“फक्त एक पेग” असं म्हणत, दारूचे तोटे माहीत असूनही ‘तळीराम’ दारूच्या आधीन का जातात?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात अनेक ठिकाणी धांदल उडालेली आहे. अनेक देशांमध्ये अत्यावश्यक आणि जीवनावश्यक गोष्टींची यादी करून त्यांना शिथिलता देण्यात आलेली आहे.
अशाच अनेक घडामोडी या धोरणामुळे संपूर्ण जग आज अनुभवत आहे. अनेक ठिकाणी आपल्यासाठी तर्कशून्य अशा गोष्टींना शीथीलता देण्यात आलेली आहे.
भारतात देखील अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दारूविक्री वरील बंधनाला शिथिलता देण्यात आलेली आहे.
अनेक प्रकारची परस्पर विरोधी वक्तव्ये देखील आपण या काळात या निर्णयामुळे नक्कीच ऐकली असतील.
काही जण म्हणत आहेत की अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी मद्य व्यवसायातून येणारा कररूपी पैसा आपल्याला गरजेचा आहे तर याउलट काहीजण या निर्णयाचा कडाडून विरोध करताना दिसून येत आहेत.
पण मुळात दारू ही हानिकारक आहे हे आपल्या सर्वांना चांगलेच माहिती असताना देखील लोक दारूच्या एवढं आधीन का जातात असा विचार कोणीही करत नाहीत.
आज आम्ही ह्या लेखाच्या माध्यमातून या प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत!
संपूर्ण जगामध्ये दारूच्या दुष्परिणामांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आढळतं.
असं असून देखील मागच्या काही वर्षांमध्ये दारू विक्रीचा आलेख मात्र चढताच आहे असे लक्षात येते भारतात देखील परिस्थिती काही वेगळी नाहीये.
दारूचे व्यसन लागण्यासाठी शारीरिक तसेच मानसिक गोष्टी कारणीभूत असतात. त्यासोबतच आपण स्वतःवरती मर्यादा ठेवणे देखील अत्यंत गरजेचं आहे.
देशामध्ये दरवर्षी लाखो लोक दारू सेवन केल्यामुळे मृत्यूमुखी पडतात तरीदेखील आपण आजपर्यंत या गोष्टीचा कधीही गांभीर्याने विचार केल्याचं जाणवत नाही.
जेव्हा आपण काही कारणास्तव नाराज असतो अशावेळी दारूचे सेवन केल्यामुळे तुम्हाला मानसिक दृष्ट्या देखील याचे व्यसन जडू शकते,
त्यामुळे या गोष्टीपासून दूरच राहावे आणि जर सेवन करायचं असेल तर गरज म्हणून मद्यसेवन करू नये. यासोबतच अजूनही काही कारण आहेत ज्यामुळे तुम्हाला दारूची सवय जडू शकते.
ही कारणे देखील आपण जाणून घ्यायला हवीत. व्यसन जडण्याची अनेक प्रकारची कारण सहजपणे सांगतात परंतु मुख्यत्वे ही कारणं मुख्यत्वे दोन प्रकारांमध्ये विभागली जाऊ शकतात.
एक म्हणजे अशी कारणं जे आपण बदलू शकत नाही पण आपल्या मनावर ताबा ठेवत आपण दारूपासून या परिस्थितीमध्ये दूर होऊ शकू!
आणि दुसरी अशी कारणं ज्यामध्ये आपण स्वतः हुन यावर व्यसनाकडे ओढले जात असतो अशा वेळी देखील भानावर येत या व्यसनापासून दूर जाण्यातच भलाई असते.
१. अनुवंशिकता :
आता तुम्ही सर्वजण म्हणत असाल हे कसलं कारण आहे, पण काही परिस्थितींमध्ये अनुवंशिकता देखील तुमच्या व्यसनाला कारणीभूत ठरू शकते.
जर तुमच्या वंशजांनी पैकी कोणी अतिप्रमाणात व्यसन केलेलं असेल तर त्याची ती गरज अनुवंशिक पणे तुमच्यापर्यंत येऊ शकते!
परंतु अशा घटना खूप कमी प्रमाणात बघायला भेटतात आणि यावर उपाय म्हणजे आपण या गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहणे एवढाच आहे.
