केवळ ‘अल्झायमर’ मुळे नव्हे तर या ८ कारणांमुळे सुद्धा होतो विसराळूपणा…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्यापैकी प्रत्येक जण कधीतरी काहीतरी नक्कीच विसरलं असेल आणि या विसरण्याच्या सवयी मुळेच पुढे आपल्याला अनेक अनपेक्षित प्रश्नांना आणि चिंतेला सामोरं जायला लागतं.
अनेक व्यक्तींना असं काहीतरी लहान – मोठी विसरण्याची सवय असते पण या सवयीमुळे त्यांच्यामध्ये अनेक बदल नेहमीच घडत असतात!
काहीजणांच्या भीती मागील कारणं मात्र वेगळीच असतात. त्यांना असं वाटतं की ही विसरण्याची सुरुवात म्हणजे अल्झायमर या असाध्य आजाराची सुरुवात आहे की काय?
अशा लहान लहान गोष्टी विसरल्याने खरंच हा आजार होतो का. अजून कुठली कारण आहेत ज्यामुळे आपण स्मृतीभ्रंश अनुभवू शकतो हे आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा –
===
आजकालच्या आपल्या या धकाधकीच्या आयुष्यात आपण अनेक गोष्टी सांभाळत आयुष्य जगत आहोत.
एक व्यक्ती अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पेलून या जगामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अनेक प्रकारची काम आणि चिंता डोक्यात घेऊन आपण दिवसभर वावरत असतो.
अशातच जर छोटी गोष्ट जरी विसरली तरी त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते!
त्यामुळे आपण लहान लहान गोष्टी जरी विसरायला लागलो तरी असाध्य आजार होण्याच्या भीतीने चिंता करायला लागतो.
मित्रांनो, लक्षात घ्या गोष्टी विसरणं हा मनुष्याचा स्वभाव आहे त्यामुळे जर एखादी गोष्ट विसरली तर चिंता न करता पुढील गोष्टी करत राहणं हाच एकमेव उपाय आपल्याकडे आहे.
त्यामुळे, असा विचार कधीच करू नका की मला आता असाध्य आजार जडला आहे. मित्रांनो लक्षात घ्या गोष्टी विसरण्यासाठी इतरही अनेक घटक आहेत जे आयुष्यभर तुमच्या सोबत राहत नाहीत.
काही परिस्थितींनुसार आपण या घटकांना बळी पडतो त्यामुळे एखादी गोष्ट विसरली की लगेच अल्झायमर झालेला आहे असा विचार न करता त्यामागील तांत्रिक कारणांचा शोध घ्या आणि चिंतामुक्त व्हा.
विसरण्यासाठी इतरही अनेक जे घटक कारणीभूत असतात त्या घटकांबद्दल आपण आता जाणून घेऊयात.
आपल्या शरीर आणि मेंदू यांच्यातील संतुलन हे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतं आणि याच परिस्थितीचा परिणाम देखील आपल्या स्मरणशक्तीवर नेहमीच होत असतो.
त्यासोबतच आपलं दैनंदिन वेळापत्रक लक्षात ठेवण्यासाठी एक विशिष्ट प्रमाणात आपली उर्जा खर्च होत असते.
ही ऊर्जा जर इतर गोष्टींवरती खर्च करण्यात आली तर, आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट देखील लक्षात राहणार नाही.
अनेक वेळा आपल्या आजूबाजूला भावनिक दृष्ट्या एक विचित्र परिस्थिती निर्माण होते ज्यामुळे आपण दैनंदिन तसेच अत्यंत महत्त्वाची गोष्ट देखील सहज विसरू शकतो.
अशा प्रकारची परिस्थिती जर खूप वेळ आपल्या आयुष्यामध्ये राहिली तर यामुळे तात्पुरत्या काळासाठी आपण काही गोष्टी नक्कीच विसरू शकतो.
परंतु याचा अर्थ असा नाही की आपण त्याच्यावरती कुठलाही उपाय करू शकत नाही.
