Site icon InMarathi

आजच्या दिवशी “या” गोष्टी केल्या नाहीत तर, आयुष्यभरासाठी एक सुंदर क्षण गमवाल

alia with mom inmarathi

india tv

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जागतिकीकरणाच्या रेट्यात आपल्या संस्कृतीत पण किती बदल झाले आहेत. आपली एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू कमी होत चालली आहे. पण नात्यातला ओलावा, भावनिक गुंफण अजूनही टिकून आहे.

जागतिकीकरण झालं आणि वेगवेगळ्या डे’जनी आपल्या देशात प्रवेश केला. नाहीतर मागच्या पिढीतील लोकांना विचारून पहा.. त्यांना व्हॅलेंटाईन डे माहिती होता का?

फादर्स डे, मदर्स डे, कधी केलं होतं का कौतुक त्यांनी आपल्या आईचं? बाबांचं? कधी साजरा केला होता का प्रपोज डे.. रोझ डे… चाॅकलेट डे..

या लोकांचं फार गंमतशीर उत्तर असतं यावर.. हे काय म्हणे आज गुलाब द्यायचा..उद्या प्रपोज करायचं..परवा दिवशी चाॅकलेट द्यायचं.

 

 

हे म्हणजे आज तुला मी चहाला बोलावणार.. उद्या तुला कप देणार..परवा दिवशी बिस्कीटं देणार.. असं असतं का कुठं? एक घाव दोन तुकडे अशी साधी सुधी व्याख्या असलेली ही पिढी.

मग या नव्या पिढीच्या शिलेदारांनी आणलेला हा सुधारणांचा वारा हळूहळू त्यांनाही एंजॉय करता येऊ लागला आहे.

आता बघा… आज मदर्स डे आहे, तर या मदर्स डेला आईसाठी सेलिब्रेशनच्या कशा भन्नाट आणि हटके आयडीया आणल्या आहेत.

खरंतर आईच्या नि:स्वार्थी प्रेमाची जागा कुणीही घेऊ शकलं नाही पण आईला तिच्या या प्रेमळ नि:स्वार्थ प्रेमासाठी आपणही काहीतरी वेगळं देऊ शकतो!

तेही सरप्राईज. एकतर सध्या लाॅक डाऊन आहे. बाहेर कुठंही जाता येत नाही. मग हे सोशल डिस्टन्सिंग पाळून आपण आईसाठी येणारा मदर्स डे हा थोडा वेगळा स्पेशल बनवूया का?

 

 

वेगवेगळ्या तऱ्हेचे सेलिब्रेशन बाकीच आहे. त्याकरिता तर आम्ही या नव्या जुन्या पिढीला साधणारा एक दुवा आहोत.

आज ज्या कल्पना आम्ही सांगतो आहोत त्या राबवण्यासाठी तुम्ही तुमच्या आईबरोबर असाल तर भारीच..

समजा नसाल तर तिच्यासाठी असं काही मस्त प्लॅन करा की तुम्ही तिथंच आहात असं वाटेल आईला.

 

चला तर मग करुया का नव्या कल्पनांना साकार?

१. मदर्स डे सेलिब्रेशन करण्यासाठी सगळ्यात आधी, सकाळी तिच्या खोलीच्या दरवाज्यावर फुलांची सजावट करा. तिनं दार उघडता क्षणी तिच्यासमोर मदर्स डे चं कार्ड सहजच येईल असं ठेवा.

ते कार्ड पाहूनच आईचा झालेला आनंदी चेहरा बघून किती समाधान वाटेल‌ याची कल्पना करा!!!  त्याचसोबत चहा किंवा कॉफी घेऊन जा.

त्यासोबतच आईला जर केक, बिस्किटे किंवा पेस्ट्रीज आवडतं असतील तर ते जरुर ठेवा.

समजा तुम्ही तिच्यासोबत नाही आहात तर हे सगळं तुमच्या तिकडचा चहा किंवा कॉफीवाला ज्याचा फक्कडसा चहा आईला आवडत असेल त्याला बनवून आईला पाठवायला सांगा.

 

 

अशा रितीने मदर्स डे एकदम झकासपणे सुरु होईल.

२. फक्कड चहा झाला की घरातल्या घरात आईसाठी स्पा ब्युटी सलून सारखा फील देईल असं काही करा. आपल्याकडं सदा सर्वदा दुर्लक्षित असलेला जीव म्हणजे आई.

कधी पाहीले होतं का तिला पार्लरला गेलेलं? पण आज तिच्यासाठी तुम्ही तिला स्पा मध्ये गेल्याचा फील द्या. आपल्याकडं असलेली साधनं वापरुन तिचं मेनिक्यूअर, पेडीक्यूअर करा.

तिच्या नखांवर हलकेच नेलपॉलिश लावा. आई किती आनंदी होईल बघा!

