इतर देशांमध्ये ‘अनिवार्य’ असा हा कायदा भारतात आला तर देश आणखीन ‘सशक्त’ बनेल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आर्मी,नेव्ही आणि एयरफोर्स या संरक्षण क्षेत्रातील तीन खांबांचे चाहते असाल तर सध्या चर्चेत असलेली ही बातमी तुम्हाला नक्कीच माहीत असेल. ‘टूर ऑफ ड्युटी.!’
भारतीय लष्कर सामान्य भारतीयांना लष्कराची ओळख आणि त्यात सेवा बजावता यावी म्हणून तीन वर्षाचा एक कोर्स सुरू करण्याच्या विचारात आहे.
जर या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर सामान्य भारतीयाला देखील सेनेत तीन वर्षासाठी का होईना गौरवशाली अशा भारतीय सेनेत सेवा बजावता येईल.!
ही सेवा कम्पलसरी सुध्दा असू शकते. आता लष्कर काय निर्णय घेते यावर सगळं अवलंबून आहे.
तर भारतात हा जो नवीन बदलावं घडून येणार आहे,हा इतर काही देशात आधी पासूनच लागू झालेला आहे.
तर बघूया असे काही देश जिथे लष्करी सेवा बजावणे कम्पलसरी आहे.
१. इस्त्रायल –
सक्तीची लष्करी सेवा म्हटलं आणि इस्त्रायल आठवणार नाही हे शक्यचं नाही. इस्त्रायल मध्ये स्त्री आणि पुरुष दोघांना लष्करी सेवा देणे अनिवार्य आहे.
स्त्रियांना दोन वर्षे तर पुरुषांना तीन अस या सेवेच स्वरूप आहे. प्रत्येक इस्त्रायली नागरिकाला हा नियम लागू पडतो.मग ती व्यक्ती अनिवासी असली तरी.
मेडिकल आधारावर या सेवेतून सूट दिली जाते, त्याव्यतिरिक्त नाही.
गॅल गॅडोट. हा तीच वंडर वुमन. ही स्वतःला इन्ट्रोड्यूस करताना आयडीएफ ची म्हणजेच इस्रायली डिफेन्स फोर्सची माजी कर्मचारी म्हणून जरूर उल्लेख करते, नंतर अभिनेत्री आणि बाकी.
वयाच्या विसाव्या वर्षी ती सेवेत रुजू झाली होती. सध्याचे इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे सुद्धा इस्त्रायली डिफेन्स फोर्सच्या ‘सेरात मटकल’ या स्पेशल फोर्सेसचे सदस्य राहिले आहेत.
१९७३च्या यॉम किप्पूर युद्धा दरम्यान अमेरिकेतल्या एमआयटी मधलं शिक्षण अर्धवट सोडून ते लष्करात सेवेला दाखल झाले होते.
त्यांचे बंधू योनाथन नेतन्याहू हे ऑपरेशन एंटबेच्या दरम्यान हुतात्मा झाले होते. एकंदरीत इस्त्रायली लष्कराची एकूण व्याप्ती येथे दिसून येते.
२. ब्राझील –
१८ वर्षा पेक्षा जास्त प्रत्येक ब्राझीलीयन नागरिकाला लष्करात सेवा बजावी लागते. १० महिने ते एक वर्ष असं या सेवेच स्वरूप असत. स्त्रियांना मेडिकल चेकअपच्या आधारे यात सामील होता येत.
महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यावर सेनेमध्ये रुजू व्हायला प्रावधान दिल गेलं आहे. ब्राझील मध्ये ही भरती अनिश्चित असते.
गरज आणि परिस्थिती नुसार ते सेनेत भरती चालू करत असतात.
३. दक्षिण कोरिया –
संरक्षण दलात सेवे संबंधी दक्षिण कोरिया जरा जास्त काटेकोर असल्याचं दिसून येत.
एका सक्षम दक्षिण कोरियायी पुरुषाला कमीत कमी २१ महिने लष्करात,२३ महिने नौसेनेत आणि २४ महिने वायुसेनेत सेवा द्यावी लागते.
जर एखादी व्यक्ती ही एशियायी किंवा ऑलम्पिक खेळात पदक विजेता खेळाडू असेल तर त्यांना कॉस्ट गार्ड, पोलीस किंवा अग्निशामक दलात सेवा द्यायचा ऑप्शन खुला असतो.
