जाणून घ्या रामायणात “यत्र तत्र सर्वत्र” विविध रूपात वावरणाऱ्या एका कलाकाराबद्दल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सलमान खान,अक्षय कुमार,प्रियांका चोप्रा यांचा मुझसे शादी करोगी सिनेमा आठवतोय? सलमान खानचा खोली मालक म्हणून कादर खानचं एक कॅरेक्टर होत त्यात. दुग्गल साहेब!
त्यांना मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आजार असतो. त्यामुळे ते कधी पोलीस असत, कधी आंधळे, तर कधी डॉक्टर! मागच्या वर्षी लॉक डाऊनमुळे दूरदर्शनवर रामायण पुन्हा सुरू झालं होत आणि अचानक दुग्गल साहेबचा ट्रेंड वाढू लागला.
जर तुम्ही रामायण नीट पाहिलं असेल तर, रामायणात एकच व्यक्ती अनेक व्यक्तिरेखा पार पाडताना तुम्हाला दिसली असेल.
जेव्हा रामायणात रामसेतू बांधण्याचा क्लायमॅक्स आला आणि समुद्र देवाने प्रवेश केला, तसा दुग्गल साहेब हा ट्रेंड आकाशात पोहोचला!
सीतेच्या स्वयंवरात गायक, दंडकारण्य मध्ये राक्षस आणि नंतर समुद्रदेव म्हणून प्रकट झाल्यावर सोशल मिडीयावर मिम्सचा पूर आला.
पण हा अभिनेता नेमका आहे तरी कोण? अस्लम खान! रामायणात अनेक पात्र रंगवणारा ‘दुग्गल साहेब’.
दूरदर्शनवरील स्क्रीनवर रामायण परतल्याने या कार्यक्रमाला देशभरातील नागरिकांकडून विक्रमी पसंती मिळाली.
या कार्यक्रमाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळविल्यामुळे हे निश्चित होते की, या लोकप्रियतेचे प्रतिबिंब सोशल मीडियावर उमटणार. लगेचच बऱ्याच कलाकारांनी लक्ष वेधण्यास सुरवात केली. हे स्वाभाविकच होते.
रामायण हे विस्ताराने मोठे आहे त्यामुळे साहजिकच त्यात अनेक पात्र आहेत. अस्लम खान यांनी सर्वाधिक पात्र साकारली आहेत.आणि अनेक प्रेक्षकांनी ती ओळखली सुद्धा आहेत!
अपेक्षेप्रमाणे लगेचच अस्लम खान यांच्यावर तयार झालेल्या मिम्स चा पूर सोशल मीडियावर ओसंडत वाहू लागला. काहींनी त्यांना ‘दुग्गल साहेब’ म्हणायला सुरुवात केली आहे.
–
हे ही वाचा – हा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रत्येक कलाकार आयुष्यभर झटत असतो, जाणून घ्या!
–
अनेक भूमिकांपैकी कधी ते वानर सैन्यात, तर कधी समुद्र देव, कधी साधू तर, कधी रावणाचा हेर म्हणून दिसले आहेत.
मागे अस्लम खान यांनी नारद टीव्हीला मुलाखत दिली. मुलाखतीत ते म्हणाले की,
“अशा प्रकारच्या अभिनयात मला खरोखर रस नव्हता. खाजगी क्षेत्रात नोकरी मिळविण्याच्या वेळी धडपड करत असताना एका मित्राने मला स्टेज शो पहायला नेले. मित्राच्या माध्यमातून माझी ओळख अभिनयाच्या जगाशी झाली.”
पहिल्यांदा विक्रम आणि वेताळ कार्यक्रमात त्यांना अभिनय करण्याची संधी मिळाली होती.
मुलाखतीत पुढे ते सांगतात की, “रामायणात त्यांनी साकारलेली समुद्रदेवतेची भूमिका अगदी नशिबाने माझ्याकडे आली.”
