लॉकडाऊन वाढलाय, घरी आंबे पण आहेत; तर आंब्याच्या या १२ डीशेस् एकदा ट्राय करून बघाच!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
मार्च १५, २०२०! शाळा, महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले. कारण अर्थातच कोविद-१९ म्हणजेच कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग!
भारतात ह्या व्हायरसने बळी घ्यायला सुरुवात केली मार्चमध्ये! सरकारने २२ मार्चला एक दिवसाचा टोटल लॉकडाऊन जाहिर झाला होता पण ह्या व्हायरसचे गांभीर्य लक्षात घेऊन १४ एप्रिल पर्यंत हा लॉकडाऊन वाढवण्यात आल्या.
सुरवातीला कुटुंबासह मिळणारा हा वेळ प्रत्येकाला सुखावह वाटत होता.
विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालय, ट्युशन, एक्ट्रा करिक्युलर ऍक्टिविटीज् मुळे वेळ नसायचा. पालकांना नोकरी, व्यवसाय यात बिझी असायचे. आता सगळेच घरात २४ तास असं पहिल्यांदाच होत असेल!
त्यामुळे एकमेकांना एकमेकांसाठी ‘क्वालिटी टाईम’ मिळाला. पण, नंतर नंतर परिस्थिती आणखीनच गंभीर होऊ लागली. त्यामुळे सगळ्यांची आनंदाची जागा आता काळजीने, चिंतेने घेतली.
घरातले वातावरण गंभीर होऊ लागले. घरचे ताजे, पौष्टिक अन्न खाण्या-पिण्याचे प्रमाण वाढले.
बाहेरचं अन्न हॉटेल्स् वगैरे बंद त्यामुळे मिळतही नाही आणि मिळालं तरी ते खाण्याची कोणाची इच्छा होत नाही, भीती वाटते.
मग काय! घरीच निरनिराळे पदार्थ तयार केले जाऊ लागले आणि तणावमुक्त होण्यासाठी सोशल मिडिया वर ‘चॅलेंजेस’ दिली जाऊ लागली.
आपण केलेल्या रेसिपीजचे फोटो शेअर करायचे आणि इतरांना टॅग करून चॅलेंज द्यायचं किंवा इतरांना कोणीतरी शेअर केलेले फोटो पाहून आपणही हे पदार्थ करावेत अशी प्रेरणा मिळायला लागली.
मग, जिलेबी, केक, पाव, पिझ्झा, बटाट्याचे चिप्स् आणि असे बरेच पदार्थ घरच्या घरी केले जाऊ लागले.
हे सगळे तर आहेच अजून एक दिलासा देणारी गोष्ट आहे आणि ती म्हणजे लॉकडाऊन असले तरीही बाजारात फळांचा राजा आंबा उपलब्ध आहे.
विटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी ह्यांनी समृद्ध असणारा हा आंबा आवडत नाही असा माणूस विरळाच!
असा सगळ्यांचा आवडता हा आंबा मोसमी फळ असल्याने एप्रिल, मे मधेच जास्त पिकतो आणि ह्या २ महिन्यातच खाल्ला गेला तरी त्यापासून मिळणारी ऊर्जा, व्हिटॅमिन्स् इत्यादी वर्षभर आपल्या शरीराची इम्युनिटी, प्रतिकार शक्ती वाढवते.
आपल्या शरीराला लाभदायक असणारा आणि चवीला देखील उत्तम असणारा हा आंबा कापून, रस काढून, पिळून-चोखून कसाही खाल्ला तरी कंटाळा येत नाही ह्याचा.
एव्हढंच नाही तर ह्या आंब्यापासून अनेक प्रकारचे चविष्ट आणि मन मोहवून टाकणारे पदार्थ तयार केले जातात.
जसं, आंबा पोळी, आंबा बर्फी, आइस्क्रीम, कुल्फी, केक, स्मुदी इत्यादी. आणि उन्हाळा असल्याने आइस्क्रीम्, कुल्फीला जास्त पसंती दिली जाते.
