Site icon InMarathi

ए.सीच्या आल्हाददायक गारव्याचा आनंद लुटताना “ह्या” गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका

ac effects inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आला उन्हाळा तब्येत सांभाळा. पूर्वी उन्हाळा सुरू होणार म्हटलं की रस्त्यावर माठ विकायला येत. वाळ्याचं, मोगऱ्याचं सुगंधी पाणी मिळावं म्हणून माठात वाळा, मोगऱ्याची फुलं टाकतं.

मुलं‌ नदीवर विहीरीवर फिरायला जात. पंखे, फार फार तर कूलर वापरायला सुरुवात होई. अती उन्हाळा असणाऱ्या ठिकाणी वाळ्याचे पडदे लावून घेतले जात.

त्यावर पाणी मारुन ठेवत त्यामुळं येणारी हवा थोडासा थंडावा आणि वाळ्याचा सुगंध घेऊन यायची. वाळ्याचं सरबत, कैरीचं पन्हं, माठातलं पाणी अशा नैसर्गिक गोष्टींनी उन्हाळा सुसह्य केला जायचा.

पण दिवस बदलले… ‌पंखा, वाळ्याचे पडदे यांची जागा ए.सी ने घेतली.‌ उन्हाळ्यात सुध्दा हिवाळ्याचा थंडावा देणारे ए.सी खूप ठिकाणी वापरले जाऊ लागले.

==

हे ही वाचा : उन्हाळा आला, म्हणजे AC तर हवाच… नवा AC घेण्याआधी या गोष्टी माहित आहेत का?

==

 

जेव्हा बाहेरचे तापमान ४० अंश इतके जास्त वाढते तेव्हा एसी ही चैन नाही तर गरज ठरते. कारमध्ये ए.सी, आॅफीसमध्ये, घरी, बेडरुममध्येपण.

तुम्हाला हे माहित आहे का.. सतत ए.सीत राहील्याने आपल्या शरीरावर त्याचे काय दुष्परिणाम होतात? नाही??? मग वाचा हा लेख.

 

१. डोळ्यांचे विकार-

 

सतत ए.सीच्या गारव्यात राहील्यास त्याचा परिणाम डोळ्यांवर होतो. डोळे कोरडे होणं, डोळे जळजळणं, हा त्रास होऊ शकतो. त्याचा परिणाम म्हणून दृष्टी मंदावते.

म्हणून दीर्घकाळ ए.सीत राहणे टाळा. थोडावेळ एसी बंद करा. खिडक्या उघडा. किंवा दहा मिनिटे पाय मोकळे करायला जाऊन या पण जास्तवेळ सतत ए.सीत बसू नका.

२. डिहायड्रेशन-

डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाणी कमी होणे. उन्हाळ्यात घाम येऊन शरीरातील क्षार बाहेर फेकले जातात. ती कमतरता भरुन काढण्याची सोय निसर्गाने शरीरातच केली आहे.

आपल्याला तहान लागते. मग आवश्यक तेवढं पाणी पिऊन शरीर ती कमतरता भरुन काढणे ज्यामुळे आपल्या शरीराचा नैसर्गिक तोल सांभाळायची यंत्रणा निसर्गाने ठेवलेली आहे.

 

 

पण सतत एसीत राहील्याने घाम येतच नाही. मग तहान कशी लागेल? स्वाभाविकच पाणी कमी लागते. म्हणजेच पाण्याची कमतरता येते.

त्याचा परिणाम म्हणून सतत घशाला कोरड पडणे, अंग दुखणे, डोकेदुखी, चक्कर येणे अशी लक्षणे दिसतात. हा सतत ए.सीत राहील्याचा परिणाम आहे. म्हणून काही वेळ एसी बंद करा.

 

३. डोकेदुखी-

 

ए.सीमध्ये राहील्याने होणारा हा आणखी एक त्रास.

शरीरात असणाऱ्या उष्णतेचा आणि ए.सी असलेल्या खोलीतील तापमानाचा तोल सांभाळायला शरीराला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे डोकेदुखी उद्भवू शकते.

डिहायड्रेशन हे ही एक कारण आहे. सतत ए.सीत बसणाऱ्या लोकांना अर्धशिशीचा त्रासही संभवतो.

 

४. विविध रोगांचे संक्रमण-

 

==

हे ही वाचा : झोपण्यापूर्वीच्या या साध्या-सोप्या सवयी मिळवून देतील सर्वांगसुंदर, निरोगी शरीर! वाचा

==

सतत ए.सीत राहील्याने शरीराला रोगांचे संक्रमण होण्याचा धोकाही वाढतो. नाकाची जागा कोरडी पडते. त्यामुळे जो म्युकस स्त्राव नाकाची अंतस्त्वचा ओली ठेवून जंतू संसर्ग टाळायचं काम करत असतो तोच आपण थांबवतो.

म्हणूनच ए.सीत काम करणाऱ्या लोकांना कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावते.

