' अमेरिकेत जाण्यास इच्छुक भारतीयांना हा ‘व्हिजा गॉड बालाजी’ कसा मदत करतोय ते बघा! – InMarathi

अमेरिकेत जाण्यास इच्छुक भारतीयांना हा ‘व्हिजा गॉड बालाजी’ कसा मदत करतोय ते बघा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

व्हिजाचे महत्त्व :

परदेशी जाण्याची इच्छा असलेले लोक भारतात भरपूर आहेत. लोक विविध कारणांसाठी परदेशी जाऊ इच्छित असतात.

अर्थात त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो त्या त्या देशात जाण्यासाठी लागणआरा व्हिजा.

आपल्या देशाचा पासपोर्ट सहजपणे मिळून जातो, मात्र त्या त्या देशांचे व्हिजा मिळताना लोकांचे जीव टांगणीला लागतात. अनेकवेळा व्हिजा नाकारले जातात.

अगदी जाण्याची सगळी तयारी करून, तिकिटं काढून बसलेलो असताना व्हिजा नाकारला जातो. नाकारला जाण्याची शक्यता असते. त्यात सतराशे साठ त्रुटी निघू शकतात.

त्यामुळे व्हिजा मिळणे, पासपोर्टवर त्या देशाचा शिक्का मारून मिळणे ही फारच लकी गोष्ट मानली जाते.

 

visa inmarathi
gulfbusiness.com

 

परदेशी जाण्याची इच्छा असणाऱ्यांत पर्यटक असतात, व्यवसायासाठी जाणारे असतात, नोकरीनिमित्ताने जाणारे असतात, बिझनेस मिटींग्स असतात, शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी तर अगदी भरपूर असतात.

या सगळ्यांची एकच इच्छा असते, ते म्हणजे व्हिजा लवकर मिळावा आणि कोणत्याही कटकटींशिवाय मिळावा.

आपल्याकडे भारतात अशा कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टींसाठी लोकांना देवाला साकडे घालण्याची, नवस बोलण्याची सवय असतेच.

आपल्याकडे ‘सब भगवान के हाथ में हैं’ या वाक्यावर विश्वास असलेले देवभोळे लोक अधिक. मग व्हिजासारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी इथले नागरिक देवाला वेठीस न धरते तरच नवल.

तर असाच एक देव आहे भारतात. तेलंगणामधील हैद्राबाद येथे, तो ‘व्हिजा गॉड’ म्हणूनच प्रसिद्ध आहे, व्हिजा बालाजी!

 

visa god inmarathi
economictimes.com

 

तो म्हणे आपल्या परदेशी जाण्यास इच्छुक असणाऱ्या भक्तांना व्हिजा मिळवून देतो. व्हिजावर त्या देशाचा शिक्का नक्की येणार याची खात्री देतो.

 

मुळ मंदिर चिकलूर बालाजी मंदिर –

हे मंदिर हजार वर्षे जुने मंदिर आहे. असं म्हणतात की वेंकटेश्वर बालाजीचा एक निस्सीम भक्त दरवर्षी तिरुपती येथे बालाजीच्या दर्शनास जात असे.

मात्र एके वर्षी तो खूप आजारी पडला आणि ठरल्या वेळेत आपल्या प्रिय देवाच्या, बालाजीच्या दर्शनास जाऊ शकला नाही.

तेव्हा खुद्द बालाजींनी त्याच्या स्वप्नात येऊन त्याला एक जागा दाखवली. जेव्हा तो स्वप्नातून जागा झाला तेव्हा त्या ठिकाणी जाऊन पोचला आणि त्याने खोदण्यास सुरूवात केली.

खोदत असतानाच त्याला तिथे मुंग्यांचे मोठे वारूळ दिसले. बालाजीने त्याला दृष्टांत दिला की त्या वारूळाला गायीच्या दुधाने भरून टाक.

त्याने तसं केल्यावर त्याला तिथे एक बालाजीची सुंदर मुर्ती दिसू लागली. त्या मुर्तीसोबत श्रीदेवी आणि भूदेवी या दोन देवीसुद्धा होत्या.

त्याने त्या मुर्तीची तिथे स्थापना केली आणि तिथे हे मंदीर बांधण्यात आले. एका कथेनुसार हे भक्त रामदास यांच्या काकांनी म्हणजे मदन्ना आणि चिकण्णा यांनी हे मंदिर बांधलेले आहे.

 

visa balaji inmarathi
thehansindia.com

 

हे ही वाचा –

===

 

व्हिजा गॉड बालाजी –

तेलंगणामधील हैदराबादजवळील उस्मान सागर लेकजवळ असलेलं चिलकूर वेंकटेश्वर बालाजी मंदिर हे हजार वर्षे जुने मंदिर आहे. म्हणजे प्राचीनच.

परंतु ते आज विशेषकरून ‘व्हिजा बालाजी’ मंदिर म्हणून अधिक ओळखले जातेय.

आपल्याकडे पुण्यात वेगवेगळे देव वेगवेगळ्या टोपण नावाने ओळखले जातात हे आपल्याला माहीतच आहे. तसाच काहीसा हा प्रकार आहे. मात्र हा प्रकार अलिकडचा आहे.

