Site icon InMarathi

महायुद्ध हे अचानक होत नसतं. या चार प्रक्रिया ठरतात महायुद्धाला कारणीभूत!

third-world-war-marathipizza

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

महायुद्ध म्हणजे एक मोठं संकट. मानवाच्या इतिहासात आज पर्यंत झालेली दोन महायुद्धं म्हणजे भयंकर जीवितहानी आणि राजकारणाची उलथापालथ करणारी होती.

आता आपण तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ आलो आहोत. ते कसं होईल आणि का होईल ह्यावर बरेच तर्क वितर्क निघत आहेत. तुम्हाला महायुद्धाची एकूण वाटचाल आणि त्याच्या स्टेजेस सोप्या शब्दांत समजावून सांगण्याचा हा प्रयत्न!

 

 

महायुद्ध हे असं अचानक मुळीच होत नसतं. महायुद्ध हे वर्षानुवर्षे धुमसत असलेल्या असंतोषाचं परिणाम असतं. वर्षानुवर्षे चालत असलेली खलबतं आणि देशांशी असलेले, बिघडलेले संबंध सुद्धा अंशतः कारणीभुत असतात.

ह्या महायुद्धाच्या प्रक्रियेला आपण चार स्टेजेस मध्ये विभागून घेऊ आणि एक एक करून बघु..

१. एकच महासत्ता

ह्या स्थितीत जो देश महासत्ता असतो तो बाकीच्यांना उगाच त्रास देतो. ही स्थिती आपण पार पाडली आहे. शीतयुद्ध झाल्यावर ही चढाओढ आणि एकाधिकारशाही संपुष्टात आल्याचं तज्ज्ञ सांगतात.

ह्या सगळ्यातून अमेरिका महासत्ता म्हणून नैसर्गिकपणे पुढे आला कारण त्यावेळी कुणी टक्कर देणारं नव्हतं. अशाने महासत्तेचा बाकीच्या देशांच्या प्रकरणात हस्तक्षेप वाढला. असे विषय ज्यांचा अमेरिकेशी अर्थाअर्थी संबंध नसायचा. ह्या स्थितीला unipolar म्हणजेच एकाधिकारशाही म्हणूया.

२. बायपोलारिटी- दोन महासत्ता

यावेळी जगाचं नेतृत्व करण्यासाठी दोन देश महासत्ता बनण्याचे दावेदार असतात तेव्हा ही स्थिती निर्माण होते. ह्यात दोन्ही दावेदार जगावर आपली छाप पाडत असतात म्हणुनच बाकीच्या देशांना ह्या दोघांपैकी एकाशी सलगी करावी लागते.
एकूणच काय तर जेव्हा जगाच्या राजकारणावर दोन देश परिणाम पडू लागतात तेव्हा बायपोलारिटी होते.

३. मल्टी पोलारिटी – विकेंद्रीकरण

 

Source

 

ह्या स्थितीत दोन पेक्षा जास्त देश महासत्ता बनण्यास उत्सुक असतात. ह्यात एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात जागतिक राजकारण अस्थायी होतं. ह्या राजकारणामुळे हेच देश एकमेकांबद्दल साशंक होतात. परिणामी शक्तीकेंद्रे सतत बदलत राहतात. ह्या बदलत्या शक्तीकेंद्रांमुळे मिलिटरी ऍक्शन, सैन्य वाढवणे, दारुगोळा जमवणे नवनवीन देशांशी ‘गरज’ म्हणून संबंध प्रस्थापित करणे ह्या गोष्टी वाढू लागतात.

४. महायुद्ध

जग तिसऱ्या स्थितीत फार कमी वेळ असणार आहे. त्या अस्थायी परिस्थितीचं लगेचंच युद्धात रूपांतर होईल. सगळ्या उध्वस्त झालेल्या जगातून मग एक नेतृत्व उभं राहील. ते अख्ख्या जगाचं नेतृत्व करेल.

त्या जगात एकंच देश, एकच धर्म आणि एकंच चलन, कोणत्याच सीमा नसतील. एकाच धर्माच्या झेंड्याखाली हे नवीन जग पुढे वाटचाल करत राहील.

ग्लोबल ट्रेंड्स च्या भाकितानुसार आपण 2025 पर्यंत एका बदललेलं जग बघू. जगातल्या बऱ्याच देशांच्या इंटेलिजन्स एजंसीस ना 2008 मध्येच मल्टी पोलारिटी ची शक्यता दिसत होती आणि तेव्हापासून त्यांनी तयारी सुरु केल्याचं ते नाकारत नाही.

 

Source

 

संसर्गजन्य रोग, लॉकडाऊनची परिस्थिती, त्यामुळे अर्थचक्राची मंदावलेली गती, या सर्व पार्श्वभूमीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात मानवी हानी पोहोचविणारा नवा आजार कोणी पसरवला यावरूनही मध्यंतरी वादविवाद निर्माण झाला होता. सध्या हा वाद काही अंशी थंड आहे. मात्र, एकूणच मागील आठ महिन्यांपासून जे काही घडलं त्याचा संपूर्ण जगावर प्रचंड वाईट परिणाम झाला आहे. या सर्वांना कारणीभूत कोण याचा शोध प्रत्येक देश आपापल्या परीने घेत आहेच. त्यामुळेच आता सत्ताकेंद्रे एकमेकांशी सलगी करण्यासाठी अधिक वेगाने डावपेच करत आहेत.

सध्याच्या राजकारणातल्या मोठ्या आणि महत्वाच्या व्यक्तींची वक्तव्ये बघितली की आपल्याला अंदाज येऊ शकतो महायुद्ध किती जवळ आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version