Site icon InMarathi

ह्या १० भारतीयांच्या प्रेरणादायी कामगिरीतून ‘माणसात’ वसलेल्या ‘देवाचे’ दर्शन घडते!

thebetterindia.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

जगामध्ये काही व्यक्ती अशा असतात, की त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला तरी त्या आपली जिद्द सोडत नाहीत. कुठल्याही संकटात सामना करण्याची तयारी त्यांची असते.

आणि अशाच व्यक्ती प्रेरणादायी ठरतात पुढे अनेक लोकांना त्यांच्या वागणुकीने मार्ग सापडतो.

 

givingcompass.org

 

भारतातही अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांच्यावर अनेक कठीण प्रसंग आले तरीही न डगमगता त्यांनी त्याचा सामना केला आणि जीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

भारतातल्या अशाच काही हिरोंच्या या गोष्टी. ज्यांच्यामुळे देव माणसात वसतो या गोष्टीवर विश्वास बसतो.

१. पौलमी पटेल :

 

thebetterindia.com

 

पौलमी जेव्हा बारा वर्षांची होती तेव्हा आपल्या कुटुंबासोबत सहलीसाठी म्हणून हैदराबादला निघाली परंतु एका मोठ्या एक्सीडेंटला या कुटुंबाला तोंड द्यावं लागलं.

एक्सीडेंट मध्ये त्यांचा जीव वाचला परंतु पौलमीचा हात प्रचंड भाजून जखमी झाला. हा त्यांच्या कुटुंबासाठी मोठाच धक्का होता परंतु छोट्या पौलमी ने मात्र अत्यंत धीराने या प्रसंगांचा सामना केला.

पुढचे सगळे आयुष्य तिने आपल्या हातांवरच अक्षरशः झेलून घेतले. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत तिच्यावर एकूण पंचेचाळीस शस्त्रक्रिया झाल्या.

कुटुंबाचा असलेला सपोर्ट, पाठिंबा याच्या जोरावर ती त्यातून बरी झाली. आता ती आपल्या कुटुंबाचा व्यवसायही सांभाळते आहे जो अवजड मशिनरीज चा व्यवसाय आहे.

आता तिला तिच्या मनासारखा जोडीदारही मिळाला आहे.

या घटनेविषयी सांगताना पौलमी म्हणते की,

“माझ्यासमोर तेव्हा दोनच पर्याय होते एक तर रडत बसणे आणि लोकांची दया मिळवणे किंवा आहे त्या परिस्थितीचा सामना करून पुढे चालत राहणे. मी दुसरा पर्याय निवडला.

मी त्या परिस्थितीतही संधी कोणती मिळते,हेच पाहिले आणि देवाने जे भरभरून दिलं ते मी माझ्या एक आणि अर्ध्या हाताने घेतलं.”

 

२. डॉक्टर आलोमा आणि डेव्हिड लोबो :

 

yourstory.com

 

या दाम्पत्याने एका मुलीला दत्तक घेतलं. तिच्यात जेनेटिकली प्रॉब्लेम होता. ती इतरांपेक्षा वेगळी दिसते तरीही डॉक्टर ऑलोमा व डेव्हिड यांनी तिला दत्तक घेतले.

भारतात दत्तक घेणे देखील तसं अवघडच. त्यातूनही अशा मुलीला घेतलं म्हणून समाजातील लोकांकडून त्यांच्यावर टीकाही झाली. बोचरी बोलणी ऐकावी लागली, पण तरीही त्यांनी तिला वाढवलं.

आज निशा लोबो एक स्वावलंबी स्वतंत्र विचारांची मुलगी म्हणून स्वतःच्या पायावर उभी आहे. डॉक्टर लोगो म्हणतात,

” तिच्यामुळेच आम्हाला खरंतर शिकायला मिळालं. लोकांनी कशाही टिप्पण्या केल्या तरी शांत कसं राहायचं आणि आपण आपलं काम कसं करायचं हे तिनेच आम्हाला शिकवलं.

