उन्हाळ्यात डोकं आणि शरीर थंड ठेवण्याकरता ह्या ७ ‘आयुर्वेदिक’ टिप्स फॉलो कराच!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
‘यंदा खूपच गरम होतंय ना?’, ‘गेल्यावर्षीपेक्षा यंदा जास्त उकाडा आहे’, ‘संपू दे आता हा उन्हाळा’ असे प्रत्येक जण दर उन्हाळ्यात हमखास म्हणत असतो.
हे उद्गार आपण दरवर्षी ऐकत असतो, आपणंही असं नेहेमीच बोलतो. खरंच काही काही वेळा हा उन्हाळा खूपच असह्य होतो. काही काही भागात तर रात्री सुद्धा गरमी असह्य होते.
त्यामुळे झोप अपुरी होते आणि दिवसभर आळस येतो, डोकं जड होतं, काहीही करू नये असं वाटतं.
ह्याशिवाय अजून एक भयानक म्हणजे ‘डिहायड्रेशन’ म्हणजेच शरीरातील पाण्याची पातळी कमी होणं!
उन्हाळ्यात आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर घाम येतो (त्यामुळे रोजचं ‘वर्काआऊट’ करायला देखील नको वाटतं), ह्या घामावाटे केवळ शरीरातील पाणीच नाही तर क्षार देखील कमी होतात.
त्यामुळे अशक्तपणा येणे, चक्कर येणे ह्यासारख्या गोष्टी होऊ शकतात.
त्याशिवाय बदलत्या जीवशैलीमुळे वेळी अवेळी झोपणे, काहीही आणि कधीही खाणे ह्यासारख्या गोष्टींमुळे अनेक जणांना पित्तासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
उन्हाळ्यात तर बऱ्याच जणांचं पित्त खूपच खवळतं. पित्तामुळे उलट्या होणे, चक्कर येणे, अन्नावर वासना न राहणे, त्यामुळे अशक्तपणा येणे, पुन्हा पित्त होणे अशा अनेक भयंकर समस्या उद्भवतात.
आपले प्राचीन ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा दुर्मिळ खजिनाच आहे. निरनिराळ्या ग्रंथांमध्ये निरनिराळ्या शास्त्रांची माहिती दिली आहे.
असाच आपला एक प्राचीन ग्रंथ आहे ज्यामध्ये आपल्या शरीरशस्त्राची आणि रोग, रोगांवरचे उपचार ह्यांची योग्य माहिती दिली आहे आणि तो ग्रंथ म्हणजे आयुर्वेद!
ह्या ग्रंथाची परंपरा आहे असे म्हंटले जाते. च
रक संहिता, सुश्रुत संहिता, काश्यपसंहिता अशा तरेने चरक, सुश्रुत आणि कश्यप ह्यांनी ह्या ग्रंथाचे लिखाण केले आणि त्यांच्या शिष्यांनी ही परंपरा पुढे चालवली.
हा ग्रंथ साधारणतः ३००० वर्षांपुर्वीचा असावा असे विद्वांनांचे मत आहे.
आयुर्वेदानुसार एका वर्षाची वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर असा सहा ऋतुंमधे विभागणी केली आहे.
त्या त्या ऋतुंमधे असणार्या वातावरणाप्रमाणे, हवामात होणार्या बदलांप्रमाणे आपला आहारविहार कसा असावा याचे उत्तम वर्णन, ह्याची उत्तम माहिती आयर्वेदामधे दिली आहे ज्याला ‘ऋतुचर्या’ असे म्हणतात.
ग्रीष्म ऋतु मध्ये म्हणजेच उन्हाळ्यात शरीराला कसा थंडावा मिळेल, उन्हाने होणारा त्रास, अंगाची लाही लाही होणे हे टाळण्यासाठी काय करावे ह्याची माहिती आयुर्वेदात दिली आहे.
त्या टिप्स् आपण फॉलो केल्यास आपल्याही हा उन्हाळा सुसह्य होईल. चला तर आपण बघूया ह्या टिप्स् आज लेखातून!
१) शरीरातील उष्णता वाढविणारे पदार्थ खाणे टाळा :
खूप मसालेदार, तिखट, मिरचीचे प्रमाण अती असणारे भोजन, अन्न ह्यामुळे शरीरातील उष्णता वाढते. असे पदार्थ खाल्ल्याने जळजळ होते आणि पित्त उसळते.
त्यामुळे अशा प्रकारचे अती तिखट, मसालेदार पदार्थ शक्यतो टाळावेत. तसेच, अती तेलकट, तळकट पदार्थ देखील पित्तकारक असतात.
त्यामुळे असे पदार्थ देखील टाळावेत.
२) पित्त शामक पदार्थांचा समावेश आहारात करावा :
आयुर्वदामधे असं सांगितलं आहे की त्या त्या ऋतुमधे येणारी फळे खाल्ल्याने त्या त्या ऋतुमध्ये उद्भवणार्या विकारांवर मात करता येते.
