आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लडाखचं नाव जरी ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती ३ Idiots मधल्या रँचो ने तयार केलेली शाळा.
शाळेत असलेले अत्याधुनिक उपकरणं, नुसती पुस्तकी हुशार नसलेली मुलं आणि ती जागा जिथे अथक परिश्रमानंतर फरहान आणि राजू हे रँचो ला शोधण्यात यशस्वी होतात.
सिनेमाच्या शेवटच्या सीन मध्ये आपलं लक्ष वेधून घेत ते म्हणजे बॅकग्राऊंड ला दिसणारे स्वच्छ निळ्या रंगाचं सरोवर, उतरत्या पर्वत रांगा आणि पांढरी शुभ्र वाळू.
पहिल्यांदा बघितलं की असं वाटतं की हे सगळं वॉटर कलर ने रंगवून आपल्या समोर आणून ठेवलं आहे. हे निळ्या रंगाचं सरोवर म्हणजे पंगोंग त्सो सरोवर आहे.
हे सरोवर पूर्व लडाख मध्ये आहे. हे सरोवर लडाख मधून वाहून चीन च्या हद्दीत मोडणाऱ्या तिबेट ला जाऊन मिळते. या जागेवर कायम एक तणावपूर्ण परिस्थिती असते. का?
ते जाणून घेऊयात :
काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी काही भारतीय आणि चीन च्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) यांच्या मध्ये काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता.
रिपोर्ट मध्ये असं म्हणण्यात आलं आहे की, ५-६ मे च्या रात्री ही घटना घडली. लाईन ऑफ actual कंट्रोल (LAC) वर सैनिकांना हाय अलर्ट सांगण्यात आला होता.
या भागात भारतीय सैन्य तैनात असते. या भागात त्या रात्री वायुसेना चे सुखोई-३० हे विमान त्या रात्री पाहण्यात आले होते.
सैन्याने हे नंतर सांगितलं की सध्या कोणतीही युद्धजन्य परिस्थिती नाहीये. वायू सेना ने सुद्धा क्लीअर केलं की कोणत्याही बाजूने हवाई क्षेत्राचं उल्लंघन करण्यात आलेलं नाहीये.
करारा नुसार, भारत आणि चीन या दोन्ही देशांपैकी कोणत्याही देशाचं विमान हे LAC भागाच्या दहा किलोमीटर च्या विना परवानगी शिरकाव करू शकत नाही.
हे अंतर हेलिकॉप्टर साठी १ किलोमीटर इतकं निर्धारित करून ठेवण्यात आलं आहे. या भागाला सैन्याच्या भाषेत ‘फिंगर ५’ असं संबोधलं जातं.
बॉर्डर – बॉर्डर :
या शिवाय, अजून एक घटना सिक्कीम च्या नाकू ला सेक्टर मध्ये सुद्धा घडली होती जिथे की भारत आणि चीन चं सैन्य एकमेकांसमोर आलं होतं.
आपले काही सैनिक जखमी झाले होते. नंतर दोन्ही देशांमध्ये बोलणं झालं आणि मग प्रकरण शांत झालं. असं घडण्याची ही काही पहिली वेळ नव्हती.
लडाख आणि अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या भागात सीमेवर असे तणाव कायमच ऐकायला मिळतात. भारताची सीमा तिबेट ला लागून आहे.
१९१४ मध्ये झालेल्या सिमला शांती करारा नुसार, तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि तिबेट यांच्यामध्ये उत्तर-पूर्व भागासाठी नियंत्रण रेषा ठरवण्यात आली होती.
त्या नियंत्रण रेषेला मॅकमोहन रेषा असं नाव देण्यात आलं.
पण, चीन या रेषेला मान्य करत नाही. चीनचं म्हणणं आहे की, हा करार तिबेट आणि ब्रिटन मध्ये झाला होता,आणि तो आम्हाला मान्य नाही.
म्हणूनच, चीन हा भारतात कायम घुसखोरी करत असतो. १९६२ मध्ये भारत – चीन युद्धाचं कारण सुद्धा ही नियंत्रण रेषाच होती.