आज आपण असेच आंब्यापासून बनणारे भन्नाट पदार्थ बघुया ह्या लेखातून! आपणही हे पदार्थ करून सोशल मिडियावर चॅलेंज द्यायला तयार होऊया!
१) आंबा कुल्फी
उन्हाळ्यात आंबा आणि कुल्फी ह्या दोन्हीला खूपच पसंती दिली जाते. त्यामुळे ह्या दोन्हीचं कॉंबिनेशन असेल तर सोन्याहून पिवळं!
आंब्याचा गर, व्हाइट चॉकोलेट किंवा दूध (मिल्क पावडर), वेलची, साय, गुलाबाचे पाणी (ऐच्छिक) हे सगळं एकत्र करून घ्या.
आंबा आणि व्हाइट चॉकोलेट गोडच असतात पण, ज्यांना अधिक गोड हवे असेल त्यांनी साखर वापरली तरी चालते.
हे सगळं व्यवस्थित एकत्र करून कुल्फीच्या साच्यात ओतावे आणि फ्रिजरमधे साधारण ३ ते ४ तास सेट होण्यास ठेवावे, तयार होते गारेगार, मस्त ‘मॅंगो कुल्फी’!
२) मॅंगो मिल्कशेक
आंब्याचा गर, दूध, साखर (ऐच्छिक), बर्फाचे तुकडे हे सर्व मिक्सरमधून एकत्र करून घ्या आणि ग्लास मध्ये ओतून घ्या, तयार झाले आपले मॅंगो मिल्कशेक आणि ह्याला मस्त ट्विस्ट द्यायचा असेल तर ह्यात काजु, बदाम, बेदाणे आणि आंब्याचे तुकडे ह्या गोष्टी वरून घालायच्या (गार्निशिंग)!
चवीलाही मस्त लागतं आणि हे हेल्दी ड्रिंक नाश्त्याला एक उत्तम पर्याय आहे.
३) मॅंगो चोकोलेट स्मूदी
हा देखील नाश्त्याला उत्तम पर्याय आहे.
आंब्याचे तुकडे, आंब्याचे आइसक्रिम, चोकोलेट सॉस, दूध आणि चवीनुसार साखर एकत्र करून मिक्सर मधून काढायचे आणि ही स्मूदी चवीला तर छानच असते.
त्याशिवाय ह्यामध्ये फायबर, ऍंटीऑक्सिडेंटस् ह्याशिवाय व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर असते. एकदा नक्की ट्राय करा.
४) कैरीची भाजी किंवा मेथांबा
कैरीच्या फोडी, तेल, मोहरी, हिंग, मेथीचे दाणे, गूळ, तिखट आणि मीठ ह्या पदार्थांपासून बनणारा मेथांबा व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतो शिवाय मेथी आणि गूळ ह्यांच्यामुळे उन्हाळ्यात अत्यंत गुणकारी असतो.
कैरीची साल काढून फोडी कराव्यात आणि त्या उकडून घ्याव्यात नंतर ज्यप्रमाणे आपण भाजीला फोडणी करून घेतो तशी करून शिजवलेले कैरीचे तुकडे त्यात घालावेत गूळ घालावा आणि शेवटी चवीनुसार मीठ घालावं.
तयार झाला आंबट, गोड, तिकट, कडू आणि हेल्दी मेथांबा!
५) पन्हे
कैर्या सोलून उकडवून साखर किंवा गूळ, वेलची घालावी आणि पाणी घालून प्यायला तयार झाले पन्हे जे उन्हाळ्याची लाही, डिहायड्रेशन अशा उन्हाळ्यामुळे होणार्या विकारांवर उत्तम औषध ठरते.
ह्याचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
६) आंबा लस्सी
दही, आंब्याचा गर, साखर आणि बर्फ मिक्सरमधून काढा आणि थंडगार सर्व्ह करा.