म्हणजेच उन्हाळ्यात जी जी फळे येतात जसे कलिंगड, केळी, ताडगोळे, खरबूज, संत्री अशा फळांचे सेवन करावे, ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.
काकडी, बटाटा, हिरवे सोयाबीन, कांदा, पालक, मोड आलेली कडधान्ये अशा भाज्या, उसळी ह्यांचा आहारात समावेश करावा.
कढीपत्ता, पुदीना ह्यासारख्या वनस्पतींच्या चटण्या कराव्यात किंवा भाज्या, कोशिंबिरी ह्यामध्ये आवर्जून समावेश करावा. पुदिना तर सरबतामधे पण वापरला जातो.
त्यामुळे थंडावा तर मिळतोच त्याशिवाय पोटाच्या इतर समस्या देखील नाहीशा होण्यास मदत होते.
३) वेळच्या वेळी आहार घेणे :
पित्ताचा समतोल राखायचा असेल आणि जर शरीराला थंडावा मिळावा असेही वाटत असेल तर आहाराच्या वेळा पाळणे आवश्यक आहे.
वेळच्या वेळी आहार घेणे हा उपाय पित्त नाशासाठी अगदी रामबाण इलाज आहे असे आयुर्वेद सांगतं. दुपारच्या वेळी अन्न सेवन टाळणे म्हणजे पित्ताला अमंत्रण देणे होय.
त्यामुळे जळजळ देखील होते. जर ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर दुपारचे भोजन वेळेवर घ्यावे.
४) गरम पेये टाळावीत :
उन्हाळ्यामध्ये शरीरातील ऊष्णता देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते.
त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये गरम पेये पिणे म्हणजे पित्ताला आमंत्रण देणे आणि शरीरातील उष्णता अजूनही वाढवणे, त्यामुळे उन्हाळ्यात गरम पेये (चहा, कॉफी तर टाळावीतच, सूप वगैरे पण शक्यतो घेऊ नये).
५) व्यायामाची वेळ :
उन्हाळ्यात आपल्याला अतितिक्त घाम येतो, व्यायाम केल्याने तर खूपच घाम म्हणजेच शरीरातील पाणी आणि क्षार ह्यांचे प्रमाण खूपच कमी होणे!
त्यामुळे व्यायामाची उत्तम वेळ म्हणजे सूर्योदयाच्या आधी म्हणजेच सकाळी खूप लवकर आणि त्यानंतर व्यायामासाठी चांगला काळ म्हणजे सुर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळी!
तोही जास्त व्यायाम करू नये, शरीराला जास्त ताण पडेल असा व्यायाम करू नये. हलका व्यायाम करावा, जसे पोहणे, योगासने, चालणे इत्यादी व्यायाम उन्हाळ्याच्या काळात अतिशय उत्तम आहे.
पोहणे हा तर ह्या काळातला खूपच चांगला व्यायाम आहे.
६) खोबरेल तेलाचा वापर :
आपल्या शरीरालाच नव्हे तर त्वचेला देखील थंडावा मिळण्यासाठी आंघोळीच्या आधी शरीरावर हलक्या हाताने खोबरेल तेलाची मालिश करावी.
जास्त मसाज करू नये. ह्यामुळे त्वचेला तजेला पण मिळतो आणि थंडावा पण मिळतो. म्हणजेच खोबरेल तेल शरीरासाठी, त्वचेसाठी देखील शांत, थंड आणि सुखदायक असते.
खोबरेल तेलाऎवजी आपण सूर्यफूलाचे तेल वापरू शकतो पण खोबरेल तेल उत्तम असते उन्हाळ्याच्या दिवसात!
७) ध्यान धारणा :
मन शांत असेल तरच शरीरावर ह्या सगळ्या गोष्टींचा योग्य तो परिणाम होतो. मन जर अशांत असेल, मनात जर वादळं चालली असतील तर अर्थातच त्याचा विपरित परिणाम आपल्या शरीरावर होतो.
त्यामुळे एरव्ही तर मन शांत असायला हवेच पण, उन्हाळ्यात मन शांत असणे जास्त गरजेचे आहे आणि मन शांत होण्यासाठी ध्यान धारणा हा अतिशय उत्तम उपाय आहे.
त्यामुळे मनःशांतीसाठी ध्यान धारणा करणे हे उन्हाळ्यात खूपच फायदेशीर ठरते.
आयुर्वेदामधे सांगितलेले हे उपाय जर अमलात आणले तर हा ग्रीष्म ऋतु किंव उन्हाळा खूपच सुसह्य होईल.
ग्रीष्मामधील ही ऋतुचर्या जर आपण ‘फॉलो’ केले तर नक्कीच आपल्याला उन्हाळ्यात होणारे जळजळ, पित्त, डिहायड्रेशन आणि उन्हाळ्यात होणारे तब्येतीचे इतर त्रास आपल्याला नक्कीच टाळता येतील.
===
सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.