Site icon InMarathi

“माफिया” थरार दाखवणाऱ्या “गॉडफादर” मधील जीवनाचे “हे” धडे प्रत्येकाने शिकणं अत्यावश्यक आहे!

godfather featured inmarathi

pinterest.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

गॉडफादर. १९७२ मध्ये रिलीज झालेला हॉलीवूड चा हा सिनेमा अफलातून होता. हा फक्त एक सिनेमा नसून ती आयुष्यभर पुरणारी शिकवण होती.

आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ‘गॉडफादर’ मध्ये आपल्याला बघायला मिळतं. फ्रान्सिस फोर्ड कोपोला यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा तीन भागात तयार झाला होता.

पुझो या लेखकाने १९६९ मध्ये गॉडफादर या नावाने एक कादंबरी लिहिली होती. ही कादंबरी त्या वर्षीची सर्वात जास्त विकलेली कादंबरी होती.

या कादंबरी वर गॉडफादर हा सिनेमा आधारित होता.

 

amazon.in

 

एक डॉन ज्याचं नाव विटो कॉर्लेओने आहे तो एका माफिया फॅमिली चा मुख्य सूत्रधार आहे. तो आपला उत्तराधिकारी म्हणून त्याच्या सर्वात छोट्या मुलाची म्हणजेच मायकल ची निवड करतो.

पण, हा निर्णय त्याला किती महागात पडतो आणि त्या निर्णयासाठी त्याला त्याच्या किती निकटवर्तीय लोकांचा जीव धोक्यात टाकावा लागतो असं या सिनेमाचं थोडक्यात कथानक आहे.

बॉक्स ऑफिस वर सुद्धा या सिनेमा ने आधीचे कमाईचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले होते. अवघ्या ७.२ मिलियन US डॉलर्स मध्ये तयार झालेल्या या सिनेमा ने जवळपास २८७ मिलियन US डॉलर्स इतकी कमाई केली होती.

हा त्यावर्षी फक्त अमेरिकेतच नाही तर पूर्ण जगात सर्वाधिक कमाई केलेला सिनेमा होता.

४५ व्या अकॅडमी अवॉर्ड मध्ये या सिनेमाने जगात सर्वात जास्त प्रतिष्ठेचा समजला जाणारा ऑस्कर अवॉर्ड बेस्ट सिनेमा आणि बेस्ट हिरो (ब्रँडो) आणि बेस्ट स्क्रीनप्ले (पुझो आणि कोपोला) यांना प्रदान करण्यात आला होता.

 

cheatsheet.com

 

आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की माफिया बॉस च्या आयुष्यावर तयार केलेल्या या सिनेमातून आपण आज काय घेऊ शकतो?

तर या सिनेमा मध्ये काही गोष्टी ज्या एका लीडर ने अवश्य कराव्यात अश्या दाखवण्यात आल्या आहेत आणि त्याच बरोबर कोणत्या गोष्टी अजिबात करू नयेत हे सुद्धा दाखवण्यात आलं आहे.

पहिल्यांदा आपण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल जाणून घेऊ :

 

१. योग्य मोबदला :

संपूर्ण चित्रपटामध्ये एक मेसेज देण्यात आला आहे की, योग्य मोबदला दिल्यास गोष्टी घडतात.

हा मोबदला पैश्याच्या स्वरूपात असेल तर कोणीही तुमचं काम होण्यापासून रोखू शकत नाही हा एक क्लिअर कट मेसेज देण्यात आला आहे.

एक डायलॉग आहे जो की वारंवार वापरला जातो, “मी त्याला अशी ऑफर देईन की तो त्या ऑफरला नकार देऊच शकणार नाही.”

 

bumppy.com

 

या वाक्यातून काय प्रतीत होतं? हेच की, प्रत्येकाची एक किंमत असते किंवा एक ठराविक क्षण असतो जेव्हा ती व्यक्ती ते काम करण्यास तयार होऊ शकते.

हुशार लिडर्स ते असतात जे की, दोघांच्याही फायद्याची बाजू बघत असतात आणि त्याद्वारे नंतर होणाऱ्या गैरसमजुती टाळत असतात.

 

२. रिलेशन्स :

गॉडफादर या पूर्ण सिरीज मध्ये आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांसोबत आपले असलेले नातेसंबंध किती महत्वाचे आहेत या गोष्टीचं चित्रण दाखवण्यात आलं आहे.

