आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आपणास माहीतच असेल की १८ दिवस चाललेल्या महाभारतातील युद्धात पांडव सैन्याचा सर्वांत जास्त नाश कोणी केला असेल तर तो महारथी भीष्मांनी.
असा म्हणतात की जर भीष्म अजून ३ दिवस लढले असते तर कदाचित बाजू फिरली असती. पण साक्षात भगवंत पांडवांच्या बाजूने होते आणि विजय हा सत्याचाच होणार होता.
–
हे ही वाचा –
===
भीष्मांचा मृत्यू हे त्यांचं प्रारब्ध होतं आणि तो कसा होईल, कधी होईल हे त्यांनाही माहीत होतं.
तर आज जाणून घेऊया, भीष्मांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अंबेचा उर्फ शिखंडी चा खरा इतिहास.
तीन बहिणींचे स्वयंवर
काशीच्या राजाला ३ मुली होत्या, अंबा, अंबिका आणि अंबालिका. वयात आल्यावर ह्या तिघींचे राजाने स्वयंवर ठेवले.
भीष्म ह्या स्वयंवराला आपल्या भावासाठी, “विचित्रवीर्या”साठी वधू आणण्याच्या उद्देशाने हस्तिनापुराहून गेले. तिघींना पाहताच भीष्माने बाहू पराक्रमावर या तिघींना पळवून हस्तिनापूरास आणले.
अंबा आणि शाल्व
ह्या स्वयंवरात अंबा शाल्वा ला वरणार होती. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते, पण भीष्माने अपहरण केल्याने दोघांचा नाईलाज झाला. अंबेने भीष्म आणि विचित्रविर्याला सत्य परिस्थिती सांगून परत शाल्वा कडे जाण्याची अनुमती मागितली.
ह्या प्रकारावर हस्तिनापुरातल्या दरबारात चर्चा झाली आणि अंबेला शाल्वा कडे जाण्याची अनुमती देण्यात आली.
कमनशिबी आणि सुडाने पेटलेली अंबा
अंबेच्या अपेक्षेच्या नेमके उलटे झाले, शाल्वाने तिला “तुला भीष्माने जिंकले आहे” असे कारण देऊन नाकारले.
उलटपावली अंबा भीष्मांकडे गेली असता तिला त्यांनीही नाकारले. कारण भीष्म आजन्म ब्रह्मचारी होते.
अंबा हा अपमान असह्य होऊन जंगलात भटकत राहिकी तेव्हा तिची भेट होत्रवाहण ह्या परशुरामाच्या शिष्याशी झाली आणि अंबेचे दुःख परशुरामां पर्यंत गेले.
अंबेची करून कहाणी ऐकून परशुरामांनी तिला भीष्माला धडा शिकविणे किंवा शाल्वा कडे परत जाणे यापैकी एक निवडण्यास सांगितले, परंतु सुडाला पेटलेली अंबा भीष्मांच्या मृत्यूच्या मागे होती.
परशुराम तिला घेऊन भीष्मा कडे गेले आणि भीष्माने अंबेला नकार देताच दोघांचे २३ दिवस युद्ध झाले.
दोहोंपैकी कोणीही हरण्याचे चिन्ह न दिसता नारदांनी मध्यस्थी करून हे युद्ध थांबविले व परशुरामांनी अंबेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
परंतु सुडाने पेटलेली अंबा वणवण भटकत राहिली व तिने शंकराची घनघोर तपश्चर्या केली. स्वतः गंगेने अंबेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण अंबेने आपली जिद्द सोडली नाही.
सरते शेवटी भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन अंबेला इच्छित वर दिला. पुढील जन्मी ती भीष्मांच्या मृत्यू चे कारण होईलअसे सांगितले. पुढे तिने अग्नीत प्रवेश केला.
अंबेचा शिखंडी म्हणून पुनर्जन्म
इकडे द्रुपद राजाने पराक्रमी पुत्रासाठी भगवान शंकराची उपासना व यज्ञ सुरु केला तेव्हा त्याला शंकरांनी प्रसन्न होऊन पुत्र प्राप्ती चा वर दिला व सांगितले की तुला कन्या होईल जी पुढे तुझा पुत्र होऊन इतिहास घडवेल.