 

५. श्वसनाचे विकार-

 

सतत ए.सीत राहील्याने श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असते. नाकाचे आणि घशाचे कार्य ए.सीमुळे बिघडते.

नाकातील त्वचेला श्लेष्मल आवरण असे म्हणतात. याचे काम संसर्ग रोखणे असतं पण ए.सीत राहील्याने हे आवरण कोरडे पडून श्वास घेण्यासाठी त्रास होणं, दम लागणं असे त्रास संभवतात.

 

६. कोरडी त्वचा-

 

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्वचा कोरडी पडते. कारण उन्हाळ्यात तापमान जास्त असते. आपल्याला घाम येऊन शरीरातील क्षार बाहेर पडतात.

तहान लागली की आपण पाणी पितो आणि हा समतोल साधला जातो. पण एसीत राहील्याने घामच येत नाही मग शरीरातील अनावश्यक घटक जे घामावाटे बाहेर पडत होते ते साठून राहतात.

मग त्वचा कोरडी पडणे, खाज सुटणे हे त्रास चालू होतात. त्वचेचे पापुद्रे निघतात. डोक्यात कोंडा होणे केसांची गळती हे त्रास एसीनेच होतात.

 

 

जास्त केस गळणं, टक्कल पडणं, कोंड्याचा प्रादुर्भाव होऊन चेहऱ्यावर पुरळ येणे हे साखळीसारखं सुरुच होतं. म्हणजे त्वचेचा पोत, केसांची हानी ही ए.सीचचीच देणं आहे.

 

७. सुस्तपणा-

 

सतत ए.सीत काम करणाऱ्या लोकांना एक प्रकारची सुस्ती येते. जडत्व येते. त्यामुळे कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होतो. वजन वाढणं, इतर रोग होतं हे पण या एसीच्या सतत वापरानंच होतं.

जरा विचार करा आणि सांगा ज्या कार्यालयात असे सुस्त आणि आजाराची लक्षणे बाळगणारे कर्मचारी असतील तिथं कामं कशी होतील?

 

८. दमा आणि अॅलर्जी-

 

 

सतत ए.सीत राहील्याने श्वसनाचे विकार बळावतात. नाकातील श्लेष्मल आवरण कोरडे पडून जंतूसंसर्ग होण्याचा संभव असतो त्याचबरोबरीने विविध प्रकारच्या अॅलर्जीचा संभवही असतो.

ए.सी वेळोवेळी स्वच्छ करावा लागतो. अन्यथा त्याची मोठी किंमत मोजावी लागते.

 

९. इतर आजारांचा धोका-

 

==

हे ही वाचा : अमेरिकेतील पंख्यांना ४ तर भारतातील पंख्यांना ३ पाती, असं का? समजून घ्या

==

ए.सीमध्ये होणारी गळती ही फार धोकादायक ठरू शकते. या गळतीमुळे तुम्ही कोणत्याही रोगजंतूशी थेट संपर्कात येता. तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल तर संक्रमणाचा धोकाही वाढतो.

म्हणूनच एसीत ठराविक काळानंतर स्वच्छ करुन घेणं गरजेचं आहे. त्यात असणाऱ्या पाण्यामुळे इतरही अनेक रोगांची शक्यता वाढते.

थोडक्यात काय तर आपण निसर्गाच्या विरोधात ज्या गोष्टी करतो त्याची शिक्षा या ना त्या प्रकारे आपल्याला मिळते. पूर्वी उन्हाळा नव्हता का? उकडत नव्हतं का? पण तरीही माणूस जे काही उपचार किंवा उपयोग करायचा ते नैसर्गिक मार्गाने करायचा.

जितक्या सुखसोयी उपलब्ध झाल्या तितकी नैसर्गिक स्त्रोत वापरण्याची पद्धत मोडीत निघू लागली. आणि मानवी जीवन विविध रोगांचे आगर बनू पहात आहे.

ए.सीमुळे गारवा मिळतो. तो तात्पुरता सुखदही असतो, पण सतत ए.सी वापरल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, केसांच्या त्वचेच्या समस्या निर्माण होणं, श्वसनाचे विकार होणं, डोळ्यांच्या तक्रारी , सुस्ती, जडपणा अशी विविध प्रकारची लक्षणंही दिसू लागतात.

नैसर्गिक स्त्रोत वापरण्याची गरज माणूस विसरतच चालला आहे. जी लक्षणं शरीरात म्हातारपणी दिसायची ती लक्षणं ऐन तारुण्यात दिसून येत आहेत. म्हणून निसर्गाने ठेवलेली जी रचना आहे त्यानुसार आहार विहार असेल तर हे त्रास कमी होतील.

अगदीच शक्य नाही झाले तर अधूनमधून ए.सी बंद करा.. खिडक्या उघडा नैसर्गिक हवा खेळती राहू द्या किंवा तुम्ही थोडावेळ ए.सीतून बाहेर जा. पण सतत एसीत राहील्याने होणारे विकार टाळण्यासाठी प्रयत्न करा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version