' सकाळी उठल्यानंतरच्या या १० घातक सवयी ठरतील वजनवाढीचं कारण! – InMarathi

सकाळी उठल्यानंतरच्या या १० घातक सवयी ठरतील वजनवाढीचं कारण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कधी आठवतो लहानपणी दर शनिवारी शाळेच्या मैदानावर होणारा पीटीचा तास? त्यावेळी लवचिक शरीरानं कितीतरी व्यायामाचे प्रकार आपण सहजी करत होतो.

शरीराने पण बारीक होतो. भरपूर खेळ, भरपूर अभ्यास, चौरस आहार हे इतकं साधं सोपं आयुष्य होतं आपलं. आठवून बघा…आपल्या बरोबरीचे सगळे सवंगडी बहुतांशी शिडशिडीत होते.

एखादाच अपवाद असायचा. पण आजकाल पाहिलं तर कितीतरी जण शालेय जीवनातच वाढलेल्या किंवा वाढणाऱ्या वजनाच्या समस्येने ग्रस्त आहेत.

त्यामुळे लहान वयातच स्थूलपणाने ग्रासलेली मुले दिसतात. शाळेतील मैदानावर खेळायचे मुलांचे घटलेले प्रमाण, सतत एका ठिकाणी बसून खेळलेले मोबाईल गेम यांनी बऱ्याच समस्या समोर आल्या आहेत.

यातील मुख्य समस्या आहे ती वाढणाऱ्या वजनाची.

काॅलेजवयीन तरुण तरुणी, मध्यमवयीन स्त्री पुरुष यांच्या मध्येही वाढणारे वजन ही समस्या हळूहळू गंभीर रुप धारण करत आहे.

 

हे ही वाचा – नकळत वाढणाऱ्या वजनाची कारणं जाणून घ्या, मग वजन आटोक्यात आलंच म्हणून समजा

या वाढत्या वजनामुळे लहान वयातच डायबिटीस, बीपी, हृदयविकार असे आजार बळावत आहेतच, शिवाय महिलांमध्ये विविध आजार ज्यात प्रेगन्सीला अडथळा निर्माण होणं ही मोठ्या प्रमाणावर असलेली समस्या आहे.

यावर उपाय काय?

आज आम्ही तुम्हाला असेच वजन वाढीला कारणीभूत असणारे घटक सांगणार आहोत. ते जर तुमच्या जीवनशैलीचा भाग असतील तर प्रयत्नपूर्वक टाळून तुम्ही या वजनवाढीच्या समस्येवर मात करु शकाल.

सकाळी सकाळी कितीतरी चुकीच्या सवयी आपण बाळगलेल्या असतात, ज्या या वजनवाढीची समस्या निर्माण करतात..

त्यामुळं आपल्या शरीरातील चयापचय क्रिया बिघडवून टाकतात. याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरातील कॅलरीज न जळता मेद म्हणजे चरबीत रुपांतरीत होतात.

या वाईट सवयी कोणत्या?

१. अतिनिद्रा-

 

indian girl sleep inmarathi

 

अति प्रमाणात घेतली जाणारी झोप ही वजनवाढीचं कारण आहे. त्यामुळे सकाळी उशिरापर्यंत झोपण टाळा. बरेचजण रात्रभर जागतात आणि सकाळी थोडी झोप काढतात, जे घातक आहे.

आठ तासांच्या वर घेतली जाणारी झोप ही शरीरातील काॅर्टीसोल या संप्रेरकाची पातळी वाढवायला लागतं.

हे हार्मोन शरीरात मेदवृद्धीचं कारण ठरतं आहे.

 

२. उन्हाचा उपयोग न करणं-

 

Asian woman in hot summer - heat stroke concept

 

सूर्यप्रकाश हा अक्षय उर्जेचा नैसर्गिक स्त्रोत आहे. ड जीवनसत्त्व आपल्याला सूर्यप्रकाशात विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र काही जण उन्हात जाणं टाळतात. विशेषतः कोवळ्या उन्हात.

तुम्ही लवकर उठलाच नाहीत तर कोवळं ऊन काय मिळवणार? रोज किमान अर्धा तास कोवळं ऊन शरीरावर घेतलं तर वजन वाढीला लागत नाही.

सतत एसी मध्ये बसणं, घरात एसी, गाडीत एसी, आॅफीसमध्ये एसी..घराबाहेर न पडणं यामुळे शरीरातील घाम बाहेर पडतच नाही.

हे टाळण्यासाठी कोवळ्या उन्हात बसा.

 

३. नाश्ता न करणं-

 

breakfast inmarathi

 

नाश्ता न केल्यामुळे फॅट म्हणजे चरबी जळण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं नाश्ता करावा पण तो प्रोटीन आणि कार्बोहाइड्रेट युक्त अशा पदार्थांचा वापर असलेल्या अन्न पदार्थांचा समावेश असलेला असावा.

एका अभ्यासाअंती असा निष्कर्ष काढला की, उच्च प्रोटीनयुक्त नाश्ता करणाऱ्या पौगंडावस्थेतील मुलींच्या भुकेचं प्रमाण हे साधारण कॅलरीज युक्त पदार्थ नाश्त्यात खाणाऱ्या मुलींपेक्षा कमी असतं.

