नोकरीच्या शाश्वततेबद्दल साशंक आहेत.

नोकरी चालू असणाऱ्या लोकांचे नोकरीचे रुटीन पूर्वीचे राहिलेले नाही. कलिग्सच्या, क्लायेंटच्या गाठीभेटी, समोरासमोर बसून बिझनेस लंच, मिटींग्स, त्यातून घडणारे डील्स, बोलणी इत्यादी नेहमीचे नोकरीतले रुटीन पूर्णपणे बदललेले आहे.

त्यामुळे देखील माणसे निराश झालेली आहेत. काहींचे पगार अर्ध्यावर आलेले आहेत. अशावेळी प्रत्येकजण डिप्रेशन किंवा नैराश्याच्या वेगवेगळ्या स्तरावर आहेच. त्यात पुन्हा कोरोना विषाणूचे टेन्शन आहे ते वेगळेच.

 

काळजी आणि चिंता : 

 

 

आपल्याकडे म्हण आहे. काळजी करू नका, काळजी घ्या. या न्यायाने काळजी करणे आणि काळजी घेणे या दोन वेगळ्या बाबी आहेत हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागलं तर येणारं नैराश्य सुसह्य होईल.

आपल्या हातात असणाऱ्या गोष्टी करणे, आलेल्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करणे, त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधणे, नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणे, हार न मानणे, सकारात्मक राहणे या गोष्टी काळजी घेण्यात मोडतात.

प्रयत्न न करता केवळ काळजी करत बसणे, निराश स्थितीत बसून राहणे याला काळजी करणे म्हणतात. या काळजी करण्यातून मार्ग तर निघत नाहीच, उलट मनुष्य अधिकाधिक डिप्रेशनमध्ये जात राहतो.

यासाठी सर्वप्रथम आपल्या मनाला समजावून मानसिक तयारी करा.

दुसरा जॉब मिळायला काही वेळ, काही अवधी लागू शकतो. निदान या परिस्थितीत तरी कमीत कमी सहा महिने ते वर्षही लागू शकतं. नवीन जॉबसाठी प्रयत्न करत असताना अनेक ठिकाणी नकार देखील मिळण्याची शक्यता राहणार आहे.

 

यातून बाहेर पडण्याचे मार्ग –

या मानसिक नैराश्यातून आणि डिप्रेशनमधून वाचायचं असेल, स्वतःला सावरायचं असेल, तर पुढील गोष्टींना फॉलो करा.

काळजी घ्या. काळजी करु नका –

 

womenplanet.com

 

नोकरी गेल्याचे दुःख करत बसाल तर पुढचे प्लॅन आखणे कठीण होईल. दुःखाला सोबत ठेवा. पण त्याला आपल्यावरचढ होऊ देऊ नका.

लगेचच पुढील प्लॅन आखायला, नवीन नोकरी शोधायला, त्याच्या इंटर्व्यूची तयारी करायला, त्या अनुषंगाने अभ्यासाला सुरुवात करा.

 

आपले वेळापत्रक ठरवा –

 

youtube.com

 

नोकरी नसल्याने रिकामा वेळ असेल. पण तो तुमच्या सुट्टीचा वेळ समजू नका. दुसरा जॉब शोधणे हाच आता आपला प्रथम जॉब आहे असे समजून दिवसभराचे वेळापत्रक आखा.

खाण्यापिण्याच्या वेळा पूर्वीप्रमाणेच आखून घ्या. त्या पाळण्याचा प्रयत्न करा. उरलेला वेळ दुसरा जॉब शोधण्याच्या प्रयत्नासाठी ठेवा. काही वेळ घरातल्या कामात मदतीसाठी ठेवा.

ज्याप्रमाणे नोकरीत असताना घरासाठी, घरच्यांसाठी वेळ देत होतात, तसंच आताही त्यांच्यासाठी वेळ राखीव ठेवा.

 

नव्या संधीचा, क्षेत्राचा शोध घ्या –

 

 

नोकरी जाण्याकडे अनेकदा तुम्ही ही फिल्ड चेंज करण्याची संधी म्हणूनही बघू शकता. आहे त्या प्रकारचाच जॉब शोधायचाय की या निमित्ताने काही स्वतःचा व्यवसाय-धंदा करून बघायचाय याचा पडताळा घ्या.

नोकरीचे क्षेत्र बदलण्याचीही संधी आहे. त्या दृष्टीनेही विचार करा. आपल्या आवडत्या क्षेत्राकडे या निमित्ताने वळता येतं का ते बघा.

आपल्यातील इतर कौशल्ये ओळखा अनेकदा चाकोरीबद्ध नोकरीत आपण आपल्या अंगातील इतर अनेक कौशल्यांकडे दुर्लक्ष केलेले असते. आता आपल्यातील अशा कौशल्यांचा शोध घ्या.

नवीन जॉब शोधण्यासाठी तुमच्यातील अशा गुणांचा-कौशल्यांचा उपयोग होऊ शकतो आणि नवीन फिल्डही मिळू शकते.

 

नकार स्वीकारायची तयारी ठेवा –

 

facilethings.com

अनेकदा असंही होऊ शकतं की तुम्ही नोकरीसाठी अर्ज कराल पण तुम्हाला तिथून काही उत्तरच येणार नाही. अशावेळी खचून जाऊ नका.

आपण फक्त नोकरी शोधत नाही आहोत, तर एक चांगली नोकरी शोधतोय, चांगल्या संधीच्या प्रतीक्षेत आहोत हे लक्षात ठेवा.

 

मदत घ्या –

 

childandfamilymentalhealth.com

 

घरच्यांना विश्वासात घ्या. तुम्ही जर डिप्रेशनमध्ये काहीच प्रयत्न न करता झोपून किंवा बसून राहाल, तर ते त्यांनाही आवडणार नाही. पण तुम्ही प्रयत्न करताना दिसलात तर तेही तुमच्यावर विश्वास ठेवतील. तुम्हाला मदत करतील.

तुम्हीही घरच्यांना त्यांच्या कामात मदत करा. उत्साही राहा. म्हणजे घरचेही तुम्हाला समजून घेतली. लक्षात ठेवा, डिप्रेशनने डिप्रेशन वाढते, तर उत्साहाने उत्साह वाढतो, आनंदाने आनंद.

परिस्थिती बदलते, यावर विश्वास असू द्या आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. जिथे गरज वाटेल तिथे घरच्यांचा, मित्रमंडळींचा, नातेवाईकांचा सल्ला घ्या, त्यांची मदत मागा.

 

व्यावसायिक सल्लागाराची मदत घ्या –

 

youtube.com

 

एवढं करूनही जर डिप्रेशन येत असेल, नैराश्य दाटून येत असेल, तर व्यावसायिक मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्या. त्यांची मदत नक्की होते.

शेवटी एक लक्षात ठेवायचं की आयुष्य माणसासाठी आहे. माणूस आयुष्यासाठी नाही. “जान है तो जहान हैं” या न्यायाने आनंदी राहून परिस्थितीचा सामना करणं महत्त्वाचं असतं.

आपल्याहून वाईट परिस्थिती असलेल्या लोकांकडे पाहिलं तर आपण बऱ्याच चांगल्या परिस्थितीत आहोत याची जाणीव होते आणि डिप्रेशन कमी होण्यास मदत होते.

एक गमावलेल्या गोष्टींपेक्षा आपल्याकडे असणाऱ्या जमेच्या बाजू कोणत्या आहेत त्याकडेही पाहिल्यास डिप्रेशन कमी होईल. सो… चिअर अप! जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा दुसरे दहा आपली वाट पाहात असतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version