…आणि त्यांनी राज कपूरसाठी आपले दागिने विकले!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. बॉलीवूड सुद्धा या उक्तीला अपवाद नाहीये. आपण बघतो आता जोड्या रोज बनतात आणि ब्रेकअप सुद्धा तितक्याच वेगाने होतात.
कधी प्रेम न टिकण्याचं कारण हे हिरो ची व्यस्तता असते तर कधी तर कधी हेरॉईन चा अति महत्वाकांक्षी पणा.
बॉलीवूड ने काही यशस्वी लव्हस्टोरी सुद्धा पाहिल्या आहेत जसं की अजय देवगण – काजोल, रणवीर सिंग – दीपिका पदुकोण यांसारख्या.
काही अश्या सुद्धा लव्हस्टोरी बघितल्या ज्या की चर्चेत खूप होत्या पण लग्नापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत जसं की अक्षय कुमार – शिल्पा शेट्टी, अमिताभ – रेखा, राज कपूर – नर्गिस.

राज कपूर – नर्गिस ही जोडी जोडी सिनेरसिकांच्या मनावर राज्य करत होती. या जोडीने सोबत १६ सिनेमे केले आणि ते सगळेच सिनेमे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.
फक्त पडद्यावर नाही तर प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
या प्रेमाची तीव्रता इतकी होती की, नर्गिस ने राज कपूर वर असलेलं कर्ज फेडण्यासाठी स्वतःचे दागिने सुद्धा विकले होते.
कधी घडली होती ही घटना आणि कशी फुलली यांची प्रेमकहाणी एखाद्या सिनेमा प्रमाणे हे जाणून घेऊ या:

–
- राज कपूरने ‘कुरूप’ म्हणून हिणवलं; नाहीतर झीनतऐवजी या सिनेमात ‘दीदी’ दिसल्या असत्या!
- ‘कपूर अण्ड सन्स’ चे हे २७ दुर्मिळ B&W फोटो चित्रपटप्रेमींनी पहायलाच हवेत
–
नर्गिस ची कारकीर्द:
नर्गिस चं बालपणी चं नाव होतं फातिमा रशीद. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी तलाश-ए-हक या सिनेमा मध्ये बालकलाकार म्हणून पहिल्यांदा काम केलं.
नर्गिस यांना पहिला लीड रोल मिळाला तो १९४२ मध्ये ‘तमन्ना’ या सिनेमा मध्ये.
पण, लोकांच्या मनात नर्गिस ने घर केलं ते म्हणजे ‘मदर इंडिया’ या सिनेमा मधील अप्रतिम कामामुळे.
हा सिनेमाला ऑस्कर फिल्म अवॉर्ड मध्ये बेस्ट फॉरेन लँग्वेज कॅटेगरी मध्ये शेवटच्या पाच सिनेमांमध्ये नामांकन मिळालं होतं.
१९६८ मध्ये त्यांना बेस्ट ऍक्टरेस चं पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं.

भारताचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा पद्मश्री पुरस्कार दिलेल्या त्या पहिल्या अभिनेत्री आहेत आणि त्यांचं नाव हे राज्यसभा सदस्य होण्याच्या शर्यतीत सुद्धा होतं.
पहिली भेट :
राजकपूर त्यावेळचे यशस्वी हिरो आणि निर्माते सुद्धा होते. ते एका स्टुडिओ च्या शोधात होते.
त्यांना अशी माहिती मिळाली की नर्गिस यांची आई जद्दनबाई या ‘फेमस’ नावाच्या स्टुडिओ मध्ये शूटिंग करत होत्या. त्या स्टुडिओ मध्ये अद्ययावत सुविधा आहेत हे राज कपूर यांना माहीत होतं.
या स्टुडिओ बद्दल बोलण्यासाठी राज कपूर हे जद्दनबाई यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी जद्दनबाई या घरात नव्हत्या. नर्गिस यांनी दरवाजा उघडला.
त्या स्वयंपाकघरातून पळत आल्या होत्या जिथे की त्या पकोडे तळत होत्या. त्यांच्या गालाला बेसन चं पीठ लागलं होतं. राज कपूर यांना तो निरागस चेहरा पाहताक्षणी आवडला.
हे घडलं होतं १९४८ मध्ये जेव्हा नर्गिस या २० वर्षाच्या होत्या आणि तोपर्यंत त्यांनी ८ सिनेमात काम केलेलं होतं. राज कपूर हे त्यावेळी २२ वर्षांचे होते.

