Site icon InMarathi

जगात सर्वांच्या बुद्धीचा कस लावणारं ‘बुद्धिबळ’ भारतात कसं जन्मलं याची रोचक कहाणी…

chess featured inmarathi

threader.app

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लॉकडाउन मुळे बरेचसे लोकं घरीच कैद झालेत. आपसूकच वेळ घालवण्यासाठी बऱ्याच बैठ्या खेळांचा आधार कामी आलाय.

साप-शिडी, कॅरम, पत्ते, ल्युडो, बुद्धिबळ सारख्या खेळाच्या साह्याने लोकं घरात बसून स्वतःचं मनोरंजन करून घेत आहेत.यातले बरेच खेळ ऑनलाइन सुद्धा खेळता येतात.

जरी एकटे असाल तरी हे गेम्स मोबाइल वर डाउनलोड करून तुम्ही बाकी लोकांसोबत खेळू शकता. यातले बरेच खेळ कित्येक शतकांपासून आपल्या देशात प्रसिद्ध आहेत.

बुद्धिबळ चा पट मांडुन तासंतास खेळण्याची मजा तुम्ही नक्कीच घेतली असेल. ८x८ च्या ६४ पांढऱ्या- काळ्या बोर्ड वर दोन्ही बाजू कडचे २०-२० सैन्य.

जो समोरच्या साम्राज्याच्या राजाला कैद करेल तो जिंकला!

 

newindiaexpress.com

 

बुद्धिबळ किंवा चेस चा गेम हा शेकडो वर्षांपासून खेळला जातो. अभिमानाची गोष्ट म्हणजे बुद्धिबळाचा शोध भारतातच लागला होता. ह्याच्या निर्मितीची कथा खूप रंजक आहे.

बुद्धिबळाचा भारतीय इतिहास :

जगप्रसिद्ध चेस म्हणजेच बुद्धिबळाचा खेळ पुरातन काळापासून खेळला जातोय. या खेळाची पाळे-मुळे बऱ्याच खंडांत विखुरली आहेत.

इतके नियम असलेला हा खेळ कोणी एका व्यक्तीने शोधल्याची शक्यता जवळपास अशक्यच! या खेळाचा अनेक व्यक्तींकडून बदल करण्यात आला असावा यावर जगातील बहुतांश संशोधकांच एकमत आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

तरीही बुद्धिबळाचं मूळ हे भारतातलं आहे. साधारण सहाव्या शतकात भारतात शिहरम राजा होऊन गेला. तो आपल्या राज्यातील प्रजेवर जुलूम,धाक- दडपशाहीने नियंत्रण ठेऊन होता.

त्याच्या राज्यातली जनता त्याला प्रचंड त्रासली होती.त्या काळात राज्यातील एका विद्वान व्यक्तीने ‘चतुरंग’ नावाचा खेळ तयार केला. एके दिवशी खेळ घेऊन तो शिहरम राजाकडे गेला.

राजाला त्याने खेळ दाखवून त्याचे नियम समजावून सांगितले आणि हा खेळ खेळण्याची विनंती केली. राजा जरी लहरी असला तरी बुद्धिमान होता. त्याला हा खेळ प्रचंड आवडला.

 

quora.com

 

राजा, राणी आणि बाकी सैन्य असा लवाजमा बुद्धीबळाच्या दोन्ही बाजूला असायचा. जो दुसऱ्याच्या राजाला अगोदर मारेल तो जिंकला!

हा खेळ बनवण्याचा मुख्य उद्देश हा शिहरम राजाला, राज्यातील प्रत्येक सामान्य व्यक्तीचं महत्व पटवून देणं हाच होता. एक सामान्य सैनिकी प्यादा सुद्धा दुसऱ्या राज्यात घुसून धुमाकूळ घालू शकतो.

पण सर्व शक्तिमान राजा एकट्याने केवळ एकच घर चालू शकतो! राजाला हा खेळ प्रचंड आवडला.

राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत हा खेळ जावा आणि त्यांनी तो खेळावा अशी राजाची इच्छा होती. त्या विद्वान व्यक्ती वर खुश होऊन त्याला आपल्या खजिनाच्या दालनात घेऊन गेला.

