Site icon InMarathi

क्रिकेटच्या देवाला करोडपती बनवणाऱ्या पडद्यामागील देवदूताची कहाणी…

sachin tendulkar inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सचिन तेंडुलकर हे नाव आज आपल्या प्रत्येकाच्या परिचयाचं आहे, क्रिकेटप्रेमींसाठी तर साक्षात देवच. परंतु एक काळ असा होता जेव्हा सचिन हे नाव एवढं मोठं नव्हतं.

आज सचिनच्या प्रसिद्धीचे आणि श्रीमंतीचे अनेक पैलू आहेत, अनेक लोकांची मदत त्याला वेळोवेळी मिळत गेली आणि त्यांच्या मदतीनेच सचिन मैदाना सोबतच मैदानाबाहेरील प्रचंड मोठ्या व्यावसायिक जगात देखील यशस्वी ठरला.

असे म्हटले जाते की, सचिन सोबतचे अनेक खेळाडू व्यावसायिक पातळीवर मात्र तेवढे होऊ शकले नाही, परंतु सचिनने खेळानंतरच्या आयुष्यामध्ये देखील प्रचंड नाव कमावलेले आहे.

 

 

मित्रांनो, प्रत्येक यशस्वी माणसाचा एक मॅनेजर किंवा एजंट असतो जो त्याच्या इतर व्यावसायिक गोष्टींकडे लक्ष देत असतो. हा एजंट हुशार असेल तर तुमचं व्यावसायिक आयुष्य खूप मोठ्या प्रमाणात वाढतं.

सचिनला देखील सुरुवातीच्या काळात असाच एक प्रचंड बुद्धिमान एजंट सापडला तो म्हणजे मार्क मस्करेहस.

 

 

मार्कने सचिन साठी सुरुवातीच्या काळापासून काम केलेलं आहे आणि कदाचित जेवढी मेहनत सचिन मैदानात करत असे, तेवढीच मेहनत मार्क देखील मैदानाबाहेर करत असे.

त्यामुळेच आज त्याचे नाव सचिन सोबतच घेतले जाते. कोण होता हा मार्क ज्याने क्रिकेटच्या देवाला देखील करोडपती बनवले जाणून घेऊयात…..

मार्कचा जन्म बेंगलोर येथे झालेला होता. तो १९७६ मध्ये अमेरिकेत तो गेला, त्याने तिथे “मास्टर इन कम्युनिकेशन” हा कोर्स पूर्ण केला. एकोणीस वर्षाच्या या मुलाने तेथील एका CBS रेडिओच्या सेल्स डिपार्टमेंट मध्ये नोकरी चालू केली.

सुरुवातीपासूनच महत्वकांक्षी असलेल्या या मुलाने पुढे सेल्स मध्ये अनेक विक्रम रचले. तो त्या कंपनीचा सर्वात उत्कृष्ट सेल्समन म्हणून समोर आला. वर्षभरातच त्याचं काम पाहून त्याचा पगार देखील तिप्पट करण्यात आला.

काही वर्षांनी मात्र त्याने रेडिओ मधील काम सोडून एका टीव्ही कंपनीच्या सेल्समध्ये काम करायला सुरुवात केली आणि इथेच त्यांच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाली.

कारण टीव्हीच्या क्षेत्रात आल्यानंतर तो कंपनीसाठी करोडो रुपयांचे व्यवहार करू लागला, त्याने अनेक महत्त्वपूर्ण डील्स कंपनीला आणून दिल्या त्याच्या या कामामुळेच त्याचा पगार वाढतच होता.

अगदी काहीच वर्षांमध्ये त्याचा पगार काही करोडो डॉलर पर्यंत पोहोचला होता.

 

 

तो भारतीय असल्यामुळे त्याला भारतीय टीव्ही मार्केटमध्ये जाण्याची फार उत्सुकता होती. त्याने त्यासाठी प्रचंड प्रयत्नदेखील केले.

दूरदर्शन सोबत संपर्क करून स्पोर्ट्स सेटअप तयार करण्यासाठी दूरदर्शनला विचारणा देखील केली; परंतु तत्कालीन इंदिरा गांधी सरकारला अमेरिकेच्या कंपनीचा कुठलाही हस्तक्षेप भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये नको होता.

