Site icon InMarathi

साक्षात श्रीकृष्णानेच दिला भूमिका करण्याचा आदेश, वाचा नेमकं काय घडलं?

Sarvadaman Krishna Role IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दोन वर्षांपूर्वी भारतात लॉकडाउन सुरू झाला होता, बहुतेक जनता घरीच असल्याने कंटाळली होती. इंटरनेटवर सिनेमे ,वेब-सिरीज तरी किती पाहणार? बाकी चॅनेलवर पण नेहमी येणाऱ्या मालिका ,शूटिंग होऊ शकत नसल्याने बंद होत्या.  पण त्यावर उपाय म्हणूनच देशातील पहिली दूरचित्र वहिनी दूरदर्शनने बरेच जुने लोकप्रिय कार्यक्रम पुन:प्रसारीत करण्याचा निर्णय घेतल होता

पहिल्या दोन टाळेबंदीत त्यांनी रामायण- उत्तर रामायण, महाभारत यांसारख्या मालिकेचे भाग दाखवले आणि आश्चर्य म्हणजे देशातून त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला.

 

amar ujala

 

रामायण मालिकेच्या टीआरपी ने तर टीव्ही विश्वातले सर्व विक्रम मोडीत घालून नवीन रेकॉर्ड स्थापन केला! यातून एक गोष्ट दिसून आली, ती म्हणजे जर कथानक आणि अभिनय यांची योग्य भट्टी जमली तर ती मालिका कुठल्याही काळात आवडीने पहिली जातेच!

 

तिसऱ्या लॉकडाउनमध्ये दूरदर्शनने नव्वदीच्या दशकातली अजून एक लोकप्रिय मालिका ‘श्रीकृष्ण’ आपल्या भेटीला आणली होती,

३ मे पासून दररोज रात्री ९ वाजता ह्याचे भाग प्रदर्शित झाले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता त्या भागाचे पुन:प्रसारण दाखवण्यात आले होते.

रामानंद सागर पौराणिक मालिकांच्या निर्मिती साठी सुप्रसिद्ध होते! रामायण- लवकुश च्या अद्भुत यशानंतर त्यांनी कृष्णावर मालिका बनवायला घेतली.

 

yotube.com

रजनीकांतना भिकारी समजून महिलेने दिली होती १० रुपयांची भीक, आणि मग ….
लावारीस ते अव्वल अभिनेता, वाचा अर्शद वारसीचा खडतर प्रवास!

अगोदर काही पौराणिक मालिका निर्माण केल्याने कलाकार निवडी साठी त्यांना बऱ्याच कलाकारांचा पर्याय उपलब्ध होता. पण त्यांना मुख्य पात्र- श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी कोणाची निवड करायची हे ठरत नव्हतं!

शेवटी जेव्हा रामानंद सागर यांनी सर्वदमन बॅनर्जी यांना पाहिलं त्यांनी लगेच त्यांना कृष्णाची भूमिका देऊ केली!

दुसरीकडे सर्वदमन मात्र गोंधळलेले होते. कारण त्यांना टीव्ही मालिका करण्यात अजिबात रस नव्हता त्यांना चित्रपटात काम करायचं होतं. त्यांच्या मते चित्रपटातील एखादे दृश्य १०० वर्षापर्यंत लक्षात राहू शकते.

त्यांना टीव्ही मालिकेत काम करणं हे कलाकाराच्या कलेला शोभणारं नाही असं वाटतं होतं. म्हणून जेव्हा रामानंद सागर यांनी त्यांना श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी विचारलं तेव्हा ते त्यासाठी तयार नव्हते.

यात अजून एक कारण म्हणजे , ते स्वतः शिवभक्त होते आणि त्यांनी रामानंद सागर यांना सुद्धा ही गोष्ट सांगितली होती मात्र तरी सागर यांनी त्यांना १० दिवस विचार करून मग निर्णय घेण्यास सांगितलं.

या दहा दिवसांत ते दररोज ईश्वराकडे प्रार्थना करायचे की जर ही भूमिका त्यांनी करावी की नाही? या बद्दल मार्गदर्शक काही तरी संकेत दे!

आठव्या दिवशी सर्वदमन ऑटो मधून सिनेमा निर्देशक बासू भट्टाचार्य यांच्या घरी जात होते. तेव्हा समुद्रकिनाऱ्यावरच्या रस्त्याने जात असताना त्यांना समुद्राच्या लाटांवर भगवान कृष्ण नृत्य करत आहेत असा भास झाला!

ते पाहून सर्वदमन ऑटो मधून खाली भोवळ येऊन पडले. शुद्धीवर आल्यावर त्याच रिक्षात बसून ते रामानंद सागर यांच्या घरी गेले आणि श्रीकृष्ण भूमिकेसाठी होकार दिला!

 

jansatta.com

 

सर्वदमन जेव्हा श्रीकृष्णाच्या भूमिकेत आपल्या अतुल्य हास्याने भगवतगीतेतील श्लोक म्हणायचे तेव्हा टीव्ही समोरचे प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन खिळून जायचे! या भूमिकेने त्यांना अफाट लोकप्रियता मिळवून दिली.