आपल्या परीवारा च्या मदतीने आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात काही बदल घडवून आणत या वरती कायमचा उपचार अगदी सहज करू शकतो.
१. टेंशन :
आजच्या स्पर्धेच्या आयुष्यात आपल्या सर्वांना रोज काहीतरी टेन्शन ला सामोरे जावं लागतं!
या टेन्शनमुळे आपल्या मेंदूतील इतर आवश्यक गोष्टी कधीकधी विसरू शकतात पण हे फक्त काही काळच राहतं हे लक्षात घ्या.
या सर्व गोष्टींपासून लांब राहण्यासाठी आपला आपल्या मनावरती ताबा हवा.
आपण टेन्शन पासून कशाप्रकारे अलिप्त राहू शकतो याचा विचार करायला हवा, आपल आयुष्य निखळपणे जगण्यासाठी टेन्शन पासून अंतर ठेवणे ही आजच्या काळातील सर्वात महत्वाचे गोष्ट आहे.
२. नैराश्य :
नैराश्यामुळे मानवी जीवनावर अनेक नकारात्मक परिणाम होतात समोर कुठलाही मार्ग दिसत नाही आणि अशा परिस्थितीत आपल्या स्मरणशक्तीवर ही परिणाम होऊ शकतो हे लक्षात घ्यायला हवं.
नैराश्यामुळे फक्त तुमच्या स्मरणशक्तीवर नव्हे तर एकाग्रतेवर आणि त्यासोबतच वास्तवतेवर देखील तुमचं प्रभुत्व राहत नाही.
अशा परिस्थितीत नैराश्यामुळे तुम्हाला झोपदेखील येत नाही, त्यामुळे तुम्हाला स्मृतिभ्रंश यापासून कायमची मुक्तता हवी असेल तर त्याला आपल्यापासून नेहमी अंतर द्या.
३. न्यूनगंड :
न्यूनगंड ही एक अशी मानसिक भावना आहे ज्यामुळे तुम्हाला परिस्थिती कळत असून देखील तुम्ही त्यावरती उपाय करू शकत नाही!
म्हणजे उदाहरणार्थ तुमची उद्या परीक्षा आहे परंतु तुमच्यात असा न्यूनगंड आहे की तुमचा अभ्यास झालेला नाही आणि त्यामुळे तुम्हाला ती परीक्षा खूप कठीण जाणार आहे.
अशा परिस्थितीत परीक्षेचा पेपर सोपा जरी आला, तुम्हाला उत्तरं माहिती जरी असली तरीही फक्त न्यूनगंडामुळे तुमचा अंशकालीन स्मृति भ्रंश होऊ शकतो,
आणि तुम्हाला उत्तर येत असून देखील तुम्ही ते उत्तर लिहू शकणार नाही.
त्यामुळे कधीही न्यूनगंडाला आपल्या आयुष्यात स्थान देऊ नका अशावेळी त्वरित आपली मानसिक अवस्था ओळखत आपल्या मनात सकारात्मक विचार आणून घेऊन न्युन गंडा वरती मात करणे अत्यंत आवश्यक आहे.
हे ही वाचा –
===
४. ड्रग्स आणी मेडिकल ट्रीटमेंट :
दारूचे सेवन केल्यामुळे किंवा प्रतिबंधित ड्रग वापरल्याचेआपल्या मानवी शरीरावरती अनेक नकारात्मक परिणाम होत असतात.
तुमच्या शरीरातील अनेक अवयवांवरती या नशेचे परिणाम तुम्हाला दिसून येतील.
याच्या वापरामुळे तुम्ही तुमचे स्मृती कायमची हरवू शकता त्याच्यावरती जर लगेच इलाज केला गेला तर कदाचित काही प्रमाणात धोका टळू शकतो.
त्यासोबतच जी मेडिकल ट्रीटमेंट डॉक्टर तुम्हाला देतात त्यामुळे देखील तुमच्या शरीरावरती विविध प्रकारचे परिणाम होतात अर्थात हे साईड इफेक्ट असतात!
