कोरोनाच्या भीषण संकटातून लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी डिस्नीची “ही”अनोखी युक्ती ट्राय कराच
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोरोना विरुद्ध लढाई मध्ये संपूर्ण जग सध्या आपल्या परीने उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे. जोपर्यंत कोरोनावर विशिष्ट औषध तयार होत नाही तोपर्यंत आपल्याकडे दोनच उपाय आहेत.
एक म्हणजे social distancing चं पालन करणे. अत्यावश्यक गरज नसल्यास बाहेर न पडणे. पोलीस, डॉक्टर लोकांना त्यांच्या कर्तव्य पालनात मदत करणे.
दुसरा आणि अगदी महत्वाचा उपाय म्हणजे कोणत्याही कामासाठी बाहेर पडत असाल तर मास्क वापरणे जेणेकरून आपल्याला कोरोना वायरस ची लागण होणार नाही.
रेड झोन किंवा इतर कोणत्याही झोन म्हणून घोषित केलेल्या सगळ्या ठिकाणांवर प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरावं ही सक्तीची घोषणा काही दिवसांपूर्वीच सरकारने केली आहे.
हे माहीत असूनही काही लोक अजूनही मास्क सारखी अत्यावश्यक गोष्ट वापरण्यासाठी अजूनही टाळाटाळ करताना दिसतात.
ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे त्या लोकांना कोरोना ची लागण इतक्या लवकर होणार सुद्धा नाही किंवा ते त्यातून बरे सुद्धा होतील, होत आहेत.
प्रश्न त्या लोकांचा आहे ज्यांना की मास्क घालणं हे सुद्धा एक अवघड काम वाटतं किंवा मास्क घालणं आवडत नाही. त्या लोकांना मास्क घालण्याकडे कसं आकर्षित करता येईल ?
गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. याबाबतीत सुद्धा ही गोष्ट परत सिद्ध होताना दिसत आहे. लोकांना मास्क कडे आकर्षित करण्यासाठी किती तरी नवीन उद्योजक विविध Designs घेऊन त्यांना बाजारात विक्रीला आणण्याच्या जोरदार तयारीत आहेत.

याचं अजून एक कारण म्हणजे, कोरोनाचा वाढता प्रसार बघता पूर्ण उद्योगजगत सध्या चिंतेत आहे. कोणतंच क्षेत्र असं राहिलं नाहीये जे की कोरोनामुळे त्यांच्या उत्पादनात बदल करत नाहीये.
कित्येक उद्योगांनी सध्याची गरज बघता ‘मास्क’ ला त्यांच्या उत्पादन किंवा त्यांच्या ट्रेडिंग च्या वस्तू श्रेणीमध्ये स्थान दिलं आहे. लोकांना मास्कचं महत्व सुद्धा पटलं आहे आणि म्हणूनच त्याची मागणी सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढली आहे.
मास्क म्हणजे कोणती सक्तीची वस्तू वाटू नये यासाठी खूप creative प्रयत्न सुरू आहेत.
आपण सर्वांनी ब्रिटन च्या राणीचे ते फोटो बघितलेच असतील ज्यामध्ये त्यांनी ड्रेस ला मॅचिंग कलर चे मास्क तयार करून घेतले आहेत आणि ती फॅशन इंटरनेटवर खूपच लोकप्रिय झाली आहे.
हा ट्रेंड लोकप्रिय होत असतानाच डिस्नी कंपनी ने त्यांच्या animation चे पात्र असलेले मास्क विकायला आणायचे ठरवलं आहे.

कोणतीही कंपनी यशस्वी होण्यासाठी एक गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे त्यांच्याकडे असलेली R&D टीम आणि त्या कंपनीच्या मॅनेजमेंट कडे असलेला संधीसाधूपणा.
ही संधी कधी कधी फक्त कंपनीच्या फायद्याची असते तर कधी कधी ग्राहक आणि कंपनी दोन्हींच्या. अशीच एक संधी सध्याच्या कोरोनाच्या प्रसारात सुद्धा अमेरिकेच्या डिस्ने कंपनी ला दिसली.
मास्क या रुक्ष गोष्टीला डिस्ने कंपनी त्यांच्या सिरीयल मधील पात्रांची नावं, चेहरा देऊन सजीव करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांना विश्वास आहे की असं केल्यास लोक मास्क जास्त प्रमाणात लोकप्रिय होतील आणि वापरले देखील जातील.
या नवीन प्रॉडक्ट ची सुरुवात करताना देखील डिस्ने कंपनी ने लहान मुलांनाच केंद्रस्थानी ठेवलं आहे.

डिस्ने कंपनी हे करू शकते कारण त्यांना माहीत आहे की आजच्या लहान मुलांना नेमकं काय हवं आहे.
कोणत्या पात्राने मुलांच्या मनावर राज्य केलं आहे हा अनुभव लक्षात घेऊन डिस्नी कंपनी ने २४ प्रकारचे वेगवेगळे मास्क तयार केले आहेत.
त्या प्रत्येक मास्क सोबतच डिस्नी कंपनी ने प्रत्येक डिसाईन सोबत एक टॅग लाईन, स्मायली सुद्धा जाहीर केले आहेत जेणेकरून मुलांना हे मास्क बघता क्षणीच नक्की आवडतील.

डिस्नी कंपनी ने छोटी, मध्यम आणि मोठ्या मास्क ची निर्मिती केली आहे आणि FDA ने त्या मास्क ला Non-surgical आणि Non-industrial या ग्रेड मध्ये मान्यता सुद्धा दिली आहे.
ह्या मास्क मध्ये स्टार वॉर चे फॅन असलेले लोक बेबी योडा आणि R2-D2 या प्रकारचे मास्क घेऊ शकतात.
जी मुलं थोडी मोठी आहेत आणि जे MCU या मीडिया कंपनीचे चाहते आहेत ते लोक हल्क या पात्राचे मास्क वापरू शकतात ज्यावर हल्क च्या हिरव्या रंगाचे फोटो आहेत किंवा निदान नाव लिहिलेले आहेत.
यासोबतच डिस्नी ने त्यांचे लोकप्रिय पात्र मिकी आणि माऊस या पात्रांचे रंगीबेरंगी मास्क लवकरच आपल्याला बाजारात आलेले दिसतील.

Medshare या NGO संस्थेला या मास्क विक्रीच्या फायद्यातील 10 लाख US डॉलर्स इतकी रक्कम दिली जाईल अशी माहिती डिस्नी च्या मीडिया स्पीकर ने नुकतीच दिली आहे.
या सोबतच ही सुद्धा माहिती देण्यात आली आहे की, १० लाख मास्क हे लहान निराधार मुलांना आणि त्यांच्या परिवाराला देणार आहेत.
डिस्नी कंपनी चे मास्क हे त्यांच्या वेबसाईट वर ऑनलाईन स्टोर वर ऑर्डर करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. या मास्क ची डिलिव्हरी ही जुलै महिन्यात मिळेल अशी माहिती डिस्नी कंपनी ने दिली आहे.
तेव्हा वाट कशाची बघत आहात ? लगेच डिस्नी ऑनलाईन स्टोर वर जा तुमच्या घरातील प्रत्येक सदस्या साठी मास्क ऑर्डर करा. कोरोना ला घालवण्यासाठी मास्क तर आवश्यक आहेच.
Design चांगली असेल तर तुमची मुलं आवडीने हे मास्क वापरतील आणि कोरोना विरुद्ध च्या या लढाईत त्यांचा सहभाग नोंदवतील.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.