Site icon InMarathi

रामायणातील या ‘७’ गोष्टी शिकल्याशिवाय आजच्या कॉर्पोरेट जगात यश मिळणं अशक्यच!

ramayan inmarathi 2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लॉकडाऊनमध्ये रामायण सिरियलमुळे सर्वांनाच परत आपल्या भारतीय जीवन मूल्यांचा परिचय नव्याने झाला. ही जीवनमूल्ये म्हणजे कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करण्याची वृत्ती, एकमेकांबद्दल असलेली आत्मीयता आणि आदर्श वागणूक.

आपण आपल्या व्यक्तिगत जीवनात ह्या गोष्टी आचरणात आणतच आहोत. रामायण हा एक ठराविक काळासाठी लिहिलेला फक्त ग्रंथ नसून ती एक जीवन जगण्याची शिकवण आहे जी की कालातीत आहे.

 

 

आपल्या सर्वांचं व्यावसायिक आयुष्य हे सुद्धा सध्या तितकंच महत्वाचं आहे. या व्यावसायिक आयुष्यात आपण रामायण मधली कोणती गोष्ट आचरणात आणू शकतो का?

हे ही वाचा – प्राणापेक्षाही प्रिय असलेल्या लक्ष्मणाला प्रभू रामचंद्रांनी मृत्यूदंड का ठोठावला? जाणून घ्या

काही उदाहरणांनी आपण हे समजून घेऊया.

मॅनेजमेंट टीम म्हणजे काय असते ? मॅनेजमेंट कडून नेमक्या कोणत्या अपेक्षा असतात ?

मॅनेजमेंट टीम ही साधरणपणे ह्या पाच गोष्टी करत असते:
१. प्लॅनिंग करून कंपनीची दिशा ठरवणे.
२. विविध कार्यक्रमांचं आयोजन करणे.
३. कंपनी मध्ये घडणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवणे.
४. टीम ला संघटित ठेवणे.
५. कंपनी ला फायदा निर्माण करून देऊ शकणाऱ्या सर्व घटकांमध्ये समन्वय साधणे.

या सर्व गोष्टी आपल्याला मॅनेजमेंट च्या पुस्तकात लिहिलेल्या सापडतील आणि त्यांना आपण मुक्तपणे दाद सुद्धा देऊ. एखाद्या बिजनेस कोच ने त्यांना आपल्यासमोर प्रेझेंट केलं तर टाळ्यांचा कडकडाट सुद्धा होईल.

पण, जर का आपण लक्ष देऊन पाहिलं तर असं लक्षात येईल की, या सर्वांचं मूळ हे रामायणात आहे.

कवी तुलसीदास आणि वाल्मिकी यांनी रामायणात आज च्या कॉर्पोरेट जगात सुद्धा उपयोगी पडतील अशा काही गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. त्यापैकी ७ गोष्टींबद्दल आम्ही इथे सांगत आहोत:

 

१. ध्येयधोरण जाहीर करणे:

 

 

रामाने ज्याप्रमाणे प्रत्येकवेळी आपल्या सहकाऱ्यांसमोर त्यांचं त्यावेळचं ध्येय आणि प्राधान्य ठेवलं. ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल ह्याचं नियोजन टीम सोबत केलं.

प्रत्येकाला आपली जवाबदारी समजावून सांगितली, ती जबाबदारी त्याला कळली आहे की नाही हे बघितलं आणि मगच कोणत्याही मिशन ची सुरुवात केली.

जसं की, ज्यावेळी सीता माता लंके मध्ये कैदेत होती; तेव्हा रामाने आधी सर्व वानर सेनेला चारही दिशेला सीतेचा शोध घेण्यासाठी पाठवलं.

त्यानंतर हनुमानाकडून सीता लंकेत आहे हे पक्क समजतं.

याच गोष्टीला आजच्या मॅनेजमेंट च्या भाषेत Goal setting & effective use of available resources असं म्हणता येईल.

 

२. सहकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा आणि त्यांना सतत प्रोत्साहन द्या :

 

 

राम ज्या सैन्याला घेऊन रावणासोबत लढाई करणार होता ते सैन्य रावणाच्या सैन्यासमोर अगदीच साधारण होतं. रावण सैन्य हे आसुरी शक्ती असलेल्या दैत्यांनी भरलेलं होतं.

ह्या सैन्याने आणि स्वतः रावणाने देवतांचा पराभव या आधी केलेला असतो. याच तुलनेत राम सैन्यात असते ती पर्वतावर राहणारी वानरसेना.

या वानरसेनेचा शत्रूकडून कायम उपहास केला जातो. त्यांच्या रावणासोबत युद्ध करण्याच्या क्षमतेला कायम हसण्यावर नेण्यात येतं.

लोकांच्या सतत कानावर पडणाऱ्या गोष्टींकडे राम अजिबात लक्ष देत नाही आणि त्याच्या सैन्यात बदल करण्याची त्याला गरज वाटत नाही.

त्याच सैन्याला सोबत घेऊन आणि त्यांना सतत प्रोत्साहन देऊन राम अशक्यप्राय वाटणाऱ्या आसुरी रावण सेनेवर हल्ला करतो आणि युद्ध जिंकतो.

हा विजय होण्यामागे रामाने सैन्यावर सर्वतोपरी ठेवलेला विश्वासाचा फार मोठा वाटा आहे.

हे ही वाचा – हिंदू युग ‘लक्ष’ वर्षांचे असूनही राम-कृष्ण हजार वर्षांपूर्वीचे? वाचा या प्रश्नाचे उत्तर

३. सर्वांना समान वागणूक देणे:

 

 

पुरातन काळातील इतर राजांप्रमाणे रामाने कधीच लोकांमध्ये कोणत्याही गोष्टीवरून कधी भेदभाव केला नाही. त्याकाळात उच्च जातीचा, नीच जातीचा ह्या गोष्टी इतक्या प्रचलित असूनही रामाला त्या गोष्टी कधीच पटल्या नाहीत.