संपूर्ण खजिना त्याला दाखवून राजा त्याला म्हणाला,

“हे विद्वान, आपल्याला हवं तेवढं धन आपण मागू शकता. मी आपल्या बुद्धिमत्तेवर प्रचंड खुश आहे!”

तो विद्वान व्यक्ती त्यावर म्हणाला,

“हे, राजन. मला हे धन ,सोनं, संपत्ती नको. मी सामान्य माणूस ,पोटाची खळगी भरणं हेच माझं उद्दिष्ट. कृपया आपण मला धान्य द्यावं!”

ते ऐकून राजा चिडला, त्याला वाटलं तो विद्वान व्यक्ती त्याचा अपमान करत आहे. राज्याचा सबंध खजीना ज्यावर आपण ओतायला तयार होतोय तो मागून मागून काय मागतोय तर फक्त धान्य!

राजा चिडून त्याला म्हणाला”आपण माझा अपमान करत आहात का?”

तेव्हा तो विद्वान म्हणतो  “नाही महाराज. मला खरच धान्याची गरज आहे. कृपया आपण माझ्या इच्छे चा मान ठेऊन मला या बुद्धिबळ खेळाचे जेवढे चौकट आहेत.

त्यातल्या पहिल्या चौकटी वर १ दाणा, दुसऱ्यावर पहिल्या पेक्षा दुप्पट या प्रकारे संपुर्ण ६४ चौकटीत येईल एवढं धान्य देण्याची कृपया करावी!”

habr.com

 

राजाने त्याच्या सेवकांना त्या विद्वान व्यक्तीची ही मागणी पूर्ण करण्याची आज्ञा दिली.

राजाच्या सैनिकांनी सगळं धान्य कोठार खाली केलं तरी तेवढ्या संख्येइतकं धान्य मिळालं नाही.

राज्यातून सगळं धान्य मागवण्यात आलं पण ते सुद्धा कमी पडलं. नंतर राजाला लक्षात आलं की ‘कुठल्याही लहान गोष्टीला कमी लेखू नये’. हा दुसरा धडा या विद्वान व्यक्तीने आपल्याला दिला आहे.

एक संशोधक एच.जे.आर.मुरे यांनी १९१३ मधे ‘A history of chess’ या आपल्या पुस्तकात बुद्धिबळाच्या इतिहासाचा उल्लेख केला आहे. उत्तर भारतात याचा शोध लागला.

तेव्हा या खेळाला ‘चतुरंग’ म्हणून संबोधलं जायचं. पुढे हा खेळ पर्शिया पर्यंत पोचला तिथे याला ‘चतरंग’ नाव पडलं.

पुढे मुघलांनी जेव्हा पर्शिया वर आक्रमण करून राज्य ताब्यात घेतलं तेव्हा मुघलांमध्ये सुद्धा हा खेळ प्रसिद्ध झाला आणि त्यांनी याच नामकरण ‘शतरंज’ केलं!

आज ही हिंदी मध्ये बुद्धिबळ ‘शतरंज’ नावाने प्रसिद्ध आहे! पुढे मुघलांकडुन संपूर्ण आशिया खंडात या खेळाचा प्रसार झाला!

 

theprint.in

 

चीन मधले बुद्धिबळाचे मूळ :

बहुतांश संशोधक बुद्धिबळाचा शोध भारतात लागला या मताचे आहेत मात्र काही चिनी संशोधकांनी ‘चेस’ हा चीन मधे तयार झाल्याचा दावा करतात.

त्यांच्या म्हणण्यानुसार ख्रिस्तपूर्व इसवी सन २०० मधे कमांडर ह्यांन शिन ने युद्धाची प्रतिकृती असलेल्या खेळाची निर्मिती केली.

याच काळात चीन मध्ये इतिहासातील मोठी लढाई झाली आणि हा खेळ विस्मृतीत गेला. नंतर सातव्या शतकात हा खेळ नवीन नियम घेऊन पुन्हा प्रकाशात आला.

