अणुयुद्धाची भीती दाखवली जाते – पण त्याहून कितीतरी दाहक महायुद्धाचा “हा” प्रकार झोपच उडवतो
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
Everything is fair in War अशी एक म्हण आहे. दिवसेंदिवस ह्या Everything च्या कक्षा खऱ्या अर्थाने रुंदावत चालल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही.
इतक्या वर्षात आपण सर्वांनी सशस्त्र युद्धाबद्दल वाचलं किंवा ऐकलं आहे. या युद्धांमध्ये शत्रू हे दिसणारे होते. शस्त्र हे मोजण्याजोगे होते. पण, सध्या जे कोरोना रुपी युद्ध पूर्ण जगात चालू आहे.
चीन ने त्यांच्या महासत्ता बनण्याच्या इच्छेने हे सुरू केलं असं मानलं जातं. हे युध्द मात्र या आधी झालेल्या सर्व युद्धांपेक्षा वेगळं आहे. इथे युद्धासाठी शस्त्र वापरले जात नाहीयेत.
वापरला जात आहे तो एक व्हायरस जो की वातावरणात पसरला की त्या जागेतील लोकांना मारण्याचं काम आपोआप करत असतो. या व्हायरस ची तीव्रता इतकी जास्त आहे की अगदी तीन महिन्यातच त्या व्हायरस ने जगातील जवळपास प्रत्येक देशात लोकांना त्याची लागण केली आहे.
कोरोना चा वाढता प्रसार हे सिद्ध करतोय की हे एका Biological war चं सूचक आहे. यापुढे युद्ध करण्यासाठी कोणताही देश या मार्गाचा अवलंब करू शकतो ही एक गोष्ट सिद्ध झाली आहे.
आपल्याला या लेखात हे पहायचं आहे की आपला भारत देश अशा प्रकारच्या जैविक युद्धासाठी खरंच तयार आहे का ?
आतापर्यंत झालेल्या युध्दांची माहिती पाहिली तर असं लक्षात येतं की, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध हे पूर्ण जगाने अनुभवलेलं आहे. अशी नोंद आहे की साधारणपणे ४ करोड लोकांना पहिल्या महायुद्धात जीव गमवावा लागला होता.
तोच आकडा दुसऱ्या महायुद्धात वाढून ७.५ करोड पर्यंत जाऊन पोहोचला होता. कोरोना चा वाढता प्रसार बघता सद्य परिस्थिती ही तिसरं महायुद्ध आहे हे मान्य करायला हरकत नसावी.
कारण जागतिक आरोग्य संस्था (WHO) ने या आजाराला या अगोदरच pandemic म्हणजेच जागतिक महामारी हे नाव दिलं आहे. कोरोना बाधित आणि त्यामुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या ही दर दिवसागणिक वाढतच चालली आहे.
जैविक युद्धांमध्ये वापरण्यात येणारे शस्त्र हे मूलतः विषाणू असतात. त्यामुळे या युद्धाला ‘जंतू युद्ध’ असं सुद्धा संबोधल्या जात आहे. जैविक युद्ध हे मनुष्य जमात सुद्धा नष्ट करू शकते इतकी त्याची व्याप्ती असू शकते.
कारण त्यामध्ये वापरले जाणारे विषाणू, बुरशी किंवा वायरस हे जागतिक पातळीवर जीवित मनुष्य, वन यांना मारण्याची क्षमता बाळगून असते. ह्याची पुष्टी जागतिक आरोग्य संस्था (WHO) ने केली आहे.
या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारचे विषाणू हे नेहमीच मुद्दामहून तयार केलेले असतात आणि सध्या ही गोष्ट जागतिक सुरक्षेसाठी खूप आव्हानात्मक आहे यावर जगातील सर्व प्रमुख देशांचं एकमत झालं आहे.
कोरोना वायरस बद्दल आतापर्यंत झालेल्या अभ्यासानुसार असं सांगण्यात आलं आहे की, हा वायरस हा किती तरी पटींमध्ये वाढत जाणारा वायरस आहे.

त्याची एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची लक्षणं किती तरी दिवस आढळतच नाहीत. आणि लक्षण आढल्यावर त्या व्यक्तीला बरं वाटण्यासाठी कमीत कमी २ ते ३ आठवड्यांचा वेळ लागतो.
जसं भारतातील काही राज्य स्वतः पुढाकार घेऊन ठराविक एरिया मधील लोकांची टेस्ट घेत आहेत त्याने, social distancing चं पालन केल्याने कोरोनाचा प्रसार थांबू शकतो; पण, त्यामुळे वायरस समूळ नष्ट होत नाही.

