Site icon InMarathi

नेताजींप्रमाणेच, या लढवय्या अन शेवटच्या पेशव्याच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

इसवी सन १७०० मध्ये सुरू झालेली पेशवाई राजवट ही मराठी साम्राज्याच्या टिकून राहण्यास आणि वाढीस बऱ्याच अंशी कारणीभूत ठरते.

पहिल्या बाजीरावाने १७ व्या शतकात पुण्यातून शाहू महाराजांच्या आशीर्वादाने कारभार करणे सुरू ठेवले. ही पेशवाई पुढे १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत टिकून राहिली.

यात पेशवाई ने आणि मराठी साम्राज्याने अनेक चढ उतार पाहिले.

 

aproudmaratha.blogspot.com

 

बाजीरावाने उत्तरेला साम्राज्य वाढविले, रघुनाथराव रावांनी अटकेपार झेंडा लावला, भाऊसाहेब पेशव्याने पानिपत युद्ध गाजविले, जबरदस्त पराभव पचवून पुन्हा मराठी दौलत त्वेषाने उभी राहिली!

माधवराव पेशव्यानी पुन्हा दिल्ली काबीज केली, शेवटच्या नाना साहेब पेशव्याने इंग्रजांशी १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात दिलेली झुंज असे अनेक प्रसंग सांगता येतील.

श्री नानासाहेब पेशवे दुसरे हे शेवटचे पेशवे ठरले, आणि आपल्या पेशवे ह्या पदाला जागून त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात अप्रतिम पराक्रम केला.

पण युद्धा नंतर नानासाहेबांचे काय झाले? नानासाहेब युद्धातून सुटून कुठे गेले? त्यांच्या कुटुंबाचे काय झाले याबद्दल अनेक मत प्रवाह आहेत.

 

rootsofindian.wordpress.com

 

या लेखात जाणून घेऊया वरील प्रश्नांची उत्तरे…!!

नानासाहेबांचा जन्म व पेशवे पद :

धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे ह्यांची आई गंगा बाई व वडील नारायण भट्ट यांना पुसटशी ही कल्पना नव्हती की आपला मुलगा पुढे जाऊन पेशवा होईल एका मोठ्या क्रांतीलढ्याचं नेतृत्व करेल.

त्यांचे आई वडील बाजीराव पेशव्यांकडे कामाला होते, छोट्या धोंडोपंतांची हुशारी पाहून बाजीराव पेशव्याने त्यास आपला वारस म्हणून दत्तक घेतले.

इसवी सन १८५१ ला बाजीरावाच्या मृत्यू नंतर त्यांना ईस्ट इंडिया कंपनीकडून मिळत असलेली ८००००० सालाना पेन्शन रद्द केली गेली आणि इथे पहिल्यांदा नाना साहेबांच्या अभिमानाला ठेच पोचली.

 

en.wikipedia.org

 

त्यांनी लंडन च्या राणीकडे आपल्या वकिलामार्फत निरोप धाडला पण इंग्रजांचे इरादे स्पष्ट होते “फक्त लूट”

 

प्लासी ची लढाई आणि ब्रिटिश राजवटीची सुरुवात :

आपणास माहीतच आहे की इसवी सन १७५७ मध्ये बंगालचा नवाब सिराज उद्दौला ह्याचा प्लासीच्या लढाईत पराभव केला आणि भारतात ब्रिटिशांनी आपले पाय रोवले.

दक्षिणेत टिपू सुलतान चा श्रीरंग पट्टणम च्या लढाईत पाडाव झाला आणि ब्रिटिश राजवट पसरू लागली. ईस्ट इंडिया कंपनी पाहता पाहता एक एक राजवट उलथवून आपला जम बसवायला सुरुवात केली.

 

quora.com

 

१८५७ चे स्वातंत्र्य समर :

ईस्ट इंडिया कंपनी विरोधात भारतीय जनतेत आणि विशेषकरून भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण व्हायला सुरुवात झाली. भारतीय जनतेवर भारतीय सैनिकांकरवीच अत्याचार करून घेण्यात आले.

आणि ह्यात भर पडली ती कंपनी सरकार ने आणलेल्या बंदुकामुळे. सैनिकांमध्ये माहिती पसरली की ह्या बंदुकी मध्ये गायीच्या आणि डुकराच्या चमडीचा वापर केला आहे.

 

sabrangindia.in

 

आपल्या “१८५७ चे स्वातंत्र्य समर” ह्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात,

” हिंदूंना गाय पवित्र होती आणि मुसलमानांना डुक्कर निषिद्ध होते, कंपनी सरकार ने हीच बंदूक वापरण्यास सुरुवात केली आणि स्वातंत्र्य युद्धाचा भडका उडाला.

वेगवेगळे संस्थानिक आणि कंपनी सरकार मधील सैनिक ह्यांनी दिल्ली चा बादशाह ह्याच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध कंबर कसली आणि ह्या सगळ्या चे नियोजन करणारे होते!

नानासाहेब पेशवे आणि त्यांचे सेनापती तात्या टोपे :

कानपुर हा तळ साधून नानासाहेबांनी ब्रिटिशां विरोधात कंबर कसली. ५३ नेटिव्ह इंफंट्री चे सैनिक नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र झाले.

नानासाहेब हे नाव ऐकताच १५ हजाराच्या आसपास सैनिक जमा झाले.

 

postcard.news

 

कानपूर ची लढाई :

नानासाहेबांनी जनरल व्हिलर आणि सैन्यावर कानपुर च्या किल्ल्याला वेढा देऊन जोरदार हल्ले सुरू केले. १० दिवस अहोरात्र गोळीबार करताच व्हिलर ची माती गुंग झाली.

