तब्बल ८० वर्षे अन्न पाण्याशिवाय जगणाऱ्या या साधूसमोर ‘डॉक्टरही’ झाले नतमस्तक!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गुजरातमधील अंबाजी येथील एका आश्रमात हे ‘चुनरीवाला माताजी’ किंवा नुसतंच ‘माताजी’ म्हणून ओळखले जाणारे साधू महाराज आहेत. त्यांचे मूळ नाव प्रल्हाद जानी आहे.
या जानी महाराजांनी किंवा चुनरीवाल्या माताजी महाराजांनी सन १९४० पासून अन्न-पाणी वर्ज्य केलेलं आहे.
आज त्यांचं वय ऐंशीच्या वर असून वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांनी अन्न-पाणी ग्रहण करणे सोडून दिले आहे.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हा एक मोठा चमत्कारच म्हणायला हवा. त्यांच्यावर मां अंबेची कृपा असून मां अंबेने त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन त्यांच्यावर कृपा करून त्यांना आपली लाल चुनरी प्रसाद म्हणून दिल्याचे ऐकिवात आहे!
त्यांचं म्हणणं आहे, की मां अंबेच्या कृपेचाच हा चमत्कार आहे, की ज्यामुळे ते इतकी वर्षे न जेवता-खाताही राहू शकतात.
अर्थात अन्न-पाणी ग्रहण करत नसल्याने त्यांना शौच किंवा लघवी या शारीरीक क्रियाही होत नाहीत. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने हा एक मोठा चमत्कारच आहे.
==
हे ही वाचा : हिमालयात गेलेल्यांना तिथले महात्मे कधीच का दिसत नाहीत? वाचा, ऐका साधूचंच उत्तर
==
प्रल्हाद जानी –
या महाराजांचे मूळ नाव प्रल्हाद जानी असून ते गुजरातमधील मेहसाणा तालुक्यातील चारडा या गावचे रहिवाशी आहेत.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी वयाच्या सातव्या वर्षीच आपलं घर त्यागलं होतं आणि ते जंगलात जाऊन राहिले होते.
वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना मां अंबेचा अनुग्रह झाला आणि ते अंबामाताचे भक्त बनले. तेव्हापासून ते स्त्री-वेशातच राहू लागले.
लाल साडी, दागिने आणि खांद्यापर्यंत लांब वाढवलेल्या केसांत लाल रंगाची फुलं माळलेली असा त्यांचा वेश असतो.
त्यामुळे ते पुरुष असूनही लोक त्यांचा उल्लेख ‘माताजी’ असाच करतात. बरेच लोक त्यांना ‘चुनरीवाला माताजी’ म्हणून ओळखतात.
जानींचा असा विश्वास आहे, की अंबामां त्यांच्या टाळूमध्ये असलेल्या छिद्रातून पाणी सोडत असल्याने शरीरातच अन्नपाण्याची आवश्यकता पूर्ण करतात.
त्यामुळे त्यांना बाहेरून त्याचे सेवन करण्याची गरज उरत नाही.
वैज्ञानिक तपासणी –
सन २००३ आणि सन २०१० मध्ये अशी दोनदा प्रल्हाद जानी यांची वैद्यकीय तपासणी झालेली आहे. अर्थातच ही तपासणी ते अन्न-पाण्याशिवाय कसे काय राहू शकतात या संदर्भात झालेली होती.
भारतातील अहमदाबाद येथील स्टर्लिंग हॉस्पिटलमधील डॉ. सुधीर शाह या न्युरॉलॉजिस्टनी त्यांची ही तपासणी केली होती.
डॉ. सुधीर शाह यांनी यापूर्वी देखील असे अजब दावे करणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांचा अभ्यास केलेला आहे. यातच एक नाव हीरा रतन माणेक यांचेही आहे.
या दोन्ही तपासणीच्या वेळी या डॉक्टर तज्ज्ञांनी प्रल्हाद जानी काहीही न खाता-पिता व्यवस्थित आरोग्यासह जिवंत राहू शकत आहेत यावर शिक्कामोर्तब केले होते.
मात्र या अभ्यासाचा अहवाल वैद्यकीय जर्नलमध्ये सादर करण्यात आला नव्हता. सन २०१० च्या प्रयोगात तर त्यांना सहा दिवस निरीक्षणाखाली ठेवले गेले होते.
परंतु तेव्हा देखील अभ्यासाचे निष्कर्ष ‘गोपनीय’ असतील असे तिथल्या प्रवक्त्यांनी जाहीर केले होते.
अर्थातच त्यामुळे बाकीच्या डॉक्टरांनी आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी या अभ्यासाबद्दल साशंकता प्रकट केली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की,
एखादा माणूस काही दिवस अन्न-पाण्याशिवाय राहू शकतो, मात्र तो अशा रितीने वर्षानुवर्ष काहीच न खाता-पिता राहूच शकत नाही.
