Site icon InMarathi

भारताची बाळं सुरक्षित रहावी यासाठी कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडणाऱ्या माणसाची कहाणी…!!

polio vaccine inmarathi 5

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अमिताभ जेव्हा टिव्ही वर येऊन ‘बस दो बूंद जिंदगी’ की म्हणतात तेव्हा कळतं की, पोलिओच्या लसीकरणाची मोहीम सुरू होणार आहे.

भारत आता जवळजवळ पोलिओमुक्त झाला आहे. तरीदेखील जन्मणाऱ्या बाळांना तसेच पाच वर्षापर्यंतच्या मुलांना हे पोलिओचे डोस दिले जातात. पोलिओचे समूळ उच्चाटन हे सध्याचं सरकारचे ध्येय आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या डोसमुळे आता अनेक मुलं निरोगी होत आहेत. ही लस सरकार तर्फे सर्व नवजात बालक ते पाच वर्षांपर्यंतचे बालक यांना मोफत देण्यात येते.

 

 

आता ही लस तोंडावाटे देण्यात येते पण जेव्हा तिचा शोध लागला होता तेव्हा ती लस इंजेक्शनद्वारे दिली जायची.

खरोखरच मानवजातीच्या कल्याणासाठी या लसीचा शोध लागला असे म्हणावे लागेल. कारण विसाव्या शतकातील सगळ्यात भयानक आजार असं ज्याचं वर्णन केलं जातं तो म्हणजे पोलिओ.

यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले. तसेच अनेक जण आयुष्यभरासाठी पंगू देखील झाले. १९४० ते १९५० या काळात या आजाराने उग्र स्वरूप धारण केले होते.

याचं वर्णन डेव्हिड ओशिंस्की यांच्या ‘ पोलिओ: अँन अमेरिकन स्टोरी ‘ या पुस्तकामध्ये आहे. त्याकाळात एक्सीडेंटने किंवा कॅन्सरने जितकी मुलं मृत्यूमुखी पडली त्यापेक्षा कितीतरी अधिक मुलांना पोलिओमुळे जीव गमवावा लागला.

 पोलिओला जागतिक महामारी असं कधीच म्हटलं गेलं नाही. परंतु तो आजार तसा भयानकच होता आणि विशेष म्हणजे तो कोणाला आणि कधी होईल, त्याचा संसर्ग दुसऱ्याला कसा होईल? हे काहीच कळत नव्हतं.

अमेरिकेत तर पोलिओला लोक खूप घाबरायचे, दुसऱ्या महायुद्धानंतर न्यूक्लियर बॉम्ब पेक्षाही अमेरिकेत पोलिओची दहशत जास्त होती.

 

https://abcnews.go.com/

 

त्याकाळात पोलिओच्या उच्चाटनासाठी अमेरिकेत हरतऱ्हेचे प्रयत्न केले गेले. त्याकाळात रसायनशास्त्रज्ञ प्रो. साल्क हे पोलिओ साठी लस तयार करत होते. विषाणू तज्ञ प्रोफेसर सबिन हेदेखील ही लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत होते.

त्या दोघांनाही आर्थिक मदतीची गरज होती. कारणं लस तयार करण्यासाठी अनेक प्रयोग करणे, तो व्हायरस तयार करणे आदी गोष्टींकरिता आर्थिक निधीची गरज होती.

म्हणूनच १९३९ नंतर अमेरिकेचे अध्यक्ष बनलेले फ्रांकलीन रुझवेल्ट यांनी पोलिओ वरील औषधाच्या संशोधनासाठी चालना दिली. कारण रूझवेल्ट स्वतः पोलिओची शिकार होते.

१९२१ मध्येच त्यांना वयाच्या ३९ व्या वर्षी पोलिओ झाला आणि त्यांचे पाय कायमचे अधू झाले.

 

business insider.com

 

आजपर्यंतच्या ज्या काही लसी निघाल्या आहेत त्यात व्हायरस वापरूनच व्हायरसला प्रतिबंध केला जातो. परंतु साल्क यांनी व्हायरसची संख्या वाढवून नंतर त्या व्हायरसला formaldehyde वायू वापरून त्या व्हायरसला डीऍक्टिव्हेट करायचे तंत्र वापरायचे ठरवले.

जेणेकरून पुन्हा शरीरात वेगळा व्हायरस तयार होणार नाही. साल्क यांच्या म्हणण्यानुसार शरीरात इंजेक्शन देऊन प्रतिजैविक तयार केल्यास नवीन व्हायरस येऊ शकणार नाही. त्यासाठी सुदृढ माणसाच्या शरीरात दुर्बल व्हायरस सोडायची गरज नाही.

त्याच वेळेस पोलिओ वर निरनिराळ्या लसींवर संशोधन सुरू होते त्यातील एक विषाणू तज्ञ रॉबर्ट सबिन हे तोंडावाटे लस देण्याबाबत संशोधन करत होते.

