आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोणत्याही गोष्टीला, वस्तूला किंवा एखाद्या व्यक्तीला ‘नाही कसं म्हणावं?’ हा एक प्रश्न कायमच काही लोकांना पडत असतो. मुळात ही गोष्ट काहींच्या स्वभावातच नसते.
त्यामुळे अशा लोकांना व्यक्तिगत आयुष्यात त्याची कायम किंमत मोजावी लागतच असते पण आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत अपेक्षित बदल नेमका कसा करावा हे त्यांना कोणीच सांगत नसतं.
ह्या लेखातून आम्ही तुम्हाला ‘नाही म्हणण्याची कला’ शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही गोष्टी कटाक्षाने टाळणं शिकलं पाहिजे:
१. गोष्टी लांबणीवर टाकणे:
गोष्टीबद्दल विचार करत बसण्यापेक्षा त्यावर कृती करावी. ही सवय स्वतःला लावणं अत्यंत आवश्यक आहे. कोणतंही काम तुमच्या कक्षेत आलं की लगेच पूर्ण करूनच स्वस्थ बसायचं ही सवय स्वतःला लावून घ्या.
ह्यासाठी आधी तुम्हाला त्या कामाची गरज मनापासून पटलेली पाहिजे. एकदा गरज पटली की तुम्हाला ते काम करताना मजा सुद्धा वाटेल. गरज आहे ते स्वतःला क्लिअर करण्याची.
त्याही पुढे जाऊन स्वतःला ‘Why me ?’ पेक्षा ‘Why not me ?’ हे विचारायची सवय लावा. गोष्टी वेळच्या वेळी घडतील.
२. स्वतः बद्दल नकारात्मक भाष्य करणे:
कायम सकारात्मक रहा. सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा. एक लक्षात ठेवावं की, आपल्याबद्दल एखादी गोष्ट जी आपल्याला आवडत नाही तीच गोष्ट दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला प्रचंड आवडणारी असू शकते.
तेव्हा आधी तुम्ही स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा.
हे साध्य कसं करावं ?
प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ भाव मनात आणा.
स्वतःबद्दल कायम सकारात्मकच भाष्य करा आणि करायला लावा.
कोणत्याही गोष्टीबद्दल जजमेंटल होणं म्हणजेच गृहीत धरून मत बनवणं टाळा
टीका करताना अपेक्षित सुधारणा सांगून करा.
३. Perfection:
सतत प्रत्येक गोष्टीत परफेक्ट होण्याचा हट्ट टाळा. प्रयत्न जरूर करा पण ते तसं न घडल्यास नाराज होऊ नका.
४. Excuses:
कोणतंही काम तुम्हाला जर करता आलं नाही तर त्याचं कारण स्वतःला ३ वेळेस विचारा. तिसऱ्या वेळेस तुम्हाला खरं कारण कळेल.
तुमच्या मनातील ‘मी हे करू शकत नाही’ ला ‘मी हे कसं करू शकेन?’ने कायम स्वरूपी बदलून टाका.
५. तुलना:
स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या, इतरांच्या नाही. तुलना करत राहताल तर मजा कधीच घेऊ शकणार नाहीत. कोणाशी स्पर्धा करायची असेल तर ती तुमच्या भूतकाळाशी करा.
६. अस्वस्थ झोप:
तुमच्या शांत झोपेमध्ये येणारे सर्व अडथळे दूर करा. झोपायच्या एक तास आधी सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरणं बंद करा.
७. बाहेरचं खाणं:
सतत जंक फूड खाणं टाळाच. स्वतःचं जेवण स्वतः तयार करा. आपण खातो ते अन्न हे किती तरी रोगांचं कारण असतं आणि इलाजही.
८. वेळोवेळी मेसेजेस वाचत रहाणं:
एक ठराविक वेळ ठरवून घ्या आणि त्याच वेळात आलेल्या प्रत्येक मेसेज ला उत्तर द्यायची स्वतःला सवय लावा. तुमच्या फोन वर येणारे पण कामाचे नसणारे नोटिफिकेशन्स बंद करा.
९. दुसऱ्याला देण्याजोगी कामं स्वतः करत राहणे:
जी कामं तुम्ही दुसऱ्या कडून करून घेऊ शकतात ती करून घ्या. तुमचा वेळ हा चांगल्या कामासाठी वापरा.
१०. लांबलचक मीटिंग:
एका पाहणीत असं लक्षात आलंय की, जितकी जास्त मोठी मीटिंग, तितकं कमी त्याचं आउटपुट असतं. त्यामुळे कमी वेळेत मीटिंग संपवणं शिका.
त्यासाठी विषय आधीच निश्चित करा आणि त्या मुद्द्यावरून भरकटू नका.