भारतात मुलांनाचं शिक्षण देणे गरजेचे आहे की माणसांकडे माणूस म्हणून बघा. त्याच्या दिसण्यावरून त्याची टिंगल टवाळी करू नका, नाहीतर आपला समाज असंवेदनशील होऊन जाईल.”

 

३. डॉक्टर उमेश आणि डॉक्टर अश्विनी सावरकर :

 

thebetterindia.com

 

या डॉक्टर दाम्पत्याची तीन महिन्यांची मुलगी एका एक्सीडेंट मध्ये ब्रेन डेड झाली. त्यावेळेस या दाम्पत्यावर काय संकट कोसळले असेल याची कल्पना येते.

आई-वडील होऊन तीनच महिने उलटून गेले आणि मुलगी गेली. तरीही त्यांनी धीराने आपल्या मुलीचे अवयव दान करायचे ठरवले. भारतात ही प्रोसिजर अत्यंत क्लिष्ट आहे.

आणि ती तर अवघी तीन महिन्याची लहानगी होती. त्यामुळे इतक्या लहान बाळाचे अवयव भारतात दान करता येत नाही असे त्यांना कळले, आणि त्यांना अजूनच दुःख झाले.

या सगळ्या घटनेवर सरकारने लक्ष घालावे आणि यासंदर्भातील जे नियम आहेत त्यामध्ये बदल करावा म्हणून एक पत्र आरोग्य मंत्रालयाला लिहिले ज्यामध्ये ते म्हणतात,

“जेव्हा तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला सोडून जाते तेव्हा जगणं अवघड होतं. जेव्हा डॉक्टरांनी डिक्लेअर केलं की आमची मुलगी ब्रेन डेड झाली आहे, त्यावेळेस काहीच करता येणार नाही याची जाणीव आम्हाला झाली.

परंतु तरीही आम्ही तिचे अवयव दान करून एका गरजू व्यक्तीचे जीवन आनंदित करायचं निर्णय घेतला.

यातून आम्हाला ही समाधान मिळालं असतं की, अवयव रूपात तरी आमची मुलगी जिवंत आहे, आणि ज्याला गरज आहे त्या व्यक्तीला दुसरं जीवन मिळेल. पण याचंच दुःख झालं की आमची ही पण इच्छा पूर्ण नाही झाली.

 

४. दीपिका म्हात्रे :

 

m.dailyhunt.in

 

भारतात टॅलेंट ची कमतरता नाही. आता जर कुणी दुसऱ्यांच्या घरात जाऊन काम करणारी बाई जर स्टॅन्ड अप कॉमेडियन होते असं सांगितलं तर!

पण हे शक्य झाले मुंबईमध्ये राहणारी दीपिका म्हात्रे या लोकलमध्ये इमिटेशन ज्वेलरी विकायच्या. तसेच चार घरांमध्ये कामही करायच्या.

परंतु एके दिवशी त्यांना स्टँड अप कॉमेडी करायचा चान्स मिळाला आणि तो प्रयोग अत्यंत हिट गेला. नंतर तोच कार्यक्रम त्या करायला लागल्या.

त्या जे सादर करतात ते त्या स्वतःच लिहितात. त्यांच्या अनुभवांवरतीच त्यांचा कार्यक्रम आहे. त्या म्हणतात,

“मी विनोद वीर होण्यामागची खरी प्रेरणा जॉनी लिव्हर आहेत. आदिती मित्तल देखील मला प्रेरणादायक वाटतात. लोकांना इतकंच सांगते की आयुष्य कठीण आहे पण तरीही हसत राहा.

हसून प्रत्येक संकटाचा सामना करा. स्वप्न पहा, स्वप्न पुरी करा पण तुमच्याकडे जे कामाला येतात त्यांनाही माणूस म्हणून बघा आणि तसंच वागवा.”

 

५. सोनम वांगचुक :

 

theweek.in

 

थ्री इडियट्स मधला ‘फुंसुक वांगडू ‘ आठवतोय? वांगचुक यांच्या वरूनच प्रेरणा घेऊन ते कॅरेक्टर सिनेमा मध्ये घेतलं गेलं आहे.

