Site icon InMarathi

“आज काय स्पेशल?”- “हे” वाचलंत तर रोज पडणाऱ्या या प्रश्नाचं ‘झटपट’ आणि ‘पौष्टिक’ उत्तर मिळेल

breakfast inmarathi.jpg 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लॉकडाऊन सुरु झालं तसं लोक घरी राहायला लागले. सुरवातीच्या काळात घरी बसून काय करायचं? म्हणून घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच वेगवेगळे प्रयोग करायला लागले.

या लॉकडाऊन मधला सगळ्यात हिट गेलेला प्रयोग म्हणजे घरोघरी ‘मास्टरशेफ’ तयार झाले.

निरनिराळ्या रेसिपीज करायचे आणि सोशल मीडियावर पोस्ट करायचे हा उद्योग बऱ्याच लोकांनी केला. त्यांचं बघून इतरांनाही प्रेरणा मिळायची आणि तेही रेसिपीज करायचे.

 

Indian women blog

 

पण हळूहळू लॉकडाऊनचा काळ वाढत चाललाय, तसा लोकांचा रेसिपी बनवण्याचा इंटरेस्टही आता कमी होतोय. लॉकडाऊन कधी थांबेल सांगू शकत नाही.

काही भागात बाहेर पडायला देखील बरीचशी बंधने आली आहेत. अशा वेळेस बाहेर जाऊन वस्तू आणणंही शक्य नाही. मग घरातल्याच वस्तू वापरून रोज रोज ब्रेकफास्टला काय बनवायचं? हा यक्षप्रश्नच घरातल्या गृहिणींना पडलेला असतो.

कारण घरातल्या प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. कुणाला पोहे आवडतात तर कोणाला उपमा.

अशा वेळेस सगळ्यांची आवड लक्षात घेऊन एखादा पदार्थ बनवणे आणि तोही कमी वेळात, आहे त्या गोष्टी वापरून, हा एक टास्कच सध्या गृहिणींसमोर आहे.

सकाळी उठल्यावर चांगला हेल्दी ब्रेकफास्ट करणं गरजेचं असतं. कारण रात्री झोपल्यामुळे आपल्या पोटात दहा-बारा तास तरी अन्न गेलेलं नसतं, म्हणूनच ब्रेकफास्ट करणं must असतं.

 

 

त्यासाठी काही सोप्या ब्रेकफास्ट रेसिपीज आपण आता पाहू.

भारत हा वेगवेगळ्या प्रदेशांनी बनलेला असल्यामुळे इथल्या खाण्यात देखील ती विविधता दिसून येते. दक्षिणेकडे इडली, डोसा, उत्तपे. तर उत्तरेत पराठे, बटाटा पुरी.

आपल्या महाराष्ट्रात उपमा, पोहे, थालीपीठ अशा गोष्टी बनवल्या जातात. त्याच सगळ्या गोष्टी थोडासा ट्विस्ट देऊन केल्या तर इंटरेस्टिंगही होतात आणि सगळ्यांना आवडूनही जातात.

१.  रवा इडली:

 

https://www.indianhealthyrecipes.com/

 

इडली बनवण्याची प्रोसेस सगळ्यांनाच माहिती आहे. आदल्या दिवशी तांदूळ, उडीद डाळ भिजवा, वाटा आणि परत ते रात्रभर ठेवून सकाळी इडली करा. यामध्ये वेळ खूप लागतो.

 म्हणून जर दह्यामध्ये रवा भिजवून तो पंधरा-वीस मिनिटं ठेवला आणि त्याच्या इडल्या करताना त्यात काही गाजर,सिमला मिरची सारख्या भाज्या घातल्या आणि इडल्या केल्या तर वेळही कमी लागतो आणि वेगळ्या प्रकारची इडली बनते.

याच पिठाचा उत्तप्पा ही बनवता येतो. त्यात कांदा वरून घालायचा.आणि आपल्या नेहमीच्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करायचा.

यामध्ये अजून एक ऑप्शन म्हणजे ओट्स वापरूनही अशा प्रकारची इडली करता येईल.