त्यांच्या म्हणण्यानुसार इंजेक्शन हे पोलिओ रुग्णांबाबतीत धोकादायक ठरू शकेलं. त्यांनी साल्क यांच्यावर ‘स्वयंपाक घरातील रसायनशास्त्रज्ञ’ अशी टीका केली.

तरीदेखील साल्क यांचं संशोधन थांबलं नाही. त्यांनी अनेक माकडांवरती प्रयोग करून पाहिले. ते यशस्वी झाले होते. आता ते माणसांवर करून पाहणे आणि इंजेक्शनमुळे रिझल्ट मिळतो, आणि त्याचा काहीच धोका नाही हे सांगणे गरजेचे होते.

 

https://www.thenewatlantis.com/

 

त्यासाठी त्यांनी त्या इंजेक्शनचा प्रयोग स्वतःवर आणि स्वतःच्या कुटुंबियांवर केला, आणि तेही घरातल्या स्वयंपाक घरातच. घरातल्या गॅसवर सगळ्या सुया उकळून घेऊन स्वयंपाक घरातच इंजेक्शन घेतले.

२६ मार्च १९५३ या दिवशी त्यांनी रेडिओवर जाहीर केले की त्यांचं संशोधन यशस्वी झालेलं आहे.

२६ एप्रिल १९५४ या दिवशी त्यांनी एका सहा वर्षाच्या मुलाला इंजेक्शन दिले. त्यानंतर जून महिन्यापर्यंत अनेक लोक त्यांच्याकडे इंजेक्शन घेण्यासाठी येऊ लागले.

अनेक शाळांमधली मुलं आणि लोक त्यांच्याकडे इंजेक्शन साठी येऊ लागले. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही याचीदेखील चौकशी लोक करत नव्हते, त्यामुळे पोलिओ पासून बचाव होतो एवढे एकच कारण लोकांना इंजेक्शन घेण्यास पुरेसं होतं.

१२ एप्रिल १९५५ ला त्यांचे इंजेक्शन हे पूर्णतः सुरक्षित असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर साल्क यांची मुलाखत घेतली गेली, त्यात त्यांना विचारलं की, पोलिओचा लसीचे पेटंट तुमच्याकडे आहे का? तुम्ही ते पेटंट घेणार का?

त्यावेळेस ते म्हणाले की,” खरंतर नाही. त्याचं पेटंट लोकांकडेच आहे. तुम्ही सूर्याचं किंवा चंद्राचे पेटंट कोणाला देऊ शकता का?” असा उलट सवाल यांनी केला. आणि या औषधाचे पेटंट घेण्यासाठी नकार दिला.

 

https://thehill.com/

 

जर त्यांनी पेटंट घेतलं असतं तर त्यांना सात कोटी डॉलर्स मिळाले असते, पण ते त्यांनी नाकारलं. सूर्य आणि चंद्र काही पैसे घेत नसतील तर मी का घेऊ!! असं त्यांचं म्हणणं होतं.

साल्क यांचं औषध पुर्णतः सुरक्षित आहे असं जरी डिक्लेअर झालं असलं तरी त्यानंतर पोलिओ झालेल्या २०० लोकांना ते इंजेक्शन देण्यात आलं, आणि त्यातील अकरा लोक मृत्युमुखी पडले. अनेक जणांना अर्धांगवायू झाला.

याचं कारण म्हणजे औषध तयार करताना योग्य काळजी घेतली नाही म्हणून त्या कंपन्यांनाच दोषी ठरवण्यात आलं. आणि अमेरिकेत साल्क यांचे इंजेक्शन घेणे सुरूच राहिले. यांच्या लसी वर कोणीही शंका घेतली नाही.

१९६२ मध्ये मात्र सबिन यांची तोंडावाटे दिली जाणारी लस मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध झाले. ती लस इंजेक्शनच्या तुलनेने अत्यंत कमी किमतीत उपलब्ध असल्याने तिलाच जगन्मान्यता मिळाली,आणि त्यानंतर तीच लस आता जगभर देण्यात येते.

गरीब विकसनशील देशांना या लसीचा खूप फायदा झाला. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार २०१३ पर्यंत संपूर्ण जगात फक्त ४१६ लोक पोलिओ बाधित राहिले. हे लोक देखील आफ्रिका खंडातील आणि आशिया खंडातील गरीब देशांमधील आहेत.

साल्क आणि सबिन हे दोघेही पोलिओ लसीचे पेटंट घेऊ शकले असते, पण त्या दोघांनीही केवळ मानवजातीचा विचार करून पेटंट घेण्याचे टाळले. जर त्यांनी आज पेटंट घेतलं असतं तर ते अब्जाधीश झाले असते.

भरपूर पैसे कमावण्याचा मार्ग त्यांच्या समोर उपलब्ध असतानाही त्यांनी तो नाकारला. जर त्यांनी पेटंट घेतलं असतं तर आज पोलिओचा डोस खूप महाग मिळाला असता.

परंतु त्यांनी पेटंट घेतलं नाही म्हणून आज अनेक गरीब देश आणि तेथील लोक त्यांच्या पोलिओ लसीचा मोफत लाभ घेऊ शकतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version