त्या आधीचा इतिहास बघितला तर चीनच्या विरोधाचं नेमकं कारण आपल्या लक्षात येईल. १९५९ मध्ये तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा हे तिबेट मधून अरुणाचल प्रदेश मध्ये आले होते.
चीन चं सैन्य त्यांचा पाठलाग करत होती. तेव्हा मसुरी मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी दलाई लामा यांना भारतामध्ये शरण दिली होती.
तेव्हा पासून चीन कायम युद्धाच्या भूमिकेत असतो.
पैगोंग त्सो :
तर आपण पैगोंग त्सो या विषयावर बोलत होतो. हिमालयात ४३५० मीटर उंचीवर असलेल्या पैगोंग सरोवरामधून लाईन ऑफ actual कंट्रोल (LAC) जाते.
हे सरोवर जवळपास १३५ किलोमीटर इतकी लांब आहे. सरोवराचा पश्चिम भाग हा भारता जवळ आहे, तो म्हणजे जवळपास ४५ किलोमीटर. बाकी ९० किलोमीटर वर चीनचं नियंत्रण आहे.
थंडी मध्ये पैगोंग त्सो सरोवर हे पूर्णपणे गोठते.
असं सांगण्यात येतं की, १९ व्या शतकात डोगरा जनरल जोरावर सिंह हे आपल्या सैनिकांना आणि त्यांच्या घोडे दळाला या गोठलेल्या सरोवरावर युद्धाचा सराव करायला लावत असत.
लडाख सरकार च्या वेबसाईट नुसार, पैगोंग त्सो चा तिबेटीयन भाषेतील अर्थ म्हणजे, “उंच गवत असलेलं मैदान असलेलं सरोवर”.
LAC चा वाद :
पैगोंग त्सो सरोवराच्या उत्तरी सीमेवर काही पर्वतरांगा आहेत. ज्याला भारतीय सैन्य ‘फिंगर्स’ या नावाने संबोधते. भारताचं असं म्हणणं आहे की, फिंगर ८ पर्यंत LAC आहे.
फिंगर ४ पर्यंत भारताचं नियंत्रण आहे. चीन ची बॉर्डर ही फिंगर ८ वर आहे. तर भारताची बॉर्डर पोस्ट ही फिंगर ३ वर आहे.
चीन नेहमीच असा दावा करतो की, फिंगर २ हे लाईन ऑफ actual कंट्रोल (LAC) च्या मधून जाते.
LAC च्या २० किलोमीटर पुढे असलेल्या पूर्वेकडच्या भागाला भारत आपला भाग म्हणून त्यावर अधिकार दाखवतो. आणि त्याच भागाला चीन सुद्धा त्याचा भाग मानतो.
या भागाला अकसाई चीन हे नाव देण्यात आलं आहे. ही जागा विवादित आहे. या जागेवर चीन ने कब्जा करून ठेवला आहे. ही जागा भारताच्या नकाशात सुद्धा याच नावाने दाखवण्यात आली आहे.
भारताच्या नकाशावरून सुद्धा भारत आणि चीन यांच्यामध्ये बऱ्याच वेळेस वाद झाला आहे.
यापूर्वीचे युद्ध :
सीमा रेषा योग्य पद्धतीने अधोरेखित न झाल्याने या आधी सुद्धा दोन्ही देशांमध्ये या आधी सुद्धा युद्ध झालं होतं.
२०१७ च्या जून ते ऑगस्ट या काळात भूतान देशाच्या सीमारेषेवरील डोकलाम या जागेसाठी वाद हा असाच भडकला होता.
त्या वर्षी चीन ने त्यांच्या सैन्याला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या समारोहात भाग घेण्यास मनाई केली होती. २००५ नंतर असं पहिल्यांदाच घडलं होतं.
अजून एक समारोह जो की दरवर्षी १ ऑगस्ट ला चीन मध्ये होत असतो. पीपल्स लिबरेशन आर्मी चा तो वर्धापन दिवस असतो. तो सुद्धा त्यावर्षी साजरा करण्यात आला नव्हता.
१९ ऑगस्ट २०१७ मध्ये पैगोंग त्सो सरोवरावर दगडफेक ची घटना घडली होती. या घटनेचा विडिओ सुद्धा वायरल झाला होता.