मेंदूच्या कार्यशीलतेसाठी निदान ग्लुकोजची तरी गरज भासतेच.
मात्र २००३ मध्ये त्यांना डॉ. सुधीर शाह यांच्या निरीक्षणाखाली १० दिवस ठेवण्यात आलं होतं. हे दहा दिवस ते एका बंदिस्त रुममध्ये होते.
या दहा दिवसांत त्यांना एकदाही शौचाला किंवा लघवीला लागली नव्हती हे सत्य होतं. मात्र त्यांच्या ब्लॅडरमध्ये युरीन साठलेली दिसत होती.
या दहा दिवसाच्या काळात प्रल्हाद जानी हे नॉर्मल दिसत होते. मात्र त्यांचे वजन काहीसे कमी झाले होते. ही संशय घेण्यासारकी बाब होती. आणि त्यांच्या टाळूमध्ये असलेले छिद्र ही गोष्ट अनैसर्गिक होती.
२०१० मधील तपासणी –
सन २०१० मध्ये २२ एप्रिल ते ६ मे अशी पुन्हा त्यांच्यावर १५ दिवसांची तपासणी केली गेली. त्यांना एका रुममध्ये बंदिस्त ठेवण्यात आले. त्या खोलीतील बाथरूम देखील कुलुप लावून ठेवले गेले.
यावेळीही डॉ. सुधीर शाह या न्युरॉलॉजिस्टसह अनेक तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवले गेले होते. त्यांच्यावर सीसी टीव्ही आणि व्हिडिओची नजर ठेवली गेली होती.
परंतु या पंधरा दिवसात त्यांनी क्वचित कधी आंघोळ केली आणि ते तोंड धूत तेवढाच काय तो त्यांचा पाण्याशी संबंध आला. ना ते शौचास गेले, ना लघवीला, ना काही खाल्लं-पिलं.
तरीही त्यांची तब्येत त्यांच्याहून तरुण व्यक्तींपेक्षाही उत्तम असलेली आढळून आली.
==
हे ही वाचा : विज्ञानाला आव्हान देणारी, आजही न उलगडलेली ६ रहस्ये, माहित करून घ्या!
==
शेवटी डॉक्टरांचे असे म्हणणे पडले, की जानीच्या शरीरातील ‘लेप्टिन’ आणि ‘घ्रेलिन’ ही दोन भुकेशी संबंधित हॉर्मोन्सच्या विशिष्ट रचनेमुळे जानी न खाता-पिता राहू शकतात.
आणि त्यांच्या शरीरातील कचरा बाहेर न टाकला जाता त्याच कचऱ्याचे रुपांतर त्यांच्या शरीरातील उर्जेत होते, ज्यामुळे ते इतर नॉर्मल व्यक्तींप्रमाणे जगू शकतात.
निष्कर्ष –
भारतात अनेक साधूसंताच्या अशा अनेक कहाण्या आपण ऐकलेल्या असतात.
हिमालयात राहणारे अनेक नागा आणि इतर साधू देखील आपल्या तप, तंत्र-मंत्र इत्यादीच्या साहाय्याने नॉर्मल माणसांपेक्षा वेगळे, चमत्कारीक आयुष्य जगत असल्याच्या कहाण्या अनेकदा आपल्या ऐकण्यात किंवा वाचण्यात येत असतात.
एक प्रकारे हा निसर्गाचा चमत्कार किंवा मनःसामर्थ्याचा अपवादात्मक प्रकार म्हणता येईल. प्रल्हाद जानी हे देखील असेच एक अपवादात्मक उदाहरण आहे.
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि चुनरीवाला माताजी –
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आपले पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी हे प्रल्हाद जानी उर्फ चुनरीवाला माताजी यांचे भक्त आहेत.
पंचवीस वर्षांपूर्वी आरतीच्या वेळी या महाराजांनी नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री होण्याचा आशीर्वाद दिला होता. तेव्हा नरेंद्र मोदी चकीत झाले होते. कारण ते मुख्यमंत्री बनतील अशी तेव्हा कोणतीच चिन्हे नव्हती.
मात्र जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा माताजींचा आशीर्वाद खरा झाल्याचे लक्षात आले. ते अधुनमधून त्यांच्या दर्शनाला जात असत.
असेच ते २००९ साली त्यांच्या दर्शनाला गेले तेव्हा त्यांनी त्यांना पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद दिला. आणि २०१४ मध्ये तो आशीर्वाद देखील सत्यात उतरला.
तेव्हापासून नरेंद्र मोदीजी त्यांचे निस्सीम भक्त बनले. आता याच महाराजांनी मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील अशी भविष्यवाणी केली आहे. आणि त्यांचा आजपर्यंतचा अनुभव बघता तेही शक्य होईल असेच वाटतेय.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
==
हे ही वाचा : मुस्लिम आक्रमणांपासून हिंदू धर्माचं रक्षण करणाऱ्या “नागा साधूंचा” इतिहास ..वाचा
==
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.