आपल्या परिवारातील नातेसंबंध हाताशी घेऊन आपण किती मोठी संस्था (भलेही ती गैर कामं करणारी असू द्या) उभी केली जाऊ शकते याचं एक उत्कृष्ट उदाहरण दाखवण्यात आलं आहे.

गॉडफादर या नावाचा असा अर्थ होतो की, एक अशी व्यक्ती जिने परिवारातील सर्व व्यक्तींशी चांगले संबंध टिकवून ठेवले आहेत आणि त्या व्यक्तीवर सगळे जीव ओवाळून टाकतात.

 

pinterest.com

 

जरी त्या लोकांचं गॉडफादर सोबत कोणतंही रक्ताचं नातं नाहीये तरीही. चांगले लीडर हे त्यांच्या अनुयायांशी संबंध कसे असावेत हे स्वतःच्या वागण्यातून कायम सांगत असतात.

 

३. संधीसाधू वृत्ती :

डॉन कॉर्लेओने आणि त्यांचे साथीदार पूर्ण सिनेमा मध्ये कायम संधीच्या शोधात असतात.

इतर माफिया फॅमिली कडून त्यांना मिळणाऱ्या कडव्या आव्हानांना ते कसं परतवून लावतात हे खूप योग्यरीत्या दाखवण्यात आलं आहे.

जवळचं नुकसान पाहण्याच्या आधी दूरचा फायदा बघितला पाहिजे या वृत्तीने हा डॉन काम करताना दाखवण्यात आला आहे जो की अचानक त्याचे प्लॅन बदलत असतो.

 

pinterest.com

 

कायम त्याच्या विचारांमध्ये एक लवचिकता असते जी की कोणत्याही लीडर आणि सामान्य व्यक्तीसाठी सुद्धा खूप आवश्यक गोष्ट आहे.

 

४. Leader creates Leaders :

गॉडफादर सिनेमाच्या उत्तरार्धात मायकल कॉर्लेओने हा दुसऱ्या परिवारातून या माफिया परिवारात कसा दाखल होतो,

आणि कालांतराने तो कसा वडिलांचा व्यवसाय स्वतः चालवतो आणि स्वतः कोरोलिओने एक डॉन म्हणून कसा नावारूपास येतो हे दाखवण्यात आलं आहे.

मायकल हा लीडर म्हणून कधी तयार होतो ते त्या हॉस्पिटल मधल्या सीन मध्ये खूप योग्य पद्धतीने दाखवण्यात आलं आहे.

जेव्हा मायकल हा त्याच्या वडिलांना त्यांच्या मारेकऱ्यांपासून वाचवण्याची जवाबदारी स्वतःवर घेतो.

 

gettyimages.com

 

टॉम हेगन हे ज्याप्रकारे मायकल च्या डॉन बनण्याच्या प्रवासात त्याला घडवतात हे एका लिडर ने लिडर्स कसे तयार करावेत याचं एक योग्य उदाहरण म्हणता येईल.

 

नकारात्मक गोष्टी :

१. चारित्र्य :

डॉन विटो कॉर्लेओने हे जरी सिनेमाचे हिरो असले आणि एक अत्यंत कणखर नेता म्हणून त्यांना दाखवण्यात आलं असलं.

तरीही ते एका माफिया परिवाराला त्यांची गुन्हेगारी वाढवण्यासाठी मदत करत असतात ही गोष्ट विसरण्यासारखी मुळीच नाहीये.

एका कणखर नेत्यामध्ये आणि एका नैतिक नेत्यामध्ये फरक असतो तो म्हणजे त्यांच्या चारित्र्याचा (कॅरेक्टर). नैतिकतेला धरून चालणारे लिडर हे कायम सामाजिक हित प्रथम ठेवत असतात.

माफिया लिडर जो गॉडफादर मध्ये दाखवण्यात आला आहे तो कायम लोकांचा द्वेष करत असतो.

त्यामुळे जरी कॉर्लेओने हा यशस्वी होताना आपल्याला पडद्यावर दिसतो आणि तो खूप श्रीमंत देखील होतो. तरीही तो एक वाईट माणूस म्हणूनच गणला जातो.