मार्क तोपर्यंत क्रिकेट आणि सचिन पासून प्रचंड दूर होता. कळस म्हणजे मागच्या दहा वर्षांपर्यंत त्याने क्रिकेट बघितलं देखील नव्हतं.

परंतु त्याच्या महत्त्वाकांक्षेने येत्या काळातील खेळातील करियर आणि त्यासोबतच टिव्ही ब्रॉडकास्टिंगचे राईट्स यामधील भविष्य त्याला जाणवले होते म्हणून त्याने १९८९ ला स्वतःची कंपनी सुरू केली.

त्याच्या कंपनीने सुरुवातीला १९९० साली ईटली मध्ये झालेला फुटबॉल वर्ल्ड कप कव्हर केला. त्यानंतर त्याने स्कीईंग या खेळाच्या प्रकाराकडे लक्ष दिले.

हा खेळ तेव्हा सर्वसामान्यांपासून फारच दूर होता, फक्त श्रीमंतांचा एक रोमहर्षक खेळ अशी या खेळाची ख्याती होती.

त्याने या खेळाचा जोरदार प्रचार केला. त्याने या खेळाचे ब्रॉडकास्टिंग राईट्स ३० लाख डॉलर्स ला विकत घेतले आणि जेव्हा या खेळा कडे सर्वांचे लक्ष आकर्षिलं गेलं तेव्हा या खेळाचे ब्रॉडकास्टिंग रेट्स २ करोड डॉलरला विकून प्रचंड नफा कमावला.

मार्क, क्रिकेट आणि सचिन

 

हे ही वाचा – आज लोकप्रिय असलेल्या क्रिकेटमधील ‘वन डे’ सामन्यांना अशी झाली सुरूवात!

अनेक खेळांमध्ये मोठ्या प्रमाणात नफा कमावल्यानंतर त्याचे लक्ष क्रिकेट वर्ल्डकप कडे गेले.

क्रिकेट हा खेळ त्याकाळी बर्‍यापैकी प्रचलित होता. संपूर्ण जगभरात खेळला जाणारा हा खेळ होता. त्यामुळे संपूर्ण जगभरात आपल्या कंपनीचे नाव करण्याची ही चांगली संधी आहे हे त्याने ओळखलं होतं.

या कंपनीने भारतामध्ये प्रसिद्ध खेळाडू रवी शास्त्री यांना पार्टनर केलं. पण कंपनीने जेव्हा सचिन तेंडुलकर याला साइन केलं तेव्हाच कंपनीला भारतामध्ये नाव प्राप्त झालं.

सचिन तेव्हा फारच नवीन खेळाडू होता. त्याचे फक्त सहा वर्षाचे क्रिकेट करियर झालेले होते. परंतु मार्कने त्याच्यातील टॅलेंट ओळखले होते. मार्कच्या मते, भारताला देखील एका मोठ्या क्रिकेट आयकॉन ची आवश्यकता होती.

सचिन या सर्व गोष्टींसाठी योग्य व्यक्ती होता. कारण एका मध्यमवर्गीय परिवारातून पुढे आलेला मेहनती खेळाडू होता.

 

 

मार्कने कंपनी भारतात सुरू व्हायच्या आधीच सचिन सोबत करार केलेला होता. सचिन तेव्हा एका वर्षाला जवळपास पाच ते सहा जाहिराती करत असे आणि त्याला त्यासाठी वर्षाला पंधरा ते सोळा लाख रुपये मिळत असत.

परंतु मार्क च्या कंपनीने सचिन सोबत पाच वर्षांचा करार केला आणि या करारासाठी त्याला चक्क ७५ लाख डॉलर दिले म्हणजेच भारतीय करन्सी नुसार २७ करोड रुपये.

त्याकाळी ज्याने कुणी या कराराबद्दल ऐकले त्याला विश्वासच बसत नव्हता. कारण त्या काळातील खेळाडूला एवढे मानधन जाहिरातींसाठी देण्यात आलेले नव्हते. सचिनला सरासरी तीन पट अधिक मानधन देण्यात आलेले होते.