ही मालिका केवळ २-३ वर्ष चालू राहणार होती पण नंतर ती बरीच मोठी करण्यात आली.

श्रीकृष्ण मालिकेनंतर जेव्हा त्यांनी रामानंद सागरना विचारलं की तुम्ही आता मला कुठलं काम देणार आहात? तेव्हा सागर म्हणाले होते “मी जेव्हा जेव्हा तुम्हाला पाहतो तेव्हा मला तुमच्यात प्रत्यक्ष भगवंत दिसतो! माझे हात आपोआपच जोडले जातात!”

एका कलाकारासाठी या पेक्षा उत्तम अभिप्राय अजून काय असू शकेल!

सर्वदमन पुढे ‘अर्जुन’,’जय गंगा मैय्या’ , ‘ओम नमः शिवाय’ सारख्या मालिकेत दिसले. आणि या सर्व मालिकेत ते भगवान कृष्णाच्या किंवा विष्णूच्या भूमिकेतच दिसले!

 

patrika.com

 

पुण्यातल्या फिल्म इन्स्टिट्यूट मधून पदवी पूर्ण केल्यावर त्यांचा चित्रसृष्टीचा प्रवास सुरु झाला.

सिनेसृष्टीत त्यांनी श्रीकृष्ण मालिकेच्या बऱ्याच अगोदर १९८३ मधेच पदार्पण केलं होतं ते आदी शंकराचार्य सिनेमाद्वारे. या सिनेमाला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

सर्वदमन यांनी त्यात आद्य शंकराचार्यांची भूमिका केली होती!

नंतर ते वल्लभचार्य गुरू, श्री दत्त दर्शनम, सिरिवेनेला, स्वामी विवेकानंद सारख्या चित्रपटात ते दिसले.

पौराणिक कथानकातच वारंवार भूमिका मिळण्याविषयी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणतात,

“बहुतेक अध्यात्म माझ्या शरीरात पहिल्यापासूनच होतं. श्रीकृष्ण मालिकेनंतर मला पौराणिक भूमिकेला राम – राम करायचा होता. पण त्या नंतर मला कृष्णा च्या भूमिकाच जास्त प्रमाणात येऊ लागल्या”

श्रीकृष्ण मालिकेच्या पूर्वी टीव्ही वर बी आर चोप्रा यांचं महाभारत सुरू होतं त्यामध्ये कृष्णाची भूमिका करणारे नितीश भारद्वाज सुद्धा बऱ्यापैकी प्रसिद्ध होते. पण या दोन श्रीकृष्णांमध्ये ३६ चा आकडा होता!

 

https://www.timesnowhindi.com/

 

त्या काळी या दोघांचा एक किस्सा बराच गाजला होता. मुंबई च्या लायन्स क्लब मधे रामानंद कृत श्रीकृष्ण मालिकेतल्या कृष्णाचा म्हणजेच सर्वदमन यांचा सत्कार समारंभ चालला होता.

तिथे कोणीतरी त्यांना बी.आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेतल्या श्रीकृष्णां विषयी म्हणजे नितीश भारद्वाज विषयी विचारलं. तेव्हा सर्वदमन म्हणाले होते “हे कुठले नवीन कृष्ण? तेच का ज्यांना जगभरातल्या कृष्ण भक्तांनी कधीच विचारलं नाही!

आम्हाला भेटायला तर BBC ची टीम गुजरात मधल्या लक्ष्मी स्टुडिओत आली होती! TNT ने आमची मालिका खरेदी केलीये आणि चार देशात त्याच प्रक्षेपण सुरुये. आम्ही तर जगात नाव कमावलं आहे”

जेव्हा त्यांचं हे वक्तव्य पत्रकारांनी जाऊन नितीश यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले “ज्यांचा दिवा घरात लागला नाही ते चालले बाहेरचे दिवे लावायला! भारतात विचारा, यांना कोण ओळखतं का ते?”

या घटनेने म्हणता येईल की देवांमध्ये लढाई नसेल पण ,त्याचं काम करणाऱ्या दोन कलाकारांमध्ये लढाई असू शकते!

२०१५ मध्ये ते भारतीय क्रिकेट चे माजी कर्णधार एम.एस.धोनी च्या आयुष्यावरील “एम .एस.धोनी द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमात ते महिंद्रसिंग धोनी च्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसले.

 

quora.com

 

सर्वदमन यांनी हिंदी, तेलगू, बंगाली सिनेमात कामं केली आहेत.

सध्या सर्वदमन बॅनर्जी उत्तराखंड राज्यातल्या ऋषीकेश येथे राहतात. तिथे ते लोकांना निःशुल्क योग आणि ध्यानधारणा शिकवून अध्यात्माची गोडी लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

अनेक देश-विदेशातील यात्री त्यांच्याकडून योग शिकून गेले आहेत. या शिवाय सर्वदमन यांची ‘पंख’ नावाची एक स्वयंसेवी संस्था सुद्धा आहे.

ज्याच्या माध्यमातून ते जवळपास २०० मुलांच्या संपूर्ण शिक्षणासाठी आणि ५० महिलांना चांगल्याप्रकारे आयुष्य जगण्यासाठी मदत करत आहेत!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version