 

rogerebert.com

 

२. सत्ता आल्यावर तुम्ही भ्रष्ट होतात :

संपूर्ण गॉडफादर सिरीज मध्ये आणि त्यातल्या त्यात गॉडफादर २ मध्ये हे अधोरेखित करण्यात आलं आहे की एकदा का तुमच्याकडे सत्ता आणि निर्णय घेण्याची क्षमता आली की तुम्ही भ्रष्ट होण्याचे खूप चान्सेस आहेत.

कॉर्लेओने हे ज्या प्रकारे सुरुवातीला मेहनत करणारे, नियम पाळणारे दाखवण्यात आले आहेत आणि तेच पुढे जाऊन माफिया परिवाराच्या प्रमुख म्हणून पद स्वीकारतात.

आणि काही काळातच कोणाला धमकावणे, कोणाला मारणे या गोष्टी सर्रासपणे करणं सुरू करतात.

त्यांच्या गुन्हेगारी कृत्याचं कायम समर्थन होताना आपल्याला दिसत राहतं ज्याचं खापर ते समाजातील लोक भ्रष्ट आहेत यावर कायम फोडताना दिसतात.

आपल्या आयुष्यात आपण लक्षात ठेवाव्यात अश्या काही गोष्टी आहेत ज्या की सिनेमा मधल्या या डायलॉग मधून सांगण्यात आल्या आहेत

१. “A man who doesn’t spend time with his family can never be a real man”.

 

scrolldroll.com

 

–  कॉर्लेओने हा सल्ला जॉनी फॉन्टेन यांना देतात आणि सांगतात की कोणत्याही परिस्थतीत तुम्ही तुमच्या परिवाराची साथ दिली पाहिजे.

ही गोष्ट जिवंत असेपर्यंत त्यांचं रक्षण करेल आणि गेल्यावर तुमचा वारसा म्हणून पुढे चालवला जाईल.

२. “Leave the gun, take the cannolis”.

–  तुमचे ध्येय आणि महत्वाच्या गोष्टी कायम डोळ्यासमोर ठेवा आणि तुमच्या कोणत्याही विजयावर स्वतःला शाबासकी अवश्य द्या.

३. “My father taught me many things… keep your friends close, but your enemies closer”.

– तुमच्या आयुष्यात घडून गेलेल्या नकरात्मक गोष्टींचा सुद्धा अभ्यास करा. तुम्हाला गोष्टी प्लॅन करायला सोप्या जातील.

 

me.me

 

४. “Good health is most important thing. More than success, more than money , more than power.”

–  उत्तम आरोग्य ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. यश, पैसा आणि सत्ता यापेक्षाही कित्येक पटीने आवश्यक आहे!

५. “Never tell anybody outside the family that what you are thinking again”.

– ज्या लोकांवर तुमचा पूर्णपणे विश्वास नाहीये त्यांना कोणतीही गोष्ट सांगायचं टाळा.

६. “The richest man is the one with most powerful friends”.

– तुमचे मित्र योग्य पद्धतीने निवडा. कारण संकटसमयी तेच तुमच्या कमी येतील.

७. “A lawyer with briefcase can steal more than a thousand men with guns.”

 

pinterest.com

 

– याच कारणासाठी तुम्ही कायम फॅमिली ला सोबत धरून चालणं अत्यंत आवश्यक आहे. गोष्टी तुमच्या बाजूने घडत नसतील तर वकील सुद्धा आवडीने तुमची इस्टेट हडप करू शकतो.

८. ” Accident don’t happen to people who take accident as a personal insult.”

– आयुष्यातले तुमचे निर्णय जर अगदी क्लीअर असतील तर आणि तरच ते इतरांना व्यवस्थित समजू शकतील.

९. “I hoped we could come here and reason together. And as a reasonable man, I am willing to do whatever is necessary to find peaceful solution to these problems.”

 

everplans.com

 

– डॉन कॉर्लेओने जेव्हा पाच परिवारातील वरिष्ठ सदस्यांना बोलत असतो तेव्हाचा हा डायलॉग आहे.

आपण आपल्या परीने कोणताही प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि तरीही जर का तो प्रश्न सुटत नसेल तर वरिष्ठांकडे तो प्रश्न सुपूर्त करावा.

अश्या पद्धतीने मनोरंजन, कलाकारांचे उत्तम अभिनय आणि आयुष्य जगताना लक्षात ठेवावेत असे काही मौल्यवान उपदेश यामुळे गॉडफादर हा सिनेमा म्हणजे complete package म्हणून आपल्या मनातली खूप मोठी जागा व्यापून टाकतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version