२. कमी वयात व्यसन जडणे :
आज भारताकडे जगातील सर्वात तरुण देश म्हणून बघितलं जातं त्यामुळे आपल्यावरती अनेक प्रकारच्या जबाबदार्या येऊन पडतात.
आपल्याला लहानपणापासून घरच्यांकडून नेहमीच सांगितलं जातं की,
व्यसनांपासून दूर राहायला हवं, वाईट गोष्टींपासून अंतर राखायला हवं, परंतु तरुण वयात कधी आकर्षण म्हणून, तर कधी मित्रांच्या आग्रहाला बळी पडून आपण दारू प्यायला सुरुवात करतो!
आणि हळूहळू त्या व्यसनाच्या आधीन होतो आणि एकदा लहान वयात तुम्ही या व्यसनाच्या विळख्यात अडकलात की हे व्यसन तुमचं संपूर्ण आयुष्य बरबाद करत!
त्यामुळे कमी वयात आकर्षण म्हणून देखील या गोष्टींपासून दूरच राहायला हवं.
३. वातावरण :
आपल्या आयुष्यावर आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा फार मोठा परिणाम असतोच.
त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात व्यसनाधीनता असेल तर कळत-नकळतपणे तुमच्यावरती देखील या गोष्टीचे वाईट परिणाम दिसून येतील,
आणि योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर तुम्ही देखील एक दिवस या व्यसनाला बळी पडाल.
४. मानसिक तणाव :
आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे चढ-उतार येतच असतात अशा अनेक घटना घडतात ज्यामुळे आपण प्रचंड प्रमाणात मानसिक तणावाखाली येतो.
अशा परिस्थितीत जर तुम्ही दारूच्या संपर्कात आलात तर ती तुमची गरज होते आणि मग तुम्हाला नेहमीच त्या गोष्टीची आवश्यकता जाणवु लागते,
त्यामुळे पुढच्या गोष्टी टाळण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत दारूपासून दूर राहणंच योग्य आहे.
५. गरीबी :
आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्या परिश्रमावरती बदलायच्या असतात. गरिबी अशी समस्या आहे जी दारू पिऊन कधीच सुटणार नाही याची जाणीव असू द्या.
आपण अनेक ठिकाणी बघतो गरीब व्यक्ती आपल्या हतबलतेमुळे आणि परिस्थितीमुळे दारूच्या आहारी गेलेला असतो आणि त्यामुळे त्याच्या सोबत परिवाराची देखील फरफट होत असते.
मुलं शिक्षणापासून वंचित राहतात आणि त्याच्या पत्नीला कुठेतरी रोजगार शोधून संसाराला हातभार लावावा लागतो,
त्यामुळे गरीब परिस्थिती अनुभवत असाल तर दारूपासून अंतर ठेवणे कधीही चांगले.
६. घरामध्येच दारूचे सेवन होत असणे :
अनेक ठिकाणी उच्चभ्रू समाजात घरातच आपल्या मुलांसमोर दारूचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते हे सर्व एका मर्यादेपर्यंत ठीक आहे.
परंतु तुमच्या या सवयींमुळे मुलांवरती काय संस्कार होत असतील याचा देखील नक्कीच विचार करायला हवा.
घरामध्येच हे सर्व होत असल्याने मुलेदेखील या गोष्टींना निषिद्ध मानत नाहीत आणि याचा परिणाम दारूच्या व्यसनाधीनतेचे मध्ये होऊ शकतो!
त्यामुळे आपण आपल्या मुलांवर ती काय संस्कार करायला पाहिजेत याचा विचार नक्कीच व्हायला हवा.
७. औषध :
अनेक वेळी व्यसनाची सवय जडलेल्या व्यक्ती दारूच्या सेवनाला औषधाशी जोडतो.
” एक पेग शरीरासाठी चांगला असतो ” हे कुठेतरी ऐकलेलं वाक्य आपल्या सर्व मित्रांना सांगत असतो!
पण लक्षात घ्या ही एक पेग ची सवयच पुढे जाऊन तुम्हाला दारूचे व्यसन लावते त्यामुळे या एक पेग पासूनच दूर राहा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.