या विडिओ मध्ये भारत आणि चीन च्या सैन्यात झालेली झटापट ही स्पष्टपणे दिसू शकते.
गोळ्या झाडल्या जात नाहीत :
झटापटी कायम होत असतात; पण कधी गोळीबार होत नाही ही एक समाधानाची बाब आहे. जास्त करून सैन्याकडे फार मोठे शस्त्रास्त्र नसतात. असेल तरीही एखादं छोटं हत्यार असतं.
जर कधी दोन्ही देशाचे सैनिक एकमेकांसमोर आले तरीही शांतता करारामुळे ते एकमेकांवर कधीच गोळी झाडत नाही.
चीन नेहमीच या जागेवर त्यांचा दावा घोषित करून घुसखोरी करत असतो. जेव्हा हे सैन्य एकमेकांसमोर येतं तेव्हा त्याला ‘बॅनर ड्रिल’ असं म्हंटलं जातं.
असं बोललं जातं की, जो भाग भारतात आहे त्या भागात जर कोणी शिरकाव करायचा प्रयत्न केला आणि थांबवल्यावर सुद्धा जर को थांबला नाही तर वाद आणि तणाव निर्माण होतो.
नेहमीच अशी तणाव परिस्थिती निर्माण झाली की एखादा अधिकारी मध्यस्थी करतो आणि निर्माण झालेला तणाव मग निवळतो. त्यावेळी नियमानुसार एक मीटिंग होते.
ही मीटिंग ब्रिगेड किंवा डिव्हिजन कमांडर यांच्या दरम्यान होत असते. ही मीटिंग नेहमी शांततेत होत असते. हे दोन्ही पक्ष त्या जमिनीवर आपला दावा सांगत असतात आणि शेवटी दोघेही मागे सरकतात.
हे असंच चालू असतं आणि चालू राहील जोपर्यंत की सीमा रेषेवर अंतिम निर्णय होत नाही.
सरोवर सुरक्षा इतकी महत्वाची का? :
पैगोंग त्सो सरोवर हे चुशल गावाच्या रस्त्यावर आहे. हे गाव भारताच्या बॉर्डर पासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. आर्मी ची एक पोस्ट सुद्धा आहे इथे.
सरोवराच्या उत्तर आणि दक्षिणी सीमेला ‘चुशल अप्रोच’ असं नाव आहे. या जागेचा चीन कधीही घुसखोरीसाठी फायदा घेऊ शकतो.
१९६२ मध्ये याच मार्गाने चुशल या गावातच चीन ने सर्वात मोठा हमला केला होता. भारतीय सैन्याने कडवी झुंज दिली होती.
१३ सैन्य असलेल्या अहिर रेजिमेंट मधील मेजर शैतान सिंह हे वीरगती ला प्राप्त झाले होते.
१९६४ मध्ये याच हमल्यावर चेतन आनंद यांनी ‘हकीकत’ या सिनेमाची निर्मिती केली होती ज्यामध्ये धर्मेंद्र आणि बलराज साहनी यांची मुख्य भूमिका होती.
चीन चं रोड नेटवर्क :
चीन ने या दिशेला रोड चं एक जाळं तयार करून ठेवलं आहे. चीन चं रोड नेटवर्क हे काराकोरम हायवे ला जोडण्यात आलं आहे.
१९९९ मध्ये कारगिल युद्धा दरम्यान भारताच्या या क्षेत्रात ५ किलोमीटर आतपर्यंत सरोवराच्या शेजारी चीन ने रोड तयार केले होते. या रोडवर सध्या चीन चं सैन्य बाईक ने गस्त घालत असते.
सध्या भारताकडून सुरक्षेच्या दृष्टीने काही हायस्पीड बोट या सरोवरावर तैनात करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे सरोवरावर गस्त घातली जाते.
सरोवराच्या परिसरात जाण्यासाठी डेप्युटी कमिशनर ऑफ लेह यांची परवानगी घ्यावी लागते. सुरक्षेच्या कारणामुळे इथे बोटिंग ला सुद्धा परवानगी नाकारण्यात आली आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.