Site icon InMarathi

महाभारतातील हे वीर अज्ञात राहिले – त्यांचा पराक्रम जाणून घेणं आवश्यक आहे…!!

mahabharat inmarathi 9

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्राचीन भारतीय संस्कृतीतील प्रमुख महाकाव्यांपैकी ‘महाभारत’ हे एक महत्वाचं महाकाव्य आहे. हेच महाभारत आपल्याला धर्म, राजकारण, युध्द, पालकत्व आणि नीती याचे संस्कार देतं.

अनेक भारतीय आणि अगदी परदेशीय विद्यार्थी सुद्धा महाभारत जाणून घेण्यासाठी अभ्यासू वृत्तीने महाभारताचे पारायण करत असल्याची उदाहरणे आपण ऐकतो.

पुरुषार्थ, भक्ती, जीवनाची ध्येये, याबद्दल तात्विक विश्लेषण या सगळ्यांबद्दलचे प्रसंग आपण वेळोवेळी महाभारतातून पाहत आलोय.

 

 

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र धर्म ग्रंथ म्हणून मानलेली ‘भगवद् गीता’ ही महाभारताने जगाला दिलेल्या शिकवणी पैकी एक असे मानले जाते.

आजवर अनेक चित्रपट आणि सीरिअल ह्या सगळ्यांमधून प्रदर्शित झालेले महाभारत आपण पहिले आहे. परंतु तरीही महाभारतातील काही पात्रे ही पडद्याआडचं राहिली.

लहानपणी कधीतरी आजीच्या गोष्टीत उल्लेख झालेली किंवा एखाद्या छोट्या उल्लेखात ऐकलेली ही पात्रे, चला बघूया..

 

१.अहिलावती:

 

 

भीम-पुत्र घटोत्कच याची पत्नी अहिलावती ही लग्नापूर्वी मौरवी म्हणून ओळखली जायची. नागकन्या म्हणून उल्लेख असलेल्या मौरवीला खूप कठीण परीक्षेत घटोत्कचाने जिंकून घेतले आणि विवाह केला.

विवाहानंतर घटोत्कच आणि अहिलावती यांचा मुलगा बर्बारिका याला अहिलावातीने स्वतः युद्धशास्त्र शिकवले.

 

२.बर्बारिक:

 

 

घटोत्कच आणि अहिलावतीचा पुत्र बर्बारिक हा अतिशय तीव्र योद्धा म्हणून ओळखला जायचा.

अहिलावती कडून युध्दशास्त्र शिकून तो युद्धात पारंगत झाला होता शिवाय, वाल्मिकी ऋषींकडून भेट मिळालेले असे तीन बाण बर्बरिक कडे होते, ज्यामुळे तो त्याच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला नष्ट आणि जतन करून ठेऊ शकेल असा वर त्याला मिळाला होता. याचमुळे त्याला ‘तीन बाण-धारी’ असे नव पडले.

अजिंक्य अशा बर्बारिकावर एका तत्व बंधनकारक होते की, तो दुर्बल बाजूसाठीच युध्द लढू शकतो. या तत्वामुळे बर्बरिक ज्या बाजूसाठी युध्द लढायला जाईल ती बाजू दुर्बल होऊ शकते, हे श्रीकृष्णाने जाणून त्याला युद्धापासून लांब ठेवले.

 

३.जरासंध:

 

 

जरासंध हा मगध राज्याचा राजा आणि शंकराचा निस्सीम भक्त म्हणून ओळखला जायचा. जरासंधाच्या शरीराचे तुकडे झाले तरी ते आपोआप जोडले जाऊन पुन्हा एकसंध शरीर बनेल असे वरदान त्याला मिळाले होते.

श्रीकृष्णाशी वैर असल्याने महाभारतात जरासंधाला नकारात्मक प्रकाश झोतात ठेवले जाते. कृष्णाच्या मदतीने भीमाने जरासंधाचा युद्धात वध केल्याचे सांगितले जाते.

 

हे ही वाचा –

===

 

४.युयुत्सु:

 

 

धृतराष्ट्र याचा पुत्र युयुत्सु, हा कौरवांचा सावत्र भाऊ मानला जातो.सौवाली आणि धृतराष्ट्र यांचा पुत्र युयुत्सुला अशी जाणीव झाली की कौरव चुकीच्या मार्गावर आहेत त्यामुळे त्याने त्यांची बाजू घेण्यास नकार दिला.