२. ओट्स चिल्ला:

 

youtube.com

 

हेल्दी नाश्त्याचा आणखीन एक प्रकार म्हणजे ओट्स चिल्ला. ओट्स दह्यात भिजवायचे आणि दहा मिनिटे झाकून ठेवायचे.

त्यात कांदा, मिरची, कोथिंबीर घालून त्याचे नॉनस्टिक पॅनवर चिल्ले बनवता येतात.

३. सुशीला:

 

https://cookpad.com/

 

पोहे खाण्याचा कंटाळा आला असेल तर पोह्यासारखाच हा वेगळा प्रकार बनवता येतो. फक्त यात पोह्यांच्या ऐवजी चुरमुरे घ्यावे लागतात.

तेही असेच पोह्यांचा सारखे भिजवून फोडणीत जिरे, मोहरी, कांदा, मिरची, पंढरपुरी डाळ, शेंगदाणे इत्यादी गोष्टी वापरून हा पदार्थ करता येईल.

४. मेथीचे मुटके:

 

https://www.spiceupthecurry.com/

 

एक वाटी ज्वारीच्या पिठात, स्वच्छ धुऊन चिरलेली अर्धी वाटी मेथीची भाजी मिक्स करून त्यामध्ये तिखट, मीठ,तीळ, ओवा हे पदार्थ घालून ते मळून घेऊन त्याचे मुटके करावेत आणि ते दहा ते बारा मिनिटे वाफवून घ्यावेत.

नंतर त्याचे तुकडे करून घ्यावेत. मग एका पॅनमध्ये त्याची फोडणी करावी त्यात जिरे,मोहरी, कढीपत्ता आणि हिंग घालावे आणि मुटके घालून फिरवून घ्यावे.

कमी तेलात आणि अत्यंत पौष्टिक असा हा ब्रेकफास्ट होतो. हेल्थ कॉन्शस लोकांसाठी हा योग्य ब्रेकफास्ट आहे.

५. कमी तेलातला मेदुवडा:

 

https://www.archanaskitchen.com/

 

काही काही जणांना सकाळी उठल्यानंतर तळलेले पदार्थ खायला नको वाटतं. त्यांच्यासाठी हा कमी तेलात होणारा मेदुवडा करून बघायला हरकत नाही.

त्यासाठी आदल्या रात्री उडदाची डाळ भिजत घालावी, सकाळी उठून ती वाटून घ्यावी.

पण कढाईत वडे न तळता आप्पेपात्रामध्ये थोड्याशा तेलात त्याचे आप्पे करावेत आणि सांबराबरोबर सर्व करावेत.

६. पोंगल राईस:

 

simplyrecipes.com

 

भारतात तांदळाच्या खिचडीचे वेगवेगळे प्रकार मिळतात. पोंगल राइस हा दक्षिण भारतात मिळणारा हा त्यातलाच एक प्रकार.

मसूर आणि तांदूळ यांच्यात वेगवेगळ्या भाज्या घालून केलेला भात अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी.

७. दलिया:

 

https://www.watscooking.com/

 

वेगवेगळ्या भाज्या घालून हा पदार्थ करता येतो. तसेच ज्याला गोड पदार्थ खायची आवड आहे त्यांच्यासाठी गूळ घालून देखील त्याची खीर करता येते.

त्यात दूध आणि तूप, ड्रायफ्रूट्स असल्यास ते घालून सर्व्ह केली तर अधिक हेल्दी होते.

८. मुग मसाला डोसा:

 

madhurasrecipe.com

 

यासाठी सालीच्या मुगाची डाळ नऊ -दहा तास भिजत घालावी. आणि नंतर वाटून घेऊन त्याचे डोसे बनवता येतात.

 मुलं जर पालक किंवा बीट खात नसतील तर आपल्या नेहमीच्या डोश्याच्या पिठात पालक प्युरी किंवा बिटाचा रस घालून त्याचे डोसे बनवावेत.

वर चीज घालून दिल्यास मुलांना त्याची रंगसंगती चांगली वाटते आणि ते तो पदार्थ आवडीने खातात.