या मंदिरातला बालाजी व्हिजा मिळवून देण्यास मदत करतो. खास करून अमेरिकेला जाण्यासाठी लागणारा व्हिजा मिळण्यासाठी या बालाजीला साकडे घातले जाते.

हे साकडे घालताना बालाजीसमोर आपला पासपोर्ट ठेवून त्याला अकरा प्रदक्षिणा घातल्या जातात. त्या वेळी तिथला पुजारी मंत्र म्हणत असतो आणि प्रार्थना करत असतो.

 

chhilkaur temple inmarathi
zeenews.india.com

 

या बालाजीला पैशांची हाव नाही. या मंदिरात दान-दक्षिणा घेतली जात नाही. आणि म्हणूनच येथे दानपेटी देखील नाही. केवळ प्रदक्षिणा आणि मनापासून भक्ती व मागणे हेच या देवाला अपेक्षित आहे.

या मंदिरात सरकारचा हस्तक्षेप काहीही नाही. किंवा हे मंदिर पैसे-दागिने-सोने इत्यादी भेटवस्तूंसाठीही प्रसिद्ध नाही.

याशिवाय तिरुपती येथील बालाजी मंदिरात ज्याप्रमाणे धनिकांसाठी, व्हिआयपींसाठी, पैसे घेऊन वेगळ्या रांगा असतात, तशा इथे या मंदिरात नाहीत, इथे भेदभाव नाही.

सगळ्यांना सारखेच दर्शन मिळते आणि त्यासाठी रांगेत यावे लागते. आणि हो, काम झाल्यावर इथं पुन्हा येऊन १०८ प्रदक्षिणा फक्त घालायच्या असतात.

त्याप्रमाणे व्हिजा मिळाला की लोक आनंदाने इथे परत येऊन १०८ प्रदक्षिणा घालतात.

 

११ आणि १०८ प्रदक्षिणांचे महत्त्व –

आपल्याकडे अकरा प्रदक्षिणांचे महत्त्व हे १ आकडा म्हणजे आपला आत्मा तर दुसरा १ आकडा म्हणजे आपलं शरीर. हे दोन एक मिळून अकराचा शुभ अंक समजला जातो.

तर १०८ मध्ये एक हा आकडा परमेश्वराचा, शून्य हा त्याच्या सर्जनाचा आणि आठ हा आकडा गर्भावस्थेचे आठ महिने म्हणून समजले जातात.

व्हिजा बालाजी हे नाव कसे पडले? –

या मंदिराला व्हिजा बालाजी मंदिर हे नाव कसे पडले याची कहाणी साधी आहे. ऐंशीच्या दशकात भारतातून बरेच विद्यार्थी अमेरिकेत आयटीच्या अभ्यासासाठी जाऊ लागले होते.

चेन्नाई येथून जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना विजाच्या अडचणी येऊ लागल्या होत्या. त्यातील काही बालाजीचे भक्तही होते. ते या मंदिरात येऊन नवस बोलू लागले, की व्हिजा मिळू दे.

तसा मिळाल्यास मी पुन्हा येऊन १०८ प्रदक्षिणा घालेन. आणि योगायोगाने म्हणा किंवा अजून काही, पण त्या विद्यार्थ्यांना व्हिजा मिळू लागले.

 

students for visa inmarathi
telegraphindia.com

 

आणि बोलता बोलता या मंदिराची याबाबतची प्रसिद्धी वाढत गेली.

२०१५ च्या नोंदीनुसार त्या वर्षी अमेरिकन व्हिजा काऊन्सुलेटने त्या वर्षी सर्वात अधिक व्हिजा हे हैदराबाद येथील विद्यार्थ्यांना दिले होते.

आता त्यातील मेरीटवर व्हिजा मिळालेले किती आणि या बालाजीचे भक्त असल्यामुळे व्हिजा मिळालेले किती हा मोठा गहन आणि आस्थेचा प्रश्न आहे.

खरे तर आपल्या मनाची स्ट्रॉंग इच्छाच आपल्याला हवं ते घडवून आणत असते.

आपल्या भगवद्गीतेत सांगितलेही आहे की आपण ज्या इच्छा प्रबळपणे मनात आणतो, त्या पूर्ण होतच असतात.

त्यामुळे इथं आलेले लोक हे देवावरच्या म्हणजेच एकप्रकारे आपल्या मनावरच्याच ठाम विश्वासाने येत असतात आणि त्यांच्या इच्छा फलद्रूप होत असतात असं म्हणायला हरकत नाही.

 

people temple inmarathi
cnn.com

 

या मंदिराचा पत्ता आहे – चिकलूर बालाजी टेम्पल रोड, हिमायत नगर, निअर उसमान सागर टेम्पल, हैदराबाद तेलंगणा – ५००७५

तर मग बघा, तुम्हीही जाऊन. तुम्हाला जर व्हिजाची अडचण येत असेल, तर एकदा या बालाजीला साकडे घालून बघाच, अर्थात यात सत्य किती हे ज्याचं त्यानेच ठरवावं!

 

हे ही वाचा –

===

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?