११. सोशल मीडिया:
दिवसभरातील एक तासापेक्षा जास्त वेळ सोशल मीडिया वर घालवू नका. इन्स्टाग्राम वरील फोटो न बघण्याने तुमच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाहीये.
या सर्वांसाठी दिवसभरातील कोणताही एक तास ठेवा आणि तेव्हाच त्यांना तुमचा किमती वेळ द्या.
१२. चहाड्या करणे:
कोणाबद्दल चहाड्या करू नका आणि कोणी इतर करत असेल तर त्या ऐकत बसू नका. त्याने तुम्हाला काहीच निष्पन्न होणार नाहीये.
तुमचा वेळ हा फक्त सकारात्मक लोकांसोबत घालवा. नकारात्मक लोक शोधा आणि त्यांना हे समजू द्या की तुम्हाला ते तुमच्या आयुष्यात नको आहेत.
१३. वेळेचा अपव्यय :
जर का एखाद्या व्यक्तीकडे तुमच्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही सुद्धा त्याच्यासाठी वेळ काढू नका. नातं हे दोन्ही बाजूंनी असावं, अन्यथा नसावं.
कोणीही न सांगता त्याचा विरोध वाचायला शिका. तसंच, प्रत्येक वेळी तुमचा विरोध दर्शवायला शब्द शोधत बसू नका. तुमचा विरोध कृतीमधून दाखवा.
१४. कामाच्या वेळात इतरत्र वेळ देणं:
कामाच्या तासात तुमचं पूर्ण लक्ष हे तुमच्या कामाचा दर्जा अजून कसा सुधारता येईल फक्त या गोष्टीकडेच लक्ष द्या.
तुमची मेहनत ही कधीच वाया जाणार नाही. अपेक्षेपेक्षा जास्त मोबदला द्या.
१५. घरचा वेळ ऑफिस च्या कामाला देणं:
जेव्हा तुम्ही काम करतात तेव्हा कामच करा आणि जेव्हा तुम्ही मुलासोबत खेळत असाल तेव्हा फक्त खेळा.
दोन्ही गोष्टींना एकत्र करू नका. घरी आल्यावर ऑफिसचं काम (अत्यंत आवश्यक असल्याशिवाय) काढून बसू नका.
१६. प्रत्येकाला आनंदी करण्याचा प्रयत्न:
हे तुम्ही कधीच करू शकत नाही. त्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. हाती फक्त निराशाच येईल.
१७. गोष्टी न विसरणं:
गोष्टी विसरता येणं ही एक अत्यंत आवश्यक कला आहे जी की प्रत्येकाने शिकलीच पाहिजे. असं केल्याने तुम्हाला हलकं वाटेल आणि मनावर कोणतंही ओझं राहणार नाही.
हे फक्त इतरांच्या बाबतीतच न करता स्वतःच्या बाबतीत सुद्धा करा. जर का तुम्ही एखादी चूक भूतकाळात केली असेल तर त्यासाठी स्वतःला सुद्धा माफ करा. जगात कोणीच परफेक्ट नाहीये.
१८. तुमच्यातली कला विसरणे:
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी गोष्ट असते ज्या गोष्टीसाठी ती व्यक्ती कायम उत्साही असते.
तुमच्यासाठी ती गोष्ट कोणती ? ते आधी शोधा आणि त्या गोष्टीला, त्या कलेला न्याय द्या. त्याला विसरून जाऊ नका. त्या गोष्टीनेच तुम्हाला आयुष्य मनासारखं जगता येईल.
१९. फक्त स्वतःबद्दल विचार करणे:
तुम्ही या समाजाचा एक भाग आहात. तुम्हाला मिळालेल्या गोष्टी समाजा सोबत share करायला शिका. तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल.
फक्त स्वतःचा विचार कराल तर लवकरच निराश व्हाल कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे अपेक्षेने बघणं सुरू कराल.
२०. स्वतःचा विरोध करणे:
आपल्यातील काही गोष्टी या आपल्याला आवडत नसतात. जसं की, तुम्हाला जास्त उंची हवी होती पण तुम्ही बुटके आहात, जाड आहात, अशा वेळी ज्या परिस्थितीत तुम्ही आहात ती मान्य करा.
ती परिस्थिती तुम्हालाच मान्य नसेल तर ती इतरांना मान्य कशी असेल ? स्वतः चे लाडके बना, जगाचे लाडके आपोआप व्हाल.
‘नाही म्हणता येणं’ ही एक कला आहे. त्याचा कायम सराव करा. त्याच्यावर प्रभुत्व मिळवा. तुम्ही हे नक्कीच करू शकता.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.