Site icon InMarathi

पर्यावरण रक्षणासाठी अमेरिकेत कित्येक दशकांपासून केलं जाणारं हे काम आपणही अवलंबायला हवं

recycling featured inmarathi

waste management

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

रिसायकलिंगचा प्रवास :

वेगवेगळ्या वस्तुंचे आणि टाकाऊ वस्तुंचे रिसायकलिंग करण्याचे तंत्र कधीपासून अवलंबनात आहे हे जाणून घेणे फार मजेशीर आहे.

आपल्याला जरी रिसायकलिंग या शब्दाची ओळख आता या शतकात होऊ लागली असली, तरी प्रत्यक्षात टाकाऊ वस्तुंचा पुनर्वापर हा प्रकार फार जुना आहे.

तुमचा विश्वास बसत नाही का यावर? तर मग वाचा अमेरिकेतील रिसायकलिंगचा इतिहास. कदाचित तो वाचून तुम्हाला पण रिसायकलिंगच्या काही नवीन कल्पना सुचतील.

रिसायकलिंग हा शब्द जरी आतासारखा हेतुपुर्वक प्रचलित नव्हता, तरीही अमेरिकेत अनेक शतकांपुर्वीही वस्तुंच्या पुनर्वापराचा हा प्रकार चालू होता.

 

the new york times

 

‘A Social History of Trash’ या पुस्तकाच्या लेखिका सुझान ट्रॅसर आपल्या पुस्तकात लिहितात की वस्तुंचा पुनर्वापर किंवा नव्याने वापर लोक फार पूर्वीपासून करत आले आहेत.

अगदी जुन्या कपड्यांपासून गोधडी बनवणे हा देखील रिसायकलिंगचाच एक प्रकार आहे.

ज्या काळात महापालिकेच्या गाड्या येऊन घरातला कचरा उचलून नेत नव्हत्या,

त्या काळात लोकांनी आपल्या घरातल्या कचऱ्यांची विल्हेवाट आपणच लावली नसती, आणि त्यातून रिसायकलिंग केले नसते, तर त्यांच्या घरासमोर किती कचरा जमा झाला असता ना तेव्हा?

याचाच अर्थ ते नक्कीच टाकाऊ वस्तू अशाच फेकून न देता त्यापासून नवीन वस्तू तयार करत असणारच ना?

 

american disposal service

 

शिवाय आपल्यापेक्षा, जे लोक वस्तु बनवण्याचे काम करतात, त्यांना त्या वस्तुंसाठी लागणाऱ्या साहित्याचे महत्त्व चांगलेच ठाऊक असते.

विकत आणलेल्या वस्तुंपेक्षा जर आपण कष्टाने बनवलेल्या वस्तु असतील, मग ते पदार्थ असोत, कपडे असोत, वा घरातल्या इतर वस्तू, त्यांचे महत्त्व आपल्याला अधिक ठाऊक असते.

मग अशा वस्तू जुन्या झाल्या तरी फेकून देण्याचे मन आपल्याला होत नाही आणि आपण त्या वस्तुंतील घटकांतून काहीतरी नवीन वस्तु बनवता येईल का याचा विचार करतो.

हेच रिसायकलिंग असते. सुझान ट्रॅसर म्हणते ते खरंच आहे. चला तर मग बघू या रिसायकलिंगचा हा प्रकार प्रत्येक शतकात कसा बदलत गेला ते 

 

१६९० :

 

history,com

 

अमेरिकेतील पेनसिल्वानिया येथील फिलाडेल्फिया जवळील रिटनहाऊस मिल या नावाच्या कारखान्यात कागदाच्या पुनर्वापराची एक प्रक्रिया प्राथमिक स्वरुपात वापरात होती.

हे रिसायकलिंगचे पहिले उदाहरण होते. इथं जुन्या सूती चिंध्या आणि तागापासून तयार केलेल्या फायबरपासून कागद तयार केला जात होता.

१७७६ :

या काळातील क्रांतीकारक युद्धाच्या परीणामी निर्माण झालेल्या तुटवड्यात लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रिसायकलिंगचे सर्व प्रकार शोधले गेले.