मुत्सद्दी नाना साहेबानी आपला दूत धाडून तह केला. जीवनदान देण्याचे मान्य करून इंग्रजांना कानपूर सोडून अलाहाबाद ला पळून जाण्यास सांगितले.

नानासाहेबांनी इंग्रजावर पहिला विजय मिळविला.

सती चौरा आणि बिबिघर ची कत्तल :

सतीचौरा घाटात कंपनी सरकार चे ब्रिटिश सैनिक बोटीतून आपापली शस्त्रे घेऊन गंगेतून जात असताना अचानक दंगा उडाला.

आणि नावीक बोटीतून उडी मारून किनाऱ्याकडे पोहत येऊ लागले आणि कोणीतरी काही बोटी जाळल्या. एकच हाहाकार उडाला आणि गोळीबार सुरू झाला.

 

commons.wikimedia.org

 

चिडलेल्या भारतीय शिपायांनी ब्रिटिश शिपायांना गंगेत गोळ्यांनी टिपले.

पहिली गोळी कुणी झाडली कळू शकले नाही पण असंख्य ब्रिटिश मारले गेले आणि युद्धानंतर ह्याचा ठपका विनाकारण नानासाहेबांवर ठेवण्यात आला.

सतिचौऱ्यामध्ये जे सैनिक मेले त्यांच्या १२० बायका आणि मुलाबाळांना कानपुर मध्ये बीबीघर येथे हुसैनि बेगम ह्या वेश्येच्या महालात ठेवण्यात आले.

व्हिलर च्या नंतर जनरल हॅवलॉक च्या नेतृत्वा खाली मोठी तुकडी कानपुर वर चालून आली. ह्या पलटणीने कानपुर ला येताना रस्त्यात दिसेल त्या भारतीयांवर अनन्वित अत्याचार केले.

त्याचा समाचार घेण्यास नानासाहेबांनी अनेक सेनापती पाठवले ते सगळे पराभूत झाले, यात त्यांचा भाऊ बाळा भाऊ सुद्धा कामी आला.

कानपूर आणि नानासाहेबांचा पराभव दिसू लागताच सैनिकांनी इंग्रजांच्या बायका पोरांना मारण्याची परवानगी मागितली, नानासाहेबांनी यास स्पष्ट विरोध केला.

 

prisonersofeternity.co.uk

 

नानासाहेबांच्या नकळत सैनिकांनी बायका पोरांना मारण्यास सुरुवात केली. त्यांच्या मनात ब्रिटिश आणि हॅवलॉक ने केलेल्या अत्याचाराचा राग होता.

पुढे चौकशीत समोर आले की नानासाहेबांनी नाही तर हुसैनी बेगम आणि तिचा प्रियकर सुरवर खान ह्यांनी बायकांना मारायचे आदेश दिले. त्यांनी स्वतः समोर ही कत्तल पहिली.

पुढे इंग्रजांनी ह्याचा ही ठपका नानासाहेबांवर ठेवला.

नानासाहेबां चे पलायन व अज्ञातवास :

१६ जुलै १८५७ ला कानपुर चा पाडाव झाला आणि कानपुर मधून नानासाहेब फतेहगड ला निसटले, तात्या टोपें ना इंग्रजांनी अटक करून फाशी दिली.

त्यानंतर नानासाहेब भूमिगत झाले ते कायमचेच. त्यांनी आपल्या बायकोला व मुलांना नेपाळ ला हलविले!

 

pinterest.com

 

इतिहासकार के. वी. बेलसरे आपल्या पुस्तकात लिहितात नानासाहेबांची नैमिशारण्यात गोंदवलेकर महराजांशी भेट झाली, महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला

” तुझ्या केसांनाही धक्का लागणार नाही व तूझ्या अंतिम वेळी मी तुझ्या सोबत असेन.”

नानासाहेब आपल्या मृत्यू समयी नेपाळ मध्ये एक गुहेत राहत होते असे पुरावे पुढे आले. त्यांच्या पुस्तकानुसार नानासाहेब नेपाळ मध्ये १९०६ मध्ये मृत्यू पावले!

नानासाहेबांचे वंशज केशवलाल मेहता ह्यांनी नंतर सरकार समोर नवे पुरावे आणून सांगीतले की नानासाहेब १९२६ ला मृत्यू पावले.

त्यांनी गुजरात सरकार ला ह्या प्रकरणी रीतसर संशोधन करण्याची विनंती केली.

सुभाषचंद्र बोसांशी संबंध :

नानासाहेबांचा हा जीवन प्रवास आपल्याला सुभाषचंद्र बोसांची आठवण करून देतो.

 

ndtv.com

 

जपान चा १९४५ मध्ये पराभव झाल्यानंतर सुभाषचंद्र बोस विमान अपघातात मरण पावले अशी बातमी आली परंतु नंतर त्याविषयी अनेक बातम्या आल्या.

कुणी म्हणाले सुभाषचंद्र बोस अपघातात न मरता ते रशिया ला गेले, कुणी म्हणाले हिमालयात गेले, कुणी म्हणाले भिखु म्हणून नेपाळ मध्ये राहिले.

जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यू वेळी एक फोटो प्रसिद्ध झाला त्यात सुभाषबाबूंसारखा दिसणारा मनुष्य नेहरूंना खांदा देत होता.

मित्रानो नानासाहेब असो, सुभाषबाबू असो, लाल बहादूर शास्त्री असो ह्यांच्या बाबत सत्य कधीच समोर आले नाही. ह्या सगळ्या सच्च्या देशभक्तांना आम्ही सलाम करतो..

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version