इथे पुरुषांना ११ वर्ष तर स्त्रियांना ७ वर्ष सेवा देणे अनिवार्य आहे.
४. तुर्की –
तुर्की मध्ये २० वर्षा वरील प्रत्येक व्यक्तीला सेनेत सेवा बजावावी लागते.स्त्रियांना यात सूट दिली गेली आहे. परंतु त्यांच्या इच्छेने त्या सेनेत सामील होऊ शकतात.
कमीत कमी तीन वर्षे सेवा बजावणे टर्किश नागरिकाला अनिवार्य आहे.विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यावर सेवा द्यावी लागते.
तर अनिवासी टर्किश नागरिक एक विशिष्ट रक्कम भरून या सेवेतून सूट मिळवू शकतो.
५. रशिया –
रशिया मध्ये एक वर्ष लष्करात काम करणे अनिवार्य आहे. वय वर्ष १८ ते २७ पर्यंत च्या प्रत्येकाला सेवा द्यावी लागते. अपवाद फक्त विद्यार्थी आणि हीच या सेवेला कात्रजचा घाट दाखवायची निन्जा टेक्निक.
लष्करी सेवा टाळता यावी म्हणून बरेच रशियन पुढील शिक्षण घेत असतात.
६. सिरिया –
प्रत्येक सीरियन पुरुषाला लष्करात सेवा बजावणे कम्पलसरी आहे. २०११ च्या मार्च मध्ये सीरियन राष्ट्रपती बशर अल असद यांनी २१ महिन्यांची लष्करी सेवा कमी करून १८ महिने केली.
स्त्रियांना यात सूट दिली गेली आहे.त्या वॉलंटियरी सर्व्हिस देऊ शकतात.
इथे लष्कराची सेवा टाळणे म्हणजे जी नोकरी करत आहात ती गमवण्याची पाळी येऊ शकते.शिवाय जेल ची वारी वेगळी.
७. स्वित्झर्लंड –
इथे १८ ते ३४ वर्षा पर्यंतच्या प्रत्येक पुरुषाला लष्करात सेवा द्यावी लागते. ५-८ महिने कमीत कमी सेवा इथल्या नागरिकाला द्यावी लागते.
त्याही पूढे जर सेवा द्यायची कोणाची इच्छा असेल तर त्यांना वेगळा ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण करावा लागतो.
स्त्रियांना सेवा देणे कम्पलसरी नाही.पण त्या स्वइच्छेने लष्करात सामील होऊ शकतात.
८. चीन –
जगातील सगळ्यात मोठं ऍक्टिव्ह सैन्य असलेला देश. चीनमध्ये लष्करी सेवा देणे अनिवार्य तरी नाही आहे.कारण चीन मध्ये नागरिक स्वइच्छेने संरक्षण दलात सेवा द्यायला तयार असतात.
१८ ते २२ वर्षांच्या तरुणांना लष्करात सहभागी व्हायला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित केले जाते. कमीत कमी दोन वर्षापर्यंत लष्करात सेवा बजावते येते.
मकाऊ,हाँगकाँग सारख्या काही विशेष प्रशासकीय भागात नागरिकांना सूट दिली गेली आहे. याच सोबत ऑस्ट्रिया,इराण,युक्रेन,म्यानमार या देशात सुद्धा लष्करी सेवा अनिवार्य आहे.
इतर देशांमध्ये मिलीटरी सर्व्हिस ही स्वइच्छेने देता येते. कोणत्याही प्रकारची निर्बंध त्यासाठी नाही आहेत.
भारतात शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि पर्मनंट कमिशन असे सर्व्हिस द्यायचे दोन प्रकार आहेत.
शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत कमीत कमी १० वर्ष सेवा देण्याचं प्रावधान आहे. तर पर्मनंट कमिशन अंतर्गत सेवा निवृत्त होई पर्यंत सेवा देऊ शकतो.
स्त्रियांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सेवा देण्याचं प्रावधान होत जे नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने खारीज केलेलं आहे.
जर भारतात देखील टूर ऑफ ड्युटी लागू झालं तर भारत देखील लष्करी सेवा अनिवार्य असलेल्या देशांच्या यादीत सामील होईल.
आणि सामान्य जणांना सुद्धा लष्कराच्या पोलादी भिंतीचा अनुभव घेता येईल.!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.