समुद्र देव भूमिकेसाठी कास्ट केलेली मूळ व्यक्ती शूटिंग साठी दिलेल्या तारखेला शूटिंगसाठी येऊ शकली नाही. बॅकअप म्हणून अस्लम खान यांच्या कडून समुद्र देवतेच्या ओळी पाठ करून घेण्यात आल्या.
मूळ व्यक्तीच अनुपस्थित असल्यामुळे अस्लम खान यांना ही भूमिका पार पाडावी लागली.
रामायण कार्यक्रमाच्या तीस वर्षानंतर हे स्पष्ट झाले आहे की, समुद्रदेव म्हणून त्यांची भूमिका त्यांना खरी ओळख मिळवून देत आहे.
मुलाखतीत ते म्हणाले की, “त्या विशिष्ट भूमिकेबद्दल मला भरभरून खूप प्रेम मिळालं.”
अस्लम खान हे मूळचे झाशीचे असून त्यांचा जन्म १९६१ साली झाला. रामायण व्यतिरिक्त त्याने असंख्य कार्यक्रमांमध्ये भूमिका देखील केल्या आहेत. पण रामायणातील त्यांच्या भूमिकांमुळेच त्यांना सर्वाधिक पसंती मिळाली आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले गेले.
रामानंद सागर यांच्याच कृष्णा कार्यक्रमात देखील त्यांनी काही भूमिका केल्या.
पण दुर्दैवाने, त्याला कधीही सिनेमात काम करण्याची संधी मिळाली नाही. २००२ मध्ये त्यांनी अभिनय उद्योग सोडला अन आपल्या मूळ ठिकाणी परत गेले.
पण मागे लॉकडाऊनमुळे ते मुंबईतच अडकले होते . प्रायव्हेट कंपनी मध्ये काम करण्याच स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलं आणि ते आता एका मार्केटींग कंपनी मध्ये चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत.
रामायणात त्यांनी साकारलेल्या पात्राविषयी सोशल मीडियावर नुकत्याच झालेल्या मिम्सच्या प्रसारणाबद्दल अस्लम खान यांना विचारले असता ते म्हणाले,
“त्या काळात सोशल मीडियाचं प्रस्थ नव्हतं आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा लिमिटेड होती. त्यावेळी जर सोशल मीडिया असती आणि आता लोक जेवढे क्रिएटिव्ह आहेत तेवढे असते तर त्यांना कदाचित बरीच प्रसिद्धी त्याकाळी मिळाली असती.”
त्याचा सकारात्मक परिणाम होऊन त्यांना अधिक प्रमुख व्यक्तिरेखा साकारण्यास मिळाल्या असत्या.
उशिरा का होईना, पण त्यांचं काम लोकांना आवडलं आणि त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळाली असं ते म्हणतात.
–
हे ही वाचा – चेहऱ्याने फिरंगी असूनही अस्सल भारतीय ठरलेल्या कलाकाराची कहाणी तुम्ही वाचायलाच हवी
–
१९८७ सालच्या जानेवारी महिन्यात रामानंद सागर यांना दूरदर्शनवरून ही मालिका बनवण्यासंबंधी विचारणा झाली होती. रामानंद सागर यांच्या जन्मशताब्दीनंतर त्यांचा मुलगा प्रेमसागर याने त्यांच्या आठवणीत सांगितले होते की,
बाबांना रामायणावर फार पूर्वीपासून चित्रपट किंवा मालिका बनवण्याचे स्वप्न होते. परंतु योग येत नव्हता. १९७५ पासून त्यांनी त्यावर विचार करायलाही सुरूवात केली होती.
परंतु दुरदर्शनवरून काही ना काही कारणं सांगून ते लांबणीवर पडत गेले होते. अखेर २५ जानेवारी १९८७ ला रामायण मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि या मालिकेने टिव्ही चॅनेल्सचा इतिहासच बदलून टाकला.
काळाच्या आड गेलेल्या ग्राफिक्सचा वापर केलेलं रामायण २१ व्या शतकातले भारतीय चवीने पाहत आहेत. सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म अस्लम खान यांच्या सारख्या गुणी कलाकारांना तेव्हा नाही तर आता प्रसिद्धी मिळवून देत आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.