हा पूर्ण सीन ह्यांनी ‘बॉबी’ या सिनेमात ऋषी कपूर आणि डिंपल कापडिया वर चित्रित केला आहे.
पहिल्या भेटीत राज कपूर यांनी स्वतःची ओळख ही पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा अशी करून दिली होती. पण, नर्गिस ने त्यांना आधी सिनेमा मध्ये बघितलं होतं.
त्यानंतर ओळख वाढत गेली. त्यांनी पहिला सिनेमा एकत्र साईन केला त्याचं नाव होतं ‘आग’. प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडली.
पण, ज्यांना आवडणं आवश्यक होती त्या नर्गिस च्या आईला आणि पृथ्वीराज कपूर यांना ही जोडी प्रत्यक्ष आयुष्यासाठी अजिबात पटली नाही.
याच कारणामुळे काही दिवसा नंतर जद्दनबाई यांनी त्या दोघांनी एकत्र कुठेच आउटडोर शूटिंग साठी जाऊ नये असं त्यांनी जाहीर केलं.

याच कारणामुळे ‘बरसात’ सिनेमाचे जे सीन्स काशमीर मध्ये शूट करायचे होते ते निर्मात्याला खंडाळा आणि महाबळेश्वर ला शूट करावे लागले होते.
नर्गिस आणि राजकपूर या दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण, पृथ्वीराज कपूर यांचा तीव्र विरोध असल्याने ते दोघेही लग्न करू शकले नाही.
नर्गिस यांचं राज कपूर वर इतकं प्रेम होतं की,
त्यांच्या लग्नात येणाऱ्या अडथळ्यांना काही कायद्याच्या मार्गाने बाजूला करता येईल का हे बोलण्यासाठी नर्गिस यांनी तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांची भेट घेतली होती.
काही वर्षांनी राज कपूर यांनी ‘आवारा’ सिनेमाचं शूटिंग सुरू केलं. या सिनेमाचं एकूण बजेट होतं १२ लाख रुपये. राज कपूर हे त्या काळात त्यांच्या perfection साठी प्रसिद्ध होते.
त्यावेळी एका गाण्यासाठी त्यांनी ८ लाख रुपये खर्च केले आणि सिनेमा ओव्हरबजेट झाला.

–
- कपूर बंधूंकडे बघून आपल्याकडची भावकीतली भांडणं आठवतात…!!
- मेहमूदचा पडद्यावरील पराभव मन्नाडेंनी पर्सनली घेतला…
–
त्यावेळी नर्गिस यांनी स्वतःचे दागिने विकले आणि राज कपूर यांची मदत केली आणि सिनेमा पूर्ण केला. इतकंच नाही तर हा सिनेमा हिट होण्यासाठी नर्गिस यांनी पहिल्यांदा बिकीनी सीन सुद्धा दिला होता.
हा सिनेमा रशिया, चीन आणि अफ्रिका देशांमध्ये सुद्धा खूप गाजला होता.
वाद :
सारं काही अलबेल सुरू असताना वादाची ठिणगी पडली ती नर्गिस यांचा भाऊ अखतर हुसैन मुळे. त्यांचं असं म्हणणं होतं की,
राज कपूर हे फक्त हिरो केंद्रित सिनेमा तयार करत आहेत आणि त्यामुळे नर्गिस ही सिनेमा मध्ये कुठेच छाप पाडू शकत नाहीये. त्यांच्या भावाने नर्गिस यांना फीस वाढवण्यास सांगितले.
त्याच दरम्यान १९५४ मध्ये राज कपूर आणि नर्गिस दोघे मॉस्को ला एका सिनेमाच्या शूटिंग साठी गेले होते. तिथे या दोघांमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून प्रचंड वाद झाले.
नर्गिस या तिथून एकट्याच भारतात परत आल्या.

प्रोफेशनल कमिटमेंट चा मान ठेवत नर्गिस यांनी RK स्टुडिओ या बॅनर सोबत सुरू केलेल्या ‘जागते रहो’ या सिनेमाची शूटिंग पूर्ण केली.
तो या दोघांचा एकत्र म्हणून शेवटचा सिनेमा ठरला आणि ही प्रेमकहाणी इथेच अर्ध्यावर संपली.
१९५७ मध्ये नर्गिस यांनी महेबूब खान यांचा मदर इंडिया हा सिनेमा साईन केला. त्यामध्ये त्यांच्या सोबत सुनील दत्त हे हिरो म्हणून दिसणार होते.
ही गोष्ट त्यांनी राज कपूर यांना सांगितली सुद्धा नाही. मदर इंडिया च्या शूटिंग च्या दरम्यान सेट वर भीषण आग लागली होती.
या वेळी स्वतःच्या जीवाची काळजी न करता सुनील दत्त यांनी नर्गिस यांचा जीव वाचवला. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि १९५८ मध्ये त्या दोघांनी लग्न केलं.
या दोघांना तीन मुलं झाली. त्यांची नावं होती संजय, प्रिया आणि नम्रता.
कालांतराने नर्गिस यांना कॅन्सर झाला. अनेक वर्ष कॅन्सर सोबत लढल्यानंतर अखेर ३ मे १९८१ रोजी त्यांचं निधन झालं.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.