आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
तूम्हे सब कुछ पता है ना माँ, मेरी माँ ।।
असं आपण लहानपणापासून ज्या व्यक्तीला म्हणतो ती आपली आई! आपल्या मनातलं ओळखणारी आपली आई!
कुठलाही हट्ट केला की तो पूर्ण होतो हा विश्वास ज्या व्यक्तीवर असतो ती व्यक्ती म्हणजे आई! लहानपणी सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे आई!
वेळोवेळी आपल्या तोंडात येणारं नाव म्हणजे आई! आपल्याला कुठलीही जखम झाली, मग ती शरीराची असेल नाहीतर मनाची, तरी आठवते ती आपली आईच!!
आई म्हणजे काय नाही, सांगा हो?! आपल्याला जगाची ओळख होते तिच्यामुळेच. आपण जगात येतो तिच्यामुळेच. मुलांसाठी आई काहीही करू शकते.
आपल्याला तर आपल्या हिरकणीची गोष्ट माहीतच आहे, मुलाच्या ओढीने रात्रीच्या अंधारात अवघड कडा ती उतरून गेली.
अशा आईचे उपकार कधीच कुणीही फेडू शकणार नाही. आणि हे आपणच नाही तर संपूर्ण जगानेच आईचं महत्व मान्य केले आहे.
म्हणूनच तर आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभर दरवर्षीच्या मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ‘मदर्स डे’ साजरा केला जातो.
खरंतर वर्षातले ३६५ दिवस हे आईला समर्पित करण्यासारखेच असतात.
तरीदेखील आईच्या नावाने एखादा दिवस संपूर्ण जगभर मनवला जावा, साजरा केला जावा म्हणून दरवर्षीच्या मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो.
त्यादिवशी आपण कसे, मदर्स डे हा फेसबुक,व्हाट्सअप, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर आपल्याबरोबर आईचा फोटो, आणि हॅपी मदर्स डे यावर एक दोन चार ओळी खरडल्या की मदर्स डे साजरा केला असं समजतो!
आता लॉक डाऊन आहे म्हणून, नाहीतर त्या दिवशी मॉलमध्ये आईला घेऊन काहीतरी खरेदी आणि एखाद्या हॉटेलात जेवण! असं मस्त शेड्युल आपल्या मदर्स डे चं असतं. अर्थात यात वाईट काहीच नाही.
तर काहीकाही जण तोंड वेंगाडून,’ ही कसली थेरं? हे पाश्चिमात्य देशातलं फॅड आहे. आम्ही जीवनात आईला खूपच महत्त्व देतो. आम्हाला हा दिवस साजरा करायची गरज नाही,’
असं म्हणून दुर्लक्ष करतात. भारतात या दोन्ही प्रकारची लोकं पाहायला मिळतात.
यापैकी कुणालाही मदर्स डे का साजरा केला जातो? त्याचा इतिहास काय आहे हे माहीत नसतं. ही कल्पना नेमकी कुणाची असेल आणि कधीपासून हा दिवस साजरा केला जातोय हे माहीत नसतं.
तसं पाहिलं तर १९०० च्या सुरुवातीलाच मदर्स डे हा अमेरिकेत चालू झाला.
अमेरिकेत सिव्हिल वॉर चालू व्हायच्या आधी ‘रिव्हीस जर्विस’ या महिलेने व्हर्जिनिया प्रांतात ‘मदर्स डे वर्क क्लब’ असा एक क्लब स्थापन केला.
ज्यामध्ये मातांनी आपल्या मुलांची काळजी कशी घेतली पाहिजे याचं प्रशिक्षण तिथल्या बायकांना द्यायला सुरुवात केली. आणि मग जागोजागी असे अनेक क्लब सुरू झाले.
तिच्याबरोबर ‘जुलिया वॉर्ड हावे’ देखील कार्यरत होती.
नंतर अमेरिकेत सिव्हिल वॉर सुरू झालं, गृहयुद्धाचा भडका उडाला. हे थांबवण्यासाठी देखील परत सगळ्या माताच एकत्र आल्या.
देशातलं सिव्हिल वॉर थांबावं आणि सलोखा निर्माण व्हावा या मातांची एकत्रित शक्ती काम करू लागली.
अमेरिकेतलं सिव्हिल वॉर थांबलं परंतु मदर्स क्लब मात्र चालूच होतं . त्यांचं कामही सुरू होतं.
म्हणूनच या सगळ्या मातांसाठी असा एखादा दिवस असावा अशी कल्पना ऍना जर्विस या रिव्हिस जार्विस यांच्या मुलीच्या कल्पनेतून आली.
ऍना जर्विस आपल्या आईचं काम पहात होती, तिच्या सोबत असणाऱ्या सगळ्या या मातांचं कामही ती पहात होती. या सगळ्या मातांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जावी इतकीच तिची इच्छा होती.
१९०५ ला तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिला ते जास्त जाणवायला लागलं. तिचं तिच्या आईवर खूप प्रेम होतं. स्वतः ऍनाने लग्नही केलं नाही.
आईच काम ती पुढे चालवत होती. मी १९०८ मध्ये फिलाडेल्फिया मध्ये मधील एका डिपार्टमेंटल स्टोअरचे मालक जॉन वनामेकर यांनी ऍनाच्या मदर्स क्लबला आर्थिक मदत केली.
तेंव्हा तिने पहिल्यांदा मदर्स डे सेलिब्रेशन केलं. वेस्ट व्हर्जिनिया मधील ग्राफ्टन येथील एका चर्चमध्ये पहिल्यांदा मदर्स डे साजरा करण्यात आला.
