आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अस्थमा पेशंटसाठी कोणताही ऋतू तसा मनस्तापाचा असतो.कारण थंडी ,पावसाळ्यात तर हवेमध्ये होणाऱ्या बदलामुळे ढगाळ हवामानामुळे देखील अस्थमा पेशंटला त्रास होतो.
आता तर ऋतुमान बदलल्या सारखीच परिस्थिती आहे. उन्हाळ्यातही प्रचंड वादळी पाऊस येतो आकाश १ ते २ दिवस ढगाळ असतं, हवेमध्ये गारवा जाणवतो आणि या सगळ्याचा त्रास अस्थमा पेशंटला होतो.
हे सगळं टाळण्यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स जर आपण फॉलो केल्या तर अस्थमा तितका त्रासदायक होणार नाही. अस्थमावर आजपर्यंत तरी कोणताही रामबाण इलाज नाही.
हा मुख्यतः आपल्या फुफ्फुसांशी निगडीत आजार आहे. श्वास घ्यायला यामध्ये त्रास होतो आणि शरीराला ऑक्सिजन कमी मिळतो.
सध्या आलेल्या कोरोना मध्ये देखील श्वास घ्यायला त्रास होतोय. त्यासाठीच अस्थमा असणाऱ्या व्यक्तीला कोरोना होण्याची शक्यता अधिक आहे.
हे टाळण्यासाठीच काही सोप्या टीप्स आता पाहू
१. अस्थमा अटॅक ची एक डायरी मेंटेन करा :
अस्थमा अटॅक यायच्या वेळेस कोणती लक्षणे दिसतात याची एका डायरीमध्ये नोंद ठेवा. म्हणजे खोकला येणे, खोकल्याची ढास लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे,
दम लागल्यासारखे वाटणे अशा गोष्टी होत असतील तर त्याची नोंद ठेवा. म्हणजे पुढे काळजी घेण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
अशा नोंदी ठेवल्याने लक्षात येईल की प्रदूषण, धूम्रपान, एलर्जी आणि फ्ल्यू व्हायरस इत्यादी पैकी कोणती कॉमन गोष्ट अटॅक येण्यासाठी कारणीभूत आहे.
एलर्जी असणाऱ्या गोष्टी शक्यतो टाळा. कधीकधी अलर्जेटिक गोष्टींच्या जवळ गेल्यामुळे देखील अस्थमाचा अटॅक येऊ शकतो.
उदाहरणार्थ धूळ, उदबत्ती धूप इत्यादीचा धूर, अगदी फुलांची सुद्धा एलर्जी माणसाला असू शकते, आणि त्यामुळे अस्थमाचा त्रास होऊ शकतो.
कबूतर किंवा कुत्रा मांजरसरखे पाळीव प्राणी तुमच्या आसपास असतील तर त्याचाही त्रास अस्थमॅटिक लोकांना जास्त होतो. त्यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्यावी.
१. तुमचे बेडशीट पिलो कव्हर्स नियमितपणे बदलले पाहिजेत. त्यांच्यातील छोटे छोटे धुळीचे कण देखील निघावेत म्हणून ते गरम पाण्यात भिजवून नंतरच धुऊन घ्यावेत.
२. तुमच्या रूम मधील धूळ घालवण्यासाठी रूम स्वच्छ झाडून पुसून घेतलेली असावी. त्यातील हवा शुद्ध असावी. यासाठी एअर पुरिफायरचा वापर करावा.
कुठेही धुळीचे कण असू नयेत याची काळजी घ्यावी. व्हॅक्युम क्लिनरने बेडरुममधील गादी, सोफा या गोष्टी स्वच्छ कराव्यात.
३. खाण्याच्या सवयी ज्या गोष्टींचा पथ्य डॉक्टरांनी सांगितलं आहे ते नियमितपणे पाळले गेले पाहिजे जास्त तेलकट-तुपकट गोष्टी टाळल्या पाहिजेत, आणि सकस आहार घेण्यावर भर दिला पाहिजे.
२. धूम्रपानाची ठिकाणे टाळा :
–
हे ही वाचा – अस्थमा (दमा) रोखण्यासाठी हे घरगुती उपाय तुम्हाला हमखास उपयोगी पडतील
–
अस्थमा आणि धूम्रपान यांचा खरंतर ३६ चा आकडा आहे. दम्यासाठी धूम्रपान अत्यंत वाईट.