आणि यामध्ये डॉक्टरांची कसलीही चूक नसते कारण तुम्हाला झालेल्या आजारातून बाहेर काढणे हीच डॉक्टरांची प्राथमिकता असते.
परंतु कधीकधी नकळतपणे या गोळ्या औषधांचे साईड इफेक्ट नक्कीच होऊ शकतात.
जर तुम्ही एकाच आजारासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे गेला असेल तर नवीन डॉक्टरांकडे जात असताना जुन्या डॉक्टरांनी दिलेली गोळ्या औषध नवीन डॉक्टरांना नक्कीच दाखवा!
५. केमोथेरपी :
लक्षात घ्या ज्या व्यक्तीला कॅन्सर हा दुर्धर आजार जडलेला असतो अशा व्यक्तींना ट्रीटमेंट म्हणून केमोथेरपी वापरली जाते.
परंतु काही प्रकरणांमध्ये केमोथेरपीमुळे स्मृतीभ्रंश झाल्याचंही समोर आलेलं आहे. अर्थात हा साईड इफेक्ट होता हे लक्षात घ्या.
आणि हा परिणाम फक्त काही प्रकरणांमध्ये आढळून आलेला आहे त्यामुळे तो प्रत्येकालाच होईल असं नाही.
६. हृदय शस्त्रक्रिया :
काही संशोधनाअंती असे निदर्शनास आले आहे की बायपास शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही प्रकरणांमध्ये कन्फ्युज होण्याचे आणि स्मृतिभ्रंश होण्याचे परिणाम आढळून आले आहेत.
परंतु चिंता करू नका जसे जसे तुम्ही स्वस्थ आणि बरे होता तसे तसे ही लक्षणे देखील कमी होतात,
परंतु या काही प्रकरणात होणाऱ्या साईड इफेक्टमुळे सर्जरी थांबवणे चुकीचे आहे कारण साईड इफेक्ट पेक्षा मानवाचा जीव अत्यंत मोलाचा आहे.
७. भूल देणे :
काही घटनांमध्ये भूल दिल्यानंतर काही दिवस संभ्रमावस्था आणि स्मृतिभ्रंश आढळून आलेली आहे.
त्यामुळे भूल दिल्यामुळे देखील तुम्हाला काही दिवस अशा प्रकारे देखील स्मृतीभ्रंशाचा त्रास जाणू शकतो कारण दिलेल्या भुली मधून बाहेर निघण्यासाठी काहीवेळेस मेंदूला वेळ लागतो.
पण हे अगदी काही दिवसात बरं होत असल्यामुळे याला फार गांभीर्याने घेऊ नये तरीही अशा परिस्थितीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा.
८. मेंदूला दुखापत होणे :
कधीकधी आपल्याला मोठे अपघात होतात अशावेळी जर चुकून आपल्या मेंदूला गंभीर दुखापत झाली तर अशाप्रकारे स्मृतिभ्रंश याचा धोका असू शकतो.
हे लगेच लक्षात येत नाही परंतु काही कालावधीनंतर हा आजार नक्कीच लक्षात येतो,
त्यामुळे सर्वात महत्त्वाचं आहे की आपण कुठल्याही अपघाताला बळी पडणार नाही याची काळजी घेणे गाडी चालवताना नेहमीच हेल्मेट घालने गरजेचे आहे!
कारण अपघात झाला तरीही आपल्या मेंदूला कसलीही दुखापत होणार नाही आणि जरी अशाप्रकारचा कुठलाही अपघात झाला तरी लक्षात घ्या.
पूर्ण बरे वाटल्याशिवाय दैनंदिन आयुष्याला सुरुवात करू नये आराम करावा
ही आहेत लहान मोठी कारण ज्यामुळे अल्जाइमर न होता देखील तुम्हाला स्मृतिभ्रंशाचा धोका उद्भवू शकतो!
त्यामुळे दैनंदिन आयुष्यामध्ये या गोष्टी आपल्यासोबत होणार नाहीत याची काळजी घ्या
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.