राजा द्रुपदाने ही गोष्ट कुणालाही कळू न देता, आपल्या पुत्रीचे शिखंडीचे अगदी मुला प्रमाणे पालन केले.”
योग्य वेळ येताच द्रुपदाने हिरण्यावर्मा नगरीच्या राजकुमारीशी म्हणजे महाराज दर्शन यांच्या मुलीशी आपल्या मुलीचे म्हणजेच मुलाचे लग्न लावले.
एकांतात असताना राजकुमारी ला कळून चुकले की, आपली फसवणूक झाली असून शिखंडी हा पुरुष नसून स्त्री आहे. तिने गुपचूप आपल्या विश्वासू दासींमार्फत ही बातमी आपल्या वडिलांना कळविली.
महाराज दर्शन हे ऐकून अत्यंत संतप्त झाले व त्यांनी द्रुपदाला निरोप धाडला की त्यांची लबाडी कळली असून ते मोठ्या सैन्यासह द्रुपद देशावर चालून येत आहेत.
–
हे ही वाचा –
===
इकडे राजा द्रुपद हे ऐकून चिंतीत झाला. “आपल्यामुळे वडिलांवर युद्धाची पाळी येणार, आपले राज्य नष्ट होणार” ह्याचा खेद वाटून शिखंडी जंगलात एकटाच गेला.
इथे शिखंडी ची स्थुन नावाच्या यक्षाशी भेट झाली, स्थुनाला त्याची दया येऊन त्याने शिखंडी ला आपले लिंग तात्पुरते देऊ केले व स्वतः स्त्री होऊन बसला.
शिखंडी ने वचन दिले की राज्यवरील संकट टळताच तो परत येऊन पुन्हा लिंग बदल करेल. इकडे वैद्यांकडून खात्री पटल्यावर राजा दर्शन ससैन्य आपल्या राज्यात परतला.
परंतु इकडे जंगलात यक्षांच्या राजाने महाराज कुबेराने जंगलाला भेट दिली व स्थुन स्वागताला न आल्याने ते क्रोधीत झाले. सत्य परिस्थिती कळताच ते अत्यंत संतापले व त्यांनी स्थुनाला आजन्म स्त्री बनून राहण्याचा श्राप दिला.
अन्य यक्षांनी या वेळी कुबेराची समजूत काढली व राग शांत झाल्यावर त्यांनी स्थुनाला उ:शाप दिला की, कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर जेव्हा शिखंडी मरण पावेल तेव्हा स्थुन पुन्हा पुरुष होईल.
भीष्मांचा पाडाव
युद्धाच्या दहाव्या दिवशी श्रीकृष्णाने बरोबर शिखंडीला अर्जुनाच्या रथावर उभे केले व त्या आडून अर्जुनाला भीष्मावर बाण वर्षाव करण्यास सांगितले.
शिखंडी हा आत्ता जरी पुरुष असला तरी तो मूळ स्त्री आहे हे भीष्मांना माहीत असल्याने त्यांनी आपल्या वचनाला जागून शस्त्रे ठेवली.
अशाप्रकारे घनघोर तपश्चर्या करून, पुनर्जन्म घेऊन, स्वतः एका दुसऱ्या स्त्रीला फसवून लग्न करून, पुन्हा लिंग बदल करून येनकेन प्रकारे अंबेने उर्फ शिखंडीने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली
शिखंडी वध
अशा ह्या शिखंडी रुपी अंबेला पुरुष असताना युद्ध संपल्यावर अश्वत्थाम्याने ठार मारले.
महाभारत हा एका सुडाचा प्रवास आहे, इथे प्रत्येकाचे आयुष्य हे कुणाचा तरी सूड घेण्यासाठी आहे. जिद्दीला पेटलेल्या स्त्री पासून वाचणे अटळ आहे हेच आपणांस ह्या अंबेच्या कहाणीतून कळते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.