आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
चिझी बर्गर आणि फ्रेंच फ्राईस!! ऐकून तोंडाला पाणी सुटलं ना?
तर बर्गर आणि फ्राईज म्हटलं की डोळ्यासमोर येतो लाल रंगाचा बॉक्स आणि त्यावर लिहिलेला पिवळ्या रंगाचा ‘M’, अर्थात मॅकडोनल्ड!
इथले अनेक वेगवेगळे पदार्थ आपल्याला आवडतात. व्हेज , नॉन व्हेज , हॅपी मिल्स , आलू टिक्की , कोक , महाराजा मिल यांसाठी तर आपण मॅकडोनल्डमध्ये नेहमी जातो.
खिशाला परवडेल आणि जिभेचे चोचले पुरवेल असा एक पर्याय आपल्याला मॅकडीमुळे मिळाला.
तर याच मॅकडोनल्ड कडून आयुष्यभरासाठी आपल्याला त्यांच्याकडे बनणारे सगळे चमचमीत आणि चिझी पदार्थ फुकट मिळाले तर?
कल्पना ऐकूनच थक्क व्हायला होतं ना. एका क्षणात आपल्या डोळ्यासमोर मॅकडीचे सगळे पदार्थ येतात. त्यातही हे सगळे पदार्थ फ्री मिळाले तर….
आपल्यासाठी हे ती तर एक मेजवानीच ठरेल. मॅकडोनाल्डड्समधे गेल्यावर तुमच्या -आमच्या सारख्यांच्या मनात हा प्रश्न आल्यावाचून राहत नाही.
या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे मॅकडॉनल्ड्सच्या “गोल्ड कार्डने!” मॅकडोनाल्डस या कंपनीने आधी अनेक लोकांना हे कार्ड देऊन फ्री फूड साठीचा पासच दिला होता.
कोणतेही पदार्थ घ्या आणि मोफत खाऊन एन्जॉय करा अशी ऑफरच यामुळे ग्राहकांना मिळाली होती.
उदाहरण द्यायचं झालं तर, रॉब लोव याना गोल्ड कार्ड मिळालं होतं. तसेच मॅक मफिन चे निर्माते हर्ब पीटरसन यांना सुद्धा ते कार्ड मिळाले आहे.
स्थानिक फ्रॅंचाईजी असलेले लोक मोठमोठ्या सेलिब्रिटीज किंवा चांगले काम करणाऱ्याना सोशल वर्कर्सना हे कार्ड देऊ करतात.
त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी हे कार्ड दिले जाते.
पण चार्लस रामसे याने, मे २०१९ मध्ये तीन किडनॅप झालेल्या महिलांना सोडवण्यासाठी चांगली कामगिरी केली म्हणून ओहायो मधल्या स्थानिक फ्रॅंचाईजीनी त्याला हे कार्ड दिले.
आणि आयुष्यभरासाठी अनलिमिटेड फास्ट फूड फ्री देण्याचे आश्वासन दिले.
२०१५ मध्ये, हॅम्बर्ग्लर म्हणून ओळखले जाणारे ओटावा सिनेटर्सचे गोलंदाज, अॅन्ड्र्यू हॅमंड यांनाही हे कार्ड मिळाले, ज्यामुळे त्याला ऑटवाच्या फ्रँचायझीकडून मॅकडोनाल्डस फ्री फूड मिळायला लागले.
लॅरी क्रेन्डल यांना त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त हे कार्ड देऊ केले होते.
कॅलिफोर्नियामधील सेंट बार्बरा याठिकाणी समाजासाठी समाजसेवक आणि तज्ञ म्हणून काम करताना लॅरी क्रेन्डल यांनी कोट्यावधी डॉलर्स जमुन देण्यासाठी मदत केली होती!
म्हणून पीटरसन यांनी हे गोल्ड कार्ड देऊ केले होते.
पण आपल्या सारख्या सर्व सामान्यांसाठी २०१८ मधे मॅकडॉनल्ड या कंपनीने, गोल्ड कार्ड साठी पहिल्यांदाच स्पर्धा आयोजित करून भाग्यवान विजेत्यांना ते कार्ड देऊ केले होते.
गोल्ड कार्ड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण आयुष्यभरासाठी मॅकडॉनल्ड मधून फ्री फास्ट फुड दिले जाणार असे कंपनीकडून सांगण्यात आले होते.