 

 

तेव्हा या मोठ्या रकमेवर अनेक प्रश्नचिन्ह देखील उभे करण्यात आले परंतु रवी शास्त्रींनी सचिनचा बचाव करत सांगितले की,

“सचिनला पैसे मोफत मिळालेले नाहीत, त्याने आयुष्यभर यासाठी मेहनत केलेली आहे. सचिनसारखा खेळाडू भारताला मोठं करेल”

मार्कंने केलेली इन्व्हेस्टमेंट पुढे त्याला भरपूर फायदा देऊन गेली कारण डील साईन केल्यानंतर वर्षभरातच सचिनने त्याला जवळपास पंचवीस लाख डॉलर नफा कमवून दिला होता.

भारतीय क्रिकेट सोबत मार्क चा झालेला हा पहिला संपर्क होता, त्यानंतर त्याने अनेक भारतीय क्रिकेट खेळाडूंसाठी काम केले. सौरव गांगुली साठी देखील त्याने अनेक वर्ष काम केले.

 

 

मार्कला त्याकाळी राहुल द्रविड सोबत काम करायची प्रचंड इच्छा होती. वर्ग मित्र असतानादेखील दुसऱ्या कंपनीने आधी साइन केल्यामुळे मार्कला, राहुल द्रविड सोबत मात्र काम करता आलं नाही.

मार्क ने फक्त भारतीय क्रिकेट साठीच काम केलं असं नव्हे तर त्याने ऑस्ट्रेलियन की क्रिकेट साठी पण मोठं काम केलेलं आहे. त्याने शेन वार्न सोबत देखील अनेक वर्ष काम केलेले आहे.

मार्कला सचिन प्रचंड आवडत असे.

तो म्हणायचा की, “ऑस्ट्रेलियन क्रिकेट ॲकॅडमी जवळ बेस्ट रिसोर्सेस आणि टॅलेंट आहे तरीही ऑस्ट्रेलिया सचिन सारखा खेळाडू बनवण्याचा विचार देखील करू शकत नाही, कारण सचिनला मुंबईने घडवलं आहे.”

मार्कने त्याच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार बघितले. क्रिकेट वर्ल्ड कपच्या राइट्स च्यावेळी त्याला दूरदर्शन सोबत कोर्टात जावे लागले. श्रीलंका क्रिकेट बोर्ड सोबत देखील त्याचे वाकडे होते.

९० च्या काळात मार्क अनेक मोठ्या लोकांचा शत्रू झालेला होता. त्याच्या कार्यालयावरती नेहमीच सीबीआय आणि इन्कम टॅक्स यांची धाड पडत असे. पण मार्क ने कधीच ही प्रकरणं माध्यमांसमोर येऊ दिली नाहीत.

मार्क नेहमी एकच गोष्ट माध्यमांना सांगत असे कि, “मी चुकीचा नाही.”

मार्कने अनेक दिग्गज खेळाडूंसोबत काम केलं होतं. अजित आगरकर, रॉबिन सिंग, शेन वॉर्न, शोएब अख्तर परंतु सचिन सोडला तर इतर कुठल्याही खेळाडू सोबत तो खूप काळ काम करू शकला नाही.

 

 

२७ जानेवारी २००२ ला मार्क एका रोड एक्सीडेंट मध्ये मृत्युमुखी पडला. तेव्हा तो मध्य प्रदेशातुन एका टाटा सुमोने मुंबईला परत येत होता, या प्रवासातच त्याच्या गाडीचं पुढचा टायर फुटल्यामुळे गाडीचा एक्सीडेंट झाला, त्यातच त्याचा मृत्यू झाला.

पुढच्या दिवशी भारताची इंग्लंड सोबत मॅच होती. ह्या मॅच ला सर्व भारतीय खेळाडू काळी फीत बांधून मैदानात उतरले होते. या मॅचमध्ये सचिनने ६७ चेंडू मध्ये ८७ धावा केल्या होत्या.

सचिन मार्कच्या मृत्यूमुळे भावनिक दृष्ट्या दुखावला होता,”खूप मोठे नुकसान झाले.” असे भावनिक शब्द त्याने मार्क साठी उच्चारले होते.

===

हे ही वाचा – गावसकरांना बाथरूममध्ये कोंडलं नसतं, तर सोबर्सने आणखी एक शतक ठोकलं असतं!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version