अमेरिकेने युद्धासाठी लागणाऱ्या वस्तु तयार करण्याकरताही वस्तुंचा पुनर्वापर आणि पुनर्वापर करण्याचे मार्ग शोधण्यास सुरूवात केली होती.

या काळात अमेरिकेचे अध्यक्ष जनरल जॉर्ज वॉशिंग्टन यांनी देखील देशातील लोकांना देशाच्या मदतीसाठी आवाहन केले होते ,

आणि अशा प्रकारे जुने भंगार धातू, जुन्या साखळ्या, स्क्रॅप पेपर, कपडा आणि लोखंडी भंगार सामान यातून नवीन वस्तू तयार करण्यास आवाहन केले होते

 

edge effect

 

१८७४ :

बाल्टीमोरमध्ये मेरीलॅन्ड येथे रस्त्याच्या कडेलाच रिसायकलिंग कार्यक्रम राबवण्यात आला होता. हा एक अभिनव उपक्रम होता.

त्यामुळे नागरिकांना आपल्याकडील टाकाऊ वस्तुंचे रिसायकलिंग करून घेणे सहज शक्य व्हावे असा हेतू होता.

१८९७ :

आतापर्यंत न्यूयॉर्क हे शहर रिसायकलिंगमध्ये चांगल्या टप्प्यापर्यंत पोचले होते.

कचऱ्यातून आणि इतर वेस्टेज मटेरिअलमधून एका स्थानिक जागेवरच वेगवेगळ्या वस्तू निवडून वेगळ्या काढल्या जाऊ लागल्या होत्या आणि त्यांची वर्गवारी केली जाऊ लागली होती.

उदा. रबर, सुतळ्या, बॅग्स इतकंच काय पण घोड्यांचे केस देखील वेगळे करून या सर्व गोष्टींचा रिसायकलिंगसाठी वापर करण्यात येत होता.

१९०४ :

अमेरिकेतील ऍल्युमिनिअमचे रिसायकलिंग करणारी ही पहिली प्रक्रिया होती. ही शिकागो आणि क्लिव्हलॅंन्ड मध्ये उघडण्यात आली होती.

१९१६ :

 

Pinterest

 

वेगवेगळा कचरा निवडून त्याची वर्गवारी करणे यासाठी यावर्षी शिकागो शहरातील कारागृहातील कैद्यांना कामाला लावले गेले.

रिसायकलिंगच्या कामात कैद्यांचा वापर करून घेण्याची ही पद्धत अमेरिकेत पहिल्यांदा अशा रीतीने सुरू झाली होती.

१९२० :

या दशकात जमिनीत भराव टाकण्यासाठी टाकाऊ वस्तुंचा वापर करण्याची कल्पना राबवण्यात येऊ लागली. जिथे बांधकाम असेल, तिथे वेस्टेज वस्तु खड्डा भरण्याच्या कामात वापरल्या जाऊ लागल्या.

१९३० :

घरातील जुन्या वस्तु विकत घेणारे फेरिवाले येऊ लागल्याने अमेरिकन लोक आपल्या घरातील टाकाऊ वस्तुंपासून सुटका कशी मिळवायची या विवंचनेतून तर सुटलेच,

परंतु त्यांना त्यातून चार पैसे देखील मिळू लागले. रिसायकलिंगसाठी या वस्तु गोळा करून पुढे पाठवल्या जात असत.

 

 

१९४० :

महायुद्धांचा हा काळ होता. या काळातील युद्धात लागणाऱ्या वस्तु तयार करण्यासाठी विविध वस्तुंवर रेशनिंग आणि रिसायकलिंग या गोष्टी चालू होत्या.

धातू, नायलॉन आणि रबरपासून बनवलेले सामान आणि रबरपासून बनविलेले सामान लोकांना रेशनवर दिले जात असे आणि वस्तुंचा पुनर्वापर करणे ही गोष्ट या काळात अनिवार्य बनली होती.

१९५५ :

अमेरिकन लोक आपल्या दैनंदिन आयुष्यातील एकदा वापरलेल्या वस्तुंकडे कोणत्या मानसिकतेतून पाहतात याचा एक लेखच ‘थ्रोअवे लिव्हिंग’ या लाईफ मॅगेझिनमधे आलेला आहे.