९. फ्रँकी:

 

https://www.indianhealthyrecipes.com/

 

पोळीवर सॉस, इतर भाज्या आणि चीज घालून त्याचा रोल करून दिला तर मुलांबरोबरच घरातल्या इतरांनाही हा पदार्थ आवडून जाईल.

१०. पुरी भाजी:

 

https://www.vegrecipesofindia.com/

 

संपूर्ण भारतात खाल्ला जाणारा हा पदार्थ.

नाश्त्याच्या वेळेस पुरी भाजी खाल्ली की दुपारच्या जेवायला जेवणाला उशीर झाला तरी हरकत नसते. व्यवस्थित पोटभरीचा पदार्थ म्हणून हा कधीतरी करून बघायला हरकत नाही.

११. पराठे आणि थालीपीठ:

 

youtube.com

 

बटाट्याचे पराठे, मेथीचे पराठे, कोथिंबिरीचे पराठे, मेथीचे ठेपले यासोबतच आपले भाजणीचे थालीपीठ ही करता येतात. परंतु सध्या गिरण्या बंद असल्यामुळे भाजणीचे पीठ मिळणं कठीण होतं.

अशा वेळेस घरातीलच गहू ,ज्वारी ,तांदूळ आणि बेसन ही पीठं एकत्र करून त्यामध्ये घरातील पालक, मेथी, कांदा, टोमॅटो अशा भाज्या घालून तिखट, मीठ, तीळ घालून त्याचेही थालीपीठ करता येतील.

यामध्ये ज्वारीच्या पिठाचे प्रमाण जास्त घ्यावे.

तसेच कधीतरी रात्रीचा भात ऊरला असेल तर तो मिक्सरमध्ये वाटून घ्यावा त्यामध्ये किसलेला बटाटा, वाटलेली हिरवी मिरची, कोथिंबीर घालावी आणि मीठ घालून मिक्स करून त्याचे देखील थालीपीठ करावेत खूपच टेस्टी लागतील.

१२. अंड्याचा ब्रेकफास्ट:

 

 

 

नॉनव्हेजेटेरियन लोकांसाठी अंड्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाता येतील. अंड्यामध्ये उपयुक्त प्रोटिन्स अधिक असल्याने लहान मुलांना तरी अंडी दिली पाहिजेत.

त्यासाठी त्यांना वेगवेगळे पदार्थ करून देता येतील. ब्रेडच्या स्लाईस मधील थोडासा भाग वेगळ्या आकाराचा कापून काढून ब्रेड पॅनवर ठेवून त्या कापलेल्या भागात अंड फोडून घातल्यास एक वेगळ्याच प्रकारचं आम्लेट तयार होईल.

हे दिसायलाही आकर्षक होईल आणि मुले आनंदाने खातील. उकडलेली अंडी देखील वेगळ्या आकारात कापून देत येतील.

१३. स्क्रंबल्ड एग्ज:

 

 

अंडी, थोड दूध आणि चीज घालून केला जाणारा हा पदार्थ अत्यंत चविष्ट आणि लोकप्रिय आहे. ब्रेड बरोबर हा पदार्थ खाल्ला जातो.

१४. बनाना पॅनकेक:

 

medibank.com.au

 

केळी, कणीक, दूध आणि साखर घालून याचे पॅनकेक केले आणि सर्व्ह करताना वरून मध घातलं तर मुलं अत्यंत आवडीने हा पदार्थ खातात.

१५. सॅंडविच:

 

swiggy.com

 

व्हेज सँडविच हा सगळीकडे आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. हा घरातही करायला सोपा जातो. गाजर, टोमॅटो ,पालक, हिरवी चटणी, चीज आदी गोष्टी घालून हा पदार्थ करता येतो.

याशिवाय ज्या लोकांना वेस्टर्न ब्रेकफास्ट चालतो त्यांना ब्रेड बटर, ब्रेड टोस्ट, हाफ फ्राय एग आणि मफिंस हे पदार्थही ब्रेकफास्टसाठी करता येतील.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version