त्यामुळे अस्थमा असणाऱ्या पेशंटने धूम्रपान तर करूच नये शिवाय जिकडे धूम्रपान होतं अशी ठिकाणं देखील टाळली पाहिजेत.
काही काही हॉटेल्स, कॉफी शॉप यामध्ये धूम्रपान होतं ती ठिकाणं टाळली पाहिजेत. घरातल्या कोणत्याही व्यक्तीला धूम्रपान करू देऊ नये. कार मध्ये देखील कोणाला धूम्रपान करू देऊ नये.
३. फ्लू साठी व्हॅक्सिनेशन करून घ्या :
अस्थमाचा अजून एक शत्रू म्हणजे इन्फ्लुएन्झा. फ्लू झाला की अस्थमाचा अटॅक हमखास येतो. त्यासाठीच फ्ल्यू होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
फ्लू चालू झाला की न्युमोनिया होण्याची दाट शक्यता असते आणि हॉस्पिटल मध्ये दाखल व्हावं लागू शकतं.
४. नियमित व्यायाम करणे आवश्यक :
तसाही सगळ्यांनीच व्यायाम करणे गरजेचे असते. तरी त्यातही अस्थमा पेशंटने नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. जेणेकरून फुप्फुस मोकळी होतील आणि स्वच्छ हवा शरीरात जाईल.
शारीरिक व्यायामाबरोबरच पोहण्याचा व्यायाम देखील अस्थमा पेशंटला उपयुक्त ठरतो.
परंतु व्यायाम करताना दम लागत असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्यासंबंधी डॉक्टरांना आणि तज्ञांना विचारणा करून व्यायाम करणे योग्य ठरेल.
त्याशिवाय नियमितपणे प्राणायाम करण्याने देखील श्वासावर नियंत्रण ठेवता येतं. या गोष्टी नियमितपणे अस्थमा पेशंटने केल्याच पाहिजेत.
५. येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जा :
अस्थमा रुग्णांना बऱ्याचदा अटॅक येणे किंवा आणखीन काही त्रास होण्याची शक्यता खूप असते. त्यासाठी प्रत्येक अस्थमा पेशंटने त्यासाठी मनाची तयारी केलीच पाहिजे.
अस्थमाचा अटॅक येतो याचा अर्थ असाही होऊ शकतो की तुमचा अस्थमा तुमच्या कंट्रोलमध्ये नाही,
यासाठी डॉक्टरांकडे नियमित जाणे त्यांनी सांगितलेली औषधे देखील वेळेवर घेणे हे देखील तितकाच महत्त्वाचे आहे.
६. बाहेर जाताना घ्यायची काळजी :
बाहेर जायच्या आधी आपली औषधे वेळेवर घेतलेली असली पाहिजेत. त्याशिवाय औषध स्वतः जवळ बाळगणे देखील योग्य ठरते.
त्याशिवाय चेहऱ्यावर मास्क लावणे किंवा स्कार्फ बांधणे स्वतःलाच बंधनकारक करणे गरजेचे आहे.
कारण त्यामुळे बाहेरील धुळीबरोबरच बाहेरची थंड हवा देखील नाकाद्वारे शरीरात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
याशिवाय लहान मुलांना देखील अस्थमा त्रास देऊ शकतो अशा वेळेस मुलांच्या पालकांनी शांतपणे मुलांना धीर देणे आणि त्याचे औषध उपचार व्यवस्थित होत आहेत का याकडे लक्ष देणे गरजेचे असते.
–
हे ही वाचा – अस्थमासारख्या गंभीर आजारावर रामबाण उपाय ठरली आहे ही मिठाची खाण!
–
कारण अशा वेळेस लहान मुलांना देखील नक्की कळत नाही की त्यांना काय होत आहे.
बाहेर खेळायला जाण्यासाठी किंवा बाहेरचे पदार्थ खाण्यासाठी मुले हट्ट करू शकतात. अशावेळेस पालकांनी त्या परिस्थितीत मुलांना योग्यरीत्या समजावणे गरजेचे असते.
शाळेत देखील शिक्षकांना त्याच्या आजारपणाची कल्पना दिल्यास शाळेतून देखील मुलांना मग सपोर्ट मिळेल. या छोट्या छोट्या टिप्स वापरून अस्थमाचा त्रास दूर ठेवता येईल..
===
सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.