त्यांनतर तो एकटाच कुरूक्षेत्रावरील युद्ध संपल्यावर जिवंत इंद्रप्रस्थी परतला आणि राज्य करू लागला अशी आख्यायिका सांगितली जाते.

 

५.विकर्ण:

 

 

धृतराष्ट्र आणि गांधारीच्या पुत्रांपैकी विकर्ण हा कौरवांचा एक भाऊ मानला जातो. विकर्णचा न्यायावर विश्वास खूप विश्वास होता असं मानलं जातं. कौरव अयोग्य आहेत हे विकर्णाला माहित असूनही त्यातून सुटण्याच्या कोणताच मार्ग त्याच्यापुढे नव्हता

भीष्म, युधिष्ठिर आणि द्रोणाचार्य यांसारखी मोठी मंडळी जेव्हा शांत होती तेव्हा विकर्ण याने द्रौपदी वर होणार्‍या अत्याचारांविरुध्द आवाज उठवला.

तो नेहमीच धर्माचा अभ्यासक म्हणून ओळखला गेला. आणि अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख चांगली आणि योग्य व्यक्ती चुकीच्या बाजूला होतो असं केलं जातं.

 

६.राजा शल्य:

 

 

मद्र राज्याचा राजा. एक उत्तम धनुर्धारी, शक्तिशाली योद्धा आणि उत्तम गदाधरी म्हणून त्याची इतिहासात नोंद केली जाते. शल्याने कौरवांच्या बाजूने युद्ध लढावे म्हणून दुर्योधनाने त्याला कपटी मार्गाने जिंकून घेतल्याचेही सांगितले जाते. या युद्धात शल्याने दुर्योधनाच्या सारथ्याची भूमिका निभावली.

शल्याकडे असलेल्या क्षमतांमुळे तो अजिंक्य ठरत होता. शत्रू जेव्हा त्याच्यावर अतिआक्रमकतेने प्रहार करायचे त्यानुसार तो अधिकाधीक ताकदवान ठरत राहिला. पुढे युधिष्ठिराने त्याचा वध केला.

 

हे ही वाचा –

===

 

७.शिखंडी:

 

 

मूलतः शिखंडी ही पांचालाचा राजा द्रुपद याला झालेली मुलगी. युद्धात पांडवांच्या बाजूने लढणाऱ्या तिच्या पित्यासोबत आणि बंधू दृष्ट्द्युम्न याच्या सोबत शिखंडीचाही सहभाग होता.

युद्धात भीष्मापासून वाचण्यासाठी अर्जुनाने शिखंडीचा ढाल म्हणून वापर केला. नपुंसक योध्यासमोर भीष्माने शस्त्र चालवण्यास नकार दिला तेव्हाच  भीष्म शरपंजरी पडले.

इच्छा मृत्यू म्हणून मरण पत्करलेल्या भीष्माचे मृत शरीर मकर संक्रांतीच्या दिवशी बाणांच्या शय्येवरून पाठवून देण्यात आले.

 

८.राधा:

अत्यंत छोटे पण महत्वाचे पात्र म्हणजे राधा. कर्णाची पालनकर्ती, आणि आई हिचा महाभारतात अत्यंत महत्वाचा वाटा आहे. कर्ण हा महाभारतातला महत्वाचा योद्धा म्हणून ओळखला जातो.

कर्णाला अजिंक्य योद्धा बनवण्यासाठी तिने तिची तत्व आणि विचारधारा कर्णामध्ये बिंबवली होती. धृतराष्ट्राची सारथी म्हणून ती कुरुक्षेत्रात सहभागी झाली होती.

 

 

९. सात्यकी:

 

 

अर्जुनाचा शिष्य आणि श्री कृष्णाचा निस्सीम भक्त सात्यकी हा महाभारतातला एक उत्तम योद्ध होता परंतु कधी फार प्रकाशझोतात आला नाही.

युधिष्ठिर आणि द्रोण यांच्याविरुद्ध अर्जुनाचा बचाव करून सत्याकीने महाभारतात चांगली कामगिरी बजावली. युद्धात बचावला परंतु नंतर गांधारीच्या शापाने सात्यकीचा मृत्यू झाला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version