 

 

३. आता नंबर आहे साईट सिईंगचा… वाटलं ना आश्चर्य? आत्ता तर हा लाॅकडाऊनचा महिना सुरू आहे आणि ट्रीप? शक्य तरी आहे का? अहो आहेच शक्य. याला व्हर्चुअल साईट सिईंग म्हणतात.

आपल्या नेटवरच मोठी वस्तूसंग्रहालयं, बागा, मोठमोठे प्रासाद, आणि राष्ट्रीय उद्यानांची सैर करुन आणा तिला, अशा व्हर्चुअल ट्रिपचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. ते तुम्ही नेटवर शोधून ठेवा.

४. आता आहे तिच्यासाठी नाश्ता जेवण बनवण्याची वेळ. इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही व्हर्चुअल कुकींग क्लासपण जाॅईन करु शकता.

सगळे कुटुंब मिळून असा एखादा क्लास ऑनलाईन जाॅईन करा. अतिशय अल्प फीमध्ये तुम्ही चीज कसं बनवायचं. असे इतरही अनेक पदार्थ बनवायला शिकू शकता. 

असे ऑनलाईन कुकींग क्लासपण तुम्हाला सापडतील. मग जेवण झाल्यावर असं आगळं वेगळं काही पाहून आई कशी खुश होईल बघाच!

पण काही आयांना घरीच केलेला ब्रेकफास्ट लागतो. मग आज तिच्या आवडीचा पदार्थ तुम्ही बनवा..अगदी नीटसपणे सजवून तिला सर्व्ह करा.

 

हे ही वाचा – या भावंडांच्या प्रयत्नांमुळे ‘आईच्या हातची खीर’ आता सगळ्यांनाच चाखायला मिळतेय…

५. यानंतर एक सिनेमा तो बनता ही है!! अरे हो.. थिएटर्स बंद आहेत.कुठं जाणार सिनेमाला? या शंकासुराला एकमेव उत्तर आहे. इंटरनेट!

यु ट्यूब, हाॅट स्टार, असे कितीतरी वेगळे पर्याय एका क्लिकवर उपलब्ध आहेत. मग खास माय लेकरांच्या नात्यावर आधारित असलेले बरेच सिनेमे आहेत.

आईला सोबत बसवून घ्या आणि मस्त एंजॉय करा!

६. आईला वाईन आवडते का?हो? वाह! चला मग ऑनलाईन, चिअर्स…झूमसारखं एखादं अॅप वापरुन तुम्ही असा मस्त वाईनचा ग्लास उंचावून आईशी झकास गप्पा मारा.

७. लहानपणी आईसोबत कधी डान्स केला होता..आठवतं? हो, तुम्ही शाळेच्या कार्यक्रमात भाग घेतला की आई तुमच्या सोबत डान्स शिकवायला उभी रहायची.

तुमच्याकडून डान्स कसा स्टेपवाईज बसवून घ्यायची! आता तुम्ही तिला सांगा ऑनलाईन डान्स पण शिकवतात. दोघे मिळून करुया तो क्लास. समजा ते नाही आवडत तर ऑनलाईन योगा आहेच.

तो तिला नक्की आनंद देऊन जाईल.

 

 

८. आता लंच टाईम! तिला घरातच रेस्टॉरंट मध्ये जेवत असल्याचा फील द्या. टेबलवर झकास टेबलक्लाॅथ अंथरा, आणि तिच्या आवडीच्या पदार्थांच्या प्लेटस् मस्त मांडून ठेवा.

ते पाहून तिच्या मनात रेस्टॉरंट वाला फील येईल.

९. जेवणानंतर थोडी विश्रांती. मग एखादं कलाकौशल्य! आठवतं का तुम्ही शाळेत असताना असे कलाकारीचे प्रोजेक्ट तुम्हाला किती कंटाळवाणे वाटत.

आई किती कौशल्यानं पूर्ण करुन द्यायची. आता तेच कौशल्य परत एकदा वापरा.

तिला एखादं क्राफ्ट बनवायचं असेल आणि ते काही कारणाने शक्य नव्हतं झालं‌ तर आज इंटरनेटवर असं एखादं कलाकौशल्य दोघं मिळून बघा आणि पूर्ण करा!

मग ते विणकाम भरतकाम किंवा पेंटिंग काहीही असेल.

 

हे ही वाचा – आईच्या वेदना पाहून त्याने जे केलं त्यासाठी जगभरातील महिला त्याचे आभार मानतील

१०. घराच्या अंगणात संध्याकाळी छान सुटलेला वारा आणि प्रसन्न करणारी हवा. मस्त खुर्च्या टाका मैफल जमवा गप्पांची, बघा. आई किती खुश होते!

११. शेवटी, मस्त चिअर्स करा! सेलिब्रेशनसाठी आई वाईन आवडते म्हणाली तर आजचा दिवस किती झकास साजरा झाला गप्पा टप्पा! जेवणखाण मेनिक्यूअर पेडिक्यूअर खाणं पिणं.

आईचा आनंद वाढवा. असा करा मदर्स डे संस्मरणीय!!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version