बावन्न वर्षांच्या ह्या इंजिनियर कडे लोकांचे तेव्हा लक्ष गेले ज्यावेळेस त्यांनी एक वेगळीच शाळा काढली.

ज्या मोठ्या मोठ्या शाळेतून मुलांना नापास असा शिक्का मिळाला होता त्या मुलांना त्याने आपल्या शाळेत ऍडमिशन दिली आणि शिकवायला सुरुवात केली.

निरनिराळे प्रयोग ती शाळा करते. हसत खेळत शिक्षण याचं खरंखुरं प्रात्यक्षिक त्या शाळेत मिळतं. आजूबाजूच्या गोष्टीतूनच, वस्तू मधूनच अनेक प्रयोग त्यांनी केले आहेत.

बर्फाचे खांब आणि चिखलाच्या बनवलेल्या झोपड्या ज्यामुळे तापमान उबदार राहतं हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. ते म्हणतात

“भारत हा महान बनवायचा असेल तर आधी इथल्या नागरिकांनीच महान बनलं पाहिजे. समाजासाठी काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे.”

 

६. दादाराव बिलोरे :

 

thebetterindia.com

 

दादाराव बिलोरे यांचा सोळा वर्षाचा मुलगा प्रकाश मुंबईत अपघातात मरण पावला आणि तेही केवळ रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे.

त्यानंतर उध्वस्त झालेल्या दादाराव बिलोरे यांनी एक चंगच बांधला ते आता रस्त्यावरील खड्डे स्वतः बुजवतात. ते म्हणतात,

“असं केल्याने मला, मी माझ्या मुलाला श्रद्धांजली अर्पण करतोय असं वाटतं. अजून कुठल्याही मुलाचा जीव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जाऊ नये हीच माझी इच्छा आहे.”

आत्तापर्यंत त्यांनी मुंबईतील ६०० पेक्षा जास्त खड्डे बुजवले आहेत. मुंबई त्यांना आता ‘खड्डे दादा’ म्हणून ओळखते.

ज्या रस्त्यांवर खड्डे पडतील त्या कॉन्ट्रॅक्टरवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठीदेखील त्यांचा लढा सुरू आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार आपण टॅक्स देतो आणि आपण फक्त बघ्याची भूमिका घेतली तर वर्षानुवर्ष हे असेच चालू राहील. यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे.

 

७. पूर्णोता बेहल :

 

deccanchronicle.com

 

लहान मुलांच्या कॅन्सर संदर्भात पूर्णता ने काम केले आहे. गरीब आणि कमी उत्पन्न कुटुंबातील कॅन्सरग्रस्त बालकांसाठी काम करणाऱ्या ‘कडल्स फाउंडेशन’ या संस्थेतर्फे ती काम करते.

त्या मुलांना पोषण युक्त आहार देणे हे या संस्थेचे मुख्य काम. आतापर्यंत १३ शहरांमधील २२ हॉस्पिटलमधील ३५००० बालकांना ते आपली सेवा देत आहेत. त्या म्हणतात,

“समाजाचं आपण काही देणं आहोत या भावनेने आपण काम केले तर मिळणारे समाधान देखील तितकंच मोठं असतं. अनेक समस्या देखील आहेत, त्यांचा आपल्या मुलांवरही प्रभाव पडतो.

मग ते पर्यावरण असू दे किंवा आरोग्य. या सगळ्याच गोष्टी माणसाच्या हक्काच्या आहेत. दुसऱ्यांसाठी नाही तरी निदान आपल्या मुलांसाठी आपल्याला हे काम करणे गरजेचे आहे.”

 

८. बेबी हलदर :

 

amazon.com

 

वयाच्या बाराव्या वर्षी तिच्यापेक्षा १४ वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसाशी तिचं लग्न झालं. तिकडे तिचा प्रचंड छळ सुरू झाला तिने तिकडे कशीबशी काही वर्षे काढली.

शेवटी तीन मुलांना घेऊन ती दिल्लीला आली. आणि तिकडे तिने धुणीभांडे करायची कामे सुरू केली. सिंगल मदर म्हणून होणारा सगळा त्रास तिला होत होता.