१९६४ :

सर्व प्रकारच्या ऍल्युमिनिअमच्या वस्तुंपासून नवीन ऍल्युमिनिअमचे कॅन बनवण्याची पद्धत आतापर्यंत सर्रास सुरू झाली होती. ही प्रक्रिया सोपी देखील आहे.

आणि त्यामुळे ऍल्युमिनिअमच्या कॅनचे रिसायकलिंग करणे ही एक लोकप्रिय पद्धत आहे. ती या काळात सुरू झाली होती.

१९७० :

 

waste360

 

या वर्षापासून प्रथमच दरवर्षी २२ एप्रिल रोजी वसुंधरा दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली. आणि पर्यावरणाचे महत्त्व ओळखून रिसायकलिंगला महत्त्व दिले गेले.

या वसुंधरा दिवसाची कल्पना अमेरिकन सिनेटचे सदस्य गेलर्ड नेल्सन आणि जागतिक पातळीवरचे उद्योजक जॉन मॅककॉनेल यांची होती.

या दिवशी जवळजवळ प्रत्येक शाळेतली मुलं झाडं लावून आपल्या पर्यावरण संवर्धनास चालना देण्यास हातभार लावतात. आणि हा दिन साजरा करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात.

१९७१ :

लोकांना रिसायकलिंगच्या वस्तु गोळा करण्यासाठी उत्तेजन देण्यासाठी म्हणून ओरेगॉन कंपनीने काचेच्या बाटल्यांवर रिफंडेबल ठेवी घेण्यास सुरूवात केली.

बाटल्यांमधील पेय संपल्यावर ग्राहकाने त्या बाटल्या परत आणून द्यायच्या आणि आपले डिपॉझिट परत घेऊन जायचे.

यामुळे काचेच्या बाटल्या पुन्हा रिसायकलिंगसाठी सहजपणे एका ठिकाणी गोळा करता येऊ लागल्या.

१९९५ :

अमेरिकेत वस्तुंच्या रिसायकलिंगचे प्रमाण वाढत गेले आहे.

आतापर्यंत म्हणजे नव्वदच्या दशकापर्यंत अमेरिकेत जवळपास १०,००० रिसायकलिंग सेंटर्स आणि ४००० रोडसाईड रिसायकलिंग उपक्रम अशी संख्या झाली होती.

रिसायकलिंगचे महत्त्व आणि त्यायोगे आपल्या पर्यावरणाचे महत्त्व त्यामुळे जनमानसापर्यंत पोचवण्यात अमेरिका यशस्वी झाली होती.

हा एक सकारात्मक संदेश होता जो देशातील नागरिकांपर्यंत पोचला होता.

२०१५ :

 

los angeles time

 

कॅलिफॉर्निया हे सर्व प्रकारच्या किराणा इत्यादी दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणणारे पहिले राज्य ठरले.

कारण या पिशव्या जरी रिसायकल करता येत असल्या तरी त्या धोकादायक आणि विषारी होत्या.

आता तर लोकांना झिरो कचरा व्यवस्थापनाची संकल्पना देऊन कमीत कमी कचरा तयार होईल याकडे लक्ष दिले जात आहे.

लोक आता ज्या वस्तु डिस्पोजेबल असतील अशाच वस्तु वापरू लागले आहेत. मात्र रिसायकलिंगला सपोर्ट करणाऱ्या कंपन्या झिरो कचरा या कल्पनेला फारसा पाठींबा देताना दिसत नाहीत.

पर्यावरणाला हानी पोचणार नाही अशा वस्तु तयार करणे हे फार मोठे आव्हानात्मक काम आहे. त्यासाठी एकूणच संस्कृतीत बदल करावा लागणार आहे.

आतापर्यंतच्या कल्पना आणि सवयी यांचा त्याग करून पर्यावरणासाठी आणि पर्यायाने रिसायकलिंग किंवा झिरो कचरा व्यवस्थापन अंमलात आणणे फार गरजेचे झाले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version