त्या वेळेस हा खेळ XiangQi या नावाने चीन देशात प्रसिद्ध झाला. या शब्दाचा अर्थ होतो ‘हत्तीचा खेळ’.

पूर्वीच्या युध्दांमध्ये हत्तीचा वापर होत असल्याने त्याच्याशी या खेळाचा संबंध जोडला गेला! परंतु आज माहीत असलेला बुद्धिबळ किंवा चेस सोबत या खेळाची कुठलीच समानता नव्हती.

 

orientaloutpost.com

 

या खेळात पूर्ण वेगळाच चेस बोर्ड होता. सोंगट्या पण वेगळ्या होत्या आणि खेळाचे नियम सुद्धा वेगळे होते!

चिनी संशोधकांच्या मते हाच खेळ पुढे भारतात गेला तिथे त्याचा विकास होऊन मग पर्शिया मार्गे तो जगभरात पसरला!

चेस चा रोमँटिक काळ ते डिजिटल युगापर्यंत प्रवास :

पुढे पर्शियातून युरोप मधे बुद्धिबळाचा प्रसार झाला. पंधराव्या शतकापर्यंत बरेच बदल होत गेले. नवनवीन नियम तयार केले गेले. प्रत्येक वेळेस या नियमांवर चर्च च नियंत्रण होतं.

या खेळाचे नियम ,प्रतिबंध किंवा बदल हे चर्च तर्फे ठरवण्यात यायचे. १८८० पर्यंत बुद्धिबळाचा विकास आता प्रचलित असलेल्या खेळा पर्यंत झाला.

या सगळ्या कालखंडाला ‘चेस चा रोमँटिक काळ’ संबोधण्यात येतं. या नंतर संपुर्ण जगात बुद्धिबळ लोकप्रियता कमावत गेला. खेळाच्या वेगवेगळ्या डावपेचावर निबंध लिहिण्यात आले.

चेस मधल्या डावपेचांवर ,त्यातल्या प्रत्येक सैनिकाच्या (सोंगट्याच्या) शक्ती बद्दल बरंच लिखाण केलं गेलं. खेळ जिंकण्याच्या अनेक पद्धती शोधण्यात आल्या.

 

youtube.com

बुद्धिबळाच्या सामुदायिक स्पर्धा भरवण्यात येऊ लागल्या.

पहिली अधिकृत बुद्धिबळ जागतिक स्पर्धेचं आयोजन १८८६ ला करण्यात आलं. या स्पर्धेत विल्हेम स्टेनिझ हा पहिला विजेता ठरला!

२० व्या शतकाच्या मध्यापर्यंत बुद्धिबळाचे खेळाडू स्पर्धा जिंकण्यासाठी पूर्वीच्या डावपेचावर आणि परिस्थितीजन्य निर्णयावर अवलंबून होते. त्या नंतर च्या काळात चेस चा प्रगत अवतार झाला!

डेटाबेस, चेस इंजिन आणि बऱ्याच बाकी पद्धतीने बुद्धिबळाचं रूपडं पालटून टाकलं!

चेस इंजिन च्या वेबसाईट ,मोबाईल अँप्स याने बुद्धिबळाच्या खेळासाठी पटाचा डाव मांडण्याची मक्तेदारी संपृष्ठात आली.

१० फेब्रुवारी १९९६ ला IBM निर्मित डीप ब्लू चेस इंजिन ने, तत्कालीन चेस चा जगज्जेता गॅरी कास्परोह ला हरवून जगभरात एकच खळबळ माजवून दिली.

जागतिक चेस मध्ये भारतीय :

 

livemint.com

 

विश्वनाथन आनंद हे नाव भारतीयांना माहीत आहेच. ते ५ वेळा बुद्धिबळाचे जागतिक विजेता ठरले आहेत. १९८८ ला ग्रँडमास्टर मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले!

राजीव गांधी खेळ रत्न अवॉर्ड आणि पद्म- विभूषण देऊन त्यांना गौरवण्यात आलं आहे. आजपर्यंत भारतात ६४ ग्रँडमास्टर झाले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version