लॅपटॉपवर डोळे रोखण्याचे परिणाम टाळा! आजपासूनच हे घरगुती उपाय कटाक्षाने पाळा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
हल्ली कामाचं स्वरूप वेगळं झालंय. बैठं काम वाढलं आहेच पण त्याबरोबरच निरनिराळ्या समस्या देखील उत्पन्न होत आहेत.
त्यात सध्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉप- मोबाईल यावरच काम अधिक असल्यामुळे डोळ्यांवर प्रचंड ताण येतोय. त्यामुळेच डोळ्याभोवती डार्क सर्कल्स वाढलेली आहेत.
खरंतर डार्क सर्कल्स वाढायचं कारण म्हणजे वयोमान, कोणत्यातरी गोष्टीची अलर्जी, उन्हात जास्त फिरणे आणि आपलं राहणीमान.
बऱ्याचदा आपली अवस्था ‘कळतं पण वळत नाही.’ अशी असते. म्हणजे रात्री जागरण करू नये, खूप काळ लॅपटॉप समोर बसू नये, अनहेल्दी फूड खाऊ नये हे सगळं माहित असून देखील आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.
“आजचा एकच दिवस रात्री मी सिनेमा बघेन”, “आज थोडं अनहेल्दी स्नॅक्स खाईन” अशा पळवाटा काढल्या जातात. आणि मग ही अशी डार्क सर्कल्स वाढत जातात.

स्त्रिया डार्क सर्कल्स लपवण्यासाठी मेकअपचा आधार घेतात परंतु तोही उपयोगाचा नसतो.
हे डार्क सर्कल्स कमी व्हायला हवीत त्यासाठीच काही उपाय करायला हवेत. आपल्या आहारातील पोषणमूल्य वाढवायला हवे. यासाठी कुठलीही ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
अगदी घरगुती, स्वयंपाक घरातील वस्तू वापरून देखील आपल्याला आपल्या डोळ्यांच्या खालच्या त्वचेची काळजी घेता येईल. घरी जे उपलब्ध असेल त्यानुसार याचा वापर करता येईल.
काकडी:

सगळ्यांनीच पाहिलं असेल की, एखाद्या सिनेमाच्या सीनमध्ये एखादी महिला चेहऱ्यावर लेप लावून डोळ्यावर काकडी ठेवून बसलेली असते. याचं कारण म्हणजे काकडीमुळे डोळ्याखालचा काळा झालेला भाग कमी होतो.
तसेच डोळ्याखालची त्वचा जर सैल झाली असेल, तर त्यालाही स्ट्रेंथनिंग मिळण्यास मदत होते.
याकरिता काकडीच्या दोन मोठ्या गोल स्लाइस करून त्या फ्रिजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवाव्यात आणि नंतर डोळ्यांवर ती ठेवून दहा मिनिटे स्वस्थ बसावे, नंतर चेहरा साध्या पाण्याने धुवून घ्यावा.
दिवसातून दोन वेळा असे केल्याने डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. खाण्याबरोबरच काकडीचा असाही उपयोग होतो.
टोमॅटो:

टोमॅटोमध्ये लायकोपेन नावाचा उपयुक्त घटक असतो, जो आपल्या हृदयासाठी, त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी आवश्यक असतो. त्यामुळे डोळ्याखालची त्वचा मऊ होते आणि काळी वर्तुळे नाहीशी होतात.
यासाठी टोमॅटोच्या फोडी डोळ्यांवर ठेवण्याबरोबरच, टोमॅटोचा रस आणि त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिक्स करून त्याच्यात कापूस बुडवून ते कापसाचे बोळे डोळ्यांवर पंधरा वीस मिनिटांसाठी ठेवल्याने डोळ्यांनाही आराम मिळतो.
नंतर डोळे साध्या पाण्याने धुवून घ्या. काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.
टी बॅग्स:

ग्रीन टी हा पिण्यासाठी जितका उपयोगी असतो इतकाच तो काळी वर्तुळे कमी करण्यासाठी देखील उपयोगी असतो कारण त्यामध्ये अधिक एंटीऑक्सीडेंट घटक असतात.
तसेच ग्रीन टी अँटीएजिंग साठी देखील उपयुक्त आहे. साध्या पाण्यामध्ये या टी बॅग बुडवून त्या अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवाव्यात.
नंतर बाहेर काढून त्या आपल्या डोळ्यांवर पंधरा ते वीस मिनिटांकरिता ठेवावीत नंतर चेहरा धुऊन घ्यावा. ज्यामुळे काळी वर्तुळ कमी होण्यास मदत होते.
बटाटे:

विटामिन सी मिळवण्याचा सगळ्यात चांगला स्त्रोत म्हणजे बटाटा. ज्यामुळे हेल्दी स्कीन मिळते.
डोळ्याखालचे डार्क सर्कल घालवण्यासाठी बटाटा किसून, त्यातील रस काढून त्यात कापूस बुडवून ते दहा मिनिटे डोळ्यावर ठेवावे आणि नंतर चेहरा धुऊन घ्यावा.
थंड दूध:
विटामिनच स्त्रोत असलेलं दूध देखील डोळ्याखालची वर्तुळे कमी करतं. तसेच चेहऱ्याची स्किन तरुण ठेवण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो.
त्यासाठी दुधामध्ये कापसाचे बोळे बुडवून दोन्ही डोळ्यांवरती पंधरा ते वीस मिनिटं करिता मिनिटं करिता ठेवावेत आणि नंतर चेहरा धुऊन घ्यावा.
डोळ्याखालची त्वचा देखील मऊ होते.
ऑरेंज ज्यूस:
व्हिटॅमिन ए आणि सी यांच्या गुणांनी परिपूर्ण असा ऑरेंज ज्यूस. ज्यामुळे डोळ्याखालील डार्क सर्कल कमी होतात.
त्यासाठी संत्र्याचा रस काढून त्यामध्ये एखाद-दुसरा थेंब ग्लिसरीन घालून ते मिक्स करून त्यामध्ये कापसाचा बोळा बुडवून डोळ्यांवरती ठेवल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो.
ग्लिसरीन मुळे डोळ्याखालील त्वचेलाही एक चकाकी येते. चेहरा नंतर साध्या पाण्याने धुवून घ्यावा.
हळद:

सगळ्यात नैसर्गिक अँटीऑक्सीडेंट असलेली हळद डोळ्याखालील काळी वर्तुळे नाहीशी करायलाही उपयोगी पडते.
अननसाच्या रसात किंवा लिंबाच्या रसात हळद मिक्स करून त्याचा लेप डोळ्याखाली लावावा.
दहा पंधरा मिनिटांनी कापूस ओला करून तो लेप काढून घ्यावा. डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात.
आहार:

डोळ्याखालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी आपला आहार देखील योग्य असला पाहिजे. आपल्या जेवणात ओमेगा युक्त माशांचा समावेश असावा. उदा. Salmn fish
त्याचबरोबर अक्रोड देखील उपयुक्त असतात.
तसेच डार्क चॉकलेट देखील आपल्या शरीरातील त्वचेसाठी उपयुक्त असतात. चवीला थोडीशी कडू असतात, पण योग्य प्रमाणात ते खाल्ल्यास त्याचा अपाय होणार नाही उलट झालाच तर फायदा होतो.
तसेच अल्कोहोल घेणे योग्य नाही.
आहारात मीठ जास्त असेल तर पाणी देखील जास्त प्यायलं पाहिजे, जेणेकरून त्वचा डीहायड्रेट होणार नाही, आणि ओढल्यासारखी दिसणार नाही.
जीवनशैली:
रोज व्यवस्थित झोप घेतली पाहिजे. दररोज किमान आठ तास झोपले पाहिजे. पाठीवर सरळ झोपले पाहिजे. पाठीवर झोपल्यामुळे डोळ्यांच्या एकाच बाजूला रक्त जमा होणार नाही व तो भाग काळा पडणार नाही.

व्यायाम प्राणायाम यांचा आपल्या शरीराला खूप उपयोग होतो, तसा डोळ्यांना देखील होतो. त्यामुळे कॉम्प्लेक्शन सुधारतं आणि त्वचा तरुण बनते.
उन्हामध्ये बाहेर जाताना चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन लोशन लावून जावे. जेणेकरून आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची हानी होणार नाही.
चेहऱ्यावर मेकअप केला असेल तर झोपण्यापूर्वी तो व्यवस्थित काढून टाकला पाहिजे.
डोळ्याखाली आणि चेहऱ्यावर दररोज मॉइश्चरायझर लावला पाहिजे.
अॅलर्जी:
एखाद्या वस्तूची ऍलर्जी असेल तर त्याबाबत योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला ही घ्यावा.
कुठल्यातरी जाहिरातीला भुलून कोणतीही क्रीम्स आणू नयेत आणि चेहऱ्याला किंवा डोळ्याखाली लावू नयेत. कारण प्रत्येकाच्या त्वचेचा पोत वेगळा असतो.
त्यासाठी डॉक्टरांना विचारूनच अशा गोष्टी कराव्यात.
===
सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.