या कार्ड ची जाहिरात करताना मॅक-गोल्ड कार्डला “ancient secret” असं संबोधण्यात आलं होतं.. पण हे कार्ड मिळवायचं कसं?
तर, मॅकडॉनल्डच्या स्थानिक फ्रँचायझीकडून हे कार्ड मिळवू शकतो.. आणि स्थानिक परिसरात, हे कार्ड असलेल्यांना फ्री फुड मिळू शकते असे सांगण्यात आले होते.
हे कार्ड मिळवण्यासाठीच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दोन ऑप्शन्स देताना कंपनीने सांगितले होते,
एकतर मॅकडॉनल्डचे मोबाइल ॲप डाऊनलोड करून त्यावरून ऑर्डर द्यावी, प्रत्येक ऑर्डर नुसार तुम्हाला एकदा स्पर्धेत सहभागी होता येते, किंवा मॅक डोनाल्डसला त्यांनी आखून दिलेल्या मांडणीतून मेल करावा.
त्यानंतर कंपनीकडून यासाठी कार्यवाही करण्यात येणार होती.
खरं तर, स्पर्धेचे शीर्षक होते “मोबाईल ऑर्डर वापरा, आमच्या अॅपवर पैसे द्या आणि आपण विनामूल्य मॅकडोनाल्ड फूड फॉर लाइफ जिंकू शकता”
गोल्ड कार्डचा उद्देश “फ्री फूड फॉर लाईफ” असला तरी पण बक्षीस मात्र आठवड्यातुन दोन जेवणापुरते ५० वर्षांच्या काळासाठीच मर्यादित होते.
तशा अटी आणि शर्ती कंपनीकडून ठेवण्यात आल्या होत्या.
तरीही बक्षीसपात्रास ५२३६५ डॉलर्स आणि याशिवाय कर (tax) भरण्यासाठीची आवश्यक रक्कम देण्यात येईल असे कंपनी कडून स्पष्ट करण्यात आले होते.
मिळणारी रक्कम छोटी नसल्याने भरगोस प्रतिसाद मिळाला. अनेक लोकांनी या संकल्पनेला पसंती दर्शवल्यामुळे मॅकडॉनल्डची ही गोल्ड कार्ड संकल्पना मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली.
यामुळे मॅकडीच्या उत्पन्नामध्येही घसघशीत वाढ झाली. मात्र एकीकडे याचा फायदा जरी होत असला तरीही या कार्डबद्दल अनेक गैरसमज आणि गूढता पसरत चालले होते.
त्याचाही काही प्रमाणात त्रास कंपनीला सहन करावा लागला.
अनेक सेलिब्रिटीज त्यांच्याकडे गोल्ड कार्ड असल्याच सांगतात. अनेक जणांचा असा दावाही व्हायरल झाल्याचं बघायला मिळाले होत.
प्रत्यक्ष मात्र असे म्हटले जात होते की, आतापर्यंत जगात अशा दोनच व्यक्ती आहेत; ज्यांना जगभरात कोठेही या कार्डचा वापर करून फ्री फूड घेता येईल.
एक बिल गेट्स आणि दुसरे मिट रोमने यांचे वडील.
मिट रोमने याने सांगितले की त्याच्या वडिलांकडे मॅकडॉनल्डने दिलेले “पिंक कार्ड” आहे ज्यामुळे त्यांना जगभरात कोठेही फ्री फूड मिळू शकते.
परंतु या बाबतचे कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याने, २०१२ सालच्या कॅम्पेन मध्ये हे स्पष्ट करणयात आलं की, जगातील सर्वात श्रीमंतांपैकी एक बिल गेट्स यांच्याकडेच हे कार्ड आहे.
ज्यामुळे ते जगभरातील कोणत्याही भागात जाऊन फ्री फूडचा आस्वाद घेऊ शकतात.
एकंदरच फ्री फूड मिळविण्यासाठी असलेले हे कार्ड आपल्या सगळ्यांकडे असावे अशी आपली अपेक्षा असेल पण तरीही प्रत्यक्षात मात्र सगळ्यांना याचा लाभ घेता येईलच असं नाही.
योग्य नियोजन करून स्पर्धा आयोजित केल्याने ही स्पर्धा चांगलीच गाजली होती. त्यामुळे आजही अनेकजण या फ्री कार्डची मागणी करताना दिसतात.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.