म्हणजेच खाण्याच्या वेळातील अंतर हे योग्य असल्याने शरीरात अतिरिक्त चरबी वाढण्याचे प्रमाण कमी राहते.

तसेच हाय प्रोटीनयुक्त नाश्ता करणाऱ्या पुरुषांमध्येही भुकेचे स्त्राव कमी प्रमाणात स्त्रवले तर दोन वेळच्या खाण्यातील वेळेचे अंतर योग्य राहते.

 

४. व्यायामाचा अभाव-

 

home exercise inmarathi 1

 

व्यायाम न करणं हे पण चरबी वाढविण्यास मदत करणारं एक कारण आहे.

रोज सकाळी किमान २० मिनीटं चालावं किंवा सूर्यनमस्कार यासारखे व्यायाम करावेत, ज्यामुळे अतिरिक्त प्रमाणात असलेली चरबी कमी करण्यासाठी मदत होते.

जर व्यायाम नाही केला तर चयापचय क्रिया मंद होते आणि परिणामी शरीरात फॅट वाढतात. पण तेच नित्यनेमाने केलेला व्यायाम शरीरातील रक्त व साखरेची पातळी समतल राखायला मदत करतो.

हे ही वाचा – बारीक होण्यासाठी मांसाहार सोडताय, पण तरीही वजन वाढू शकतं! म्हणून या चुका टाळा

५. हाय कॅलरी स्नॅक्सचा आहारात समावेश-

 

eating fast food inmarathi

 

रात्रीच्या जेवणानंतर आठ तास झोप झाल्यानंतर अन्नपचन होऊन पोट मोकळे झालेले असते.

उठल्याबरोबर जर तळलेले पदार्थ जसे वेफर्स, किंवा बर्गरसारखे पदार्थ ज्यात मैदा व इतर चरबीजन्य पदार्थ जास्त प्रमाणात वापरले जातात, असे पदार्थ नाश्त्यात खाल्ल्यामुळे वजनवाढीच्या समस्येला तोंड द्यावे लागते.

 

६. पाणी न पिणे-

 

drinking warm water inmarathi

 

झोपून उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. ते न प्याल्याने शरीरातील विषारी द्रव्ये साठून राहून‌ त्याचे रुपांतर चरबीत होते व जाडी वाढू लागते.

वाढते वजन कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. आपले वजन करुन ते तपासत राहणे, कमी जास्त लक्ष ठेवून त्यानुसार आहार घेणे हे वजन‌ आटोक्यात आणण्यासाठी मदत करते.

 

८. आहार-

 

cooked food inmarathi
pinterest

 

सकस आणि घरगुती पद्धतीने बनविलेले जेवण शक्यतो करावे. त्यात तेल तूप यांचा मर्यादित वापर केलेला असतो. अति मसालेदार पदार्थ हे शरीराला घातक असतात.

रोज हाॅटेलचे खाणे टाळावे.‌

मैदा, साखर यांचा अतिरिक्त प्रमाणात वापर केलेल्या पदार्थांनी शरीरात फॅट वाढतो. म्हणून संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.

 

९. सावधगिरी-

 

stress 1 inmarathi

 

वाढते वजन आटोक्यात आणण्यासाठी सावध राहून खाणे पिणे आवश्यक आहे, पण त्याचबरोबर मन सतत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

जुन्या काळातील त्रासदायक घटना किंवा भविष्याची अनावश्यक चिंता यामुळेही वजनवाढीच्या धोक्याची घंटा वाजते.

म्हणून वर्तमानात जगायला शिका. खाणं पिणं मर्यादित ठेवा. हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.

 

१०. पुरेशी झोप घेणे-

 

guy sleeping inmarathi

 

शरीराला दिवसभर श्रमाने होणाऱ्या दमणुकीवर विश्रांती घेणं हाच सर्वोत्तम उपाय आहे. मात्र ती झोप पुरेशी असावी. कमी झोप किंवा अतिझोप दोन्हीही वाईटच.

कमी झोपेमुळे पित्ताचा त्रास होतो तर अतिझोप चरबी वाढविण्यास मदत करते. त्यामुळे तुमचा दिवस आखून योग्य झोपून सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा.

थोडक्यात व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, खाण्याच्या वेळा सांभाळणं आणि सावध राहून मनःस्वास्थ्य टिकवणं हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.

अतिनिद्रा, अतिभय, अतिचिंता, अतिआहार या सर्वांमुळे वजन अतिरिक्त प्रमाणात वाढून आपले शरीर विविध रोगांचे आगर बनू शकते.

जुन्या काळात लोक लवकर झोपत व लवकर उठत शरीर कष्टाची कामे करत त्यामुळे हा वजनवाढीचा राक्षस त्यांच्या आयुष्यात शिरला नव्हता. त्यामुळे शक्य तितक्या वर सांगितलेल्या

गोष्टींचा, आहाराचा रोजच्या जीवनात समावेश केला तर वजन आटोक्यात आणण्यासाठी मदत होते.

===

हे ही वाचा – वजन कमी करताना ही चरबी जाते तरी कुठे? – वाचा तर्कशुद्ध उत्तर!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?