आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीयांना मुघल आणि ब्रिटीश या दोन्ही शासनांच्या राजवटीत अनेक अत्याचारांचा सामना करावा लागला. दोघांनीही “भारताचे अनिर्बंधपणे शोषण केले”.
सर्वांनाच माहीत आहे की मुघलांनी भारतात हजारो मंदिरे नष्ट केली. हिंदूंची अनेक श्रद्धास्थळे आक्रमकांच्या पाशवी कृत्याने नष्ट झाली.
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला आणि भारतभर जल्लोष झाला.
एकीकडे हा विजयाचा जल्लोष चालू होता, पण दुसरीकडे अगदी याच्या विरुद्ध जे चालू होतं ते थरकाप उडवणार होतं.
स्वातंत्र्याचा मुकुटमणी भारताच्या डोक्यावर चढवला न चढवला तेव्हाच भारताच्या छातीवर एक जखम भलभळत होती आणि तिने उग्र रुप धारण केले होते.
ती जखम म्हणजे भारताची फाळणी आणि त्यासोबत झालेल्या हजारो लाखो निरपराध नागरिकांच्या कत्तली. स्वातंत्र्याच्या लक्ष लक्ष उषकालीच या यातना भारताच्या वाट्याला याव्यात याउपर दुर्दैव कुठलं?
१९४७ मध्ये झालेल्या भारताच्या फाळणीनंतर मुस्लिमांचे पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले. ज्यात अनेक हिंदू मंदिरे होती.
फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये शेकडो मंदिरे नष्ट करण्यात आली. काही हिंदू मंदिर मशिद, हॉटेल किंवा ग्रंथालयांमध्ये रूपांतरित झाले.
तथापि, देशात अजूनही अनेक हिंदू देवतांचे मंदिरे आहेत.
हो! यावर विश्वास ठेवणे कठीण आहे परंतु हे सत्य आहे की पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र जो भारताचा एक भाग होता, त्या पाकिस्तानमध्ये आजही काही हिंदू मंदिरं आहेत.
आज आपण अशाच एका मंदिराविषयी या लेखातून माहिती मिळवणार आहोत!
नृसिंह अवतारात जिथे विष्णू प्रकट झाले ते प्रल्हादपुरी मंदिर चक्क पाकिस्तानात आहे. त्यामागचा इतिहास काय आहे तो आपण बघूया!
आपल्याला माहीत आहे की भगवान विष्णूंनी वाईट आणि दुराचारी वृत्ती वर विजय मिळविण्यासाठी दहा अवतार घेतले होते.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
त्यातील चौथा अवतार म्हणजे “नृसिंह अवतार”.
पृथ्वीवर जेव्हा हिरण्यकश्यपू राजाने सर्व विष्णू भक्तांवर अन्याय सुरू केला.
देवाचे नाव घेण्याला बंदी घातली आणि जो कोण घेईल त्याला शिक्षा देण्यास सुरुवात केली, तेव्हा भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपू चा वध केला.
हिरण्यकश्यपू च्या राज्याचं नाव होतं “कश्यपपुरी” म्हणजे आत्ताचे पाकिस्तानातील मुलतान.
मित्रांनो दर वर्षी वैशाख शुद्ध चतुर्दशी ला नृसिंह जयंती साजरी केली जाते. ह्या लेखात आज जाणून घेऊया नृसिंह जिथे प्रकट झाले होते त्या प्रल्हाद पुरी मंदिराबद्दल.
हिरण्यकश्यपू आणि नृसिंह अवतार :
कश्यपपुरी म्हणजे आत्ताच्या मुलतान चा राजा हिरण्यकश्यपू हा राक्षस कुळाचा होता. त्याने आपल्या राज्यातील सर्व देव भक्तांवर अनन्वित अत्याचार सुरू केले.
भगवान विष्णू चे नाव घेण्यास बंदी केली, नाव घेतल्यास शिक्षा देण्यास सुरुवात केली. या राजाला कयाधु ह्या त्याच्या बायको पासून प्रल्हाद नावाचा मुलगा होता जो विष्णू भक्त होता.
हा भक्त प्रल्हाद भगवान विष्णूचा निस्सीम भक्त होता, तो अहोरात्र विष्णूचे नामस्मरण करीत असल्याने राजाने त्याला कोठडित डांबून त्याच्यावर ही अत्याचार सुरू केले.
हिरण्यकश्यपू चा वर आणि वध :
हिरण्यकश्यपू ला असा वर होता की त्याला “पुरुष किंवा स्त्री, दिवसा किंवा रात्री, कुठल्याही शस्त्राने वा अस्त्राने, ना मनुष्य ना प्राणी, ना जमिनीवर ना आकाशात, न घरात न बाहेर असे कुणीही मारू शकणार नाही”
ह्या वराच्या बळावर त्याने अजून सगळया भक्तांचा छळ सुरू केला..
अश्या वेळी भगवान विष्णूंनी ना दिवसा ना रात्री तर तिन्ही सांजेला, घराच्या उंबरठ्यावर, आपल्या मांडीवर घेऊन आपल्या नखाने त्याचे पोट फाडून वध केला..
प्रल्हादपुरी मंदिर :
भक्त प्रल्हादाने तदनंतर कश्यपपुरीत प्रल्हादपुरी नृसिंह मंदिराची स्थापना केली. हे मंदिर आज च्या पाकिस्तानातील मुलतान मध्ये आहे.
हे मंदिर मुलतान किल्याच्या टोकावर असून ह्या मंदिराच्या शेजारी बहाउद्दीन झाकरिया यांची समाधी आहे.
इसवी सन १८१० ते १८३१ ह्या ब्रिटिश राजवटीच्या काळात ह्या भागात ह्या मंदिराचे शिखर वाढविण्याच्या वादातून अनेकदा हिंदू मुस्लिम दंगली झाल्या आणि अनेक वेळा या मंदिराची नासधूस करण्यात आली.
नंतर येथील हिंदूंनी पुन्हा वर्गणी काढून या मंदिराचा जीर्णोद्धार केला..
भारत पाकिस्तान फाळणी नंतर मुलतान मध्ये हिंदू औषधाला ही उरला नाही आणि त्यामुळे या मंदिराची देखभाल करायला ही कोणी राहिले नाही.
बाबरी चा पाडाव अन नंतरची दंगल :
सन १९९२ मध्ये जेव्हा भारतात बाबरी मशिदीचा पाडाव झाला अन त्यानंतर जातीय दंगली उसळल्या तेव्हा मुलतान मधील मुसलमानांनी ह्या मंदिराचा उरला सुरला भाग ही नष्ट केला.
आनंदाची गोष्ट म्हणजे १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बाबा नारायण दास बत्रा यांनी ओरिजिनल मूर्ती आपल्या सोबत भारतात आणली. ही मूर्ती हरिद्वार येथे ठेवल्या आहेत.
मित्रांनो अशी आहे ही नृसिंह अवतराबद्दल ची माहीती आपल्याला नक्कीच आवडली असेल!
तसं बघायला गेलं तर बलुचिस्तान मध्ये सुद्धा हिंगलाज माता मंदिर, कराची मध्ये पंचमुखी हनुमान मंदिर अशी काही हिंदू मंदिरं आहेत, जिथे सामान्य भारतीयाला जाणं तसं कठीण असलं तरी,
अशा मंदिरांत अनेक भाविक येत असतात असं तिथले लोकल गाईड सांगतात!
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.