हवी असल्यास वर ताजी साय घाला. उन्हाळ्यात हे पेय अतिशय गुणकारी ठरते. तब्येतीला खूपच चांगले असते.
७) मॅंगो आइसक्रीम
उन्हाळ्या सर्वांना हवेहवेसे वाटणारे आंबा आणि आइसक्रिम हे दोन्हीही पदार्थ एकत्र करून आणखीनच लज्जत वाढते.
कस्टर्ड पावडर, आंब्याचा गर, व्हिप्ड् क्रिम, साखर, थोडेसे दूध मिक्सर मधून काढून नंतर त्यात ड्राय फ्रुटस् आणि आंब्याचे तुकडे घालून फ्रिझरमध्ये ४-५ तास सेट करून थंडगार खा.
घरी केल्यामुळे भरपूर, हवे तितके करता येते.
८) आम्रखंड
भारतीय जेवणात मिष्टान्न म्हणून नेहेमीच असणारा एक पदार्थ म्हणजे श्रीखंड!
ह्यात आंब्याचा गर मिक्स करायचा. म्हणजेच चक्का, आंब्याचा गर, साखर एकत्र करायचे आणि श्रीखंडासारखे फिरवून घ्यावे वरून आंब्याचे काप घालावेत तयार झालं चविष्ट आम्रखंड!
९) मॅंगो पुडिंग
आंबा, नारळाचं दूध, आळशी (flaxseeds), पुदिना, सब्जा ह्यांचं हे पुडिंग चवीला तर मस्त असतंच शिवाय तब्येतीला पण चांगलं असतं.
१०) मॅंगो थिकशेक
मिल्क शेकसारखंच असणारं हे पेयं फक्त ह्यामध्ये साय आणि मॅंगो आइसक्रिम ह्यांचा वापर जास्त अस्तो आणि दूध अगदी थोडं असतं.
आंब्याचा गर मुख्य असतो आणि साखर, वेलची, साय, आइसक्रीम हे बाकीचे पदार्थ मिक्सरमधून काढून घेतलं की झालं तयार आपलं मॅंगो थिकशेक!
११) मॅंगो साल्सा
अतिशय हेल्दी, कलरफुल, डोळ्यांना सुखावणारा, जीभेची तृप्ती करणारा त्याच बरोबर तब्येतीला लाभदायक असणारा हा पदार्थ म्हणजे मॅंगो साल्सा.
भारतीयांची कोशिंबिर ज्यामध्ये आंब्याचे तुकडे, हिरवी शिमला मिरची, टॉमॅटो, भरपूर कोथिंबिर, हिरवी मिरची, लिंबू, मीठ हे एकत्र करोन घेतलं की जालं तयार मॅंगो साल्सा!
१२) मॅंगो कस्टर्ड
आंब्याचा गर, फुल क्रिम दूध, कस्टर्ड पावडर, आंब्याचे काप घ्या. दूध गरम करायला ठेवा. कस्टर्ड पावडर दूध घालून मिक्स करा म्हणजे एकजीव होते.
गरम दूधात पावडर घाला, मग मॅंगो पल्प, काप घाला. मिश्रण घटा होइपर्यंत गरम करत ढवळत रहा मग फिजमध्ये सेट करावं वरून काजू, बदाम, पिस्ता काप घाला.
झालं तयार आपलं कस्टर्ड!
सध्या लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडण्याची मनाई आहेच, पण अनेक दुकानंही बंद आहेत.
त्यामुळे या सगळ्या डिशेस बनविण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त खरेदीची गरज नाही.
आंबा, दुध, साखरं किंवा घरात अगदी सहज आढळणा-या पदार्थांच्या मदतीने या सगळ्या डिश नक्की तयार करता येतील.
आता पुन्हा एकदा कृती वाचा आणि घऱच्यांना हे गारेगार सरप्राईज देऊन खुश करा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.