Site icon InMarathi

हॉलिवूडने आपली गाणी त्यांच्या चित्रपटांत कशी वापरून घेतलीयेत पहा!

Jimi Jimi IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एका सर्व्हेनुसार, आपण भारतीय सर्वात जास्त आनंदी राहणारे लोक आहोत. या आनंदी राहण्याचं एक महत्वाचं कारण समोर आलंय ते म्हणजे भारतीय संगीत.

कोणताही मूड असू द्या, आपल्याकडे त्यासाठी गाणी तयार आहेत. आजही बऱ्याच घरात सकाळची सुरुवात ही भक्ती गीताने होते आणि रात्री झोपताना जुनी गाणी लावली जातात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भारतीय गाणी ही एका पिढीला दुसऱ्या पिढीशी जोडते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण, लहान मुलं ही गाणी ऐकतच वाढतात आणि त्यामुळे त्यांना सुद्धा गाण्याची आवड निर्माण होते. ती आवड पुढे अविरत चालू राहते.

भारतात सध्या सुरू असलेल्या वातावरणात सुद्धा लोक कोरोनावर सुद्धा गाणी तयार करत आहेत आणि त्यांच्या मनातल्या अस्वस्थतेला दूर ठेवत आहेत.

गृहिणी सुद्धा त्यांची कामं चालू असताना गाणी ऐकत काम करत असतात आणि त्यामुळे त्यांना त्या कामाचा ताण कमी येतो हे सर्वश्रुत आहे. कामातून विरंगुळा म्हणून गाणी ऐकली तरीही ताण कमी होतो.

 

 

भारतीय गाण्यांची ही जादू फक्त भारतीयांपुरती मर्यादित राहिली नसून आपण हॉलीवूडला सुद्धा आपल्या गाण्याने थिरकायला भाग पाडलं आहे. फक्त ह्या गोष्टीची पाहिजे तेवढी चर्चा होत नाही.

आपल्याकडे चर्चा होते ती फक्त कोणत्या सिनेमाची कथा आपण हॉलिवूड च्या एखाद्या सिनेमामधून चोरली आहे ह्याच गोष्टीची.

आतापर्यंत या ७ हिंदी गाण्यांनी हॉलिवूड मधील सिनेमा मध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे आणि तिथल्या प्रेक्षकांना या गाण्यांवर नाचवलं आहे. हे तुम्हाला कदाचित माहीत नसावं.

ही गाणी त्या सिनेमा मध्ये इतक्या सफाईने टाकली जातात की कधी कधी सिनेमा पाहताना आपल्या लक्षात येत नाही :

 

१. ‘छलका छलका रे’ आणि ‘मुझे रंग दे’ :

 

https://in.bookmyshow.com/

 

Accidental Husband (2008) नावाच्या सिनेमा मध्ये उमा थुरमन आणि जेफरी मॉर्गन यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.

ह्या सिनेमाचं कथानक थोडक्यात असं आहे की, उमा आणि जेफरी हे एका विचित्र घटनाक्रमामुळे लग्नाच्या बेडीत अडकतात. ह्या दोघांचं लग्न हे भारतीय पद्धतीने होतं.

भारतीय पद्धतीने लग्न म्हणजे आपल्याला माहितीच आहे की, गाण्यांशिवाय पूर्ण होतच नाहीत.

लग्नाच्या सीन मध्ये साथीया सिनेमा मधील ‘छलका छलका रे’ हे गाणं आणि तक्षक सिनेमा मधील ‘मुझे रंग दे’ हे गाणं बॅकग्राऊंड ला वाजवून आलेल्या अतिथींना नाचवण्यात आलं आहे.

 

२.Ghost world मध्ये ‘जान पहचान हो’:

 

http://indianquarterly.com/

 

Ghost world (2001) नावाचा एका हॉलिवूड सिनेमा होता. या सिनेमाचं कथानक हे शाळेतील मुलांबद्दल आणि त्यांच्या एका नाटकाभोवती फिरणारं होतं.

या सिनेमा मध्ये स्कारलेट जॉन्सन यांनी काम केलं होतं. या सिनेमाच्या सुरवातीला ‘जान पहचान हो’ हे आपल्या हिंदी सिनेमा ‘गुमनाम’ मधील गाणं वापरण्यात आलं आहे.

हे गाणं हॉलिवूडच्या पेक्षकांना सुद्धा तितकंच भावलं होतं.

 

३. ‘लॉर्ड ऑफ वॉर’ मध्ये ‘बॉम्बे थीम’:

 

https://in.bookmyshow.com/

 

निकोलस केज यांच्या ‘लॉर्ड ऑफ वॉर’ (२००५) या सिनेमा मध्ये ‘बॉम्बे’ या हिंदी सिनेमाची थीम वापरण्यात आली होती.

ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं सिनेमामध्ये अगदी महत्वपूर्ण ठिकाणी येतं आणि त्या थीम मुळे तो सीन आणि तो सिनेमा प्रेक्षकांच्या मनाजवळ पोहोचतो.

ह्या ट्युन मध्ये कोणताही गाण्याचा शब्द वापरण्यात आलेला नाहीये. असं असूनही जेव्हा कोणताही भारतीय प्रेक्षक हा सिनेमा बघेल त्याला सिनेमातील ही ट्युन, त्याची सिनेमातील महत्व आनंद दिल्याशिवाय राहणार नाही.

 

४. ‘Moulin Rouge’ मध्ये ‘छम्मा छम्मा’:

 

https://www.bustle.com/

 

‘चायना गेट’ या हिंदी सिनेमा मधील हे गाणं खूप हिट झालं होतं. उर्मिला मातोंडकर ने या गाण्यात केलेला डान्स आणि गाण्याचं music यामुळे प्रेक्षकांनी हे गाणं अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं.

‘Moulin Rouge’ (2001) या सिनेमात हे गाणं वापरण्यात आलं होतं. या सिनेमाचं कथानक हे एक कवी आणि एक डान्सर यांच्यातील प्रेमकहाणी आहे. हा पूर्ण सिनेमा हा संगीतावर आधारित आहे.

भारतीय प्रेक्षक जेव्हा हा सिनेमा बघतात आणि त्यातील डान्सर अचानक ‘छम्मा छम्मा’ या गाण्यावर थिरकू लागते तेव्हा त्यांना प्रचंड आनंद होतो.

 

५. ‘You Don’t Mess with Zohan’ मध्ये ‘Jimmy Jimmy’:

 

youtube.com

 

बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलेलं ‘जिमी जिमी’ हे गाणं ‘डिस्को डान्सर’ या सिनेमामध्ये मिथुन चक्रवर्ती यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं.

हे गाणं Adam Sandler या हिरो च्या ‘You Don’t Mess with Zohan’ ह्या सिनेमा मध्ये एका फायटिंग च्या दरम्यान वापरण्यात आलं आहे.

त्यावेळी हिरो काही गुंडांसोबत फायटिंग करत असतो. तेव्हा गाणं वाजतं आणि हास्यफवारे निर्माण होतात. हा सीन इतका कॉमिक आहे की सिनेमा बघणारा कोणीही हा सीन आणि हे गाणं विसरू शकत नाही.

 

६. ‘Inside Man’ मध्ये ‘छइय्या छइय्या’:

ए. आर. रहमान यांचं एक गाणं ‘दिल से’ सिनेमा मध्ये शाहरुख खान आणि मलायका अरोरा वर चित्रित करण्यात आलं होतं. उत्कृष्ट संगीत आणि रेल्वे टपावरील चित्रीकरणामुळे हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं.

 

https://www.thenewsminute.com/

 

ही लोकप्रियता लक्षात घेऊन हॉलिवूड चा सिनेमा ‘Inside Man’ (२००६) या सिनेमा मध्ये हे गाणं वापरण्यात आलं आहे. निकोलस केज हे या सिनेमाचे हिरो आहेत.

सिनेमाच्या सुरुवातीला असलेल्या निकोलस केज यांच्या डायलॉग नंतर लगेच हे गाणं आहे. हे गाणं इतकं छान वाटतं की प्रेक्षकाला हे गाणं सुरू असताना त्यांच्या जागेवर उठून नाचावंसं वाटतं.

 

७.’डेडपूल’ मध्ये ‘मेरा जुता है जापानी’:

 

https://www.imdb.com/

 

भारतीय सिनेमा माहीत असलेल्या कोणत्या व्यक्तीला हे गाणं माहीत नाहीये असं होऊच शकत नाही. इतकं हे राज कपूर यांच्यावर चित्रित केलेलं गाणं आजही लोकप्रिय आहे.

‘डेडपूल’ (२०१६) या हॉलिवूड च्या सिनेमा मध्ये डेडपूल हे पात्र भिपेंदर यांच्या टॅक्सी मध्ये शिरतं, तेव्हा त्या टॅक्सी च्या रेडिओ वर ‘मेरा जुता है जापानी’ हे गाणं लागतं आणि भारतीय प्रेक्षक खूप सुखावतो.

एका प्रेक्षकाने तर अशी सुद्धा प्रतिक्रिया नोंदवली आहे की त्याला ह्या सीन मुळे हा सिनेमा जास्त आवडला आणि लक्षात राहिला होता.

त्यामुळे भारतीय संगीतकारांनी हॉलीवूडलाही आपल्या मोहात पाडलंय हेच खरं!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version