पण तिचं आयुष्य बदललं ते लेखक प्रबोध कुमार यांच्या घरी ती कामाला लागली तेव्हा.

तिला त्यांनी लिहायला वाचायला शिकवले आणि तिची गोष्ट लिहून काढायला सांगितले गोष्ट लिहिता लिहिता तिच्यातली लेखिका जागृत झाली.

आणि तिचे पुस्तक ‘आलो अंधारी ‘ जगभरात प्रसिद्ध झालं.

तिच्या म्हणण्यानुसार,

“भारतात आजही स्त्रीवर अनेक बंधने आहेत कुठलीही गोष्ट सोपी आणि सहजासहजी मिळणार नाही त्यासाठी आपणच आपले हिरो व्हायला हवे. आपली लढाई आपणच लढायला हवी यासाठी आपलाच आपल्यावर विश्वास हवा.”

 

९. मुरुक्कन एस :

 

theoptimistcitizen.com

 

स्वतः अनाथ असल्याने अनाथांची दुःख त्यांना माहीत आहेत. एकेकाळी ते स्वतः देखील पोटाची खळगी भरण्यासाठी उकिरड्यावर काही खायला मिळतं का हे शोधायचे.

पण पुढे मोठे झाल्यानंतर अशाच अनाथ, बेघर लोकांसाठी काम करायचं त्यांनी ठरवलं. त्यासाठी त्यांनी ‘थिरुवरा प्रवर्तक असोसिएशन’ ही ऑर्गनायझेशन सुरू केली.

यामध्ये अनेक अनाथ मुलं, बेघर लोक,म्हातारी माणसं, रस्त्यावर राहणारे लोक या सगळ्यांना आसरा दिला. जे केरळ सरकारलाही शक्य झालं नाही ते त्यांनी करून दाखवले आहे. ते म्हणतात की,

” माणूस जन्माला येताना काही घेऊन येत नाही तसाच तो मरताना देखील काही घेऊन जात नाही. आपल्याला जे आयुष्य मिळतं ते सुंदर आणि चांगलं बनवायचा प्रयत्न आपण केला पाहिजे.

या पृथ्वीने आपल्याला खूप काही गोष्टी दिले आहेत आणि आपलं जीवन सुंदर केलं आहे आपण त्याची थोडीतरी परतफेड अशा कामामधून केली पाहिजे.”

 

१०. अलगारत्नम नटराजन :

 

yourstory.com

 

लंडन वरून ते दिल्लीला शिफ्ट झाले. दिल्लीमधल्या उन्हाळ्याने त्यांचे लक्ष तिथे असणाऱ्या पाणीटंचाई कडे गेले. त्यांनी घराबाहेर कुलर लावला आणि त्यांना तिथल्या परिस्थितीची जाणीव झाली.

बाहेरच्या कडक उन्हात लोकांना काही अंतर चालणे देखील मुश्कील होते. लोकांना प्यायला पाणी नसल्याने रस्त्यात चक्कर येणे वगैरे प्रकार घडायचे.

हे पाहून नटराजन यांनी ठीकठिकाणी मटका ठेवायचे ठरवले. साउथ दिल्लीतील अनेक ठिकाणी त्यांनी मटके ठेवलेले आहेत. काही वेळानंतर ते स्वतः गाडीतून जाऊन ते मटके भरतात.

आता त्यांना तिथली लोक ‘मटका मॅन’ म्हणतात.

“दिल्लीत पाणीपट्टी घेतली जाते पण गरिबांना पाणी दिलं जात नाही. ही खेदाची बाब आहे” असं ते म्हणतात. ” पण मी इतकं शिकलो आहे की, आपण ठरवलं तर खूप काही या समाजाला देऊ शकतो.

मी तर दररोजच अनेक नवीन गोष्टी आता यातून शिकत आहे. पंचशील पार्क मध्ये राहतो आणि मला खात्री आहे की इथले लोक देखील दयाबुद्धीने वागून भारतामध्ये एक आदर्श उदाहरण निर्माण करतील. आपणच समाजासमोर एक उदाहरण म्हणून उभा राहिले पाहिजे.”

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version