कोरोना वायरस च्या पसरण्या सोबतच एक अजून आकडेवारी प्रकर्षाने बघितली जात आहे ती म्हणजे डेथ रेट. याचा अर्थ असा की, कोरोना positive सापडलेल्या किती व्यक्तींचा मृत्यू होत आहे याची पाहणी.
आतापर्यंत झालेल्या कोणत्याही युद्धाच्या वेळी उपलब्ध नसेल असा वेगवेगळ्या प्रकारचा डेटा यावेळी जागतिक आरोग्य संस्थेने वर्ल्ड हेल्थ काउंट च्या माध्यमातून सातत्याने जाहीर करत आहे.
त्यामुळे एका क्लिक वर तुम्हाला जगातील सर्व देशातील कोरोना बाधित आणि मृत लोकांची आकडेवारी ही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सतत वाढणाऱ्या डेथ रेट मुळे काही काळातच हॉस्पिटल च्या मर्यादा सुद्धा समोर येत आहेत. व्हेंटिलेटर ची मोजकी संख्या, हॉस्पिटल स्टाफ सुद्धा संसर्गजन्य रोगाने आजारी पडत आहेत.

या सर्व परिस्थितीचा सतत आढावा घेणाऱ्या काही तज्ञांनी आणि संस्थानी हा आरोप केला आहे की, कोरोना वायरस हे जागतिक जैविक युद्धासाठी चीन ने तयार केलेलं जैविक अस्त्र आहे.
जैविक अस्त्रांचा या आधी झालेला वापर:
कोरोना हे जैविक अस्त्र आहे की नाही येणारा काळ सांगेल. पण, जैविक अस्त्रांचा वापर युद्धात होण्याची ही काही पहिली वेळ नाहीये.
मागील शतकामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जीवघेण्या मोहरीच्या वायूचा वापर करण्यात आला होता. जपान आणि जर्मनी या दोन्ही देशांनी जैविक अस्त्र तयार करण्यासाठी प्रयत्न केले होते.
जैविक अस्त्र तयार करण्याचा मनसुबा अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या देशांनी शांतता युद्धानंतर जाहीर केला होता. या प्रयत्ना नंतरच ऐरोसोल स्प्रे ची निर्मिती करण्यात आली जे की विषाणू ला विविध ठिकाणी मिसाईल मधून पोहोचवू शकते.
जैविक अस्त्रांच्या वापर बंदी चा करार हा जगातील २२ देशांनी संमत केला आहे. पण तरीही जैविक अस्त्र निर्मिती वर कुठलाही ठोस निर्बंध जगातील कोणतीही संस्था आजही आमलात आणू शकलेली नाहीये.
काही देश आजही जैविक अस्त्रांचा साठा बाळगून आहेत याबद्दल संशोधन सुरू आहे.
जवळपास १२ प्रकारचे असे जैविक अस्त्र आहेत जसं की, anthrax, इबोला, टायफस या प्रकारचे जैविक अस्त्र हे कधीही लोकांवर अतिरेक्यांकडून वापरल्या जाण्याची शक्यता टाळता येत नाही.
भारतावरील जैविक अस्त्रांचं संकट:
कोरोना वर मात करण्यासाठी भारत सरकारने जाहीर केलेलं लॉकडाऊन, बाहेरून येणाऱ्या लोकांच्या व्हिसा थांबवणे, परदेशातून आलेल्या भारतीय लोकांना क्वारंटाइन मध्ये ठेवणे यामुळे भारत देशाने मार्गदर्शक अशा काही उपाययोजना अवलंबल्या आहेत.

ही भारताची स्वातंत्र्य लढाई नंतरची सर्वात मोठी लढाई मानली जात आहे.
भारताची action plan:
भारत सरकारने काही मित्र राष्ट्रांसोबत हात मिळवणी करून भारतात एक मोठी गुंतवणूक करण्याच्या विचारात आहेत. ज्यामध्ये, रिसर्च वर भर दिला जाईल प्रामुख्याने या विषयावर की असे वायरस हे वातावरणात कसं शोधता येतील ?
एक कमिटी अशी स्थापन व्हायला हवी ज्यांनी की जैविक अस्त्रांचा केलेला त्वरित शोधून काढता येईल. इस्राईल, डच यासारख्या देशांनी सुद्धा या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
किती तरी देशांनी जैविक अस्त्र हे सुद्धा त्यांच्या शास्त्र साठ्यात जमा करून ठेवले आहेत. भारताने आपली जैविक अस्त्रांबरोबर करावी लागणारी लढाई आतापर्यंत खूप संयमाने लढली आहे.
किती तरी देशांनी भारताच्या कृतीचं कौतुक आणि अनुकरण सुद्धा केलं आहे. त्यामुळे आता येणारा काळच पुढील गोष्टी ठरवेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.