स्पृश्य, अस्पृश्य या गोष्टी तेव्हा इतक्या मानल्या जात असूनही त्या भावनेचा स्पर्श ही रामाला कधी झाला नाही. या सर्व समान वागणुकीमुळेच रामाने निषादराज सारख्या कोळी मित्राकडून सुद्धा मदत घेतली.

इतकंच नाही तर आदिवासी लोकांनी सुद्धा रामाला प्रत्येकवेळी मदत केली.

ही गोष्ट आजच्या बिजनेस लिडर्स ला हा खूप महत्वाचा संदेश देऊन जाते: लीडर ने त्याच्या टीम मध्ये समानता आणल्यास टीम ची निष्ठा आपोआप वाढते.

 

४. प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड द्या

 

 

 

सीता मातेचं रावणाकडून हरण झाल्यानंतर राम तिला शोधण्यासाठी त्या वनात वणवण भटकत असतो. त्यावेळी ना त्याच्याकडे त्याचं सैन्य नसतं ना कोणती संपत्ती असते.

राम त्यावेळेस किती दुःखी होते या बद्दलचं वर्णन हे रामायणात खूप आर्त पणे लिहिलेलं आहे. अशा हरलेल्या परिस्थतीत सुद्धा रामाचा आत्मविश्वास कुठेही कमी झालेला नव्हता.

स्वतः कडे काहीही नसताना सुद्धा त्याला सुग्रीव सोबत संगनमत करताना कोणतीही भीती वाटत नाही, जेव्हा की रामाचा शत्रू नेमका कोण आहे हे सुद्धा रामाला माहीत नव्हतं.

आजच्या बिजनेस वर्ल्ड बद्दल सांगायचं तर कितीही वाईट दिवस येऊ द्या, कितीही नुकसान झालं तरीही आत्मविश्वास गमवू नका. संधीच्या शोधात रहा.

 

५. तुमच्या नैतिकतेला धरून निर्णय घ्या; पण तुमचे निर्णय दुसऱ्यांवर लादू नका:

 

 

 

आपण सर्वांनी राम म्हणजे नैतिकता पाळणारी आदर्श व्यक्ती असंच पाहत, ऐकत आणि वाचत आलो आहोत. रामाने त्याच्या नैतिकतेच्या सीमा स्वतः पुरत्या मर्यादित करून ठेवल्या होत्या.

तो त्याचे निर्णय कधीही कोणावर लादत नव्हता. रामाने घेतलेल्या निर्णयात कुठेही व्यक्तिगत स्वार्थ नसायचा. 

राम स्वतः एक पत्नीव्रत होता जेव्हा की इतर सगळे राजे त्याच्या स्वतःच्या वडिलांसहित, सर्व राजे हे बहुपत्नीत्व मानत.

जे नेते त्यांचा आदर्शवाद हा त्यांच्यापुरता मर्यादित ठेवून त्यांच्या सहकाऱ्यांसोबत काम करणं पसंत करतात, त्या नेत्याला त्याची प्रजा सुद्धा तितकंच आदरणीय समजते.

 

६. सहकाऱ्यांसोबत चर्चा करूनच महत्वाच्या गोष्टींवर निर्णय घेणे:

 

 

बिभीषण जेव्हा त्यांच्या भाऊ रावण ला सोडून रामाला शरण येतात तेव्हा राम त्यांना शरण येऊ देत असताना आपल्या सर्व सहकाऱ्यांना एकत्र बोलवून चर्चा करतात.

तेव्हा सर्व सहकारी हे बिभीषणला आपल्या टीम मध्ये घेऊ नये असा सल्ला देतात कारण की, तो रावणाचा भाऊ असतो.

त्यावेळी राम कुठेही राजा म्हणून असलेल्या शक्तीचा वापर करत नाही. त्याच्या सर्व सहकाऱ्यांना चर्चा करून, आपण बिभीषणला आपल्या बाजूने का घेतलं पाहिजे हे शांततेने पटवून सांगतो.

त्यामध्ये कुठेही अधिकारवाणीचा स्वर रामाच्या बोलण्यातून ऐकू येत नाही. युद्धात महत्वाची मदत बिभीषण रामाला करतात जेणेकरून रामाचा युद्धात विजय होतो.

 

७. नीतिशास्त्रात दिलेले सिद्धांत पाळा आणि ते पाळण्यासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी ठेवा:

 

 

रामाच्या वागणुकीतून प्रत्येक गोष्टीसाठी आदर्शवाद  कायम झळकत असे. तो या गोष्टीची सुरुवात नेहमी स्वतःपासून करत असे.

एक राजा म्हणून स्वत:चे कर्तव्यपालन करताना आपल्या वैयक्तिक आयुष्यातील त्रास तो सहन करतो, पण आपल्या कुळाच्या किर्तीला धक्का लागेल असे कोणतेही आचरण करत नाही.

या सर्व गोष्टी यापुढे MBA मध्ये अभ्यासाला असायला पाहिजे. नेहमीच्या पुस्तकी ज्ञानापेक्षा रामायण मध्ये शिकवलेल्या या गोष्टी किती तर मौल्यवान आहेत.

हे ही वाचा – सरळ वाचली तर ‘रामकथा’ आणि उलट वाचली तर ‘कृष्णकथा’-“हा” ग्रंथ म्हणजे प्रतिभेचा उत्कृष्ट नमुनाच!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version