वनामेकर यांच्या मालकीच्या डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये देखील त्यादिवशी ‘मदर डे’ चा इव्हेंट करण्यात आला ज्याला अनेक लोकांनी उपस्थिती लावली.
पहिला मदर्स डे अशा प्रकारे यशस्वी झाल्यानंतर ऍना जर्विस हिने मदर्स डे हा संपूर्ण देशभर साजरा केला जावा अशी मागणी लावून धरली.
–
हे ही वाचा – आईवर रागावून त्यांनी घर सोडून पुणे गाठलं…आणि काही वर्षात तुळशीबाग उभी केली…!
–
अमेरिकेत बर्याचशा सुट्ट्या ह्या केवळ पुरुषांशी निगडित असून एकाही स्त्रीसाठी कुठलीही सुट्टी दिलेली नाही अशी तक्रार केली.
म्हणूनच संपूर्ण देशात मदर्स डे साजरा केला जावा यासाठी तिने सह्यांची मोहीम सुरु केली. आणि किती लोकांच्या सह्या येत आहेत हे पेपर मध्ये छापून आणायला सुरुवात केली.
तिच्या या चळवळीला यश येत होतं. १९१२ पर्यंत अमेरिकेत अनेक चर्चेसमध्ये, राज्यांमध्ये, शहरांमध्ये मदर्स डे साजरा केला जाऊ लागला.
शेवटी १९१४ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी मे मधला दुसरा रविवार हा अमेरिकेत “मदर्स डे” म्हणून साजरा केला जाईल असे जाहीर केले. मदर्स डे ही राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली.
ऍना जर्विसच्या कल्पनेनुसार मदर्स डे म्हणजे,
पांढरे कपडे घालून चर्चमध्ये जाणे, तिकडे काही सेवा करणे, एखाद्या आईला भेट देणे, एक हॉलमध्ये सगळे जमा होणे त्यात एखाद्या आईच्या कर्तुत्वावर भाषण करणे, ते ऐकणे, काही गाणी म्हणणे असा होता.
मात्र पुढे फुलं, भेटकार्ड, भेटवस्तू यांची रेलचेल मदर्स डे मध्ये दिसून यायला लागली.
मदर्स डे हा संपूर्ण व्यावसायिक रित्या साजरा केला जाऊ लागला ज्याची अँना जर्विसला चीड आली. आता हे थांबावं यासाठी तिने प्रयत्न सुरू केले.
मदर्स डे वर भेटकार्ड बनवणाऱ्या कंपन्यांवर तिने खटले दाखल केले. असा मदर्स डे साजरा करू नका असं तिचं म्हणणं होतं.
गरीब मातांसाठी होणाऱ्या चॅरिटीला देखील तिने विरोध केला.आपली कितीतरी संपत्ती तिने या खटल्यांमध्ये घालवली.
१९४८ मध्ये तिचा मृत्यू होईपर्यंत ती मदर्स डे ला जाहीर सुट्टी नको असं म्हणायला लागली. तिच्या मते मदर्स डे कसा साजरा करायचा हे सांगण्याचा अधिकार तिलाच होता.
मदर्स डे हीची प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखी ती वागायला लागली. परंतु तोपर्यंत मदर्स डे संपूर्ण जगभरात साजरा केला जाऊ लागला.
आणि आता तर मे महिन्यातील दुसरा रविवार हाच मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. अमेरिकेत फुलं, भेटकार्ड ,भेटवस्तु आईला देऊन आता मदर्स डे साजरा होतो.
त्याशिवाय एक दिवस आईला स्वयंपाक करण्यापासून सुट्टी देऊन मदर्स डे साजरा केला जातो.
१९३४ मध्ये प्रेसिडेंट रुझवेल्ट यांनी एक स्टॅम्प आणला ज्यावर ” IN MEMORY AND IN HONOR OF THE MOTHERS OF AMERICA.” असं लिहिलेलं होतं.
–
हे ही वाचा – ‘नर्गिसची आई’ यापलीकडे असलेली त्यांची ओळख जणू काही पुसलीच गेली आहे…!!
–
थायलंडमध्ये तिथल्या राणीच्या वाढदिवसानुसार मदर्स डे ऑगस्टमध्ये साजरा केला जातो. इथिओपिया मध्ये मदर्स डे चे काही दिवस ठरलेले आहेत, त्या दिवसांमध्ये तो साजरा केला जातो.
ज्याकाळात सगळे कुटुंब एकत्र येतात गाणे म्हणतात आणि विविध पदार्थ पदार्थांचा आस्वाद घेतात.
युरोप आणि ब्रिटनमध्ये याला मदरिंग संडे असं म्हटलं जातं. ग्रीस मध्ये अनेक देवता या स्त्री देवता असल्यामुळे या दिवशी त्या देवतांची पूजा केली जाते.
आज जगभर हा मदर्स डे साजरा केला जातो तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, की त्यादिवशी फोनचं नेटवर्क इतर कोणत्याही दिवसापेक्षा सगळ्यात जास्त बिझी असते.
त्यादिवशी फुलांची विक्री जास्त होते, भेटकार्ड विक्री अधिक होते.
अमेरिकेत त्यादिवशी प्रत्येक जण आईला भेटवस्तू देण्यासाठी किमान १८५ डॉलर्स खर्च करतो अशी तिथली आकडेवारी दर्शवते.
बाकी काही का असेना परंतु आई पोटी आपली कृतज्ञता व्यक्त करता येते, त्यासाठी तरी हा दिवस आपण आपल्या आई बरोबर साजरा केला पाहिजे.
तिला आनंदी ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. तुमची अगदी छोटीशी कृती देखील तिला आनंद देऊन जाईल इतके नक्की.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.